लातूर येथे हिंदु तरुणींना मोहात पाडण्याचा प्रयत्‍न करणार्‍या २ मुसलमानांना अटक

संभाजीनगर येथेही ६ मुसलमानांना अटक

लातूर, ३१ डिसेंबर (वार्ता.) – हिंदु तरुणींना मोहात पाडण्यासाठी मुसलमान तरुणांना खर्चासाठी मौलवींच्यातर्फे दोनशे रुपये देण्यात येत असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. काल या फतव्याची अंमलबजावणी खुद्द पोलीस वसाहतीतच केली जात असतांना दोन मुसलमान तरुणांना हिंदु तरुणांनी पकडले. त्यांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबत खास पथक नेमावे, अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीने केली आहे.

(आजवर विविध खास पथके नेमूनही गुन्हेगारीचा आलेख वाढतच आहे. त्यामुळे अशा वेळी पोलिसांवर अवलंबून रहाण्यापेक्षा हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन गुन्हेगारांना उत्तर देण्यासाठी सिद्ध होणे आवश्यक आहे. – संपादक) त्याचबरोबर संभाजीनगर येथेही ६ मुसलमानांना पोलिसांनी अटक केली आहे. येथील पोलिसांच्या वसाहतीत ४ मुसलमान तरुण एका तरुणीला छेडत होते. (पोलिसांच्या वस्तीत येऊन मुलीला छेडणार्‍या मुसलमानांना पोलिसांचे भय नाही, हेच यावरून स्पष्ट होते. वैचारिक सुंता झालेल्या काँग्रेसच्या राज्यात पोलिसांच्या मुली तरी सुरक्षित कशा रहातील ? – संपादक) तेव्हा तेथील हिंदु तरुणांनी त्यांना हटकले. (हिंदु तरुणीला छेडणार्‍या मुसलमानांना हटकणार्‍या हिंदु तरुणांचे अभिनंदन ! – संपादक) या वेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. मुसलमान तरुणांनी सांगितले की, ते त्यांना मौलवींनी दिलेले काम करत आहेत. (धर्मगुरूंच्या फतव्यांचा कोणताही विचार न करता अंमलबजावणी करणार्‍या मुसलमानांप्रमाणे किती हिंदू धर्माचार्यांची शिकवण आचरणात आणतात ? – संपादक) तेव्हा त्यांनी सदर वृत्त प्रसिद्ध झाल्याचे `दैनिक सामना’चे कात्रण दाखवले. या बातमीबाबत हिंदु तरुणांना काहीच कल्पना नव्हती. (हिंदूंच्या पोरीबाळींच्या जिवावर बेतू शकणार्‍या घटनांबाबतची माहिती हिंदूंना नसणे, ही हिंदूंच्या निद्रिस्तपणाची परिसीमा ! – संपादक) तरीही त्यांनी त्या तरुणांना पकडण्याचा प्रयत्‍न केला, तेव्हा २ मुसलमान पळून गेले. पकडण्यात आलेल्या मुसलमानांची नावे आजम गुलामनबी शेख (वय १८ वर्षे) व आमीर हमजा शेख (वय ३५ वर्षे, दोघेही रहाणार झिनत सोसायटी, लातूर) अशी आहेत. या दोघांकडे सदर वृत्ताच्या १०
छायांकित प्रती सापडल्या. तेव्हा हिंदु तरुणांनी सदर कात्रणांचे मूळ वृत्तपत्र आणून पाहिले आणि मग त्यांच्या लक्षात सर्व प्रकार आला. तेव्हा त्या दोघांना यथेच्छ चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. हिंदूंच्या वस्तीत मुलींची छेडछाड करणार्‍या ६ मुसलमानांना संभाजीनगर येथे पोलिसांनी अटक केली आहे. त्यात एका मुसलमान प्राध्यापकाचा समावेश आहे. (मुसलमानांची गुन्हेगारी ते अशिक्षित असल्याने वाढते, असे म्हणणार्‍यांना सणसणीत चपराक ! – संपादक) याबाबत आज शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अविनाश रणखांबे यांना निवेदन देण्यात आले. (मुसलमानांच्या मुजोरीच्या विरोधात तत्परतेने कारवाई करणार्‍या शिवसेनेच्या महिला आघाडीचे अभिनंदन ! आजवर हिंदूंनी दिलेल्या हजारो निवेदनांचा वापर कागद म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने केला आहे. त्यामुळे हिंदूंनी असे गांधीगिरीचे मार्ग सोडून सरकारचे कान उघडणारी कृती केली, तरच ती परिणामकारक होईल ! – संपादक) या निवेदनात अशा प्रकारे हिंदूंच्या वस्तीत फिरणार्‍या मुसलमानांना पकडण्यासाठी खास पथक नेमावे, त्यात महिला पोलिसांचा सहभाग असावा. शाळा, महाविद्यालये व शिकवणीवर्ग याठिकाणी बंदोबस्त वाढवावा, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या आहेत. या वेळी महिला आघाडीप्रमुख सौ. सुधा पाटील, अधिवक्‍त्या नविता सोनवळकर, सौ. सरला म्हेत्रे, सौ. बेबी जोगदंड आदी उपस्थित होत्या.

निगडीत वृत्त : हिंदूंनो आता तरी या धर्मांध मुसलमानांचा बंदोबस्त करा