हिंदूंनो, प्रभु श्रीरामचंद्रांचा अवमान करणार्या `स्लमडॉग मिलीयनेर’ चित्रपटावर बहिष्कार घाला !
`स्लमडॉग मिलीयनेर’ हा भारतीय परिस्थितीवर परदेशी निर्मात्याने बनवलेला चित्रपट सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. एका बाजूला या चित्रपटाला नामांकित `ऑस्कर’ पुरस्कारासाठी दहा नामांकने मिळाली आहेत, तर दुसरीकडे श्रद्धास्थानाचा अवमान केला म्हणून भारतातून काही जागृत हिंदूंनी व अन्य देशभक्त मंडळींनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. हिंदु जनजागृती समितीने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने या चित्रपटाचा केलेला अभ्यास.
संकलक : श्री. शिवाजी वटकर, मुंबई, ठाणे व रायगड जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
चित्रपटाबद्दल माहिती
`स्लमडॉग मिलीयनेर’ या चित्रपटाचे निर्माते िख्र्टासीन कोलसन आणि दिग्दर्शक डॅनी बॉयल व श्रीमती लवलीन टंडन हे आहेत. या चित्रपटाचे कथानक काल्पनिक असून भारतीय लेखक विकास स्वरूप यांच्या `क्यु अँण्ड ए’ या कादंबरीवर अवलंबून आहे. (श्री. स्वरूप यांनी लिहिलेल्या कादंबरीत नायकाचे सर्वधर्मसमभावी (?) नाव राम महंमद थॉमस असे आहे.) चित्रपटाचा नायक जमाल मलिक हा मुंबईतील धारावी झोपडपट्टीत रहाणारा तरुण मुलगा `कोणाला कोट्यधीश व्हायचे आहे ?’ (व्हू वॉन्ट्स् टू बी अ मिलीयनेर ?) या प्रश्नोत्तर स्वरूपाच्या खेळामध्ये भाग घेतो. या खेळाचे सूत्रसंचालक अनिल कपूर यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन तो कोट्यधीश होतो. झोपडपट्टीवासी मुलाला सर्व उत्तरे माहीत असणे शक्य नाही, या शंकेमुळे अनिल कपूर त्याला चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देतो. त्या वेळी जमाल पोलिसांना त्याच्या जीवनात घडलेल्या विविध घटना व त्यातून उत्तरे कशी मिळाली, हे सांगतो.
प्रभू श्रीरामचंद्रांना दंगलीसाठी दोषी ठरवण्याचा प्रयत्न !
अनिल कपूर यांनी १६ सहस्र रुपये बक्षिसासाठी जमाल याला, `प्रभु श्रीरामाने उजव्या हातात काय धरले आहे’ असा प्रश्न विचारलेला असतो. या प्रश्नाचे उत्तर तुला कसे मिळाले, असे पोलिसांनी जमालला विचारल्यावर त्याला बालपणी झालेली दंगल आठवते
या दंगलीमध्ये हिंदूंचा जमाव मुसलमान वस्तीवर काठ्या व सळया घेऊन हल्ला करतो. `ते मुसलमान आहेत, त्यांना मारा’, अशी ओरड करत हिंदू मुसलमानांना मारतात. मुसलमान सैरभैर होऊन पळतात. एक हिंदु जमालच्या आईच्या डोक्यावर लोखंडी सळई मारतो व त्यात तिचा जागीच मृत्यू होतो. जमाल व त्याचा भाऊ सलीम तेथून पळ काढतात. पळतांना ते एका छोट्याशा बोळात घुसतात. तेथे त्यांना प्रभु श्रीरामचंद्रांची वेशभूषा केलेला एक लहान मुलगा दिसतो. जमाल व त्याचा भाऊ सलीम तिथेच थबकतात व `त्या’ श्रीरामाला काही क्षण बारकाईने न्याहाळतात व श्रीराम आपल्याला ठार मारेल या भीतीने ते जीव मुठीत धरून अन्यत्र पळतात. त्यानंतर चित्रपटात हिंदु मुसलमानांना जिवंत जाळत आहेत, रॉकेल बाँब फेकून घरे, वस्ती पेटवत आहेत, अशी दृश्ये दाखवण्यात आली आहेत. शेवटी जमालला त्याच्या आईचा पाण्यात उताणा पडलेला मृतदेह आठवतो. पोलिसांना या प्रसंगाबाबत सांगतांना जमाल म्हणतो, “या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नसावे, या आशेने मी रोज सकाळी उठतो. जर ही दंगल राम व अल्ला यांच्यासाठी नसती, तर माझी आई अजूनही असती.” त्यानंतर जमाल पुन्हा आठवणीत जातो. त्याला श्रीराम आठवतो व त्याच्या उजव्या हातातील धनुष्य स्पष्ट दिसते. त्यानुसार तणावग्रस्त चेहर्याने तो अनिल कपूर यांना `धनुष्यबाण’, असे प्रश्नाचे उत्तर देतो.
हा प्रसंग मनावर ठसवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या संगीत, `स्पेशल इफेक्ट्स’ यांचा वापर केला आहे व श्रीरामाचा चेहरा ५ ते ६ वेळा विविध कोनांमधून (अँगल) दाखवला आहे. तसेच श्रीरामाच्या हातात धनुष्य दाखवून आठवणीच्या दृश्याचा शेवट केला आहे. चित्रपटाच्या `ट्रेलर’मध्येही हा प्रसंग दाखवला आहे. एकूण चित्रपटात मधेमधे अनेक वेळा या श्रीरामाचे चित्र दाखवण्यात आले आहे. दंगली व मुसलमानांवरील कथित अत्याचारासाठी प्रभु श्रीरामांना दोषी ठरवण्याच्या विकृत हेतूने सदर प्रसंग चित्रपटात अंतर्भूत केला असल्याचे स्पष्ट होते.
धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
अयोध्येतील रामजन्मभूमीवरील बाबरी मशीद पाडल्यावर मुंबईत उसळलेल्या दंगलीचे हे चित्रण आहे. या चित्रपटाचा मुसलमान व आंतरराष्ट्रीय समाजावर मोठा परिणाम होणार आहे. हिंदु जमाव मुसलमानांना ठार मारतो, जिवंत जाळतो, त्यांची वस्ती पेटवतो व नायकाच्या आईची निर्घृणपणे हत्या करतो. या निराधार, काल्पनिक, एककल्ली व द्वेषपूर्ण दृश्यांमुळे `हिंदू म्हणजे अत्याचारी’ अशी हिंदूंची प्रतिमा जगासमोर मांडली गेली आहे; मात्र प्रत्यक्षात मुसलमानच दंगलखोर असतात, हा आजवरचा अनुभव आहे. या चित्रपटामुळे हिंदु व मुसलमान समाजांत धार्मिक तेढ व तणाव निर्माण होऊ शकतो. सहिष्णू वृत्तीच्या हिंदूंना व त्यांच्या श्रद्धास्थानांना जगभरात कलंकित करण्याचा हा आंतरराष्ट्रीय कट आहे.
मुसलमान वस्तीत श्रीराम ?
मुसलमान वस्तीत श्रीरामाच्या वेशात भीक मागणारा मुलगा कसा आला, या वस्तीत त्याला कोण भीक देणार, दंगलीच्या गोंधळात लहान मुलगा अतिशय शांतपणे आशीर्वादाच्या मुद्रेत रस्त्यात कसा काय उभा राहू शकतो, असे अनेक प्रश्न या घटनेच्या संदर्भात उपस्थित होतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट बनवणार्या दिग्दर्शकाकडून एका विशिष्ट प्रसंगात एवढ्या बाळबोध चुका होणे शक्य नाही. हे दृश्य हेतूपुरस्सर हिंदु देवतांच्या अपमानासाठी चित्रपटात अंतर्भूत करण्यात आले आहे, हे स्पष्ट आहे.
डाव्या हाताने आशीर्वाद ?
प्रभु श्रीरामचंद्रांसारखी वेशभूषा केलेल्या त्या मुलाच्या चेहेर्यावरील हावभाव अतिशय गंभीर दाखवण्यात आले आहेत. त्या श्रीरामाच्या वेशातील मुलाने उजव्या हातात धनुष्य धरले असून आपला डावा हात आशीर्वादासाठी वर केला आहे. व्यक्ती उजव्या हातात धनुष्य धरते, तेव्हा ती युद्धसज्ज आहे, असा अर्थ असतो. प्रश्नातही उजव्या हाताचा उल्लेख जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. प्रत्यक्षात श्रीरामाचे डाव्या हाताने आशीर्वाद दिल्याचे एकही चित्र उपलब्ध नाही व हे धर्मविसंगत असल्याने तो देवतेचा हेतूपुरस्सर अपमान ठरतो.
भारताचे अतिशय विकृत चित्रीकरण
संपूर्ण चित्रपटात भारत म्हणजे भिकारी, लुटारू, नीच, दंगलखोर, वेश्याव्यवसाय करणारे यांचा देश, असे चित्र उभे केले आहे. काही प्रसंगात अमेरिकेचे श्रेष्ठत्व दर्शवणारी व भारताला हिणवणारी वाक्ये आहेत. भारताचे असे अतिरंजित व बीभत्स चित्रण कोणाही राष्ट्रभक्ताला क्लेशदायक वाटणारे आहे. त्यामुळे भारताच्या सन्मानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर धक्का पोहोचला आहे.
राष्ट्रीय मानचिन्हाचा अवमान
चित्रपटात `भारताच्या राजमुद्रेत तीन सिंहांचे चित्र आहे. त्याच्या खाली काय लिहिले आहे’, असा प्रश्न अनिल कपूर यांनी विचारला आहे. भारतीय राजमुद्रेत तीन नाही, तर चार सिंह आहेत. चुकीची माहिती देऊन चित्रपटातून राष्ट्रीय मानचिन्हाचा अवमान केला आहे.
हिंदु मुलींना सावधानतेचा इशारा
हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढून फसवण्यासाठी मुसलमान तरुणांना पैसे देण्यात येतात, अशी वृत्ते वरचेवर आपल्या वाचनात येतात. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांमध्ये तर मौलवींनी `हिंदु मुलीला बाटवा व १०० रुपये मिळवा’, अशी योजना मुसलमान तरुणांसाठी सुरू केली आहे. कर्नाटकमध्ये दरवर्षी ३० हजार युवती मुसलमान होतात, अशी आकडेवारी आहे. या प्रकाराबाबत हिंदु युवती आधीच अज्ञानी असून या चित्रपटामुळे त्यांना दिशाहीन होण्यास आणखी प्रोत्साहन मिळणार आहे. हिंदु अभिनेत्री अथवा युवतीचा मुसलमान अभिनेत्याशी विवाह झाल्याच्या घटना प्रसिद्ध आहेत. विवाहानंतर या हिंदु युवती त्यांचा धर्म बदलतात; मात्र मुसलमान अभिनेत्रीने हिंदु अभिनेत्याशी विवाह केल्याचा घटना ऐकिवात येत नाहीत. या चित्रपटात जमाल या मुसलमान नायकाचे लतिका नावाच्या हिंदु युवतीशी प्रेमप्रकरण दाखवले आहे. समाजमनावर चित्रपटांचा विशेष परिणाम होतो. हिंदु युवतींनी चित्रपटाच्या या मायाजालास न भुलता समाजातील विदारक सत्याची कायम जाण ठेवावी. हिंदु समाजाला बाटवण्याच्या इस्लामी षड्यंत्राला स्वत: बळी पडू नये, तसेच इतरांनाही सावध करत रहावे.
असंवेदनशील सरकारी यंत्रणा
धार्मिकदृष्ट्या संवेदनशील प्रसंग असतांनाही हा चित्रपट `सेन्सॉर’ मंडळाने मंजूर केला. श्रीरामाऐवजी येशु, महंमद पैगंबर यांचा वापर केला असता, तर चित्रपटाला भारतीय चित्रपटगृहांचे दरवाजे कोणीही न सांगताच बंद झाले असते. तसेच हिंदु जमावाऐवजी मुसलमान जमाव असा अत्याचार करत आहे, असे चित्रपटातून जनतेला दाखवण्याचे धाडसही भारतीय राज्यकर्ते कधीच करू शकत नाहीत.
श्रद्धेवर घाला
श्रद्धेमुळे माणूस `मानव’ या संज्ञेला शोभेल, असे जीवन जगतो. ज्याची कोणावरही श्रद्धा नाही, अशा व्यक्तींचे जीवन बहुतांश वेळा स्वैर व समाजविघातक असते. प्रभु श्रीरामाचे जीवन समस्त हिंदूंना आदर्श आहे. भगवान श्रीराम हे आदर्श राजा, पिता, पती, पुत्र, बंधु आहेत. रामायण ऐकून जीवनाला चांगली दिशा मिळावी, यासाठी बालपणीच देवतांच्या कथा सांगून नीतीमत्तेचे धडे बालकांना दिले जातात. प्रभु श्रीरामांवरील अशी चुकीची दृश्ये समाजात गोंधळ उत्पन्न करतात. बुद्धीवादी व हिंदुद्रोही मंडळी त्यांचा कोलित म्हणून वापर करून देवतांबद्दल शंका उपस्थित करतात. देवतांवरील श्रद्धा ही समाजाला सशक्त बनवते; म्हणून श्रद्धेचे रक्षण केले पाहिजे. या चित्रपटाद्वारे भावनिक आधार घेत नेमक्या याच श्रद्धेचा पाडाव करण्याचा राक्षसी प्रयत्न केला आहे. हिंदूंच्या जीवनाचा आधारस्तंभ असलेल्या अशा श्रद्धांना आरोपींच्या पिंजर्यात उभे करणारे चित्रपट हे धर्मासाठी मोठा धोका आहेत. हा हिंदूंचा अपमान आहे. देवतांबद्दल चुकीचे विचार निर्माण होतील, असे दृश्य समाजात प्रसारित होण्यापासून रोखण्यासाठी प्रत्येक धर्मप्रेमी हिंदूने कार्यरत व्हायला हवे.
आपण काय करू शकता ?
आपण नातेवाइकांत व मित्रमंडळींत या चित्रपटाबद्दल जागृती निर्माण करू शकता. वृत्तपत्रांतून चित्रपटाचे सत्यस्वरूप उघड करणारी पत्रे लिहिणे, हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील `ऑनलाईन’ निषेध मोहिमेत सहभागी होणे, या चित्रपटाच्या विरोधात पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंदवणे, चित्रपटगृहांना निवेदन देणे, जिल्हाधिकारी, मंत्री यांच्याकडे चित्रपटावर बंदी घालण्याबद्दल मागणी करणे, अशा अनेक प्रकारे आपण या चित्रपटाच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करू शकता. प्रभु श्रीरामाचे विडंबन उघड्या डोळयांनी पाहूनही कृती न करणार्या षंढ वृत्तीच्या जमावाचे घटक बनू नका. या चित्रपटाला शक्य त्या सर्व माध्यमांतून विरोध करून प्रभु श्रीरामांची कृपा संपादन करूया !
समितीच्या `ऑनलाईन’ निषेध चळवळीत सहभागी व्हा !
http://www.hindujagruti.org/denigrations/protestslumdog


