हिंदूंच्या विरोधाला न जुमानता माओवाद्यांकडून पशुपतीनाथ मंदिरात नवीन पुजार्‍याची नेमणूक

हिंदुत्वाच्या मूळावर उठलेले नेपाळमधील माओवादी सरकार !

काठमांडू, २ जानेवारी (वृत्तसंस्था) – नेपाळमधील माओवाद्यांच्या सरकारने पशुपतीनाथ मंदिरातील जुन्या पुजार्‍यांना काढून टाकून त्यांच्या जागी नवीन
पुजार्‍यांची नेमणूक केली आहे.

(हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या पशुपतीनाथ मंदिरातील पुजार्‍यांना हाकलून माओवाद्यांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानावर घाला घातला आहे. नेपाळमधील माओवादी सरकारची चीनशी होत असलेली जवळीक नेपाळमधील हिंदूंना आणखीनच त्रासाची ठरणार आहे. हिंदुबहूल भारतातील हिंदुत्ववादी संघटना आणि पक्ष नेपाळमधील हिंदूंच्या अवस्थेकडे कोणत्या दृष्टीने पहाणार ? – संपादक) नेपाळमधील सर्वोच्च न्यायालयाने पुजार्‍यांच्या नेमणुकीबाबत सरकारच्या विरोधात निर्णय दिला आहे. तरीही आज येथील यंग कम्युनिस्ट लिग या माओवाद्यांच्या युवक संघटनेने संघर्षमय वातावरणात पशुपतीनाथ मंदिराचे टाळे तोडून नवीन पुजारी विष्णुप्रसाद दहाल यांना मंदिरात नेले. (माओवाद्यांच्या राज्यात न्यायालयाला नव्हे तर अराजकाला स्थान आहे, याचे हे उदाहरण आहे. – संपादक) नवीन पुजार्‍याला आत नेतांना येथील हिंदूंनी विरोध केला. परंतु सरकारने आपल्या अधिकाराचा वापर करून मंदिरासमोर विरोध करणार्‍या हिंदूंना थांबवण्यासाठी पोलीस दलाचा वापर केला. (न्यायालयाच्या आदेशावर मात करणारे सरकारला जर वेगळे अधिकार आहेत, तर ती लोकशाही नव्हे, तर हुकूमशाहीच आहे ! – संपादक) पूर्वीचे पुजारी गेली ३०० वर्षे परंपरागत या मंदिरात पूजा करत होते. त्यांना काढून टाकल्याने येथील हिंदु संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. येथील नेपाळी काँग्रेस या विरोधी पक्षाने सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. (नेपाळमधील माओवादी सरकारचा हिंदूंना नेस्तनाबूत करण्याचा हा डाव ओळखून भारतातील हिंदूंनी त्यांच्या मदतीला धावायचा निश्चय केला पाहिजे ! – संपादक)

निगडीत वृत्त : याबाबत बलाढ्य हिंदुत्त्ववादी संघटना काय करणार आहेत?