फाळणीचे गुन्हेगार गांधी

गांधींनी देशावर फाळणी लादली. फाळणीच्या वेळी मुसलमानांनी लाखो हिंदूंची अमानुष कत्तल केली. या सर्व घटना पहाता गांधी भारताचे राष्ट्रपिता आहेत का, याचा निर्णय आता भारतियांनी घेणे आवश्यक आहे.

अ. `बॅ. जिनांनी `प्रत्यक्ष कृती’चा (direct action) निर्णय घोषित केला. मास (महिना) उलटत नाही, तोच कोलकाता अन् नौखाली येथे हिंदूंच्या कत्तलीचा फतवा पेटला. देशाच्या फाळणीचा ब्रिटिशांनी निर्णय घेतला. गांधींनी घोषणा केली की, देशाची फाळणी होण्याआधी माझ्या देहाचे तुकडे होतील. ही गोष्ट मार्च १९४७ ची ! काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. काँग्रेसच्या बैठकीला जाण्यासाठी गांधी दिल्लीला निघाले. त्या वेळी ते म्हणाले, “हरणारे युद्ध लढण्यासाठी मी दिल्लीला जातो आहे.”
आ. गांधी व्हाईसरॉयला भेटले आणि म्हणाले, “फाळणीमुळे शांतता प्रस्थापित होईल. फाळणी व्हायची, तर ती ब्रिटीश राजवटीखाली नको. आता प्रत्येक जण स्वातंत्र्यासाठी उतावीळ झाला आहे. त्यामुळे अन्य मार्ग नाही.”
इ. `दुबळयांच्या अहिंसेला मी खरी अहिंसा समजलो’, अशी स्वीकृती देणारे गांधी म्हणजे गांधींचा अहिंसावाद फोल ठरल्याचे लक्षण ! : `प्यारेलाल लिहितात, `गांधीजी स्नान करतांना म्हणाले, “फाळणीचा शिक्कामोर्तब आजच्या दिवशी होणार. फाळणीने देशाचे भवितव्य धोक्यात येणार आहे. दीडशे वर्षांची गुलामगिरी संपली खरी; पण स्वातंत्र्य फार काळ टिकेल, असे वाटत नाही. पूर्वी परमेश्‍वराने माझ्या दृष्टीवर पडदा टाकला. त्यामुळे दुबळयांच्या अहिंसेला मी खरी अहिंसा समजलो. आता माझ्यावरही अंधत्वाचा आघात केला असावा.”
ई. ४ जूनला प्रार्थनासभेत ते म्हणाले, “फाळणीची वस्तूस्थिती आता मान्य करायलाच हवी.”
उ. ४ जूनच्या प्रार्थना सभेत गांधी म्हणाले, “भारत द्विखंडित होत आहे, याविषयी फारच वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. तुम्ही मागितली म्हणूनच फाळणी मान्य झाली.”
ऊ. ५ जूनला ते म्हणाले, “फाळणी आता वस्तूस्थिती झाली आहे.”
ए. फाळणीचा दोष स्वत:वर नव्हे, तर जनतेवर लादणारे गांधी म्हणे महात्मा ! : ९ जूनला ते म्हणाले, “देशाची फाळणी म्हणजे माझ्या देहाचे तुकडे !’, हे माझे शब्द किती निरर्थक आणि फोल आहेत, हे दाखवून देऊन मी फाळणीला कसून विरोध करावा’, अशी पत्रे मला येत आहेत; परंतु फाळणीचा दोष माझ्यावर येतो, असे मला वाटत नाही. `देशाचे तुकडे करू नयेत’, असे मी म्हणालो होतो. त्या वेळी `सामान्य जनतेचा पाठिंबा मला आहे’, असा मला आत्मविश्‍वास होता; पण आता बहुमत विरोधात आहे, असे दिसल्यावर मी माझे मन लोकांवर का
लादावे ? `खोटेपणा आणि दुष्टपणा यांच्याशी तडजोड करू नये’, असे मी वारंवार सांगतो आहे. आज मी खात्रीने सांगतो की, सगळे मुस्लीमेतर माझ्या पाठीशी असते, तर मी फाळणी होऊ दिली नसती. आज बहुजन माझ्यासह नाहीत; म्हणून मला बाजूला होऊन थांबले पाहिजे.”
ऐ. दोन दिवसांनंतर हाच संदेश त्यांनी दिला. ते म्हणाले, “काँग्रेस कार्यकारिणी लोकांची अधिकृत प्रतिनिधी आहे. त्यांनी लोकांच्या जिवावरही हुंडी लादली आहे. ती स्वीकारणे आता लोकांचे कर्तव्य आहे. नंतर पाहिजे, तर ती कार्यकारिणीच पालटून टाकावी.”
ओ. एका प्रसंगी ते म्हणाले, “फाळणीच्या निर्णयाने मला आनंद झाला नाही; पण जगात आपल्या मनाविरुद्ध पुष्कळ गोष्टी घडतात आणि त्या चालवून घ्याव्या लागतात. ही फाळणी आपण तशीच खपवून घ्यायला हवी.”
औ. काँग्रेस कार्यकारिणीच्या महत्त्वाच्या बैठकीत ते म्हणाले, “फाळणीच्या मार्गात सभासद अथवा मी कोणीच आडवे येणार नाही.” या बैठकीनंतर अनेकांनी गांधींना छेडले. त्या वेळी गांधीचे उत्तर ठरलेले असे, “नेता किती करू शकेल, याला मर्यादा आहेत. एखाद्या गोष्टीकरता यातना भोगण्याचा निर्णय लोकच घेतात. अशा वेळी नेता त्यांना ओलांडून जाऊ शकत नाही.”
अं. काँग्रेस कार्यकारिणीच्या सभेत ते म्हणाले, “जनता म्हणजे तुम्हीच. जे घडेल ते तुम्हालाच पसंत आहे. जे पसंत नाही, ते तुम्हीच काँग्रेसला सभ्यभाषेत कळवू शकता.”
क. कार्यकारिणीत ते म्हणाले, “देशाच्या फाळणीने मला जितक्या वेदना झाल्या, तितक्या अन्य कोणालाही नसतील, हे तुम्ही मान्य करायला हवे.”
ख. काँग्रेस पक्षाला ते म्हणाले, “जे घडले, ते घडले. कार्यकारिणी काँग्रेसच्या वतीने कार्य करीत होती. तिचा ठराव तुम्ही फेटाळला, तर जग तुम्हाला दायित्वशून्य म्हणेल. दुसरा मार्ग नव्हता; म्हणून नेत्यांनी फाळणी स्वीकारली.”
ग. हिंदुद्रोही निर्णय घेतांना सवंग लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी वारंवार आमरण उपोषण करणार्‍या गांधींनी फाळणी रोखण्यासाठी मात्र आमरण उपोषण न करणे
पत्रकार : `गांधीजी ! `देशाचे तुकडे म्हणजे माझ्या देहाचे तुकडे’, असे आपण वारंवार सांगत होता ना ? आता फाळणी झाली आहे. आता तुम्ही आमरण उपोषण का करत नाही ? फाळणी थांबविण्यासाठी आपण धर्मयुद्ध का करत नाही ?
गांधी : उपोषण करावे, असा आम्हाला आतून आदेश येत नाही. काँग्रेस ही राष्ट्रीय सभा आहे आणि मी तिचा सेवक आहे. काँग्रेसने फाळणी स्वीकारली आहे. आता मी उपोषण केले, तर प्रत्येक निर्णयाची सक्‍ती मी काँग्रेसवर करतो, असे होईल. काही झाले तरी फाळणी ही काळया दगडावरची रेघ आहे. घटना समित्या स्थापन झालेल्या आहेत. त्या रद्द करण्याकरता मी मरावे का ? अशा तर्‍हेने मी मरणार नाही.
घ. फाळणी होण्यासाठी मुसलमान हिंसाचार करत असतांना त्यांना नव्हे, तर सर्व भारतियांना `जातीयवादी’ संबोधून त्यांना फाळणीचे गुन्हेगार ठरवणारे गांधी !
हिंदू-मुसलमान एकमेकांचे मुडदे पाडत होते. कोलकात्यात प्रचंड हत्याकांड झाले. गांधी तिथे आले, त्या वेळी पुढील संवाद झाला.
एन््.के. बोस : कार्यकारिणीच्या फाळणीच्या ठरावाला तुम्ही पाठिंबा दिला होता. याचा अर्थ फाळणी अगोदर स्वीकारणार्‍या नेत्यांना संरक्षण देणे, हाच तुमचा हेतू नव्हता का ?
गांधी : त्याचा तसा अर्थ करता येईल; पण ते खरे नव्हे. मी लढणार तरी कोणाविरुद्ध ? वर्षभर जातीय दंगली चालू आहेत. सगळे भारतीय जातीयवादी झाले आहेत. जातीय विवादापलीकडे त्यांना काहीच दिसत नाही. सगळया देशाच्या या भावनांचे प्रतिबिंब काँग्रेसमध्ये पडले आहे. त्याला मी विरोध कसा करणार ?”
च. काँग्रेसला फाळणीचा निर्णय पालटण्यास भाग न पाडणारे गांधी म्हणजे फाळणीचे समर्थक !
एन्.के. बोस : `फाळणी चुकीची आहे, हे माहीत असतांना तुम्ही काँग्रेसला तिचा निर्णय पालटण्यास भाग का नाही पाडले ?
गांधी : निर्णयाला पाठिंबा देणे चूक कि बरोबर, हे केवळ काळच ठरवू शकेल ! मी विरोध करण्याला परिस्थिती अनुकूल नव्हती.
बोस : तुम्ही परिस्थिती निर्माण करू शकला नसता का ? यापूर्वी तुम्ही तसे केले आहे.
गांधीजी : आयुष्यात मी कधीही परिस्थिती निर्माण केली नाही. तुमच्यापैकी अनेकांकडे नाही, असा एक गुण माझ्यात आहे. सामान्य जनतेच्या मनातील खळबळ मला अंर्त:प्रेरणेने समजू शकते. त्यानुसार मी कार्यक्रम आखतो. ते प्रतिसाद देतात. आज तशी शुद्ध भावना माणसात असल्याचे चिन्ह मला दिसत नाही.’
अरुण शौरी यांच्या `रिलीजन इन पॉलीटिक्स’ (Religion in
politics) या ग्रंथात फाळणीच्या संदर्भात विस्तृत विवेचन आले आहे. जिज्ञासूंनी ते पहावे.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

`भारतखंड द्विखंड नव्हे त्रिखंड झाला ! अखंड भारतमूर्ती दुभंगली ! भग्न मूर्तीचे षोडषोपचार किती दिवस करत रहाणार ? ती मूर्ती का षोडषोपचारांनी साजरी होईल ? ती पुन: एकजीव केल्याविना तिच्यात जिवंत राष्ट्राची प्रार्णैंातिष्ठा कशी होईल ?’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

दलितांना `हरिजन’ म्हणून दलितांचा अपमान करणारे गांधी !
`हरिजन कार्याकरता गांधींनी देशाला जुंपले. दलित सांगतात, “हरिजन म्हणजे देवाला वाहिलेल्या स्त्रियांची (गणिकेची) अपत्ये. गांधींनी दलितांना `हरिजन’ म्हणून दलितांचा अपमान केला.” दिल्लीत यमुनेच्या तिरावर गांधी-समाधीसमोर जी अखंड ज्योत आहे, ती बहुजन समाजवादी पक्षाचे संस्थापक काशीराम यांनी लाथ मारून विझवली. आफ्रिकेत जोहान्सबर्गला तिथले शासन कोटी रुपये खर्चून गांधींचा पुतळा उभारणार होते. हिंदुस्थानातील दलितांनी कडाडून विरोध केला. आफ्रिकन शासनाने ती योजना रद्द केली.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

source :http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2009-10-02&action=fullnews&catid=3&id=24530

Leave a Reply