उर्दू शाळांतील विद्यार्थ्यांना दररोज एक रुपयाचा भत्ता

मुसलमान विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता म्हणजे निधर्मी काँग्रेसच्या धर्मांधतेचे उदाहरण !

<!–

06-01-2009 by shashi

–>

(निधर्मी)काँग्रेसी मुख्यमंत्र्यांची मुसलमानधार्जिणी घोषणा !

मुंबई, ६ जानेवारी – मुसलमानांमधील साक्षरतेचे प्रमाण वाढावे, यासाठी उर्दू प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता म्हणून दररोज एक रुपया देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

(काँग्रेसचा मुख्यमंत्री बदलला म्हणून धोरण बदलणार नाही. राज्यातील शाळांमधून उर्दू भाषा सक्‍तीची करण्याचा माजी मुख्यमंत्री देशमुख यांचा निर्णय, सच्चर समिताच्या अहवालाची अंमलबजावणी देशात प्रथम करण्याचा महाराष्ट्र राज्याला मान मिळवून देण्याची देशमुख यांची खुमकी आणि आता देशमुखांच्या पावलावर पाऊल टाकत चव्हाण यांचा मुसलमान विद्यार्थ्यांना भत्ता देण्याचा निर्णय ! निधर्मी काँग्रेसचा हा पक्षपातीपणा नव्हे का ? – संपादक) अशा शाळांना शैक्षणिक साहित्य देऊन शिष्यवृत्तीचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सूचनाही अल्पसंख्यांक विकास खात्यास मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच अल्पसंख्यांक मुलामुलींना व्यावसायिक प्रशिक्षण व नवीन उद्योगधंदे सुरू करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे द्यावीत व कर्ज सुलभपणे आणि कमी व्याजदरात मिळण्यासाठी व्यवस्था करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

निगडीत वृत्त : मुसलमानांच्या लांगूलचालनाची एकही संधी न सोडणारे राजकारणी