`हिंदु दहशतवादी’ वगैरे शब्दप्रयोगांना वेळीच प्रतिबंध केला पाहिजे !

सध्या वृत्तपत्रांमध्ये व वृत्तवाहिन्यांद्वारे प्रसारित होणार्‍या बातम्यांमध्ये `हिंदु दहशतवादी’, `हिंदु दहशतवाद’ व `भगवा दहशतवाद’ असे शब्द वापरले जात आहेत. हे शब्द वापरण्याविरुद्ध पंजाबमधील हिंदु धर्माभिमानी श्री. विशाल भारती, श्री. शक्‍तीप्रकाश देवशाली आणि अधिवक्‍ते श्री. योगेश गोयल यांनी चंदीगड येथील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. बलवंत सिंग यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. वरील प्रकारचे शब्दप्रयोग वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या या प्रसिद्धीमाध्यमांनी वापरू नयेत, असा आदेश न्यायालयाने द्यावा. तसेच त्यासंबंधी सूचना प्रसिद्धीमाध्यमांना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेतील भाग संक्षिप्‍ताने येथे देत आहोत.

याचिकाकर्त्यांचा परिचय
फिर्यादींपैकी श्री. विशाल भारती हे गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात वावरत आहेत. १५ जानेवारी १९८७ रोजी पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील करतारपूर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. त्या वेळी त्यांच्या छातीत व गळयाजवळ दोन गोळया घुसल्या होत्या. केवळ नशिबानेच ते या हल्ल्यानंतरही वाचले. दुसरे फिर्यादी श्री. शक्‍तीप्रकाश देवशाली हेही सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ते १९८८ ते २००२ सालापर्यंत भाजपच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव होते. २००३ ते २००७ या काळात ते विश्‍व हिंदु परिषदेचे प्रसिद्धीप्रमुख होते. तिसरे फिर्यादी श्री. योगेशकुमार गोयल हे सध्या चंदीगड येथील जिल्हा न्यायालयात वकिली करत आहेत.


याचिकाकर्त्यांनी मांडलेली भूमिका !
आमचा भारताची एकता व स्वयंपूर्णता यांवर विश्‍वास आहे. हिंदु समाजातील अस्पृशता, जातीयता व इतर सामाजिक समस्या मिटवल्या पाहिजेत, असे आमची म्हणणे आहे. आमची मातृभूमी सर्व क्षेत्रांत जगातील प्रमुख राष्ट्र व्हावे, अशी आमचे इच्छा आहे. आम्ही याचिकाकर्ते हिंदू आहोत व हिंदु धर्मातील संस्कृती व विधी यांवर आमची दृढ श्रद्धा आहे.

प्रसिद्धीमाध्यमांचे बेकायदेशीर व भारतीय संस्कृतीविरोधी कृत्य ! प्रसिद्धीमाध्यमांनी `हिंदु दहशतवादी’, `हिंदु दहशतवाद’ व `भगवा दहशतवाद’, असे शब्द वापरणे, हे बेकायदेशीर व भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहे. अशा प्रकारचे शब्द वापरून म्हणजे भारतीय नागरिकांचा व हिंदु समाजाचा हेतूपुरस्सर अवमान केला जात आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसिद्धीमाध्यमांनी वापरलेले हे शब्द ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. निधर्मीवाद्यांनी आणि राष्ट्रविरोधी शक्‍तींनी शोधून काढलेले हे अपमानकारक शब्द हिंदु संस्कृतीच्या आत्म्यावर घाला घालत आहेत. सध्या दहशतवादाशी संबंध असलेल्यांना `हिंदु दहशतवादी’ असे शब्द वापरणे म्हणजे थेट हिंदु धर्म व सहिष्णू हिंदूंकडे अंगुलीनिर्देश करण्यासारखे आहे. हिंदु धर्माच्या अनुयायांचे खच्चीकरण व मानहानी करण्यासाठीच असे शब्दप्रयोग केले जात आहेत.

धर्माच्या नावावर राष्ट्रामध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र !
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात पोलिसांनी काही हिंदूंना अटक केली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक हिंदूला `हिंदु दहशतवादी’, `हिंदु दहशतवाद’ अशा प्रकारचे शब्द प्रसिद्धीमाध्यमांनी वापरणे, हे या देशाच्या राष्ट्रीय तत्त्वांच्या विरुद्ध आहे.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील काही मंडळी देशातील एकात्मता, बंधुत्व यांना फाटा देऊन हिंदूंबद्दल अपप्रचार करत आहेत. हिंदु राष्ट्राची बदनामी करणे व धर्माच्या नावावर राष्ट्रामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्‍न करणे, हा राष्ट्रविरोधी घटकांचा डाव आहे. भारतातील विकास व सांस्कृतिक कार्यक्रम यांना खीळ घालणे व ब्रिटिशांप्रमाणे भारतातील एकात्मता फोडणे, यांसाठी राष्ट्रविरोधी घटकांना याद्वारे सुवर्णसंधी लाभली आहे.

भगवा रंग त्यागाचे व मोक्षाचे प्रतीक !
सध्या संत व समाजसुधारक वापरत असलेल्या व हिंदूंसाठी पवित्र मानल्या गेलेल्या भगव्या रंगाला लक्ष्य केले जात आहे. हा रंग त्यागाचे व मोक्षाचे प्रतीक आहे. समाजविघातक घटक भगव्या रंगाचा अवमान करून हिंदूंचा धर्म व धर्मश्रद्धा यांवर घाला घालत आहेत. भगव्या रंगाचा अवमान करणे, हे देशहिताच्या विरुद्ध आहे.

हिंदु समाजामध्ये दहशतवादाची संस्कृती नाही !
जर `हिंदु दहशतवादी’, `हिंदु दहशतवाद’ व `भगवा दहशतवाद’, असे शब्द वापरले, तर आमचे, आमच्या कुटुंबियांचे व देशातील समस्त हिंदूंचे मोठे नुकसान होणार आहे; कारण हिंदु समाजामध्ये दहशतवादाची संस्कृती नाही. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांकडून झालेल्या अशा चुकीच्या कृतींमुळे हिंदु समाजावर वाईट परिणाम होणार आहे. त्यामुळे असे शब्दप्रयोग करण्यास न्यायालयाने वेळीच प्रतिबंध केला पाहिजे !

हिंदूंनी एकजूट दाखवल्यास देशावर भगवे राज्य येईल !

मालेगाव बाँबस्फोटांत आरोपी असलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या पाठीशी `अभिनव भारत’ संघटनेच्या अध्यक्षा व हिंदूंच्या तेजस्वी नेत्या श्रीमती हिमानी अशोक सावरकर खंबीरपणे उभ्या आहेत. त्या देशभक्‍त नथुराम गोडसे यांची पुतणी असून गांधी अभियोगात जन्मठेप झालेले गोपाळराव गोडसे यांच्या कन्या होत. त्यामुळे श्रीमती हिमानी सावरकर यांना बालपणीच हिंदुत्वाचे बाळकडू मिळाले. विवाहानंतर सावरकर कुटुंबात प्रवेश केल्यामुळे त्यांचे संबंध आयुष्य हिंदुत्वाच्या कार्याला समर्पित झाले. या संघर्षमय जीवन जाणून घेण्यासाठी पुणे येथील आमचे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांनी त्यांची घेतली असता, श्रीमती सावरकर यांनी व्यक्‍त केलेले मनोगत !

जन्म व बालपण
माझा जन्म १९४७ साली झाला. १९४८ साली गांधींचा वध झाल्यानंतर माझे वडील म्हणजे गोपाळराव गोडसे यांना तुरुंगात जावे लागले. त्या वेळी माझे वय फक्‍त १० महिन्यांचे होते. तो वध का झाला वगैरे कळण्याचे वय नव्हते; मात्र समजायला लागल्यापासूनच राजनीती, समाज वगैरे गोष्टी मला कळू लागल्या. माझी आई अत्यंत ध्येयवादी व कष्टाळू. वडील तुरुंगात असतांनाही म्हणजेच संसाराचे एक चाक निखळले असतांनाही तिने आम्हा दोघा बहिणींचे जिद्दीने पालनपोषण केले. मुलींनी सुट्टीत सतत काहीतरी काम केले पाहिजे, त्यांनी स्वस्थ बसू नये, असा तिचा विशेष आग्रह असे. माझे आई-वडील दोघेही अर्थातच तात्यांचे म्हणजेच स्वा. सावरकर यांचे अनुयायी होत. मी पुण्यातून माझे सबंध शिक्षण पूर्ण केले. शाळेत असतांना एकदा मी स्वा. सावरकर यांच्यावर केलेली कविता शाळेच्या एका मासिकात छापून आली. ती मी तात्यांना दाखवल्यावर त्यांनीही मला शाबासकी देऊन प्रोत्साहन दिले. पुढे १९६१ मध्ये त्यांचे स्वा. सावरकरांशी एका सभेनिमित्त प्रत्यक्ष संभाषणही झाले. मला खरे तर डॉक्टर व्हायचे होते; मात्र त्यांच्या स्वकियांनी मला आर्कीटेक्चर (वास्तुविशारद) होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी आर्किटेक्चर झाले. माझे आडनाव `गोडसे’ असल्याने नोकरी केल्यास त्यावर येणारी संभाव्य गदा आधीच लक्षात घेऊन आईने मला स्वतंत्र व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पुण्यात तब्बल २७ वर्षे आर्किटेक्चर (वास्तुविशारद) म्हणून स्वत:चा व्यवसाय केला.

लहानपणापासूनच हिंदुत्वाची आवड
स्वा. सावरकरांचा पक्ष म्हणजे `हिंदु महासभा.’ १९६३ साली पुण्यातील मॉर्डन हायस्कूलमधून मी मॅट्रीक झाले. त्यानंतरच्या सुट्टीत मी हिंदु महिला सभेच्या गिरीजाबाई गोरे यांच्याबरोबर निधी गोळा करायला जात असे. सततचे शब्द कानावर पडल्यामुळे तेव्हापासूनच मला एकप्रकारचे बाळकडू मिळाले. त्या वेळी कानखोजे, जयंतराव टिळक यांचा सहवास लाभला त्यामुळे मी घडत गेले.
१९६६ मध्ये तात्या म्हणजे स्वा. सावरकर गेले. १९६७ वर्षांपासून मी अचानक स्वयंस्फूर्तीने लिखाण करू लागले. पुढे माझे काका म्हणजे हिंदु महासभेचे तत्कालीन अध्यक्ष श्री. विक्रम सावरकर यांच्या व्यक्‍तीमत्त्वाचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला. त्यांची भाषणे, आंदोलने मला विशेष आवडत.

हिंदु महासभेत प्रवेश
हिंदु महासभा हा राजकीय पक्ष आहे. देशात `समान नागरी कायदा’ लागू करावा, यासाठी गेल्या कित्येक दशकांपासून `हिंदु महासभा’ लढा देत आहे. हा पक्ष निखळ हिंदूंचा आहे. येथे गैरहिंदूंना स्थान नाही. राष्ट्रभक्‍तीने जे जे प्रेरीत झाले आहेत, अशा सर्व हिंदूंना या पक्षात मुक्‍त प्रवेश आहे.
१९६३-६४ पासून मी हिंदु महासभेच्या कार्यात सक्रीय सहभाग घेतला. यामध्ये विविध अधिवेशने केली. १९८५ साली हिंदु महासभेचे एक अराजकीय अंग असलेल्या `हिंदु महिला सभे’च्या अध्यक्षपदाची धुरा सन २००५ पर्यंत सांभाळली.

असे केले हिंदूंचे संघटन
हिंदूंचे संघटन करण्यासाठी अनेक ठिकाणी सभा, घरोघरी जाऊन लोकांना संपर्क करणे, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, आदींची जयंती, पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करणे, असे उपक्रम सुरू केले. पुढे `सावरकर स्मृती प्रतिष्ठान’या संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतले. काहीही करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती जागृत ठेवणे, हाच या सर्व खटाटोप करण्याचा मागील हेतू. आता अनेक राज्यांमधून निवडणुकांच्या प्रचारासाठी जात असल्याने अनेक ठिकाणी राष्ट्राभिमानी नागरिक भेटतात. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यक्रमांनाही मी गेले आहे.

आध्यात्मिक अधिष्ठान
लहानपणापासून मी माझ्या आजीबरोबर येथील खुन्या मारुतीच्या देवळात कथा, कीर्तने ऐकायला जात असे. स्तोत्र म्हणणे हा माझ्या आवडीचा भाग. याशिवाय नित्यनियमाने देवदर्शन, पोथीवाचन वगैरे आजतागायत सुरू आहे. अभिलाषा न ठेवता देवाचे स्मरण केल्याने मनाला शांतता मिळते. भगवंताचे स्मरण करणे पूजा करणे वगैरे आपली कर्तव्यच आहेत. अनेकजण म्हणतात `मी पूजा करतो’. पण आपला श्‍वासही आपल्या हातात नसतांना पूजा `मी’ कशी करू शकतो ? हल्ली लोकांना फक्‍त व्यायाम व देवपूजे सोडून सगळया गोष्टींना वेळ असतो! त्यामुळे मी पूजा करतो असे कोणी म्हणत असेल, तर त्याने ती केलीच पाहिजे, असे माझे मत आहे. प्रार्थनेचे महत्त्व अफाट आहे. माझे वय आज ६२ वर्षे असून मला आजपर्यंत ना रक्‍तदाबाचा ना मधुमेहाचा त्रास आहे. ही केवळ परमेश्‍वराची कृपा आहे. म्हणूनच मी निरोगी आहे.

एकसंधता हेच हिंदु राष्ट्राचे मूळ
`हिंदु’ हे राष्ट्रवाचक तसेच धर्मवाचक आहे आणि म्हणूनच गल्लत होते. हिंदुस्थानात रहाणारा हा हिंदु आहे. धर्म ही आचारपद्धती आहे. धर्म हवा, पण तो आतमध्ये बाहेर एकच म्हणजे राष्ट्रधर्म असायला हवा. तरच सर्व प्रश्‍न सुटतील. काश्मीरमध्ये काही झाल्यास कन्याकुमारीतील लोकांना काही वाटल्यास ते हिंदु राष्ट्र होय.

मालेगाव प्रकरणी निर्भीड भूमिका !
मालेगाव बाँबस्फोटानंतर मी जी निर्भीड भूमिका घेतली, त्याबाबत मी एवढेच म्हणेन की, माझ्याकडे सत्ता, संपत्ती वगैरे काहीच नाही. त्यामुळे मला काही गमावण्याची भिती नाही व काही कमावण्याची अभिलाषाही नाही.

कर्नल पुरोहितांना अटक करणारे मंगळूरू येथील पाकिस्तानी वेशातील सैन्याबाबत गप्प का ?
१५ ऑगस्ट २००८ रोजी मंगळूरू (कर्नाटक)मधील नेहरू मैदान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वेशातील लोकांनी संचलन केले. कर्नल प्रसाद पुरोहित यांना तत्परतेने अटक करणारे पोलीस या `समांतर लष्करा’च्या उघड उघड कारवायांकडे कोणत्या कारणामुळे दुर्लक्ष करत आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे.

गांधीहत्येचा उल्लेख करून प्रसारमाध्यमांकडून अवहेलना
माझे पूर्वीचे आडनाव गोडसे व आताचे सावरकर आहे. या दोन्ही आडनावांना समाज, सरकारकडून दिला जाणारा त्रास नवीन नाही. म्हणूनच की काय, प्रसारमाध्यमांकडून मालेगाव प्रकरणात माझी ओळख करून देतांना जाणूनबुजून गांधीहत्येतील कै. नथुराम गोडसे यांची पुतणी अशी करून दिली जात आहे. गांधीहत्या होऊन आता ६० वर्षे उलटली आहेत. या घटनेचा व मालेगाव प्रकरणाचा काय संबंध ? ही घटना घडली तेव्हा मी केवळ १० महिन्यांची होते. मग या प्रकरणात माझा काय दोष ? या प्रकरणाचा गांधीहत्येशी संबंध लावणारी प्रसारमाध्यमे कधी काँग्रेसच्या राहूल गांधी यांचे आजोबा फिरोज खान यांच्याविषयी बोलतात का ?
केवळ `गोडसे’ व `सावरकर’ आडनावामुळे माझी बदनामी केली जात आहे. ६० वर्षांनंतरही आमच्या वाट्याला ही अवहेलना येत आहे. या अवहेलनेपायी आमच्या घरातील दोन जणांना फासावर, तर ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागली आहे. या घरात जन्म घेणे हा काय आमचा अपराध आहे का ? प्रसारमाध्यमांकडून मला मानसिक खच्चीकरण केले जात असून त्याबाबत संबंधितांना मी नोटीसही देणार आहे.

माझ्या अटकेची मागणी करणार्‍यांनी कधी इमाम बुखारी, अबू आझमी यांच्या अटकेची मागणी केली आहे का ?
मालेगाव प्रकरणी माझ्या अटकेची मागणी करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रसचे मदन बाफना यांनी अनेक वेळा देशद्रोही विधाने करणारे इमाम बुखारी व विखारी फुत्कार टाकणारे अबू आझमी यांच्या अटकेची मागणी केली का ?

मालेगाव प्रकरणामागे विदेशी शक्‍ती कार्यरत
मालेगाव प्रकरणाच्या तपासाची दिशा हेच एक राजकीय षडयंत्र आहे. यामागे मोठी विदेशी शक्‍ती कार्यरत आहे, हे राज्यकर्त्यांना कळत नाही. मतांसाठी एकीकडे महंमद अफझलला फाशी देण्याचे टाळायचे, तर दुसरीकडे संशयित हिंदूंना `मोक्का’ लावायचा! कसेही करा पण हिंदूंना छळा, असे सर्रास सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयात टिकू शकणार नाही.

सरकारपुढे हे दोनच पर्याय आहेत….
हिंदूंचा छळकपट सुरू असून हिंदु धर्माला नाहक बदनाम केले जात आहे. यातून कायमचा मार्ग काढण्यासाठी एकतर `हे हिंदुराष्ट्र घोषित करा’ अन्यथा `सर्व देशभक्‍त हिंदूंना कापून टाका’ त्यामुळे एकतर `अखंड हिंदुस्थान’ निर्माण होईल अन्यथा `अखंड पाकिस्तान’ निर्माण होईल.

हिंदूंनी जागृत रहाणे गरजेचे
माझ्या मते `धर्मांतर’ ही देशासमोरील सर्वांत ज्वलंत समस्या आहे.
त्यापाठोपाठ अशिक्षितपणा व गरिबी याही गंभीर समस्या आहेत. देशातील सर्व हिंदूंनी जागृत रहाणे आवश्यक आहे. तरच आणि तरच सध्याचे आपल्यासमोरी प्रश्‍न सुटणार आहेत. सर्व हिंदूंनी एकजूट दाखवल्यास या देशावर कायमचे भगवे राज्य येऊन सर्वजण सुखी रहातील.

विश्‍व हिंदु परिषद व बजरंग दल यांच्याकडून देशात बाँबनिर्मितीचे प्रशिक्षण – हिंदुद्वेष्टे बी.जी. कोळसे-पाटील

संतांच्या व्यासपिठावर देव, धर्म, संत व हिंदुत्ववादी यांच्यावर टीका करणार्‍या कोळसे-पाटील यांचा निषेध !

सातारा, २० डिसेंबर (वार्ता.) – देशात जातीयवाद निर्माण केला जाऊन युवा पिढीला चुकीच्या दिशेने नेण्याचे कार्य केले जात आहे. विश्‍व हिंदु परिषद व बजरंग दल यांच्याकडून देशात बाँब निर्माण करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

(आज मुंबईत दहशतवाद्यांनी घातलेल्या थैमानाचे घाव ताजे असतांना हिंदुत्ववादी संघटनांवर असे खोटे आरोप करणारे हिंदुद्वेषच स्पष्ट करत आहेत ! – संपादक) याबाबतचे अहवाल मी स्वत: तयार केले आहेत, असे मनमानी विधान माजी न्यायमूर्ती श्री. बी.जी. कोळसे-पाटील यांनी नुकतेच केले. (असे अहवाल तयार केले होते, तर तेव्हाच कारवाईसाठी प्रयत्‍न का केले नाहीत ? त्यामुळे हल्ली हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस सरकारने अशा प्रकारे खोटी माहिती दिलेली असल्याने त्यांचेच हस्तक म्हणून हे माजी न्यायमूर्ती कृती करत आहेत, असे वाटल्यास नवल ते काय ? आताच यांना देशाची काळजी वाटण्याचे कारण संशयास्पदच म्हणावे लागेल ! – संपादक)
येथील क्रांतीस्मृती मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या `युवक आत्मनिर्भर मेळाव्या’त ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर व्यसनमुक्‍त युवक संघाचे प्रेरणास्थान व वारकरी महामंडळाचे अध्यक्ष संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर, संघाचे अध्यक्ष श्री. सचिन शिंदे, ह.भ.प. बद्रीनाथ तनपुरे महाराज, ह.भ.प. बबनराव सापते महाराज, संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विलासबाबा जवळ आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. कोळसे-पाटील पुढे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली घटना ही सर्व धर्मग्रंथांचा बाप आहे. (संतांसमोर अशी विधाने करण्यास माजी न्यायमूर्तींना लाज वाटत नाही ! खुद्द आंबेडकरांनीही असे वक्‍तव्य केलेले नव्हते ! आणि खरेच जर असे असते, तर न्यायालयात तरी धर्मग्रंथाची शपथ घ्यायला लावली असती का ? – संपादक) जाती-पाती व धर्माचे राजकारण करणारा भाजप म्हणतो,`संविधान गंगेत बुडवा व मनुस्मृती वर आणा !’ नेहमी स्त्रियांना दुय्यम स्थान देणारा भाजप स्त्रियांना कधीतरी समान संधी देईल का ? (संतांच्या व्यासपिठावर राजकारणाची हौस भागवणार्‍या अशा वक्‍त्यांना पुन्हा व्यासपिठावर बोलवायचे का, याचा विचार संयोजकांनी करावा ! – संपादक) हे नेहमीच मुसलमानांच्या नावाने ओरडत असतात, त्यांचे लांगूलचालन झाले, असे वाटते; मात्र मुसलमानांएवढे गरीब या देशात कोणीही नाही. (तसे आहे, तर ती कोळसे-पाटील यांनी त्यांची संपत्ती खुशाल मुसलमानांना द्यावी; मात्र हिंदूंच्या करातून मिळणार्‍या पैशांची खिरापत करण्याचा हक्क राजकारण्यांना देण्यासाठी केविलवाणी धडपड करू नये ! – संपादक) जोपर्यंत देशात निर्माण झालेली आर्थिक दरी संपत नाही, तोपर्यंत भारतीय संविधानाचा फायदा कोणालाही होऊ शकत नाही. जात व धर्म हे ज्याने त्याने स्वत:च्या घरात करावेत, पाळावेत. (घटनेची तरफदारी करणारे आता घटनेने दिलेले धर्मस्वातंत्र्यच हिरावून घेण्याचा प्रयत्‍न करत नाहीत काय ? – संपादक) धर्म वगैरे काही खरे नसते. (देव, धर्म यांबाबत बोलण्याचा अधिकार फक्‍त संत व धर्माचार्य यांना असतो. न्यायदानाचे कार्य केले, म्हणजे धर्मातील सर्वकाही कळाले, असे कोळसे-पाटील यांनी मानू नये; कारण माहिती नसलेल्या विषयाबाबत बोलू नये, या नियमाचे हे उल्लंघनच आहे ! – संपादक) अनेक संत झाले. संत रोहिदास तर म्हणे प्रकाशात विलीन झाले. असे काही होत नसते. माझे तुम्हाला हात जोडून सांगणे आहे, अशा गोष्टींचा आपण योग्य विचार करायला हवा. (त्यापेक्षा देवाला हात जोडले असते, तर असे बोलावेच लागले नसते. संत रोहिदास कसे विलीन झाले, तेही समजले नसते. – संपादक) जर इस्लाम प्रथम कोणी स्वीकारला असेल, तर तो ब्राह्मणांनी स्वीकारला आहे. ख्रिस्त्यांमध्ये बिशप ही सर्वोच्च पदवी आहे. जर भारतातील बिशप कोणी झाला असेल, तर तो मागच्या जन्मीचा ब्राह्मणच असला पाहिजे. (अशा प्रकारे कोणत्याही पुराव्याशिवाय बोलणारे माजी न्यायमूर्ती केवळ ब्राह्मणद्वेषापोटीच बोलत आहेत, असे स्पष्ट होते. – संपादक) या वेळी काही नागरिकांनी कार्यक्रम सुरू असतांनाच कोळसे-पाटील यांचा निषेध केला. संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर म्हणाले की, कोळसे-पाटील यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे काहींची मने दुखावली असतील; मात्र त्यांना आम्ही उत्तर देण्यास समर्थ आहोत. पण ही `ती’ वेळ नव्हे ! जी घटत जाते ती `घटना’! म्हणून `घटने’पेक्षा `संघटना’ महत्त्वाची !

कोळसे-पाटील यांनी विहिंप व बजरंग दल यांच्या वाटेस जाऊ नये – बाबूजी नाटेकर
सातारा – वैचारिक दिवाळखोर माजी न्यायमूर्ती श्री. बी.जी. कोळसे-पाटील यांनी अशोभनीय विधाने करून विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वाटेस जाऊ नये, असा इशारा विहिंपचे महाराष्ट्र प्रातमंत्री श्री. बाबूजी नाटेकर यांनी `दैनिक सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिला. ते म्हणाले की, समाजाचा विश्‍वास कोळसे-पाटील यांच्यापेक्षा विहिंप व बजरंग दल यांच्यावर जास्त आहे. अशा प्रकारच्या विकृत थापांना समाज भूलणार नाही. संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या पायाशी बसण्याची ज्याची लायकी नाही, अशांना व्यासपिठावर स्थानापन्न होण्याची संधी देण्याची चूक वारकर्‍यांनी करू नये. “डाऊ’विरोधी आंदोलनाची मुहूर्तमेढ मी रोवली’, असे म्हणणारे कोळसे-पाटील संतवीर ह.भ.प. बंडातात्या यांनी डाऊ आंदोलन पुकारल्यानंतर कोठे गेले होते ? बंडातात्या कारागृहात असतांना कोळसे-पाटील कोठे होते, असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले.

निगडीत वृत्त : हिंदूंनो या धर्मद्रोह्यांना विसरू नका

सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मसत्संगांच्या दूरचित्रवाहिनीवरील प्रक्षेपणाचा शुभारंभ !

सनातन व हिंदु जनजागृती समिती दूरचित्रवाहिनीवर पोहोचणे, ही त्यांची धर्मकार्यातील गरुडझेप !


`श्री शंकरा’ या नूतन धार्मिक दूरचित्रवाहिनीचा बेंगळुरू येथे आज भव्य उद्घाटन सोहळा !

सनातनचा धर्मसत्संग आता दूरचित्रवाणीवर !
हिंदु जनजागृती समितीचा धर्मशिक्षणवर्ग आता दूरचित्रवाणीवर !
बेंगळुरू – १५ डिसेंबर रोजी शुभारंभ झालेल्या `श्री शंकरा’ या नूतन धार्मिक दूरचित्रवाहिनीचे उद्या, २१ डिसेंबर रोजी येथील ग्रँड कॅसल येथे संध्याकाळी ६.१५ वाजता कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य श्री श्री श्री स्वामी जयेंद्र सरस्वती यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार असून उद्यापासून देशभर सर्वत्र या वाहिनीच्या प्रक्षेपणाला सुरुवात होणार आहे. कर्नाटकचे राज्यपाल श्री. रामेश्‍वर ठाकूर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. १५ डिसेंबरपासून, म्हणजे या दूरचित्रवाहिनीच्या पहिल्या दिवसापासून वाहिनीवरून सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मसत्संगांच्या प्रक्षेपणास सुरुवात झाली आहे.

समाजात अध्यात्मप्रसार करत धर्मशिक्षण देण्याचे महत्कार्य सनातन गेले दशकभरापासून सत्संग, अभ्यासवर्ग, बालसंस्कारवर्ग, ग्रंथ, नियतकालिके व ध्वनीचित्र-तबकड्या या माध्यमांतून करत आहे, तर गेल्या सहा वर्षांपासून धर्मरक्षणाच्या कार्यात हिंदु जनजागृती समिती अग्रेसर आहे. आता प्रथमच दूरचित्रवाहिनीवर दर सोमवार ते शुक्रवार अर्थात सप्‍ताहातील ५ दिवस सनातनचा धर्मसत्संग व हिंदु जनजागृती समितीचे धर्मशिक्षणवर्ग झळकणार आहेत. दूरचित्रवाहिनीवर सकाळच्या सत्रात `धार्मिक कृतीयोंका शास्त्र’ हा विषय हिंदु जनजागृती समितीचे धर्मशिक्षणप्रमुख डॉ. पांडुरंग मराठे, तर रात्रीच्या सत्रात `ईश्‍वरप्राप्‍तीके लिये अध्यात्मशास्त्र’ हा विषय सनातनचे धर्मप्रसारप्रमुख डॉ. दुर्गेश सामंत हे मांडणार आहेत.

केबलचा (स्थानिक दूरचित्रवाहिनी) व्यवसाय करणार्‍यांसाठी `श्री शंकरा’ दूरचित्रवाहिनीची तांत्रिक माहिती
SATALLITE : INSAT 2E AT 83 DEGREE EAST
FREQUENCY : 3696MHZ SYMBOL RATE : 6.113 MSPS
POLARIZATION : VERTICAL FEC : 3/4

बाबरीसाठी संघर्ष करणारे हिंदू कैलास सरोवरासाठी चीनशी का संघर्ष करत नाहीत ? – समाजवादी पक्षाचा हिंदुद्वेष

मुंबई, १८ सप्टेंबर (वार्ता.) – बाबरी मशीद पाडण्यात स्वारस्य दाखवणारा भारतीय जनता पक्ष, विश्‍व हिंदु परिषद आणि रा.स्व. संघ या हिंदुत्ववाद्यांनी चीनच्या ताब्यात असलेल्या मान सरोवरासाठी संघर्ष का केला नाही, असे हिंदुद्वेषी फुत्कार समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. श्यामसुंदर आर्य यांनी आज सोडले.

(मान सरोवर हा केवळ हिंदूंचाच नव्हे, तर संपूर्ण भारताचा मानबिंदू आहे. तो चीनकडून परत मिळवण्यासाठी हिंदुत्ववादी राजकीय पक्ष व संघटना यांनी काय केले, हे विचारण्यापेक्षा स्वत: आज केंद्र सरकारचा घटकपक्ष असतांना समाजवादी पक्षाने काय केले, हे श्री. आर्य यांनी सांगावे. दुसरे असे की, क्रूर इस्लामी आक्रमक बाबराची मशीद पाडल्याचे श्री. आर्य यांना का बरे एवढे दु:ख होत आहे ? – संपादक)
मुंबई विद्यापिठाच्या `पत्रकारिता अभ्यासक्रम विभागा’तर्फे `राजकीय पक्षांचे भविष्यातील राजकीय ध्येय’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या देशात मुसलमान व अल्पसंख्यांक यांचाही देशाच्या जडणघडणीत समान सहभाग आहे. (या `समान सहभागा’ची उदाहरणे श्री. आर्य यांनी द्यावीत ! – संपादक) तेव्हा मुसलमानांवर होणार्‍या अत्याचारांबाबत त्यांना न्याय दिलाच पाहिजे. (मुळात या देशात मुसलमानांवर नेमके कोणते अत्याचार होत आहेत, हे श्री. आर्य यांनी स्पष्ट करावे. उलटपक्षी `या देशात मुसलमान फार सुखात आहेत’, असे मुसलमान चित्रपट अभिनेते फिरोज खान यांनीच सांगितले आहे ! – संपादक) जर त्यांना न्याय देणार नसाल, तर त्याची प्रतिक्रिया उमटेल आणि देशाचे अस्तित्व धोक्यात येईल, असेही श्री. आर्य म्हणाले. (कोणत्याही कारणाने जे या देशाच्या अस्तित्वावर उठतात, ते देशात रहाण्याच्या लायकीचे आहेत का ? या देशात गेली साठ वर्षे अतोनात गळचेपी होऊनही हिंदू कधी या देशाच्या अस्तित्वावर उठले आहेत का ? त्यामुळे वरीलप्रमाणे वक्‍तव्ये करून श्री. आर्य देशविरोधी कारवाया करणार्‍यांचे समर्थनच
करत आहेत. श्री. आर्य यांच्या विरोधात शासन काय कारवाई करणार आहे ? – संपादक)
कुठेही दंगली किंवा बाँबस्फोट झाले की, मुसलमानांना पकडले जाते. (दंगली किंवा बाँबस्फोट यांत मुसलमानांचाच हात असल्याने ते पकडले जातात. यात चूक काय आहे ? – संपादक) त्यांच्यावर अन्याय केला जातो. या सर्व प्रकारांमुळे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी हे समाजवाद बाजूला ठेवून मुसलमानांच्या विषयी अधिक बोलतात, असेही श्री. आर्य म्हणाले. (अशा प्रकारे प्रक्षोभक भाषणे करून समाजात अशांतता निर्माण करणार्‍या अबू आझमी यांचेही
श्री. आर्य समर्थन करत आहेत, हे निषेधार्ह आहे ! – संपादक)

| मित्रांना पाठवा | छापील प्रत

निगडीत वृत्त : मुसलमानांच्या लांगूलचालनाची एकही संधी न सोडणारे राजकारणी