भारताची प्रतिमा मलीन करणार्या `स्लमडॉग मिलीयनेर’ चित्रपटाला ऑस्कर म्हणजे हिंदुद्वेषाला पुरस्कार !
लॉस एंजिल्स (अमेरिका): जागतिक स्तरावरील चित्रपट समीक्षणात सर्वोच्च समजल्या जाणार्या ऑस्कर पुरस्कारांच्या ८१ व्या सोहळयात हिंदुद्वेष्ट्या व जगात भारताची प्रतिमा मलीन करणार्या वादग्रस्त `स्लमडॉग मिलीयनेर’ला तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले.
(`स्लमडॉग मिलीयनेर’ या हॉलीवूडपटाला ८ ऑस्कर पुरस्कार मिळाले असले, तरी या चित्रपटात हिंदूंना दंगलखोर ठरवण्यात आल्याने व भारताचे बीभत्स चित्रण करण्यात आल्याने या चित्रपटाला हिंदुत्ववादी व राष्ट्रप्रेमी यांचा विरोध कायम राहील ! अनेक शहरांत या चित्रपटाचे खेळ रद्द करण्यात आले आहेत, ही बाब जनमानसांतही या चित्रपटाबाबत नाराजी असल्याचे स्पष्ट करते. अशा हिंदु व भारत विरोधी चित्रपटाला मिळालेले विक्रमी ऑस्कर पुरस्कार नक्कीच काहीतरी आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असल्याचे स्पष्ट करतात ! – संपादक) त्याचबरोबर ४० मिनिटांचा उत्तरप्रदेशी लघुपट `स्माईल पिंकी’लाही सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून ऑस्करने सन्मानित करण्यात आले. भारतीय चित्रपटांना एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑस्कर पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ख्यातनाम संगीतदिग्दर्शक ए.आर्. रहमान यांना `सर्वोत्कृष्ट ओरीजनल स्कोर’ व `सर्वोत्कृष्ट गीत’ यांसाठी दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले. एकाच वर्षी दोन बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बोएल यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सायमन बिफॉय यांना `बेस्ट अँडॉप्टेड स्क्रीन प्ले’, अँथनी डॉड मँटल यांना `बेस्ट सिनेमॅटोग्राफी’, रिसूल पुकुट्टी यांना `बेस्ट साऊंड मिक्सिंग’ व क्रीस डीकन्स यांना सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार विजेत्यांपैकी रहमान यांनी हा पुरस्कार त्यांच्या आईला, तर रिसूल पुकुट्टी यांनी त्यांचा पुरस्कार भारताला अर्पण केला ! `स्लमडॉग मिलीयनेर’ या चित्रपटात श्रीरामाच्या नावाच्या घोषणा देत काही हिंदू मुस्लीम वस्तीत दंगल करण्यासाठी घुसत असल्याचा प्रसंग असून त्या वेळी तेथे एका श्रीरामाच्या रूपातील बहुरूप्याला दाखवण्यात आले आहे. या प्रसंगामुळे भारतातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटाच्या शीर्षकात भारतियांसाठी `डॉग’ हा शिवीवाचक शब्द वापरला आहे. (अन्य राष्ट्रांनी असे अपमानकारक शीर्षक खपवून घेतले असते का ? भारतात राष्ट्राभिमानी जागरूक नागरिकांचा अभाव असल्यानेच असे घडते ! – संपादक) चित्रपटात भारतातील सर्व अनैतिक व्यवसायांचे व बजबजपुरीचे दर्शन घडवण्यात आले आहे. (अन्य राष्ट्रांनी त्यांच्या देशातील अशी बजबजपुरी जागतिक स्तरावर दाखवण्याची परवानगी दिली असती का ? – संपादक) मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत मुसलमानांकडून चालणारे अनैतिक धंदे, मुसलमानांची गुन्हेगारी वृत्ती यांवर प्रकाश टाकणार्या प्रसंगांमुळे चित्रपट वास्तवदर्शी झाला आहे. `स्लमडॉग मिलीयनेर’ हा भारतीय कलाकार व भारतातील चित्रीकरण असलेला हॉलीवूडपट आहे, तर `स्माईल पिंकी’ हा अस्सल भारतीय चित्रपट असून तो उत्तरप्रदेशमधील दाबई गावात रहाणार्या व ओठांचे अपंगत्व असलेल्या एका मुलीवर बेतलेला आहे.