मोहनदास गांधी यांनी केलेल्या अक्षम्य चुकांमुळे स्वातंत्र्यानंतरची ६२ वर्षे उलटली, तरी देश अजूनही सुखाने जगत नाही. मुसलमानांच्या तुष्टीकरणाचे बीज गांधींनी रोवले. आज त्याचा वृक्ष होऊन त्याच्या गडद काळया छायेखाली संपूर्ण देश झाकला गेला आहे. गांधींचा वध झाल्यानंतर नथुराम गोडसे यांना दोषी ठरवून त्यांना फाशी देण्यात आले. त्या वेळी गोडसे यांची भूमिका कोणी समजून घ्यावी, अशी स्थिती नव्हती; कारण स्वातंत्र्यानंतर हिंदूंच्या हिताचे रक्षण करणार्यांचे गांधी व त्यांच्या काँग्रेसने खच्चीकरण केले होते व संपूर्ण देशावर मुसलमानांना पंखाखाली घेणार्या काँग्रेसचे अधिराज्य झाले होते.
आज काही वर्षांनंतर बघता नथुराम गोडसे यांनी गांधींच्या हत्येच्या वेळी जी कारणे दिली, तेच मुद्दे घेऊन काँग्रेस गेली ६२ वर्षे राज्य करत आहे, असे लक्षात येते. परिणामी आजही `गांधी काँग्रेसच्या रूपाने जिवंत आहेत आणि हिंदुत्वरूपी नथुराम मात्र प्रतिदिन फासावर चढत आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गांधींच्या हत्येच्या प्रकरणाची सुनावणी २७ मे १९४८ या दिवसापासून सुरू झाली. हा अभियोग ऐतिहासिक होता. त्याला यंदा ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. गांधींची हत्या करण्याबाबत त्यांनी केलेली मीमांसा आजही जगाला चिंतन करायला लावते. नथुराम गोडसे यांची बाजू भक्कमपणे मांडणारे `मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक गेली काही वर्षे गाजते आहे. .
जोखीम उचलून प्रयोग सुरू
नथुराम गोडसे यांची गांधींच्या हत्येमागील भूमिका पुढच्या पिढ्यांनाही आणि सार्या जगाला समजावी, हा हेतू मराठी रंगभूमीवरील `मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकातून साध्य झाला आहे. मराठी रंगभूमीच्या सध्याच्या साचेबद्ध नाटकांमध्ये निश्चितच अधिक वास्तववादी चित्रण असणारे हे नाटक ! आजही या नाटकाचे प्रयोग `माऊली प्रोडक्शन’तर्फे निर्माता श्री. उदय धुरत जोखीम उचलून करत आहेत. दिग्दर्शक श्री. विनय आपटे, लेखक श्री. प्रदीप दळवी, नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे प्रमुख कलाकार श्री. शरद पोंक्षे व इतर सहकलाकार असा फौजफाटा नव्या पिढीला `नथुरामांची भूमिका’ पटवून देण्याचे महतकार्य करत आहे.
शासनाची बंदी; न्यायालयाचा पाठिंबा
भाजप केंद्रात सत्तेवर असतांना `मी नथुराम…’चे ७ प्रयोग झाल्यावर लोकसभेत त्यावर बंदी घाला, अशी आरडाओरड झाली. ३ दिवस लोकसभेचे कामकाज विरोधकांनी अर्थात काँग्रेसवाल्यांनी बंद पाडले. शेवटी कै. प्रमोद महाजन यांनी मुंबईला माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली. माननीय बाळासाहेब ठाकरे नथुराम गोडसे हे नाटक बंद पडू नये, या मताशी सहमत होते आणि त्यांचा पाठिंबा श्री. उदय धुरत यांना होता.
शेवटी श्री. लालकृष्ण आडवाणी यांनी बाळासाहेबांना दूरध्वनी करून विनंती केली की, लोकसभा पुढे चालू शकत नाही, तूर्तास हे नाटक बंद ठेवावे. नंतर काँग्रेसप्रणीत महाराष्ट्र शासनाने नाटकावर बंदी आणली. बंदीच्या विरोधात श्री. उदय धुरत मुंबई उच्च न्यायालयात गेले आणि ६ वर्षे हे प्रकरण लढवून न्यायदेवतेने नथुरामला न्याय दिला.

मुंबईतील शिवाजी मंदिर नाट्यमंदिरात या नाटकाच्या प्रयोगाला काँग्रेसवाल्यांनी मोर्चे आणून नाटक बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यास शिवसेनेने चोख उत्तर देत मोर्चेवाल्यांना पिटाळून लावले व या वेळी पोलिसांनीही लाठीमार केला.
नथुराम गोडसे यांचे आत्मनिवेदन
नाटकाच्या सुरुवातीला मनोगत व्यक्त करतांना नथुराम गोडसे म्हणतात, “मी नथुराम गोडसे. माझे सध्याचे वय ९८ वर्षे. नव्या पिढीला माझी ओळख `एक हिंदु माथेफिरू’ अशीच आहे; कारण सरकारी दफ्तरी माझी अशीच ओळख झाली आहे. मधल्या वयाच्या पिढीला मी धर्मांध वाटतो आहे, तर माझ्या वयाचे किंबहुना माझ्यापेक्षा काहीसे कमी वयाने असलेल्या वयस्करांना माझी ओळख चांगली असेल, त्यांनी माझे लिखाण वाचले असेल, भाषणे ऐकली असतील; मात्र गांधींच्या वधानंतर तेही काहीसे माझ्यापासून दूर गेलेले आहेत.”
गांधी हत्येमागील कारणे !
“गांधीजींनी आफ्रिकेत वर्णभेदाच्या विरोधात पुकारलेले बंड, इंग्रजांच्या विरोधातील `चले जाव’ची चळवळ, तो मिठाचा सत्याग्रह, या सर्व कार्याबद्दल या नथुरामच्या मनात गांधींच्या प्रती आदर होता आणि आहे; पण फाळणी अनावश्यक होती. त्यानंतर अहिंसेच्या हट्टापायी हिंदूंची कत्तल, आपल्या देशातील सीमांवरील सैनिकांच्या विरुद्ध संहार करण्यासाठी पाकिस्तानला ५५ कोटी रुपयांची मदत, गांधींचे हे सर्व निर्णय चुकले. या अक्षम्य चुका आहेत. गांधींच्या या देशविघातक चुकांची बोचणी मनात सतत होती. `अशा चुका पुन: पुन्हा होऊ नयेत’, असा विचार करून मी गांधींचा वध केला.” नाटकाच्या प्रारंभी गांधीवधामागील नथुराम गोडसे यांनी स्पष्ट केलेली ही भूमिका कोणत्याही राष्ट्रप्रेमी प्रेक्षकाला सहज आकलन होते !
गांधींची हत्या नव्हे वध !
गांधीवधानंतर दिल्लीतील पोलीस अधीक्षक शेख यांनी जबानी लिहून घेतांना `गांधींचा खून’ असा शब्दप्रयोग केला, तेव्हा त्याला हरकत घेत जबानीत `वध’ हाच शब्द वापरण्याचा आग्रह नथुराम यांनी धरला. “एखाद्या योद्ध्याप्रमाणे रणांगणावर वीरमरण द्यावे, असे मरण मी गांधींना दिले आहे. या कृत्यामागे कुठेही पूर्वग्रह, वैयक्तिक हेवेदावे नव्हते, तर केवळ राजकीय कारण होते”, इतक्या स्पष्ट स्वरूपात नथुराम गोडसे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. यावरून गांधीवध हा भावनेच्या भरात नव्हे, तर देशहिताचा विचार करून करण्यात आला, ही इतिहासाची दुसरी बाजू समाजासमोर येते.
गांधींच्या मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा उबग आलेले गोडसे !
या नाटकाच्या सुरुवातीला नथुराम विनायक गोडसे हे `दैनिक हिंदुराष्ट्र’चे संपादकीय लेख लिहीत असतांना दाखवण्यात आले आहे. दिवसाच्या शेवटाला आकाशवाणीवर बातमी येते, `सरकारने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला !’, ही बातमी सांगण्यासाठी नाना (नथुराम गोडसे यांचे मित्र नाना आपटे) लगबगीने नथुराम गोडसे यांच्याकडे येतात आणि संपादकीयचा विषय बदलण्यास सांगतात; परंतु नथुराम गोडसे यांनी केव्हाच त्या विषयावर संपादकीय लिहून ठेवलेले असते ! आणि मग सुरू होतो दोघांमध्ये चर्चेचा खल. “आजवर आपण फक्त निषेध मोर्चे काढत राहिलो, अग्रलेख लिहीत राहिलो, `जनतेने उठाव करावा’, असे म्हणत राहिलो; पण नाना, जनतेने उठाव करावा म्हणजे तू आणि मी उठाव करावा. आणि म्हणून मी उद्याच्या अग्रलेखात `उद्या संक्रांत नाही, तर दसरा साजरा करूया, शमीच्या झाडाखाली पाझरलेली शस्त्रे हातात घेऊया’, असे आवाहन केले आहे.” गोडसेंचे हे उद्गार ऐकत असतांना नाना काही काळ स्तब्ध रहातात व `हे वाचून सरकार आपल्याला अटक करेल’, अशी प्रतिक्रिया देतात. तेव्हा नथुराम गोडसे म्हणतात, “सरकार हिंदूंच्या शब्दांना किंमत देत नाही. तेव्हा असे काही होणार नाही, सरकार याची दखल घेणार नाही. सरकार आता फक्त एका खटल्याची दखल घेईल आणि तो म्हणजे गांधीवधाचा खटला!”
नथुराम यांनी अग्रलेख लिहीत असतांनाच गांधींचा वध करण्याचा निश्चय केला होता आणि तो सर्वात प्रथम नानांसमोर बोलून दाखवला होता. वारंवार प्रयत्न करूनही न बदलणारी स्थिती धर्माभिमानान्यांसाठी क्रांती करणे कसे अपरिहार्य करते, हे गोडसेंच्या वरील उद्गारावरून लक्षात येते.
क्रांतीकारक निर्णय घेण्याची अपरिहार्यता !
“देशविघातक सत्र थांबायला पाहिजे असेल, तर गांधी आताच संपले पाहिजेत. घावांना जर जिभा असत्या, तर त्यांनी वेदना बोलून दाखवल्या असत्या. हिंदूंच्या घावांना फक्त अश्रू आहेत. हिंदूंच्या मतांना सरकार टीचभर महत्त्व देत नाही. त्यामुळे हा अग्रलेख लिहितांना हे मी स्वगत लिहीत आहे, असे मी स्वत:ला बजावले आहे. गांधींचे इतिहासातील स्थान अजरामर रहाणार आहे. काळाच्या पाठोपाठ इतिहासाची पाने उलटली जातील, तेथे गांधी असतीलच; पण हा इतिहास लांबवता कामा नये, गांधींची अहिंसेची व्याख्या चुकीची आहे. हा निर्णय धाडसाचा असला तरी धाडस करणे गुन्हा आहे का”, असा प्रश्न गोडसे नानांना विचारतात.

नथुराम गोडसेंनी गांधीवधाचा निर्णय बदलावा म्हणून नाना आपटे तेव्हा `सरकारच्या विरुद्ध तीव्र निदर्शने करू’, असे सुचवतात. तेव्हा गोडसे उसळतात आणि पुन्हा तोफ डागतात, “फाळणीच्या वेळी आपण किती निदर्शने केली, झाला का उपयोग त्याचा ? `बिर्ला हाऊस’कडील निदर्शने आठव ! म्हणे शांततापूर्ण निदर्शने ! नंतर काय, व्हायचे तेच झाले ना ! गांधींनी हिंदूंना न जुमानता जिनांच्या हट्टापायी फाळणी केली, संपूर्ण मंत्रीमंडळ या निर्णयाच्या विरोधात असतांना गांधींनी हा निर्णय घेतला. नाना, गांधी स्वत:ला देशापेक्षा मोठे समजू लागले आहेत. जिनाने तलवार उपसली आणि गांधींनी ती भारतमातेच्या छातीत घुसवून तिचा लचकाच तोडला. स्वत:च्या देहाला जेव्हा-जेव्हा गांधी आव्हान देत, तेव्हा तेव्हा संपूर्ण देशाला गांधींसमोर झुकावे लागले व देशविघातक निर्णय झाले; म्हणून नाना, तो देहच संपवायचा आहे. आज मुसलमानांनी देशाचे तुकडे केले, उद्या शीख, परवा हिंदूंमधील अनेकविध जातीमधील लोक या देशाचे तुकडे करतील. कोणाकोणाला रोखणार ? फाळणी झाली तेव्हाही मी असेच प्रखर विचार मांडले होते. फाळणीच्या वेळी हैद्राबादमधील मुसलमानांच्या मुलुखातील एकमेव हिंदूच्या कुटुंबाला मी जेव्हा भेट दिली, तेव्हा मुसलमानांनी त्या घरातील आठ वर्षांच्या मुलाची कत्तल केलेली होती. त्याचा बाप त्या मुलाचा रक्ताळलेला मृतदेह माझ्यासमोर करून मला सांगतो, `जाऊन सांगा तुमच्या गांधीला की, पुन्हा कधी उपोषणाला बसलात, तर उपोषण सोडायला संत्र किंवा मोसंबीचा रस घेऊ नका, याचे रक्त घ्या !” गोडसे यांनी वर्णन केलेली ही स्थिती गांधींचे भ्रमवादी जीवन उघडकीस आणते. या पार्श्वभूमीवर या नाटकाचे महत्त्व लक्षात येते.
नथुराम गोडसे असामान्य असल्याचे मान्य करणारा पोलीस अधीक्षक शेख !
गांधींच्या वधाचा नियोजनबद्ध कट रचलेल्या नथुराम गोडसेंना गांधींचा वध एकांतात करण्याची संधी मिळाली होती; मात्र त्यांनी त्याचा फायदा घेतला नाही. उघडपणे त्यांना गांधींचा वध करून व स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करवून घ्यायचे होते; म्हणून त्यांनी बिर्ला हाऊस येथे गांधींची प्रार्थना सुरू असतांना त्यांच्या कारकिर्दीला प्रथम वंदन करून नंतर त्यांच्यावर तीन गोळया झाडल्या. त्यानंतर हातात पिस्तूल घेऊन नथुराम तसेच उभे राहिले. कोणीही त्यांच्याजवळ आले नाही. त्यांनी स्वत: पोलिसांना जवळ बोलावून स्वत:ला त्यांच्या हवाली केले. त्यानंतर नथुराम दिल्लीचे पोलीस अधीक्षक शेख यांच्या नजरकैदेत होते.
सुरुवातीला त्यांचा पराकोटीचा तिरस्कार करणारे शेख जेव्हा गोडसेंना फाशी देण्यासाठी अंबाला येथील तुरुंगात नेण्याची वेळ येते, तेव्हा गोडसेंशी वाद-प्रतिवाद करतांना अप्रत्यक्षपणे बुद्धीभेद झालेले शेख काहीसे गहिवरतात आणि म्हणतात, “नथुराम, तू असामान्य आहेस. तुझ्या सहवासात आलेल्या आमच्यासारख्या हाडामासाच्या लोकांच्या रक्तात तू विषासारखा हळूहळू भिनत जातोस. आता मीही पाकिस्तानचा, जिनांचा तिरस्कार करू लागलोय. तुझा गळफास मी स्वत:च्या हाताने विणला, आता तो उसवता येऊ शकतो का, याचा विचार करू लागलोय !” नथुराम गोडसे यांच्या विचारसरणीतील सत्यता आणि त्यांची देशप्रेमाची प्रामाणिक तळमळ, याचाच हा परिणाम म्हणावा लागतो. या प्रसंगाचे सादरीकरण करून लेखकाने नाटकाला एका विशिष्ट उंचीवर पोहोचवले आहे.
या चर्चेच्या शेवटी नथुराम गोडसे मुद्दाम गांधींच्या मुसलमानप्रेमाचा संदर्भ अधिक खोलवर देत सांगतात, “गांधी मृत्यूच्या वेळी `हे राम’ बोलले नव्हते. आयुष्यभर ज्या माणसाने `राम-रहीम’, असेच म्हटले, असे गांधी मृत्यूक्षणी कधी `हे राम’ म्हणतील का ? बोलायचे तर `राम-रहीम’ असेच बोलतील, अन्यथा फक्त `रहीम’ बोलतील; कारण राम गांधींच्या हृदयात होता आणि रहीम त्यांच्या मुखात होता.”
`अखंड भारत’ स्वप्न मूर्त स्वरूपात येईल, असा ठाम विश्वास असणारे गोडसे !
`अंतीम क्षणी माझ्या हातात श्रीमद्भगवतगीता, भगवा झेंडा आणि अखंड भारतमातेचा नकाश असावा’, अशी इच्छा गोडसे यांनी व्यक्त केली होती. फाशीच्या आधी गांधींचे पुत्र देवीदास गांधी हे नथुराम गोडसे यांना भेटायला येतात, तेव्हाही नथुराम त्यांना त्यांच्या पित्याच्या चुका स्पष्टपणे उलगडून सांगतात. “मृत्यूपत्रात मी `जोवर अखंड सिंधु नदी अखंड भारतात येत नाही, तोपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित करू नका, त्या पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित करा’, असे लिहून ठेवले आहे.” हे सांगतांना गोडसे आवर्जून म्हणतात, “गांधींचाही आत्मा अशांतच आहे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी; म्हणून मी असे केले आहे. गांधींनी त्यांच्या अस्थी जगातील सर्व नद्यांमध्ये विसर्जित करा, असे म्हटले होते; परंतु पाकिस्तानने सिंधु नदीत त्यांच्या अस्थी विसर्जित करायला दिली नाही. गांधींचा वध झाला होता, तेव्हा पाकिस्तानच्या आकाशवाणीवर `हिंदूंचे पुढारी गेले’ असे सांगितले गेले. आम्ही गांधींना वारंवार हेच सांगत होतो की, गांधी तुम्ही आमचे आहात, हिंदूंचे आहात; पण गांधी मात्र `मी त्यांचा आहे’, असेच म्हणत राहिले. असे असले तरी हा भारत देश अखंड होईल, गंगा खेचून आणणार्या भगीरथाच्या परंपरेचा हा देश आहे. सिंधु नदी आज ना उद्या अखंड भारतात येईल, याचा मला ठाम विश्वास वाटतो आहे.” नथुरामांचे वरील संवाद प्रत्येक राष्ट्रप्रेमीला त्याच्या कर्तव्याची जाणीवच एक प्रकार करून देतात आणि नाटकाचा पडदा पडतो. |