मुंबई, २० जानेवारी (वार्ता.) – `स्लमडॉग मिलेनिअर’ या आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटातून हिंदूंचे आराध्यदैवत प्रभु श्रीरामचंद्रांचे विडंबन करण्यात आले आहे.
(हिंदु त्यांच्या देवता व धर्म यांबद्दल उदासीन असल्याने कोणीही त्यांच्या देवता व धर्म यांचे सहज विडंबन करू धजावतात. मुसलमानांच्या श्रद्धास्थानांचे अशा प्रकारे विडंबन करण्याची हिंमत कोणात आहे का ? – संपादक) या चित्रपटात प्रभु श्रीरामचंद्रांना विद्रुप स्वरूपात दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात `भारतात हिंदु मुसलमानांवर अन्याय करतात’ असा प्रसंग दाखवण्यात आला आहे. (आंतरराष्ट्रीय पातळीवर सहिष्णू हिंदूंची प्रतीमा जाणूनबुजून खराब करण्याचे षडयंत्र यशस्वी करणार्यांचे पितळ उघडे पाडणारा एकही मायचा लाल अस्तित्वात नाही का ? हिंदुत्ववादी संघटना याबाबत काय करणार आहेत ? – संपादक) या संपूर्ण चित्रपटात केवळ भारतातील दारिद्र्याचेच प्रदर्शन करण्यात आले आहे. याबाबत जगभरातील धर्माभिमानी हिंदूंमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या चित्रपटाच्या विरोधात सर्वत्र निषेधाचे सूर उमटत आहेत व या चित्रपटाचे प्रदर्शन त्वरित थांबवावे व चित्रपट निर्मात्याने सर्व हिंदूंची क्षमा मागावी, अशी मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. हा चित्रपट भारतात २३ जानेवारी रोजी म्हणजे येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. (प्रभु श्रीरामचंद्रांचे विडंबन करणार्या व हिंदूंचा अवमान करणार्या या चित्रपटाचा जाहीर निषेध ! – संपादक) विशेष म्हणजे या चित्रपटास आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. याबाबत हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील http://www.hindujagruti.org/news/6162.html या मार्गिकेवर विस्तृत माहिती उपलबध आहे. समितीच्या संकेतस्थळावर याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. संकेतस्थळाला भेट देणार्या हिंदूंनी या चित्रपटाचे भारतात होणारे प्रदर्शन थांबवावे व चित्रपटाच्या निर्मात्यांनी समस्त हिंदूंची क्षमा मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
धर्माभिमानी पुढील पत्ता व संपर्क क्रमांक यांवर निषेध नोंदवत आहेत.
फॉक्स सर्चलाईट पिक्चर्स, १०२०१ पिको ब्लव्ह्ड, लॉस एंजलिस सीए ९००३५, अमेरिका दूरध्वनी : ३१०-३६९-२४३१
हिंदु जनजागृती समितीचे चित्रपट परीनिरीक्षण मंडळास निवेदन
मुंबई – लाखो हिंदूंच्या व भारतियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने `स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटाला भारतामध्ये दाखवण्यास प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी आज हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला केली. हिंदु जनजागृती समितीतर्फे केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला याबाबतचे निषेधपत्र देण्यात आले. समितीच्या महिला आघाडी प्रमुख सौ. वर्षा ठकार, संकेतस्थळ प्रतिनिधी श्री. अनित पिंपळे व समितीचे मुंबई समन्वय श्री. शिवाजी वटकर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या सचिव श्रीमती विजया यांच्याबरोबर हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने आज चर्चा केली. उद्या या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी विभागीय अधिकारी श्री. विनय आझाद यांनी शिष्टमंडळास बोलावले आहे. या मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शर्मिला टागोर यांनाही हे निवेदन दाखवून उद्या या संदर्भात शिष्टमंडळाला माहिती देण्यात येईल. हिंदु जनजागृती समितीतर्फे हिंदु धर्माभिमान्यांना व राष्ट्राभिमान्यांना त्यांनी या चित्रपटाला विरोध करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
धर्माभिमानी पुढील पत्ता व संपर्क क्रमांक यांवर निषेध नोंदवत आहेत.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, भारतभुवन, ९१ इ, वाळकेश्वर रोड, मुंबई ६.
दू.क्र. व फॅक्स : (०२२) २३६२ ५७७०, २३६९ ९२५५
`स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटातील आक्षेपार्ह प्रसंग व दृश्ये
या चित्रपटातील कथानकात जमाल मलिक हा मुंबईतील झोपडपट्टीत रहाणारा तरुण मुलगा या खेळामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन कोट्याधीश होतो, असे दाखवण्यात आले आहे. त्यात `प्रभु श्रीरामाने उजव्या हातात काय पकडले आहे ? असा एक प्रश्न सूत्रसंचालक असलेला अनिल कपूर जमालला विचारतो. त्या वेळी जमालला त्याच्या बालपणी झालेली दंगल आठवते त्यात हिंदु मुसलमानबहुल भागात हल्ला करतात व `ते पहा मुसलमान, त्यांना पकडा’, अशा घोषणा देत ते मुसलमानांवर हल्ला करतात व मुसलमान सैरभैर होऊन पळतात. एक हिंदु जमालच्या आईच्या डोक्यावर लोखंडी दांडा मारतो व तिची हत्या करतो. जमाल व त्याचा भाऊ सलीम तेथून पळ काढतात. पळतांना ते एका छोट्याशा बोळात शिरतात. तेथे त्यांना प्रभु श्रीरामचंद्रांची वेशभूषा केलेला एक लहान मुलगा दिसतो. जमाल त्याला बारकाईने न्याहाळतो. तेव्हा त्याला त्या मुलाच्या उजव्या हातात धनुष्य दिसतो. नंतर ते मार्ग बदलतात, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. (हिंदूंनो, या चित्रपटाच्या विरोधात जोरदार आवाज उठवा व हिंदु मुसलमानांवर नव्हे, तर मुसलमान हिंदूंवर अन्याय करतात, हे सिद्ध करून दाखवा ! – संपादक) प्रभु श्रीरामचंद्रांसारखी वेशभूषा केलेला तो मुलगा अतिशय भयानक दाखवण्यात आलेला आहे. चित्रपटात त्याच्या चेहर्यावर दाखवण्यात आलेले हावभाव व स्थिती अत्यंत विद्रुप आहे. प्रभू श्रीराम उजव्या हातात लोकांना मारण्यासाठीच धनुष्य घेऊन उभे आहेत, असे या दृश्यातून प्रतीत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात भारत हा चोरट्यांचा व अमेरिका हा मानवतावाद्यांचा देश आहे, असे प्रसंग दाखवण्यात आले आहेत.


