कुठे राष्ट्रद्रोह्यासाठी केवळ तो मुसलमान आहे म्हणून प्रार्थना करणारे मुसलमान, तर कुठे संकटात सापडलेल्या राष्ट्रप्रेमी हिंदूंसाठी मदत तर लांबच प्रार्थनाही न करणारे हिंदू !
जळगाव जिल्ह्यातील काही गावांमध्ये `हिंदु जनजागृती समिती’तर्फे दर आठवड्याला धर्मशिक्षण वर्ग घेण्यात येतो. या वर्गात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील मुसलमानांच्या जत्रेत मुंबईच्या बाँबस्फोटातील भयोत्पादक कसाबसाठी दर्ग्यावर मुसलमान चादरी चढवत असल्याचे सांगण्यात आले. या प्रसंगावरून एकीकडे धर्मांधतेमुळे राष्ट्रद्रोही कसाबसाठी प्रार्थना करणारे मुसलमान व हिंदुहितासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रप्रेमी हिंदूंवर संकट आल्यावर त्यांच्यासाठी कृतीतर लांबच; मात्र साधी प्रार्थनाही हिंदू करत नाहीत, हा भाग उपस्थितांच्या लक्षात आणून देण्यात आला. या प्रबोधनाने प्रभावित झालेल्या अमळनेर, धरणगाव, पाळधी, फैजपूर व वाघोदा येथील हिंदूंनी धर्माभिमानी हिंदू व हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांपासून त्यांची सुटका व्हावी; तसेच धर्मद्रोही जनता आणि धर्मद्रोही सरकार नष्ट व्हावे, यांसाठी सामूहिक प्रार्थना करणार असल्याचे सांगितले. धर्मशिक्षण वर्गाला येणार्या हिंदूंनी त्याप्रमाणे कृतीला सुरुवात केली आहे. (धर्मशिक्षण वर्गातील प्रबोधनाप्रमाणे कृतीला सुरुवात करणारे धर्माभिमानीच हिंदूंची दु:स्थिती दूर करण्यासाठी आशास्थान आहेत. – संपादक)


