राष्ट्राभिमान्यांना अकारण मारहाण करून तुरुंगात डांबणार्या पोलिसांना हटवण्यासाठी क्रांतीला सज्ज व्हा !
वाचकहो, हे तुम्हाला गुन्हेगार वाटतात का, हे तुम्हीच ठरवा !
पुणे – प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांच्या विक्रीविरुद्ध तक्रार करण्यास गेलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अश्लील शिवीगाळ करत अमानुष मारहाण करण्याची व `चोराच्या उलट्या बोंबा’ याप्रमाणे पोलिसांकडून संबंधित कार्यकर्त्यांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून त्यांना एक दिवस तुरुंगात डांबण्याची संतापजनक घटना २६ जानेवारी रोजी पुणे येथील शुक्रवार पेठ पोलीस चौकी येथे घडली.
२६ जानेवारी २००९ रोजी दुपारी ४ वाजल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सर्वश्री सुनील घनवट, हेमंत शिंदे, नीलेश शिंदे व प्रशांत हिरवे हे पुणे येथील फरासखाना पोलीस ठाणे येथे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होत असल्यासंदर्भात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्या वेळी घडलेल्या घटनेसंदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे त्यांच्याच भाषेत दिली आहे.
१. आम्ही पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्यानंतर एल्.आय.बी.(लोकल इन्फॉर्मेशन ब्युरो)चे काही अधिकारी भेटले व ते `स्लमडॉग मिलीयनेर’ चित्रपट बंद पाडण्यासाठी त्यांनी समितीला कशी मदत केली, हे सांगत होते. हे सर्व बोलणे जवळीकतेने झाले; कारण ते समितीचे कार्य व वरील सर्वांना जवळून ओळखतात.
२. फरासखाना पोलीस ठाण्यातील एल्.आय.बी.चे श्री. दाते तेथे भेटले. त्या वेळी आम्ही त्यांना `प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांच्या विक्रीसंदर्भात तक्रार द्यायची आहे’, असे सांगितले. त्या वेळी त्यांनी `घटना कुठे घडली आहे’, असे विचारले व “तुम्ही संबंधित पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यास गेल्यावर तेथे तक्रार दाखल करून घेतील”, असे सांगितले; परंतु आम्ही त्यांना “आतापर्यंतच्या अनुभवानुसार पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल करून न घेता आम्हाला पोलीस स्थानकातच पाठवतात”, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी “ठीक आहे. वर जाऊन तक्रार दाखल करा”, असे सांगितले.
३. फरासखाना पोलीस स्थानकात गेल्यावर तक्रारीसंदर्भात सांगितले, तेव्हा “आमचे वरिष्ठ बाहेर गेलेले आहेत. ते आल्यावर तुम्ही तक्रार दाखल करा”, असे सांगितले. त्या वेळी आम्ही त्यांना “पोलीस निरीक्षक नसतील, तर दुसरे कोणी तक्रार दाखल करून घेतात का ?”, असे विचारले. त्या वेळी त्यांनी “ते आल्यावरच ते तक्रार दाखल करून घेतील किंवा तुम्ही गुन्हा कुठे घडला आहे, त्या पोलीस चौकीला जाऊन तक्रार दाखल करा”, असे त्यांनी सांगितले. यावर आम्ही त्यांना “पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल करून न घेता आम्हाला पोलीस स्थानकातच पाठवतात”, असे यापूर्वीचे आमचे अनुभव सांगितले. त्या वेळी त्यांनी “साहेबांना अजून वेळ लागणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच ठिकाणी (पोलीस चौकीमध्ये) जाऊन तक्रार दाखल करा”, असे सांगितले व स्थानिक पोलीस चौकीला दूरध्वनी करून आम्हाला तेथे पाठवले.
त्यानुसार आम्ही शुक्रवार पेठ पोलीस चौकी येथे तक्रार देण्यासाठी गेलो. त्या वेळी उपस्थित हवालदारांनी नेहमीप्रमाणे `गुन्हा कुठे घडला ?, आमच्या पोलीस चौकीच्या हद्दीत ते ठिकाण आहे का ?’, अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले. (गुन्हा नोंदवून घेतांना हद्दीचा प्रश्न उपस्थित करणारे कामचोर पोलीस ! – संपादक)
श्री. सुनील घनवट (आग्रहाने) : साहेब, ही राष्ट्रध्वजासंदर्भातील तक्रार असून ती कुठे घडली, यापेक्षा ती नोंदवून घेणे महत्त्वाचे आहे.
हवालदार : राष्ट्रध्वजाची विक्री करणारे दुकान कोणत्या हद्दीत आहे, हे आम्हाला दाखवा.
त्यानंतर त्यांना आम्ही ज्या दुकानातून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज खरेदी केले, त्या दुकानाची त्यासंदर्भातील पावती दाखवली. त्यावरून ते दुकान त्याच पोलीस चौकीच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट होत होते; परंतु तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यासाठी ते हद्दीचा विषय बोलत होते.
हवालदार : तुम्ही आमच्याबरोबर दुकानात चला, म्हणजे आम्ही ते आमच्या हद्दीत आहे का, ते पहातो.
श्री. सुनील घनवट : साहेब, त्या पावतीवर स्पष्ट उल्लेख आहे, तुम्ही हवं तर खात्री करून या.
यानंतर आम्ही तेथील संबंधित वरिष्ठ अधिकार्यांचा, म्हणजे पोलीस उपनिरीक्षिका सौ. बिडवे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संबंधित विषय सांगितला. त्या वेळी “१५ मिनिटांमध्ये मी पोलीस चौकीत येते. तोपर्यंत तुम्ही आमच्या हवालदारांना ते दुकान कुठे आहे, ते दाखवा, म्हणजे ते आमच्या हद्दीत आहे का, ते लक्षात येईल”, असे त्या म्हणाल्या. त्यानुसार उपस्थित कार्यकर्ते श्री. नीलेश शिंदे हे हवालदारास सदर दुकान दाखवून आले. (हद्दीचा प्रश्न सातत्याने उपस्थित करून पोलीस प्रक्रिया करण्यास टाळाटाळ करणार्या अशा पोलिसांना जनतेच्या पैशांवर पोसायचे कशाला ? – संपादक)
सामंजसपणे बोलणार्या कार्यकर्त्यांवर अकारण रागावून पोलीस उपनिरीक्षिकेने त्यांच्याविरुद्ध वरिष्ठांकडे `ही मुले गोंधळ घालत आहेत’, अशी खोटी तक्रार करणे
पोलीस उपनिरीक्षिका सौ. विमल बिडवे पोलीस चौकीत आल्यावर आम्हाला त्यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. आल्यावर त्या घाईतच होत्या. (त्या वेळी पोलीस चौकीच्या बाहेर हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.) आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर तेथे ५-६ महिला उपस्थित होत्या. आम्हाला बसायला जागाही न देता व आमच्या तक्रारीकडे गांभीर्याने न पहाता त्या महिलांच्या उपस्थितीतच आम्हाला आमचे काय म्हणणे आहे, ते विचारले. (पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांकडे नव्हे, तर हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाकडे जास्त लक्ष देणार्या उपनिरीक्षिका सौ. बिडवे ! – संपादक) प्रत्यक्षात आम्ही जे सांगत होतो, ते खूप ऐकून न घेता त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांना दूरध्वनी लावला. तत्पूर्वी कार्यकर्ते श्री. हेमंत शिंदे हे `आम्ही कोणत्या उद्देशाने येथे आलो आहोत’, हे सांगण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी संवाद साधत होते. हा संवाद साधत असतांनाच सौ. बिडवे यांनी त्यांच्या वरिष्ठांना दूरध्वनी लावला व त्यावरूनच वरिष्ठ जे प्रश्न विचारत होते, तेच आम्हाला त्या विचारत होत्या. याप्रमाणे त्यांनी श्री. हेमंत शिंदे यांचे नाव व वय विचारले व श्री. सुनील घनवट यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सांगितले. पूर्णनाव विचारल्यानंतर पूर्ण नाव सांगितले. लगेचच त्यांनी वय विचारले. त्या वेळी श्री. सुनील घनवट यांनी “सर्वच माहिती तुम्ही दूरध्वनीवरून कशाला घेता आहात, साहेब प्रत्यक्ष येणारच आहेत, तर ते आल्यावर आम्ही सर्व माहिती देणारच आहोत”, असे सांगितले; परंतु असे सांगितल्यानंतर सौ. बिडवे यांच्या रागाचा पारा अनावर झाला व त्यांनी दूरध्वनीवरूनच वरिष्ठांना “ही आलेली मुले माझे ऐकत नाहीत. या ठिकाणी गोंधळ घालत आहेत”, असे सांगितले.
त्यानंतर श्री. सुनील घनवट एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी तेथून उर्वरित कार्यकर्त्यांना सांगून निघाले.
तक्रार दाखल करण्यासाठी अधिकार्यांची वाट पहात उभे असलेल्या कार्यकर्त्यांची कोणतीही चौकशी न करता व त्यांचे काहीही ऐकून न घेता अश्लील शिव्या देत अमानुष मारहाण करण्यास सुरुवात करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी म्हणजे खाकी वर्दीतील गुंड !
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पवार त्या पोलीस चौकीमध्ये आले. तेव्हा त्यांनी पोलीस चौकीच्या दारात त्यांची वाट पहात उभे असलेल्या आम्हा कार्यकर्त्यांची कोणतीही चौकशी न करता आल्या आल्या आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या अधिकार्यांसह असलेल्या अन्य पोलिसांनी आम्हाला मारत मारतच आतमध्ये नेले. त्यानंतर कार्यकर्ते श्री. प्रशांत हिरवे यांना सर्वांनी खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारले. उर्वरित श्री. हेमंत व श्री. नीलेश शिंदे यांनाही ते अमानुषपणे मारत होते व आई-बहिणीवरून अश्लील शिव्या देत होते. “माज आला आहे का ? भडव्यांनो, तुमच्या गांडीवर लाथा घातल्या पाहिजेत, फालतू कुठले चार जण येतात व तक्रार दाखल करतात. पुढारी व्हायला चाललात का ? कसली जागृती करताहेत, लेडी पी.एस्.आय बघून तुम्ही गोंधळ घालता का ? भेंच्योत, मादरच्योत, मस्ती आली आहे का ?” वगैरे शिव्यांची लाखोली वाहत होते.
श्री. हेमंत शिंदे हे त्या अधिकार्यांना `आम्ही कशासाठी आलो आहोत’, हे सांगण्यासाठी प्रत्यक्ष कागदपत्रे दाखवत असतांना व त्याबद्दल सांगत असतांना कोणीही त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांना अर्वाच्च शिव्या देत मारत होते. तिघा कार्यकर्त्यांना मारत ६ ते ८ जण एकाच वेळी लाथाबुक्क्यांनी मारत होते.
त्यानंतर श्री. प्रशांत हिरवे यांनी श्री. सुनील घनवट यांना भ्रमणध्वनी केला व “तुम्ही या ठिकाणी त्वरित या”, असे सांगितले. त्या वेळी श्री. घनवट तेथे पोहोचले. त्या वेळी पोलिसांनी त्यांना तेथील मुख्य कार्यालयात शिव्या देत नेले व तेथे त्यांची कोणतीही गोष्ट ऐकून न घेता वरील प्रकारे शिव्या देत पोलिसांनी मारहाण केली. या वेळी आमचा (कार्यकर्त्यांचा) पोलीस चौकीत येण्यामागचा उद्देश काय आहे, हे कोणीच ऐकून घेत नव्हते.
पोलीस उपनिरीक्षिका सौ. बिडवे यांनी भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्ष आल्यावर जे काही त्या अधिकार्यांना सांगितले होते, त्या गैरसमजातून व पूर्वग्रहातून ते सर्व आम्हाला आमानुष पद्धतीने मारहाण करत होते, असे लक्षात आले.
कार्यकर्त्याला मारहाण करत त्यास टेबलवर ढकलून देऊन टेबलवरची काच फुटण्यास स्वत:च कारणीभूत असतांना `सदर काच कार्यकर्त्यांनी बुक्की मारून फोडली’, अशी
खोटी नोंद तक्रारीमध्ये करणे, ही पोलिसांची हुकूमशाही !
श्री. सुनील घनवट यांना मारहाण करत असतांना पोलीस निरीक्षक श्री. पवार यांनी श्री. घनवट यांना तेथील टेबलवर ढकलून दिले. त्या वेळी कदाचित तेथील टेबलवरील काच फुटली असावी; मात्र नंतर पोलिसांनी आमच्याविरुद्ध (कार्यकर्त्यांविरुद्ध) दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये `सदर काच कार्यकर्त्यांनी बुक्की मारून फोडली’, असे म्हटले आहे.
कार्यकर्त्यांचे म्हणणे काहीच ऐकून न घेता त्यांना उद्धटपणे व अरेरावीच्या भाषेत बोलत `तुमचे `रेकॉर्ड’ खराब करतो’, अशी धमकी देणारे कायदाद्रोही पोलीस !
त्यानंतर पोलिसांनी आम्हाला (कार्यकर्त्यांना) खाली बसण्यास सांगितले. `आमचे चुकले असेल तर आम्हाला माफ करा. आमचा उद्देश असा काहीही नव्हता. मॅडमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे’, असे पोलीस अधिकार्यांना सांगत असतांना ते ऐकून न घेता उद्धटपणे व अरेरावीच्या भाषेत श्री. पवार व श्री. धुमाळ हे “तुम्हाला पुढारीपणा काय आहे ते दाखवतोच, तुमचे रेकॉर्ड खराब करतो,’ असे बोलत होते.
त्या वेळी श्री. सुनील घनवट यांनी त्यांना “मी हिंदु जनजागृती समितीचे कार्य पहातो. आमची सर्व आंदोलने ही सनदशीरमार्गांनी असतात, हे तुम्हाला माहीत आहे. आम्ही येथे चुकीचे असे काही केलेले नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे”, असे सांगण्याचा प्रयत्न करत असतांनाच पोलीस निरीक्षक श्री. पवार हे त्यांना “कसली जागृती करतोस ? तुझ्याकडे बघतोच, बाईशी तुम्ही कसे वागले पाहिजे, हे कळत नाही का तुम्हाला ?,’ याच गोष्टीचा ते सतत उल्लेख करत होते. (समोरच्या व्यक्तीचा मुद्दा समजून न घेता त्यावर अनाठायी आरोप करत हाणामारी करत सुटलेले लोकशाहीद्रोही पोलीस ! – संपादक)
शिव्या देणे व अर्वाच्च भाषेत बोलणे, यांशिवाय बोलता न येणारे गुंडप्रवृत्तीचे पोलीस उपनिरीक्षक !
त्या वेळी श्री. पवार यांच्यासोबत उपस्थित असणारे पोलीस उपनिरीक्षक
श्री. धुमाळ त्या पाऊण तासाच्या कालावधीमध्ये सतत आम्हा सर्वांना शिव्या देत होते व अर्वाच्च भाषेत संभाषण करत होते. ते श्री. पवारसाहेबांच्या पुढे पुढे करत होते.
कार्यकर्त्यांची कोणतीच बाजू ऐकून न घेता एकतर्फी गुन्हा दाखल करण्याचा हुकूम सोडणारे पोलीस अधिकारी !
त्यानंतर त्या अधिकार्यांनी श्री. घनवट यांना उर्वरित तिघा कार्यकर्त्यांसमवेत खालच्या खोलीत बसण्यास सांगितले व “या सर्वांवर गुन्हा दाखल करा”, असे पोलीस कर्मचार्यांना सांगितले.
प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकणे, हा कायद्यानुसार गुन्हा असतांना `तो गुन्हा कसा नाही’, हे सांगणारे व्यापारी व त्या व्यापार्यांची बाजू घेणारे आणि राष्ट्रप्रेमी कार्यकर्ता बाजू मांडू लागल्यास त्यास अर्वाच्च भाषेत बोलणारे राष्ट्रद्रोही पोलीस अधिकारी !
त्यानंतर १० मिनिटांनी अधिकार्यांनी श्री. सुनील घनवट यांना पुन्हा कार्यालयात बोलावून घेतले. त्या वेळी ज्या व्यापार्यांविरुद्ध तक्रार दाखल करायची होती ते व अन्य ६-७ व्यापारी त्या पोलीस निरीक्षकांसमोर बसले होते आणि ते `प्लास्टिकचा राष्ट्रध्वज विकल्याने कोणताही गुन्हा कसा होत नाही’, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. ते प्रत्यक्षात झालेल्या प्रकाराच्या विरोधात साहेबांना खूष करण्यासाठीच बोलत होते. त्या वेळी शासनाचा अध्यादेश (जी.आर.) श्री. घनवट यांना दाखवून त्यात `प्लास्टिकचे ध्वज विकण्यास कुठे बंदी आहे ?’, असे विचारत होते. यावर श्री. घनवट यांनी त्या अध्यायदेशामध्ये सदर मुद्दा असल्याचे सांगण्यास सुरुवात केल्यावर त्यांचे काहीच ऐकून न घेता पोलिसांनी पुन्हा अरेरावीच्या भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्या वेळी उपस्थित व्यापारी “राष्ट्रध्वजाची तक्रार गौण असून तुमचे वागणे चुकीचे आहे”, हे साहेबांसमोर सांगण्याचा प्रयत्न करत होते.
स्वत: जनतेचे सेवक असतांना तक्रार करण्यास आलेल्या कार्यकर्त्यांवर गुंडगिरी करणारे व `चोराच्या उलट्या बोंबा !’ याप्रमाणे उलट कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबणारे मोगलांचे वंशज शोभणारे पोलीस अधिकारी !
त्यांनतर श्री. घनवट यांना खाली बसवून सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्या वेळी `गुन्हा दाखल करू नये व काही मदत मिळावी’, यांसाठी `आम्हाला आमच्या घरातील किंवा ओळखीच्या लोकांशी बोलू द्या,’ अशी कार्यकर्त्यांनी खूप विनवणी केली, तरीही कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही व अवघ्या १५ मिनिटांत सर्वांवर भा.दं.वि.च्या कलम ३५३, ४२७, ३४, तसेच क्रिमीनल लॉ सेक्शन ७ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात सर्वांना नेण्यात आले. त्यानंतर चौघांना फरासखाना पोलीस ठाण्यात एका रात्रीसाठी तुरुंगात ठेवण्यात आले.
लोकप्रतिनिधी व अन्य लोकांनी `कार्यकर्ते असे करू शकणार नाहीत. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे’, असे सांगून कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करण्यास सांगितल्यावर `वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत हा विषय पोहोचवल्यामुळे तसे करू शकत नाही’, असे सांगणारे पोलीस अधिकारी !
आम्हा कार्यकर्त्यांना पोलीस वैद्यकीय तपासणीला घेऊन गेल्यानंतर तेथे श्री. नीलेश शिंदे यांचे काका श्री. राजेश शिंदे व त्यांच्या ओळखीचे काही ज्येष्ठ लोक आणि स्थानिक नगरसेवक आले होते. त्यांनीही पोलीस निरीक्षक श्री. पवार यांना दूरध्वनीवरून “सदर कार्यकर्ते आमच्या ओळखीचे असून ते असे कधी करू शकणार नाहीत. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेऊन त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत”, असे त्यांना सांगितले; परंतु पोलीस निरीक्षक श्री. पवार यांनी हा सर्व विषय अत्यंत तत्परतेने ए.सी.पी. व डी.सी.पी. यांच्यापर्यंत पोहोचवला व “वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत हा विषय पोहोचवला असल्यामुळे मी आता काहीही करू शकत नाही”, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांची गुंडगिरी लपवण्यासाठी कार्यकर्त्यांवर खोटारडे आरोप करणार्या पोलीस उपनिरीक्षिका !
पोलीस उपनिरीक्षिका सौ. बिडवे यांच्याशी आमचे (कार्यकर्त्यांचे) प्राथमिक बोलणे त्या बसत असलेल्या कार्यालयात झालेले होते, तरीही सौ. बिडवे याबाबत सांगतांना “हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या १५० महिला उपस्थित असतांना हे कार्यकर्ते माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागले”, असे खोटे सांगत होत्या. प्रत्यक्षात असे काहीही झाले नव्हते.
निरपराध कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणारे जनतेचे सेवक नव्हे, तर गुंड पोलीस !
पोलिसांनी आमच्याविरुद्ध (कार्यकर्त्यांविरुद्ध) दिलेल्या पोलीस तक्रारीमध्ये `कार्यकर्त्यांनी पोलिसांचा एकेरी उल्लेख केला, शिपायांना `शिपुरड्या’ म्हटले, हवालदारांची गचुंडी पकडून त्यांना ढकलून दिले, बुक्क्या मारून टेबलवरील काच फोडली व सरकारी कामात अडथळा आणला’, असे नमूद केले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्षात हे सर्व आरोप खोटे आहेत.
निरपराध लोकांशी मुजोरीने वागून मोगली सत्तेची आठवण करून देणारे व नंतर पोलिसांच्या विरोधात न जाण्याचा सल्ला (नव्हे एक प्रकारची धमकी) देणारे पोलीस !
दुसर्या दिवशी, म्हणजे २७.१.२००८ रोजी जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साहित्य घेण्यासाठी आमच्यापैकी काही कार्यकर्ते शुक्रवार पेठ पोलीस चौकीत गेले. त्या वेळी तेथील काही पोलीस “तुम्ही पोलिसांबरोबरच राहून काम केले पाहिजे. कोणतीही संघटना पोलिसांच्या विरोधात जाऊन काम करूच शकत नाही”, असे समजावून सांगत होते.
पोलिसांनो, जनतेशी प्रथम मगु्ररीने वागायचे व परिस्थिती उलटून स्वत: अडचणीत येणार, असे वाटल्यावर प्रेमाने वागण्याचा व मदत करत असल्याचा आव आणायचा, या तुमच्या ढोंगीपणाला भुलायला जनता दूधखुळी नाही, हे लक्षात ठेवा !
पहिल्या दिवशी (२६ जानेवारी रोजी) आम्हा कार्यकत्यांना मारहाण करणे व आमच्या विरोधात तक्रार करणे यांमध्ये सहभागी असलेले सर्व पोलीस दुसर्या दिवशी आम्ही जामिनावर सुटल्यावर सर्व कार्यकर्त्यांशी अत्यंत शांतपणे, प्रेमाने व `आम्ही तुम्हाला मदत कशी करतो’, हे दाखवण्याच्या या आविर्भावाने वागतांना व बोलतांना दिसत होते.
सत्य परिस्थिती नाकारणार्या पोलीस उपनिरीक्षिका !
सदर प्रकार पोलिसांच्या गैरसमजातून झाल्याचे सांगून कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करण्यासंदर्भात अनेक व्यक्तींचे व लोकप्रतिमनाला झालेल्या जखमा सर्व ठिकाणच्या जनताद्रोही व अत्याचारी पोलिसांचा नायनाट केल्याशिवाय कधीही भरून येणार नाहीत. द्रौपदीने कौरवांनी केलेल्या अत्याचारांची जाणीव पांडवांना सतत करून देण्यासाठी आपले केस मोकळे ठेवले होते. त्याचप्रमाणे आता हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर येऊन सर्वत्रच्या मग्रूर पोलिसांना योग्य धडा शिकवीपर्यंत दररोज त्या प्रसंगांची आठवण मनात ठेवा, म्हणजे जनताद्रोही पोलिसांविरुद्धचा सूडाग्नी धगधगता ठेवा !
वाचकांना विनंती व साधकांना सूचना
अन्यायकारक वागणूक देणार्या पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे व न्यायालयीन अन्याय निवारण समितीकडे तक्रार करा !
पोलीस हे जनतेचे सेवक आहेत; पण बहुतांश वेळा सर्वसामान्य जनतेला त्यांचा उलट अनुभव येतो. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्यांना तासन्तास ताटकळत ठेवणे, त्यांची तक्रार नोंदवून न घेणे, तक्रारदारांशी उद्धटपणे बोलणे, दमदाटी करून तक्रारदाराच्या मनाचे खच्चीकरण करणे, तक्रार नोंदवून घेण्यासाठी पैशांची मागणी करणे, तक्रारदाराला निष्कारण धक्काबुक्की करणे, तक्रार करणार्याविरुद्धच खोटा गुन्हा दाखल करणे या व अशा विविध प्रकारांमुळे पोलिसांकडून सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो. पोलिसांकडून होणार्या अशा अन्यायाबद्दल त्यांच्या वरिष्ठांकडे, म्हणजे संबंधित पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री, गृहमंत्री, स्थानिक आमदार वगैरेंकडे तक्रार करा आणि त्याची एक प्रत न्यायालयीन अन्याय निवारण समितीकडे पुढील पत्त्यावर पाठवा.
न्यायालयीन अन्याय निवारण समिती, बी.जी. – ३, तळमजला, मार्विल अपार्टमेंट, फेज – २, सांताक्रूज, फोंडा, गोवा. ४०३४०१
जनेतला अन्यायकारक वागणूक देणार्या पोलिसांवर योग्य वेळी कारवाई करण्यासाठी त्यांची यादी बनवा !
वाचक व साधक यांनी कर्तव्यपराङ्मुख व जनेतला अन्यायकारक वागणूक देणार्या पोलिसांची पुढील कारवाईसाठी यादी बनवावी. त्यामध्ये संबंधित पोलिसाचे पूर्ण नाव, बक्कल क्रमांक, पद व शक्य असल्यास त्याच्या घरचा पत्ता आदी माहितीचा समावेश असावा. नंतर प्रसंगांनुरूप लक्षात येणार्या अन्यायकारी पोलिसांची नावे त्या त्या वेळी त्या यादीत अंतर्भूत करावीत. काही महिन्यांतच होऊ घातलेल्या निवडणुकीत हिंदुत्ववाद्यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अशा पोलिसांवर कठोर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडू.
लोकहो, तुम्हाला पोलिसांनी दिलेल्या अन्यायकारक वागणुकीचा सूडाग्नी योग्य वेळ येईपर्यंत धगधगत ठेवा !
लोकहो, जनतेच्या पैशावर पोसले जाणारे बहुतांश पोलीस जनतेशी मगु्ररीने वागतांना व अन्यायकारक वागणूक देतांना आढळतात. त्याचा अनुभव तुमच्यापैकी काहीजणांनी कमी-जास्त प्रमाणात घेतलेला आहे व घेत आहेत. पोलिसांनी तुम्हाला दिलेल्या अन्यायकारक वागणुकीमुळे तुमच्या मनाला झालेल्या जखमा सर्व ठिकाणच्या जनताद्रोही व अत्याचारी पोलिसांचा नायनाट केल्याशिवाय कधीही भरून येणार नाहीत. द्रौपदीने कौरवांनी केलेल्या अत्याचारांची जाणीव पांडवांना सतत करून देण्यासाठी आपले केस मोकळे ठेवले होते. त्याचप्रमाणे आता हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर येऊन सर्वत्रच्या मग्रूर पोलिसांना योग्य धडा शिकवीपर्यंत दररोज त्या प्रसंगांची आठवण मनात ठेवा, म्हणजे जनताद्रोही पोलिसांविरुद्धचा सूडाग्नी धगधगता ठेवा !
चांगल्या पोलिसांची नावे कळवा !
ज्या पोलिसांकडून जनतेला चांगली वागणूक दिले जात आहे, त्या पोलिसांचीही यादी बनवा. ईश्वरी राज्यात चांगल्या पोलिसांच्या गुणवत्तेचे कौतुक करून त्यांची महत्त्वाच्या जागांवर नेमणूक करण्यास नवीन सरकारला सांगू.





