धर्मांतरितांनो, हिंदूंच्या मंदिरावर हल्ला करणारे हिंदुद्वेष्टे पाद्री व ख्रिस्ती यांना शांतीचे उपासक कसे म्हणता येईल ?
विशाखापट्टनम, २५ डिसेंबर (वृत्तसंस्था) – मलकापूरम येथील जनता कॉलनीतील श्रीदुर्गा मंदिरावर ख्रिस्तीतरुणांनी दगडफेक करून मूर्तींची मोडतोड केली. झालेल्या प्रकाराबद्दल ख्रिस्त्यांना जाब विचारण्यास गेलेल्या हिंदूंमध्ये व ख्रिस्त्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला त्यानंतर केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एक पादरी व ख्रिस्तीतरुण यांना अटक केली.
नाताळानिमित्त मध्यरात्री चर्चमध्ये तयारी पूर्ण करून परतणार्या २० ते २५ ख्रिस्तीतरुणांनी समोरच असलेल्या श्रीदुर्गादेवीच्या मंदिरावर दगडफेक केली. होत असलेला प्रकार लक्षात येताच पहारेकर्याने त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला, तरीही ते थांबले नाहीत व त्यांनी अधिकच दगडफेक केली. त्यात ५ मूर्तींची हानी झाली. या प्रकाराची माहिती पहारेकर्याने मंदिराच्या अध्यक्षांना सकाळी दिली. मंदिरात जमलेल्या ५०० भाविकांनी मंदिर समितीला हे प्रकरण चर्चच्या मंडळाकडे नेण्यासाठी पाठिंबा दर्शवला. यानंतर ख्रिस्तीमंडळासोबत झालेल्या चर्चेत तणाव निर्माण झाला, त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर मंदिर अध्यक्षांनी पोलिसांत तक्रार दिल्यावर पोलिसांनी चर्चचे पाद्री व काही ख्रिस्तीतरुण यांना अटक केली.


