दंगलीचा सूत्रधार मूर्तीभंजक इम्रान नदाफ याला अटक !
एकट्या इम्रानला अटक करून सहस्रावधी दंगलखोर मुसलमानांना दोषमुक्त करणारी काँग्रेस !
कोल्हापूर, ११ सप्टेंबर (वार्ता.) – अफझलखान वधाच्या चित्राचे भांडवल करत मिरज येथे दंगल घडवण्याचा कट रचणार्या इम्रान हसन नदाफ (वय ३० वर्षे, र. नदाफ मशिदीनजीक, मिरज) या दंगलीच्या मुख्य सूत्रधाराला सांगलीतील पोलिसांनी कोल्हापूर येथील पोलिसांच्या साहाय्याने गुरुवारी येथे पकडले.
(दंगलीतील मुख्य सूत्रधाराला दंगलीनंतर आठ दिवसांनी अटक करणारे पोलीस अतीप्रगत प्रशिक्षण घेतलेल्या छुप्या आतंकवाद्यांना शोधण्यास किती वेळ घेतील ? – संपादक)

हाच तो इम्रान नदाफ
नदाफने भिवंडीसह मिरजेतील काही स्थानिक मुसलमान गुंडांच्या साहाय्याने हा कट रचला होता. त्याला पकडल्यानंतर मारहाण करत पोलिसांनी त्याची धिंड काढली.
दंगलीनंतर इम्रान पुन्हा गुजरातला पळून जाण्याच्या बेतात होता. बुधवारी सायंकाळी तो कोल्हापूर येथे आला. मिरजेतील काही अनैतिक व्यवसाय करणार्यांशी संपर्क साधून त्याने आर्थिक साहाय्याची मागणी केली. ही माहिती मिळताच अपर पोलीस महासंचालक शिवप्रतापसिंह यादव यांच्या सूचनेनुसार सांगली पोलिसांनी कोल्हापूर पोलीसयंत्रणेशी संपर्क साधून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यादव यांनी दोन तास इम्रानची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. इम्रानने दंगल घडवण्याच्या हेतूने मिरजेतील श्रीकांत चौकात मुसलमानांच्या जमावासमोर चिथावणीखोर वक्तव्य करून घोषणाबाजी केली. शिवाय जमीर फौलाद याच्या हातात हिरवा झेंडा देऊन जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णप्रकाश यांच्यासह अन्य अधिकारी आणि पोलीस यांच्या डोळयांदेखत पोलिसांच्या गाडीवर चढून धिंगाणा घालण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर उसळलेल्या दंगलीत इम्रानने हिंदु एकता आंदोलनाच्या स्वागत कमानीची मोडतोड केली. जवळच असलेल्या महाराणा प्रताप गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीवर दगडफेक करून तिची विटंबना केली. गणेशोत्सव मंडळाच्या कमानीचा फलक काढून पायाने तुडवत नासधूस केली, असे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.
इम्रान गेल्या काही वर्षांपासून भिवंडीसह गुजरात राज्यातील सूरत जिल्ह्यातील नवसारी येथे रहात होता. नवसारी येथील काही दंगली घडवणार्या गुन्हेगारी टोळयांशी त्याचा संपर्क होता. जमावाला भडकवणे आणि चिथावणी देण्याचे त्याने प्रशिक्षण घेतल्याचेही पोलिसांच्या चौकशीतून पुढे आले आहे. गुजरात येथून तो कोल्हापूर येथे आला. तेथे दोन वर्षे, तर उदगाव (तालुका शिरोळ) येथे एक वर्ष त्याने धार्मिक शिक्षण घेतले. नदाफ हा मूळचा मिरजेचा, किणी वाठार (तालुका हातकणंगले) ही त्याची सासूरवाडी.त्याचे मिरजेतील कमान लावण्याच्या सर्व घटनांवर बारीक लक्ष होते. अफझलखान वधाचे चित्र लावताच दंगल करण्याचे त्याचे नियोजन होते. त्याने भिवंडी येथील काही गुन्हेगारांसह मिरजेतील काही सराईत गुंडांशी संपर्क करून जुळवाजुळव केली. चार-पाच दिवस याच प्रयत्नात तो होता. त्यासाठी त्याने त्याच्या साथीदारासमवेत दोन-तीन वेळा बैठकाही घेतल्या. त्याला दंगलीची पूर्ण ध्वनीचित्रफित दाखवून त्याच्या पळून गेलेल्या तीन साथीदारांची नावे पोलिसांनी मिळवली आहेत. जमीर फौलाद याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. त्याचबरोबर इम्रानला मदत करणारा आणि पंधरा वर्षांपूर्वी हिंदु एकताचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित मेहबूब पिरजादे यालाही पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
| मित्रांना पाठवा | 62 – वाचक संख्या | छापील प्रत
निगडीत वृत्त : धर्मांध मुसलमान
जिहादी आतंकवाद्यांकडून केरळमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींना प्रेमाचे आमिष ! : 2009-09-09
विसर्जन मिरवणुकीवरील मुसलमानांच्या दगडफेकीमुळे गणेशमूर्ती दुखावली; पोलिसांची अन्याय्य कारवाई : 2009-09-06
कुराणाची विटंबना केल्याच्या अफवेवरून मुसलमानांनी केलेल्या हिंसाचारात ६ ख्रिस्त्यांना जाळले ! : 2009-08-11
विवाहित मुसलमानाकडून हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीशी लग्न ! : 2009-08-04
बांगलादेशमध्ये हिंदूंच्या घरांची पोलिसांकडून नासधूस : 2009-08-03
जामखेड (जिल्हा नगर) येथे नागपंचमीनिमित्तच्या यात्रेत मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण ! : 2009-08-02
मध्यप्रदेशातील शाळांत भोजनापूर्वी प्रार्थना करण्यास मुसलमान आणि ख्रिस्ती यांचा आक्षेप ! : 2009-07-31
भारताबरोबरच्या चर्चेत सामावून घेण्याची `आयएस्आय’ची मागणी : 2009-07-24
पाकमधील वृत्तपत्रांकडून भारताची बदनामी ! : 2009-07-24
आता भारतात भगवा झेंडा फडकवण्यास मुसलमानांकडून बंदी, : 2009-07-13


