`जो हिंदूंवर अत्याचार करील त्याचे हात मी तोडेन’, असे भाजपचे लोकसभा निवडणुकीचे तरुण इच्छुक वरुण गांधी विशिष्ठ परिस्थितीच्या संदर्भात म्हणाल्याने त्यांना कडक शासन व्हावे, म्हणून काँग्रेस आणि काही गांधी-नेहरूवादी संस्था प्रयत्नशील आहेत. मुसलमानांनी गेली हजार वर्षे केलेले व अजूनही करत असलेले हिंदूंवरील अत्याचार पहाता हिंदु-मुसलमान संबंध बिघडवण्यासाठी वरुण गांधींच्या विधानाची आवश्यकता नाही. ते आधीच बिघडले आहेत. ते जर सुधारायचे असतील, तर `आपले अत्याचार करणारे हात वरच्यावर तोडले जातील’, अशी भीती इस्लामी आतंकवाद्यांच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे.
वरुण गांधींवर कारवाई होण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील !
`जो हिंदूंवर अत्याचार करील त्याचे हात मी तोडीन’, असे भाजपचे लोकसभा निवडणुकीचे तरुण इच्छुक वरुण गांधी विशिष्ठ परिस्थितीच्या संदर्भात म्हणाले, म्हणून त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडून आणि भारतीय दंड संहितेखाली कारवाई व्हावी, तसेच त्यांना कडक शासन व्हावे म्हणून काँग्रेस आणि काही गांधी-नेहरूवादी संस्था प्रयत्नशील आहेत. भारतात हिंदु-मुस्लीम ऐक्य प्रस्थापित झाले असून सर्वत्र शांततामय आणि गोड वातावरण असतांना वरुण गांधी बेजबाबदार आणि आक्रस्ताळी विधाने करून हिंसात्मक परिस्थिती उत्पन्न करत आहेत, असे चित्र उभे केले जात आहे; परंतु वस्तुस्थिती अगदी उलटी आहे; म्हणून (१) अशा विधानांची चिकित्सा कशी करावी ? (२) परिस्थिती आधीच स्फोटक आहेत कि ती या विधानामुळे निर्माण होणार आहे आणि (३) आतंकवाद फोफावण्याची खरी कारणे काय, याचा विचार केला पाहिजे आणि मतितार्थ काँग्रेस जनांसमोर ठेवला पाहिजे.
वरुण गांधींच्या विधानापेक्षा मोहनदास गांधींचे विधान भयंकर प्रक्षोभक !
घटना समितीसमोर राष्ट्रध्वजाचा विषय विचारार्थ होता, तेव्हा प्रबोधनकार ठाकरे, समतानंद अनंतराव गद्रे प्रभृतींनी आंबेडकरांना भेटून परंपरागत पवित्र भगव्या ध्वजाची गणना राष्ट्रध्वज म्हणून व्हावी, अशी विनंती केली. आंबेडकरांनी सहमती दर्शवली; परंतु संभाव्य अडथळे ओलांडण्यासाठी साहाय्य लागेल, असे सांगितले. मोठा अडथळा गांधींचा होता. त्यांनी भगव्याला विरोध करून तिरंग्याचा हट्ट धरला आणि तो पुरवावा लागला. मग गांधींनी कोपराने खणता येते का, ते पाहिले. ध्वज खादीचा असला पाहिजे आणि त्यावर चरखा असला पाहिजे, असा नवा हट्ट त्यांनी धरला “असा हट्ट धरणे वेडेपणाचे आहे”, असे सांगून सावरकर आंबेडकरांना म्हणाले, “हा देश केवळ विणकरांचा नाही. तेव्हा चरख्याऐवजी धर्म चक्राची स्थापना करा.” आंबेडकरांनी तसे करवून घेतले. तेव्हा गांधी भडकले. ते म्हणाले, “जर ध्वज मी सांगतो तसा केला नाहीत, तो खादीचा नसेल आणि त्यावर चरखा नसेल, तर या ध्वजाशी आपला काडीचाडी संबंध रहाणार नाही. अशा ध्वजाला आपण वंदनही करणार नाही.” गांधींच्या या विधानाचा अर्थ असा होतो की, भारतीय संविधानाने स्वीकृत आणि अधिकृतपणे मान्य केलेला राष्ट्रध्वज ते भारताचे नागरिक असूनही मानणार नाहीत.
एवढेच नव्हे, तर ते त्याला वंदन करणार नाहीत. म्हणजे ते बंड करणार आहेत. ते नेते असल्यामुळे त्यांना जे अनुयायी आहेत, तेही त्यांच्यासमवेत बंड करणार आहेत. राष्ट्रध्वजाच्या विरोधात ते चळवळ करणार आहेत. वरुण गांधींच्या विधानापेक्षा मोहनदास गांधींचे विधान भयंकर प्रक्षोभक आहे. एवढेच नव्हे, तर त्यात घटनाद्रोह आणि राष्ट्रद्रोह दडलेला आहे. आपल्यामागे या प्रश्नात लोक नाहीत हे गांधींच्या लक्षात आल्यावर चळवळ करण्याचा विचार त्यांनी सोडून दिला असावा. उरलेल्या आयुष्यात त्यांनी वंदन केले कि नाही, हे मला माहीत नाही; पण त्यामुळे त्यांनी घटनेला धुडकावणारे विधान केले होते, ही गोष्ट पुसता येत नाही. तरी समाजाने गांधींच्या फाजील अहंकाराला आणि वेडपटपणाला शिक्षा केली नाही. अशा समाजाला वरुणला एका साध्यासरळ आणि विधायक उद्देशाच्या विधानाविषयी जाब कसा विचारता येईल ? भारतीय दंड संहिताही एखाद्याला दोषी ठरवण्यापूर्वी त्याच्या विधानामागील उद्देश, ते कृतीत आणण्याची त्याची क्षमता आणि एकंदर समाजाच्या शांततेवर आणि भवितव्यावर त्याचे होणारे बरेवाईट परिणाम लक्षात घेते. त्यामुळे वरुण गांधींनी दोषी ठरून शासन होण्याइतकी चूक केलेली नाही, असे म्हणता येईल.
मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार !
वरील विधान करून वरुण गांधी हिंदू आणि मुसलमान यांच्यात द्वेष पसरवत आहेत आणि त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध बिघडवत आहेत, असा आरोप केला जातो; म्हणून हिंदु-मुस्लीम संबंध गेल्या १०० वर्षांत कसे होते, हे पहाणे आवश्यक ठरते. गांधीयुग सुरू झाल्यापासून हिंदु-मुस्लीम ऐक्य हे राष्ट्रीय प्राथम्य ठरले. मुसलमान सदैव प्रसन्न रहावेत, म्हणून हिंदूंनी त्यागाची पराकाष्ठा करण्याचे ठरले. हिंदूंनी आपली भूमी तोडून दिली; पण त्यांनी शांतपणे घेतली नाही. मागितली तेवढी दिली नाही; म्हणून त्यांनी हिंदूंच्या कत्तली केल्या. प्रत्येक गावात रक्ताचे पाट वाहविले. संपत्ती, घरदार लुटले. एकाही हिंदु स्त्रीला भ्रष्ट केल्यावाचून सोडले नाही. फाळणीच्या वेळी मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारात जो नीचपणा भरलेला आहे, तसा नीचपणा जगातील कोणत्याही एका समाजाने दुसर्या समाजावर केलेला नाही. त्याविषयी मुसलमान समाजाने गेल्या साठ वर्षांत हिंदु समाजाची एकदाही क्षमा मागितलेली नाही. पश्चात्ताप प्रदर्शित केलेला नाही. दु:ख व्यक्त केलेले नाही. तरीही हिंदू त्यांच्याशी चांगले वागत आहेत. हिंदूंनी सूड घेतलेला नाही. मुसलमानांच्या त्या नीचपणाने हिंदूंच्या हृदयावर केवढा मोठा घाव पडला आहे, याची जाणीव हिंदूंनी मुसलमानांना करून दिलेली नाही.
हिंदु-मुसलमान संबंध वरुण गांधींमुळे नव्हे, तर ते आधीच बिघडले आहेत !
हिंदु-मुस्लीम ऐक्यासाठी ३२ वर्षे आपण सतत आणि कठोर परिश्रम केले; पण त्यात आपणाला यश आले नाही, अशी स्पष्टोक्ती मोहनदास गांधींनी केली आहे. “काश्मीरमधील मुसलमान सुखी रहावेत; म्हणून भारताने त्यांच्यावर एक लाख कोटी रुपये पहिल्या चाळीस वर्षांत खर्च केले; पण त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम आम्हाला निर्माण करता आले नाही”, असे काँग्रेसनेते सी. सुब्रमण्यम म्हणाले. काश्मीरमध्ये इस्लामी आतंकवाद्यांनी एवढे भय निर्माण केले आहे की, हिंदु स्त्रियांची मासिक पाळी ऐन तिशीत बंद होते आहे. त्यावर हिंदूंची प्रतिक्रिया कशी आहे ? पाकिस्तानने भारतात आणि भारताने पाकिस्तानात आतंकवादी कृत्ये करायची नाहीत, असा संधी गुजराल पंतप्रधान असतांना उभय राष्ट्रांत झाला. पाकिस्तानने तो लगेच तोडला; पण भारत त्यास अजून चिकटून आहे. तात्पर्य हिंदु-मुसलमान संबंध बिघडवण्यासाठी वरुण गांधींच्या विधानाची आवश्यकता नाही. ते आधीच बिघडले आहेत. ते जर सुधारायचे असतील, तर आपले अत्याचार करणारे हात वरच्यावर तोडले जातील, अशी भीती इस्लामी आतंकवाद्यांच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे.
निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार
|








