फाशीच्या शिक्षेची शासनाने ठराविक काळात अंमलबजावणी करावी ! – उज्ज्वल निकम

अफझलला फाशी देण्याचे टाळणार्‍या काँग्रेसला हा टाहो ऐकू येईल का ?

मुंबई, २५ एप्रिल – सर्वोच्च न्यायालयाने फाशीसारख्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर शासनाने ठराविक काळात त्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा `दीर्घकाळ तुरुंगवास भोगल्यामुळे कायद्याने फाशी जन्मठेपेवर आणावी’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालय देण्याची भीती असते, असे सांगत सुप्रसिद्ध शासकीय अधिवक्‍ते उज्ज्वल निकम यांनी अतिरेक्यांना ठोठावलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत होणार्‍या चालढकलपणाविषयी नाराजी व्यक्‍त केली.

(अफझलला फाशी देण्याबाबत काँग्रेस शासन जो अक्षम्य वेळकाढूपणा करत आहे, त्यामागे अतिरेकी अफझलची फाशी वर प्रकारे रद्द व्हावी, हाच प्रयत्‍न असावा, असे कुणी म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही ! – संपादक)

निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !

मतदाराने काय समजायचे ?

लोकहो, सत्तेसाठी कोणत्याही पक्षाशी सोयरिक करून स्वार्थ साधणार्‍या मायावतींसारख्या नेत्यांना कायमचे घरी बसवा !

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती त्यांच्या चौफेर आणि बेधडक वक्‍तव्य करण्याच्या पद्धतीबद्दल प्रसिद्ध आहेत. केंद्रातील सत्ता उपभोगण्यासाठी किंवा उत्तरप्रदेशमधील राजकारणातील राजकीय फायदे उपटण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांबरोबर सोयरिक केली आणि मतभेद झाले तेव्हा त्यांच्यावर खरपूस टीका केली.

 

आज त्यांच्याशी मैत्री असलेला एकही राजकीय पक्ष देशात नाही, अशी स्थिती आहे. त्यांनी उत्तरप्रदेश राज्यात स्वबळावर निवडणूक लढवून राज्यातील सत्ता स्वत:च्या पक्षाकडे खेचून आणली आणि आता लोकसभा निवडणूकही त्या स्व:तच्या पक्षाच्या बळावर लढवत आहेत. संपूर्ण देशात स्वत:च्या पक्षाचे उमेदवार उभे करायचे, असा त्यांचा निश्चय होता आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत त्यांनी उमेदवार उभे केले. त्यांच्या पक्षाने आकर्षित केलेले उमेदवार पहाता त्यांचा पक्ष किमयागार असल्याचा भास झाल्यावाचून रहात नाही आणि त्यांना तिसर्‍या आघाडीने भावी पंतप्रधान म्हणून दिलेली मान्यता भारतियांना विचारप्रवण केल्याशिवाय सोडत नाही. प्रत्येक गोष्टीचा प्रतिवाद करून स्वत:चे आधिपत्य सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्‍न जनतेच्या नजरेतून सुटत नाही. भाजपचे उमेदवार श्री. वरुण गांधी यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून तुरुंगात पाठवतांना एके काळचा मित्रपक्ष असलेल्या भाजपला त्या साफ विसरल्या. अर्थात् राजकीय स्वार्थ साधतांना अशा संबंधांना तिलांजली देण्याचे काम कोणताही राजकीय पक्ष करत असतो. त्यामुळे मायावती त्याला अपवाद असू शकत नाहीत. त्यांच्या वागण्यातील हा फटकळपणा त्यांच्या बोलण्यातही असतो आणि त्याचा प्रत्यय म्हणून कि काय, नव्या मुख्य निवडणूक आयुक्‍तांबद्दल त्यांनी बेधडक विधान केले. मुख्य निवडणूक आयुक्‍त श्री. गोपालस्वामी परवा २० एप्रिल रोजी निवृत्त झाल्यावर त्यांच्या पदावर आलेले निवडणूक आयुक्‍त नवीन चावला हे काँग्रेसचे दलाल आहेत, असे विधान मायावती यांनी केले. सध्या निवडणुकीचे वारे असल्यामुळे राजकीय पक्षांसाठी आचारसंहिता सुरू आहे. राजकीय व्यक्‍तीने किंवा उमेदवाराने काय बोलावे व काय बोलू नये याची यादी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. आता मायावतींचे विधान नव्याने नेमणूक झालेले निवडणूक आयुक्‍त नवीन चावला कोणत्या अर्थाने घेतात, हे पहावे लागेल.

पक्षपातीपणाचा दावा !
मायावती यांची नवीन चावला यांच्याविषयीची टीकाटीपणी कोणत्या परिस्थितीत झाली ते पहायचे झाले, तर उत्तरप्रदेशमधील जौनपूर येथील तीन पोलीस अधिकार्‍यांच्या करण्यात आलेल्या बदल्या पहाव्या लागतील. इंडियन जस्टीस पार्टीच्या उमेदवाराची हत्या झाली त्याप्रकरणी उत्तरदायी धरून पोलीस अधिकार्‍यांची बदली करण्यात आली. आपल्या राज्यातील पोलीस अधिकार्‍यांची अशा प्रकारे बदली केल्यामुळे राजकीय यंत्रणेचे नैतिक धैर्य ढासळते, परिणामी राज्यशासनाची बदनामी होते, असा मायावती यांचा दावा आहे. झारखंड, आंध्रप्रदेश, बिहार, या राज्यांत अलीकडे पार पडलेली निवडणुकीची पहिली फेरी हिंसाचारग्रस्त होती, तर उत्तरप्रदेशमध्ये तसे काही झाले नाही. तरीही निवडणूक आयुक्‍त एस्.वाय्. कुरेशी या राज्यांच्या दौर्‍यावर न जाता उत्तरप्रदेशच्या दौर्‍यावर परत का येतात, हा मायावती यांचा प्रश्‍न आहे. वस्तूस्थितीचा अभ्यास केला तर त्यांचा प्रश्‍न कोणाला गैर वाटण्याचे कारण नाही. निवडणूक आयुक्‍त कुरेशी आणि नव्याने मुख्य निवडणूक आयुक्‍त म्हणून एनेमणूक झालेले चावला यांच्यावर नि:पक्षपाती नसल्याचे आरोप यापूर्वीही झाले आहेत. सत्ताधारी पक्षांशी असलेली त्यांची जवळीक हे त्यामागील एक कारण आहे. माजी मुख्य निवडणूक आयुक्‍त गोपालस्वामी यांनी दोन महिन्यांपूर्वी तेव्हा निवडणूक आयुक्‍त असलेले नवीन चावला पक्षपाती कारभार करतात, असा आरोप ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केंद्रातील काँग्रेस सरकारकडे केली होती. काँग्रेसच्या सरकारने ती शिफारस विनाविलंब फेटाळली आणि त्याच वेळी आवश्यकता नसतांना नवीन चावला लवकरच मुख्य निवडणूक आयुक्‍त होतील, असे घोषित करून टाकले. श्री. गोपालस्वामी यांच्या निरोपसमारंभाच्या दिवशी
श्री. गोपालस्वामी यांनी त्यांच्या भाषणात आवर्जून उल्लेख केला की, नवीन चावला नि:पक्षपातीपणे कारभार करतील. वस्तूत: निरोपसमारंभाच्या दिवशी उत्तरदायी व्यक्‍तीबाबत अशा शब्दांत मतप्रदर्शन करणे ही बाबच मुळी खटकणारी आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या सेवेविषयी लिखित नियमावली असतांना त्यांच्या वर्तनाविषयी संशय निर्माण करणारी अशी विधाने काय सांगतात ? आणि एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने अशा अधिकार्‍याविषयी काही मतप्रदर्शन केले तर जनतेने काय समजायचे ?

 

  निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !

कोणत्याही क्षणी पोलीस आयुक्‍तालयावर हल्ला होण्याची शक्यता !

लोकहो, भयोत्पादकी हल्ल्याची स्थिती निर्माण करणार्‍या निष्क्रीय काँग्रेसला सत्ताच्यूत करा ! पाकचे १०० हून अधिक प्रशिक्षित अतिरेकी मुंबईत ! मुंबई, १९ एप्रिल – येथील क्रॉफर्ड मार्केटमधील पोलीस मुख्यालय असुरक्षित झाले आहे. पाकमध्ये प्रशिक्षण घेतलेले शंभरपेक्षा जास्त प्रशिक्षित अतिरेकी मुख्यालयाच्या आसपास वावरत आहेत. कोणत्याही क्षणी अतिरेक्यांकडून मुख्यालयावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता गुप्‍तचर यंत्रणांनी व्यक्‍त केल्याचे वृत्त आज दैनिक `सामना’ने प्रसिद्ध केले आहे. (मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिरेकी देशात येतातच कसे ? यावरून हा देश अतिरेक्यांसाठी नंदनवनच झाला आहे, असे म्हणावे लागते. अफझलपासून कसाबपर्यंत प्रत्येक अतिरेक्याला जिवंत ठेवणारे मुसलमानप्रेमी काँग्रेस शासनच यास उत्तरदायी आहे. हिंदूंनो, अशा काँग्रेसवाल्यांना येत्या निवडणुकीत पराभूत करून त्यांच्या विरोधात याबद्दल खटले दाखल करा व त्यांना कठोर शिक्षा होईल, असे पहा ! – संपादक) पोलीस आयुक्‍त कार्यालयात अतिरेकी अगदी बिनधास्तपणे घुसू शकतात, इतक्या वाटा आहेत. कार्यालयाच्या सभोवतालची भिंत आखूड आहे. (मुळात आपल्याच देशात आपल्याच आयुक्‍तालयाच्या सभोवताली भिंत कशाला बांधावी लागते ? आपल्या आयुक्‍तालयाचे रक्षण करण्याची धमक काँग्रेसी राज्यकर्त्यांमध्ये का नाही ? अशा षंढ राज्यकर्त्यांना एक क्षणही सत्तेवर रहाण्याचा काय अधिकार ? – संपादक) ही भिंत अगदी सहज ओलांडून ते पोलीस आयुक्‍त कार्यालयात घुसू शकतात, तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वेठीस धरू शकतात. त्यासाठी आता सर्वांनीच सतर्क राहिले पाहिजे, असे पोलीस आयुक्‍त कार्यालयातील बहुसंख्य अधिकारी बोलत आहेत.

निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !

अतिरेकी हल्ल्यानंतर मुसलमानांना पकडण्याची `फॅशन’ ! – इमाम बुखारी

गृहमंत्रीजी, तुमची कारवाई योग्य कि बुखारींचे वक्‍तव्य ?

नवी दिल्ली, १२ एप्रिल – गेल्या साठ वर्षांत सर्व पक्षांनी मुसलमान समाजाला केवळ निवडणुकीपुरती आश्‍वासने देऊन फसवले आहे.

(मुसलमानांचे अपरिमीत लांगूलचालन करणार्‍या दोन्ही काँग्रेसना चपराक ! – संपादक) कुठेही अतिरेकी हल्ला झाला की, मुसलमान तरुणांना पकडायचे आणि त्यांना तुरुंगात टाकायचे, ही `फॅशन’च झाली आहे. (गृहमंत्रीजी, याबाबत तुम्हाला काय म्हणायचे आहे ? तुमच्या खात्यातील पोलीस करत असलेली कारवाई योग्य कि इमाम बुखारी यांचे हे वक्‍तव्य, हे जनतेला स्पष्ट व्हायला हवे. – संपादक) या सर्वांवरचा विश्‍वास उडाल्याने आगामी निवडणुकीत मुसलमान समाजाने विश्‍वासार्ह प्रादेशिक पक्ष वा उमेदवारांना मते द्यावीत, असे आवाहन जामा मशिदीचे शाही इमाम मौलाना सय्यद बुखारी यांनी आज केले.

 

  निगडीत वृत्त : मुजोर मुसलमान

दैनिक सनातन प्रभात’ने `समर्थ’ (बोधचित्र) सदराद्वारे राबवलेली मतदार जागृती चळवळ !

 
निवडणुकीच्या काळात हिंदु मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी सनातन प्रभात कार्यरत असते. `समर्थ’ हे बोध देणारे `दैनिक सनातन प्रभात’मधील लोकप्रिय चित्रमय सदर ! सनातनच्या बोधचित्रकर्त्या साधिका सौ. गौरी वैभव आफळे यांनी तयार केलेल्या या सदराच्या माध्यमातून सनातन प्रभातने आगळीवेगळी मतदार जागृती चळवळ राबवली. महाराष्ट्रात १६, २३ व ३० एप्रिल, तर गोवा राज्यात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानिमित्त याच बोधचित्रांच्या साहाय्याने मतदारांचे प्रबोधन करण्याचा आणखी एक प्रयत्न !

सर्व संकल्पना व चित्रांकन सौ. गौरी वैभव आफळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल

केवळ स्वार्थ व सत्तेसाठी अतिरेक्यांना फाशी न देणारे राज्यकर्ते देश व जनताद्रोही आहेत !

संसदेवर हल्ला करणार्‍या अफझलच्या फाशीच्या प्रकरणाच्या अगोदर २२ प्रकरणे प्रलंबित असतांना अफझलचे प्रकरण हाती घेणे योग्य नाही, असे `(चांद)तारे’ देशाचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी तोडले आहेत. त्यामुळे स्वत:ला निधर्मी म्हणवणार्‍या काँग्रेसचा खरा `इस्लामी’ चेहरा पुन्हा एकदा निवडणुकीच्या ताेंडावर उघड झाला आहे. देशाच्या सुरक्षेपेक्षा आपल्या कपड्यांच्या परीट घडीकडे अधिक लक्ष ठेवून असणार्‍या शिवराज पाटील यांनीही पूर्वी गृहमंत्रीपदावर असतांना असेच आपल्या अकलेचे तारे तोडले होते. `अफझलला फाशी देण्याची एवढी घाई काय आहे ?’, असे विचारून शिवराजमियॉं `इफ्तार पार्टी’च्या शिरखुर्म्याला जागले होते ! पाकपुरस्कृत अतिरेकी हल्ले करत असतांना शिवराज पाटील यांनी मात्र केवळ निषेधाच्या पिचक्या मारण्यापलीकडे काहीच केले नाही. असल्या पिचकार्‍यांनी पाकिस्तानी अतिरेकी भारतावर हल्ले करायचे थांबले असते, तर प्रत्येक देशाने काँग्रेसवाल्यांकडे पिचकार्‍या कशा मारायच्या याचे सल्ले घेण्यासाठी रांग लावली असती. तिकडे इस्रायल संपूर्ण इस्लामी देशांनी घेरला असूनही निधड्या छातीने पॅलिस्टीनी अतिरेक्यांना नेस्तनाबूत करण्यात जराही कसूर ठेवत नाही आणि आम्ही मात्र अतिरेक्यांचा नायनाट तर करत नाहीच; परंतु ज्यांना पकडले आहे, त्यांना `जावई’ असल्याप्रमाणे चिकन बिर्याण्या घालून त्यांचा पाहुणचार करत आहोत ! शूरवीरांच्या या देशाच्या गादीवर षंढ राज्यकर्ते बसल्यावर आणखी वेगळे काय होणार ?

 

२६/११ च्या आगीचा भडका
मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानातील जिहादी अतिरेकी समुद्रमार्गे येऊन त्यांनी पाकिस्तानातील `आका’च्या आदेशानुसार मुंबईवर ६० तास सैतानी राज्य केले. तेव्हा काँग्रेस सरकार व तिची संपूर्ण यंत्रणा रजेवर होती कि कुंभकर्णी झोपा काढत होती, हे देशाचे व महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनुक्रमे शिवराज पाटील व रा.रा. पाटील यांनाच माहीत ! या वेळी आलेल्या १० अतिरेक्यांनी दोन जवानांसह १८ पोलिसांचा व २०० निरपराध लोकांचा बळी घेतला आणि बलाढ्य लोकशाही असलेल्या भारताच्या सुरक्षाव्यवस्थेची लक्‍तरे जगाच्या वेशीवर टांगली. अतिरेकी समुद्रमार्गे येणार असल्याचे संकेत आधीच यंत्रणांना मिळाले असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अर्थात काँग्रेस सरकार त्याकडे लक्ष देणारच कसे ? मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी `मालेगाव’ हे आयतेच कोलीत त्याच्या हाती मिळाले होते. त्यामुळे हे कोलीत निवडणुकीपर्यंत विझू द्यायचे नाही व त्यावर सातत्याने फुंकर घालून हिंदुद्वेषाची आग भडकवत ठेवायची, हे `महत्कार्य’ तेव्हा काँग्रेस सरकार करत होते; मात्र २६/११ च्या निमित्ताने ही आग त्यांच्यावर उलटी फिरली आणि महाराष्ट्रातील जनतेच्या क्रोधाने मुख्यमंत्री देशमुख यांच्यासह रा.रा. पाटील आणि शिवराज पाटील यांच्या खुर्च्या त्यात जळून भस्मसात झाल्या; मात्र त्यानंतरही `सुंभ जळला तरी पिळ काही सुटत नाही’, अशा वृत्तीच्या काँग्रेसवाल्यांचे `मालेगाव’ प्रकरणाचे भूत काही मानगुटीवरून उतरलेले नाही. काँग्रेस इस्लामी दहशतवादी हल्ले नेहमीच सोयीस्करपणे विसरते आणि जनतेलाही तिची दिशाभूल करून विसरायला लावते. मालेगाव प्रकरणानंतर देशात आसाम येथे बाँबस्फोट झाले. त्यापूर्वी २६/११ चा सर्वांत मोठा जिहादी हल्ला मुंबईवर झाला. तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणतात, “मालेगाव बाँबस्फोटानंतर कोठेच स्फोट झाले नाहीत. आम्ही त्यावर ठोस उपाययोजना केली.” पवार यांना हे सांगतांना जरा तरी आपल्या प्रामाणिकपणाची चाड असायला हवी होती. अर्थात हिंदुद्वेषाच्या काविळीमुळे आंधळया आणि बहिर्‍या झालेल्या दोन्ही काँग्रेसवाल्यांना इस्लामी दहशतवाद्यांनी केलेले बाँबस्फोट कसे दिसणार आणि स्फोटात मरण पावलेल्या जनतेच्या कुटंबियांचा आक्रोश तरी कसा ऐकायला येणार ?

लोकहो, आणखी किती अफजल होऊ देणार ?
अफजलला फाशी देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे; मात्र मुसलमानांची मते गमवण्याची भीती वाटत असल्याने काँग्रेस सरकार आधीची २२ प्रकरणे प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित करून त्याला फाशी देण्याचे टाळत आहे. अर्थात २२ अपराध्यांना काँग्रेसने अद्याप फासावर का लटकवले नाही, हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. याचे कारण हेच आहे की २३ वा क्रमांक अफजलचा आहे आणि त्यापाठोपाठ आता कसाबही २४ क्रमांकावर येत आहे. तालिबान्यांनी काल काश्मीरमध्येही घुसखोरी केली आहे. काँग्रेस सरकारचे घरजावई अफझल आणि कसाब यांना पुन्हा त्यांच्या गावाला घेऊन जाण्यासाठी त्यांचे `माघारी’ म्हणून हे तालिबानी आले आहेत. काँग्रेस सरकारने या दोघांना दिलेच नाही, तर पुन्हा एकदा संसदेवर हल्ला होईल आणि रालोआकडे बोट दाखवणारे काँग्रेसवाले या अफजल आणि कसाब यांना तालिबान्यांच्या स्वाधीन करतील. रालोआच्या सत्ताकाळात मौलाना अझर मसूदसह ५ अतिरेक्यांना सोडायला जसवंत सिंग गेले होते आता प्रणव मुखर्जी जातील. त्यानंतर पुन्हा अफजल आणि कसाब भारतावर हल्ले करतील. त्यात काही निरपराध लोक मारले जातील. समजा चुकून एखादा अफजल सुरक्षायंत्रणेच्या हाती सापडलाच, तर काँग्रेस सरकार आहेच त्यांना घरजावई करायला ! लोकहो, आता तुम्हीच ठरवा या निवडणुकीत या काँग्रेसचे काय करायचे ते !

 

  निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

जनतेला मूर्ख समजणारे काँग्रेसचे गृहमंत्री म्हणतात, “फाशीची २२ प्रकरणे प्रलंबित असतांना प्रथम अफझलला फाशी देणे अयोग्य”

अतिरेक्यांना फाशी देण्यास बिचकणार्‍या काँग्रेसला पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे ठार मारणेच योग्य !

नवी दिल्ली, ८ एप्रिल (प्रे.ट्र.) – संसदेवर हल्ला करणार्‍या अफझलच्या फाशीच्या प्रकरणाच्या अगोदर २२ प्रकरणे प्रलंबित असतांना अफझलचे प्रकरण हाती घेणे योग्य नाही, असे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.

(असे निर्लज्जपणे सांगणार्‍या व फाशीची २२ प्रकरणे प्रलंबित ठेवणार्‍या काँग्रेस सरकारलाच आता फाशी द्या ! – संपादक) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “फाशी माफ करण्यासंबंधीची याआधीची प्रकरणे प्रलंबित आहेत. (गंभीर गुन्ह्यांबाबतची प्रकरणे प्रलंबित आहेत हे सांगायला लाज कशी वाटत नाही ? – संपादक) फाशीच्या प्रकरणांच्या यादीत अगदी शेवटी असलेले प्रकरण आधी हाती घेणे योग्य होणार नाही. असे केल्यास या प्रकरणाकडे धार्मिकतेच्या दृष्टीकोनातून बघितल्यासारखे होईल. (मुसलमान तसा प्रचार करतील ही गृहमंत्र्यांना वाटणारी भीती यातून स्पष्ट होते. मुसलमानप्रेमापोटी देशहिताला विसरणारे काँग्रेसचे गृहमंत्री ! – संपादक) यामुळेच अफझलच्या फाशीची कार्यवाही होत नाही. संपुआचे सरकार अफझलच्या प्रकरणाकडे धार्मिकतेच्या दृष्टीकोनातून पहात नाही.” (मुसलमानांना दिलासा देणारे गृहमंत्र्यांचे विधान ! – संपादक)

 

  निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !

आता भारत `दरिद्री राष्ट्र’ म्हणून ओळखले जाणार !

काँग्रेसशाहीचा परिणाम
काँग्रेसप्रणीत संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारने आम्हाला काय दिले नाही ? या शासनाने आम्हाला दारिद्र्य दिले, दु:ख दिले, भारतात जिहादी अतिरेक्यांना आम्हाला ठार मारण्यासाठी मोकळे रान करून दिले ! आम्ही कधी नव्हे एवढ्या भयोत्पादनाच्या सावटाखाली वावरू लागलो आहोत. आम्हाला किड्यामुंग्यांप्रमाणे वागणूक देणार्‍या अशा या शासनाचा पाडाव करणे आवश्यक आहे.

भारतातील दारिद्र्य घटले आहे, असे धादांत खोटे सांगणारे काँग्रेसचे शासन !
`इंडियन स्टॅटीस्टिकल इन्स्टीट्युट’ या संघटनेने भारतातील १ लाख २४ सहस्र घरांची पहाणी केली व त्यांतून काही धक्कादायक माहिती जनतेसमोर आणली. `भारतातील दारिद्र्य कमी झाले आहे’, असे वक्‍तव्य पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी केले होते; मात्र `इंडियन स्टॅटीस्टिकल इन्स्टीट्युट’ने प्रसारित केलेली आकडेवारी भयानक आहे. या आकडेवारीनुसार भारतातील २० टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली गेली आहे. २००४-२००५ साली २ लाख ७० सहस्र लोक दारिद्र्यरेषेखाली होते. आता ५ लाख ५ सहस्र लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत. `संयुक्‍त पुरोगामी आघाडी शासनाच्या योजना या `आम आदमी’साठी असणार’, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र शासन हे `खास आदमी’साठी होते, हे शासनाच्या एकंदरीत धोरणांवरून लक्षात आले.

तुम्हाला हे माहीत आहे का ?
पाच महिन्यांपूर्वी एक अमेरिकी डॉलर म्हणजे ३६ रुपये, असे रुपयाचे मूल्य होते. आज मात्र रुपयाचे अवमूल्यन होऊन १ अमेरिकी डॉलर म्हणजे ५० रुपये झाले आहेत. भारताचा निर्यात दर २४ टक्क्यांनी घटला आहे. भारत आर्थिक दिवाळखोरीत निघाला आहे, याचे हे द्योतक आहे.

मंदीमुळे २५ लाख तरुण बेकार होतील, असे सांगणारे नव्हे, तर समस्येवर मात करणारे अर्थमंत्री हवेत !
जागतिक मंदीमुळे भारतात २५ लाख तरुण बेकार होणार, अशी भीती अर्थमंत्री व परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्‍त केली होती.
भारतात बेकारी वाढणार, असे सांगणारे राज्यकर्ते नव्हेत, तर बेकारीच्या समस्येवर मात करून जनतेला आश्‍वस्त करणार्‍या राज्यकर्त्यांची भारताला गरज आहे !


साम्यवाद्यांच्या बंगालमधील १८ जिल्ह्यांपैकी १४ जिल्हे दरिद्री !
बंगालवर साम्यवाद्यांनी तीन दशके राज्य केले. `इंडियन स्टॅटीस्टिकल इन्स्टीट्युट’ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून भारतातील १०० दरिद्री जिल्ह्यांच्या यादीमध्ये बंगालमधील १४ जिल्ह्यांचा समावेश आहे. बंगालमध्ये एकूण १८ जिल्हे आहेत. त्यांपैकी १४ जिल्ह्यांचा दरिद्री जिल्ह्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यावरून साम्यवाद्यांनी बंगालचा सत्यानाश केला, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2009-04-05&action=fullnews&catid=9&id=18646