धुळे दंगलीतील मुसलमानांना व्यवसायांच्या पुनरुज्जीवनासाठी २ कोटी

मशिदींवरील भोग्यांवर कारवाई का नाही ?


मशिदींवरील भोग्यांवर कारवाई का नाही ? – भाजप

मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्‍तीभावाने साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव महिन्याभरावर आला असतांना मुंबई महापालिकेने शहरातील दोन सहस्रांहून अधिक ठिकाणे `शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित केली आहे. तथापी हाच नियम मशिदींवरील भोंग्यांना कधीच का लावण्यात आला नाही, असा संतप्‍त प्रश्‍न मुंबई भाजपचे अध्यक्ष श्री. गोपाळ शेट्टी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

श्री. शेट्टी यांनी पुढे म्हटले आहे की, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करून समाज संघटित करत वाईट प्रवृत्तींच्या विरोधात, तसेच स्वातंत्र्य लढ्यात मोठेच योगदान दिले आहे; परंतु विद्यमान काँग्रेसप्रमाणे शासनाने गरीबी, भ्रष्टाचार, महागाई अन् मुसलमानांचे तुष्टीकरण याशिवाय काहीच दिलेले नाही. त्यामुळे समाजाने संघटित होऊन या प्रवृत्तींच्या विरोधात लढा देणे क्रमप्राप्‍त आहे. तथापी महापालिका आयुक्‍तांनी आघाडी सरकारच्या तालावर नाचत कायद्यावर बोट ठेवले आहे. अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी पर्यायाने मतांच्या लाचारीसाठी हिंदूंच्या भावनांचा अनादर केला जात आहे. त्याचबरोबर समाजात जातीय तेढ निर्माण करून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा कुटील डाव खेळण्यात येत आहे; परंतु आघाडी शासनाचा हा आटापिटा आम्ही कदापी सहन करणार नाही, अशी चेतावणीही श्री. गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे.

सिमीच्या चार अतिरेक्यांना सोडण्याची पोलिसांचीच न्यायालयाकडे मागणी

सिमीच्या चार अतिरेक्यांना सोडण्याची पोलिसांचीच न्यायालयाकडे मागणी

`मुसलमानधार्जिणे काँग्रेस शासन मतांसाठी अतिरेक्यांनाही सोडेल’, हे सनातनचे भाकित खरे ठरले !

न्यायालयाकडून पुन्हा चौकशी करण्याचे आदेश

अकोला, २६ जुलै – काही दिवसांपूर्वी मूर्तीजापूर येथे अटक करण्यात आलेल्या सिमीच्या ४ अतिरेक्यांची सुटका करावी, अशी मागणी स्वत: अकोला येथील पोलिसांनीच येथील न्यायालयात आज केली. या आरोपींच्या विरोधात पुरावा नसल्याने त्यांची मुक्‍तता करण्यात यावी, अशा आशयाचा अर्ज पोलिसांनी आज न्यायालयात केला.

(एरव्ही छोट्या छोट्या प्रकरणांत आवश्यकता नसली तरी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी करणारे पोलीस अतिरेक्यांना `सोडून द्या’ असे स्वत:हून सांगत आहेत. म्हणजे मुसलमानधार्जिण्या काँग्रेस शासनाची अतिरेक्यांवर कारवाई करण्याची इच्छाशक्‍ती नाही ! – संपादक) यावर न्यायालयाने पोलिसांना फटकारत `या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी’, असा आदेश दिला. पोलिसांनी अचानक असा अर्ज केल्याने त्यांच्यावर राजकीय दबाव आल्याची चर्चा आहे. अकोला येथे सिमी या बंदी घातलेल्या संघटनेची गुप्‍त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ३० ते ४० जण उपस्थित होते, अशी माहिती गुप्‍तचर विभागाने दिल्यावर अकोला पोलिसांनी एका इंडिका गाडीतून जाणार्‍या चार जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे आणि आक्षेपार्ह साहित्य हस्तगत करण्यात आले होते. त्यांच्या चौकशी केल्यानंतर त्या माहितीवरून पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली होती; मात्र या घटनेनंतर काँग्रेस आघाडी शासनातील गृहराज्यमंत्री नसीम खान यांनी अटक करण्यात आलेले सिमीचे कार्यकर्ते निरपराध असल्याचे सांगत त्यांना सोडण्याचा आदेश पोलिसांना दिल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी यांनीही एका शिष्टमंडळाद्वारे गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन या कार्यकर्त्यांची सुटका करण्याची मागणी केली होती. (अशा राष्ट्रघातकी मुसलमान नेत्यांना राष्ट्रप्रेमींचे शासन आल्यावर कठोर शिक्षा करता येईल ! – संपादक)

अबू आझमी यांचे राष्ट्रघातकी फुत्कार !
म्हणे सिमीच्या कार्यकर्त्यांची सुटका करा !
मुंबई – गेल्या काही दिवसांत विदर्भातील अकोला आणि अन्य शहरांतून अटक करण्यात आलेल्या `सिमी’ (स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) या बंदी असलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची सुटका केली जावी, तसेच या कार्यकर्त्यांना अटक करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी शासनाकडे केली आहे. (ही मागणी म्हणजे `चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार आहे. असे करणार्‍या आझमी यांच्यावरच प्रथम कठोर कारवाई करणारे राज्यकर्ते मिळण्यासाठी वैचारिक क्रांतीला पर्याय नाही ! – संपादक) आझमी यांच्या नेतृत्वाखाली `कौमी-मझलीस-ए-शुरा’ या संस्थेच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांची नुकतीच भेट घेऊन सिमीच्या कार्यकर्त्यांची सुटका करण्याची मागणी केली. “हे कार्यकर्ते निरपराध असून त्यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे”, असा कांगावा आझमी यांनी राऊत यांच्यासमोर केला. (सिमीचे कार्यकर्ते अपराधी कि निरपराधी, हे यथावकाश न्यायालयात स्पष्ट होईलच. यामध्ये आझमी यांचा हस्तक्षेप कशासाठी ? लोकहो, सिमीचे कार्यकर्ते मुसलमान आहेत, म्हणून त्यांची तळी उचलणार्‍या या धर्मांध लोकप्रतिनिधींना जाब विचारा ! – संपादक)

कोण म्हणतो भाकित खोटे असते ?
विज्ञानवादी पर्यावरण खात्याचे पावसाचे अंदाज खोटे ठरतात; पण सनातनने केलेली सर्व भाकिते खरी ठरत आहेत. `मुसलमानधार्जिणे काँग्रेस शासन मतांसाठी अतिरेक्यांनाही सोडेल’, हेही सनातनचे भाकित खरे ठरले ! भाकितांना `भाकडकथा’ म्हणणारी अंनिस काळाच्या ओघात नष्ट होईल, हे अजून एक सनातनने वर्तवलेले भाकित आहे.

निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !

घुसखोरी करण्यासाठी पाकने कारगिलची निवड का केली ?

घुसखोरी करण्यासाठी पाकने कारगिलची निवड का केली ?

१. हिवाळयात या भागाच्या रक्षणासाठी भारताचे सैनिक नसतात.
२. हा प्रदेश समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर असल्याने येथील हवामान विरळ असते. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान दहा दिवस योग्य पद्धतीने सराव करावा लागतो. तसे न केल्यास सैनिक मृत्यू पावण्याची शक्यता खूप असते. (१९६२ च्या युद्धात चिन्यांनी आपले जितके सैनिक मारले, त्याच्या दुपटीहून अधिक सैनिक ही दक्षता घेतली न गेल्याने प्राणाला मुकले होते.) यामुळे लढाईला सुरुवात झाली तरी सुरुवातीचे १० दिवस भारत जोराचा प्रतिहल्ला करू शकणार नाही.

३. श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर कब्जा मिळवून लडाखचा उर्वरित देशाशी जमिनीवरील संपर्क संपूर्णरीत्या तोडता येईल. घुसखोरांनी काही काळ श्रीनगर-लेह वाहतूक बंद
पाडल्यानंतर सरकारला थोडीफार जाग आली व काश्मीरचे मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी लेहकडे जाणारा सोनकूमार्गे दुसरा सुरक्षित मार्ग बांधण्यात येईल, अशी घोषणा केली !
४. लडाख हा चीनच्या सीमेवरील प्रदेश आहे.
(संदर्भ : सनातन-निर्मित `कारगिलची लढाई’ या ग्रंथातून)

निगडीत वृत्त : मेरा भारत महान

मुंबई पोलिसांकडून कसाबला सदरा अन् पायजामा भेट !

मुंबई पोलिसांकडून कसाबला सदरा अन् पायजामा भेट !

मुंबई, १८ जुलै – २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील आतंकवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत अटक करण्यात आलेला पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अन् त्याला सुरक्षा देणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांनी सदरा अन् पायजमा भेट दिल्याचे काल विशेष न्यायालयात उघड झाले.(मालेगाव बाँबस्फोटातील संशयीत आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांना आत्महत्येला प्रेरित होईपर्यंत छळ करणारे पोलीस पोलिसांनाच ठार मारणार्‍या पाकिस्तानी अतिरेक्याचे लाड करत आहेत, ही घटना लोकशाहीची निरर्थकताच स्पष्ट करते ! – संपादक)

| मित्रांना पाठवा | - वाचक संख्या 25 – वाचक संख्या | छापील प्रत

निगडीत वृत्त : पोलिसी मनोवृत्तीची चुणूक

राज्यात मुसलमानांसाठी ३५ `आयटीआय’ सुरू करणार – उच्च तंत्रशिक्षणमंत्री

राज्यात मुसलमानांसाठी ३५ `आयटीआय’ सुरू करणार – उच्च तंत्रशिक्षणमंत्री

मुसलमानप्रेमाने आंधळे झालेले काँग्रेसचे आघाडी सरकार !

संभाजीनगर, १६ जुलै – मुसलमानांचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्‍न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुसलमानबहुल जिल्हे अन् तालुक्यांच्या ठिकाणी मुसलमानांसाठी ३५ स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू केल्या जाणार आहेत, अशी घोषणा उच्च तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी येथे केली.

(हिंदूंनो, करदात्या हिंदूंचा पैसा स्वत:च्या वडिलांची मिळकत असल्याप्रमाणे मुसलमानांवर उधळणार्‍या हिंदुद्रोही काँग्रेसला येत्या निवडणुकीत धडा शिकवा ! – संपादक) अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या प्रसंगी ते बोलत होते. टोपे पुढे म्हणाले की, या संमेलनाने मुसलमानांना दिशा देण्याचे काम केले आहे. संमेलनासाठी शासनाकडून मानधन दिले जाते. तसेच साहित्यिकांच्या उदरनिर्वाहासाठीही मानधन देण्याचा विचार पुढे आला पाहिजे. (असा विचार मुसलमानांकडूनच पुढे यायची अपेक्षा का ? हिंदु साहित्यिकांना उदरनिर्वाहाची गरज नाही का ? – संपादक) मुसलमान समाजाने स्त्रीशिक्षणालाही तेवढेच महत्त्व द्यावे. स्त्रियांना बरोबरीची वागणूक दिली पाहिजे. ममता, मानवता आणि बंधुत्व वाढीस लागण्यासाठी प्रयत्‍न व्हावेत, असे त्यांनी सांगितले.

मित्रांना पाठवा- वाचक संख्या 32 – वाचक संख्या |  छापील प्रत

निगडीत वृत्त : मुसलमानांच्या लांगूलचालनाची एकही संधी न सोडणारे राजकारणी

समाज, राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणाबरोबरच स्वत:च्या आध्यात्मिक उन्नतीसाठी सनातनच्या कार्यात सहभागी व्हा !

समाज, राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणाबरोबरच स्वत:च्या आध्यात्मिक उन्नतीसाठी सनातनच्या कार्यात सहभागी व्हा !

साधनेचे समष्टी अंग प्रचलित करणारी सनातन संस्था !

समाज, धर्म व राष्ट्र हितार्थ संस्थेचे अथक प्रयत्‍न !

*धर्माचरणी समाजाच्या निर्मितीसाठी सत्संग वैयक्‍तिक आध्यात्मिक उन्नत्तीसाठी मार्गदर्शन
* देश-विदेशांत दर महिन्याला १ हजार ३१५ सत्संगांचे आयोजन
* अवघ्या १० वर्षांत ५ साधक संतपदाला पोहोचले

प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेच्या स्थापनेपासूनच ईश्‍वरप्राप्‍तीसाठी समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व असल्याचे आणि ही साधना करण्यासाठी ३० टक्के महत्त्व असलेल्या व्यष्टी साधनेचा पाया भक्कम असणे आवश्यक असल्याचे साधकांच्या मनावर बिंबवले. प.पू. डॉक्टरांनी लावलेल्या या गुरुकृपायोगारूपी शिकवणीच्या सनातनरुपी बीजाला आज दोन दशके पूर्ण होत असतांना तिचा कल्पवृक्ष विविध उपक्रमांच्या माध्यमांतून अधिकाधिक बहरत आहे. हा कल्पवृक्ष समाज, राष्ट्र व धर्म यांच्या हितार्थ काही करू इछिणार्‍यांना आधाराची सावली व कृतीशीलतेचे बळ देत आहे. या गुरुकृपायोगरुपी साधनेच्या वृक्षाला केवळ समाज, राष्ट्र व धर्म यांच्यातील जागृतीचीच नव्हे, तर साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचीही फळे येत आहेत. ही फळे चाखण्यासाठी आपणही सनातन संस्थेच्या विविध उपक्रमांत सहभागी होऊ शकता.


सुसंस्कारीत पिढीच्या निर्मितीसाठी संस्कारवर्ग

  • सुलभ भाषेतून धर्मशिक्षण, स्वभावदोष-निर्मूलन व गुणवृद्धी यांवर लहान व किशोरवयीन मुलांना विनामूल्य मार्गदर्शन
  • दर महिन्याला ३१३ ठिकाणी बालसंस्कार वर्ग
  • धार्मिक विधी साधना म्हणून करणारे साधक-पुरोहित निर्माण करणारा उपक्रम
    स्थळ : सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा


    संस्थेचे अद्वितीय अध्यात्मिक संशोधन

    समष्टी साधना करणार्‍या प्रत्येकाला चैतन्य पुरवणारे प.पू. डॉक्टरांचे वचन त्यांच्याच हस्ताक्षरात…

    सनातनच्या धर्मप्रसाराच्या उपक्रमांत सहभाग म्हणजे धर्माचरण !

    ज्वलंत हिंदुत्ववादी नियतकालिके सनतन प्रभात

    * दैनिक (मराठी – चार आवृत्त्या) * साप्‍ताहिक (मराठी व कन्नड)
    * मासिक (हिंदी, गुजराती व इंग्रजी) * संकेतस्थळ – www.sanatan.org

    समाजातील सध्याची वर्तमानपत्रे राष्ट्र आणि धर्म यांबाबत जागृती करण्यास अपयशी ठरली आहेत. अशा स्थितीत केवळ राष्ट्र व धर्म हित डोळयांसमोर ठेवून आर्थिक हानी सोसूनही दशकपूर्तीकडे वाटचाल करणारे `सनातन प्रभात’ समाजाला धर्माचरण व धर्मरक्षण यांसाठी प्रवृत्त करण्याची समष्टी साधना करत आहे !

    वैशिष्ट्ये
    १. हिंदुसंघटन, धर्मशिक्षण, तसेच राष्ट्रद्रोही व धर्मद्रोही यांविरुद्ध लढा यांसाठी कार्यरत २. सदैव सत्याचे अधिष्ठान असलेली ३. संतांचे शुभाशीर्वाद लाभलेली ४. केवळ प्रबोधन करणारी नाही, तर कृतीशील बनवणारी ५. समाजाला साधनेला उद्युक्‍त करणारी.


    सनातन संस्थेच्या विनामूल्य उपक्रमांत स्वयंसेवक, प्रायोजक वा अन्य हेतूने सहभागी व्हा !

    शैक्षणिक उपक्रम

    प्रश्‍नमंजुषा : भावी पिढी संस्कारक्षम व राष्ट्राभिमानी होण्यासाठी राष्ट्रीय दिन, सण व धार्मिक उत्सव यांचे औचित्य साधून शाळांमध्ये आयोजन
    गेल्या वर्षभरात १,३१३ शाळांमधील १ लाख १३ हजार ७३ विद्यार्थ्यांना प्रश्‍नमंजुषा उपक्रमाचा लाभ
    निवासी शिबिरे : दिवाळी व उन्हाळयाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण, व्यक्‍तिमत्त्व विकास यांसारख्या निवासी शिबिरांचे आयोजन
    गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब विद्यार्थ्यांना लेखनसाहित्य व गणवेश वाटप

    सामाजिक उपक्रम

  • तणावमुक्‍ती व व्यसनमुक्‍ती या विषयांवर प्रवचने
  • अनाथाश्रम व वृद्धाश्रम यांना आवश्यक वस्तूंचे वाटप
  • आपत्कालिन प्रशिक्षण शिबीर
  • वृक्षारोपण
  • अन्नदान
  • चष्मेवाटप
  • अग्निशमन प्रशिक्षण शिबीर
  • आदीवासींना कपड्यांचे वाटपवैद्यकीय उपक्रम
    आपत्कालात जखमींवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गांचे आयोजन
  • रक्‍ततपासणी
  • मोतीबिंदू चिकित्सा
  • दंतचिकित्सा
  • नेत्रचिकित्सा लसीकरण

    | मित्रांना पाठवा | - वाचक संख्या 7 – वाचक संख्या | छापील प्रत

  • निगडीत वृत्त : सनातनचे उपक्रम

    काँग्रेसचा विजय संशयास्पद ठरवणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे !

    काँग्रेसचा विजय संशयास्पद ठरवणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे !

    मतदानासाठी वापरण्यात आलेली यंत्रे सदोष असणे, हे काँग्रेसच्या अविश्‍वासार्हतेचे लक्षण !

    मतदानासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ही सदोष असल्यामुळे ती तडीपार करावीत, अशा १ सहस्रहून अधिक तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या. `ही यंत्रे सदोष असल्याचे सिद्ध झाले, तर काँग्रेस शासनाच्या विजयावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होईल’ या भीतीने मुख्य निवडणूक आयुक्‍त आणि `सोनियासेवक’ नवीन चावला यांनी या तक्रारींकडे कानाडोळा केला.

     

    निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचेच एक अविभाज्य अंग समजले जाते. या प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणार्‍या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबद्दलच जनतेच्या मनात संशय आहे, हे समजल्यावर काँग्रेस शासनाने त्याबाबत तत्परतेने कारवाई करणे आवश्यक होते; मात्र असे झाले नाही. काँग्रेस हे प्रकरण `दाबणार’, असे वाटत असतांनाच ज्येष्ठ सनदी अधिकारी असलेल्या ओमेश सैगल यांनी ही यंत्रे सदोष कशी आहेत, याचे प्रात्यक्षिकच करून दाखवले; त्यामुळे `सोनियासेवक’ नवीन चावला यांचे धाबे दणाणले आणि लोकलज्जेखातर त्यांनी या यंत्रांच्या चौकशीचे आदेश दिला. या सर्व प्रकरणात भारतीय जनता मात्र अस्वस्थ आहे. ही यंत्रे सदोष असल्याचे २००० सालीच उघड झाले होते. असे असतांनाही त्या यंत्रांच्या वापराबद्दल ठोस निर्णय घेण्यात आला नाही. ही यंत्रे सदोष असल्यामुळे अमेरिका, जर्मनी आदी ११ देशांनी ही यंत्रे तडीपार केली. पाश्चात्त्यांमध्ये एखादी गोष्ट रूढ झाली की, ती भारतियांच्या माथी मारायची, हे काँग्रेसचे धोरण आहे. त्यामुळेच `पाश्चात्त्य देशांना समलिंगी संबंध मान्य आहेत, म्हणून ते भारतियांनीही मान्य करावेत’, असा काँग्रेसचा अट्टाहास आहे. असे आहे तर, पाश्चात्त्य देशांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे तडीपार केली असतांना ती भारतातूनही तडीपार करणार, ही भूमिका काँग्रेस का घेत नाही ? या यंत्रांच्या वापराबाबत एकट्या तामिळनाडू राज्यात १२ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत; शिवाय देशात इतर ठिकाणी दाखल झालेल्या याचिका वेगळयाच ! असे असतांनाही काँग्रेसवाले या यंत्रांचे गोडवे गातांना थकत नाहीत ! यावरून या यंत्रांच्या वापरामागे काँग्रेसचे हित दडले आहे, हे स्पष्ट होते. `सध्या भारतात सत्तेवर असलेले काँग्रेस शासन हे लोकांनी निवडून दिलेले आहे कि सदोष यंत्रांच्या साहाय्यामुळे निवडून आले आहे’, या शंकेने भारतियांना ग्रासले आहे. जिथे संशय आणि शंका आहे, तिथे विश्‍वासार्हता नाही. लोकशाहीच्या सूत्राप्रमाणे विश्‍वासार्हता गमावलेल्या अशा शासनाला राज्य करण्याचा अधिकार नाही. लोकशाहीची सूत्रे पूर्णपणे विसरलेल्या काँग्रेसला त्याची जागा दाखवण्यासाठी आता लोकांनी वैचारिक क्रांतीचा मार्ग चोखाळावा !

      निगडीत वृत्त : मेरा भारत महान