हिंदूंच्या संघटित शक्‍तीचा पुण्यनगरीत आविष्कार !

३ हजार धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती

पुणे जिल्ह्यात ७ वी हिंदु धर्मजागृती सभा : आणखी १० सभा घेण्याचे समितीचे नियोजन !

पुणे, १८ डिसेंबर (वार्ता.) – चैतन्य व उत्साह यांच्या वातावरणात पुण्यनगरीत गुरुवारी हिंदूंच्या संघटित शक्‍तीचा आविष्कार घडला. औचित्य होते हिंदु जनजागृती समितीने टिळक रस्त्यावरील `न्यू इंग्लीश स्कूल’ या ऐतिहासिक शाळेच्या मैदानावर आयोजित केलेल्या `हिंदु धर्मजागृती सभे’चे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक यांनी समाजात राष्ट्रप्रेम रुजण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण देणार्‍या या `न्यू इंग्लीश स्कूल’ची स्थापना केली. याच ठिकाणी जन्महिंदूंनी कर्महिंदू बनावे, यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणारी धर्मजागृती सभा हिंदु जनजागृती समितीने आयोजित केल्याने तिला ऐतिहासिक महत्त्व प्राप्‍त झाले.

सभास्थळी सर्वत्र लावण्यात आलेले भगवे झेंडे, स्वामी वरदानंद भारती यांचा पोवाडा आदींमुळे आधीच सर्वत्र चैतन्य पसरले होते. त्यातच वक्‍त्यांच्या ओजस्वी भाषणांनी सारे वातावरणच क्षात्रतेजाने भारून गेले. या सभेस ३ हजारहून अधिक हिंदूंनी उपस्थित राहून राष्ट्र व धर्म रक्षणार्थ कृती करण्याचा निर्धार केला. या प्रसंगी व्यासपिठावर हिंदु महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती हिमानी सावरकर, प्रसिद्ध प्रवचनकार भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे, सनातन संस्थेचे डॉ. नरेंद्र दाते तसेच धर्मशक्‍ती सेनेचे श्री. विनय पानवळकर हे मान्यवर उपस्थित होते. सभेची सुरुवात वेदमूर्ती पुंडलीक विठ्ठल हळबे गुरुजी व वेदमूर्ती वामन पुंडलीक हळबे गुरुजी यांनी केलेल्या वेदमंत्रपठणाने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदु जनजागृती समितीचे श्री. सारंग अकोलकर यांनी, तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. चैतन्य तागडे व कु. गौरी कुलकर्णी यांनी केले. सनातन संस्थेच्या साधिका कु. नेहा कुलकर्णी यांनी म्हटलेल्या `वन्दे मातरम्’ने सभेची सांगता झाली.

वक्‍त्यांचे मार्गदर्शन
अन्यायाच्या विरोधात हिंदूंचे क्षात्रतेज उसळून आलेच पाहिजे ! – हिमानीताई सावरकर, राष्ट्रीय अध्यक्षा, अभिनव भारत
कोणीही उठून हिंदूंवर अन्याय करतो व हिंदू ते निमूटपणे सहन करतात. मुसलमानांचे लांगूलचालन करणारे सरकार शांतपणे हे सर्व पाहून त्यास मुकसंमती देते; मात्र या अन्यायाच्या विरोधात येथून पुढे हिंदू शांत बसणार नाहीत. खाली मान घालून ऐकून घेणार नाहीत, तर त्याविरोधात जशास तसे उत्तर देतील. यासाठी अन्यायाच्या विरोधात हिंदूंचे क्षात्रतेज असळून आलेच पाहिजे. दहशतवाद संपवण्याची इच्छा नसलेल्या सरकारलाही धडा शिकवलाच पाहिजे. हिंदूंमधील धर्माचरण व एकी आणि मॅकोलेच्या इंग्रजाळलेल्या शिक्षणपद्धतीच्या जागी राष्ट्रीय अस्मिता निर्माण करणारी शिक्षणपद्धती निर्माण केल्यासच दहशतवाद संपण्यास मदत होईल.

साधना हाच धर्मजागृतीच्या कार्याचा पाया ! – डॉ. नरेंद्र दाते, सनातन संस्था
आज समाजात धर्माप्रती असलेली कमालीची उदासीनता नष्ट करण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक असून धर्माचरणासाठीही साधनाच करणे आवश्यक आहे. हिंदुत्ववाद्यांच्या अनेक आंदोलनांच्या अपयशामागील कारणही भगवंताचे अधिष्ठान नसणे, हेच आहे. त्यामुळे साधना हाच धर्मजागृतीच्या कार्याचा पाया आहे. याशिवाय स्वत:च्या स्वभावातील दोष, अहंकार याही गोष्टी हिंदुसंघटनाच्या कार्यात अडथळा ठरणार्‍या असल्याने त्यांच्या निर्मूलनासाठीही प्रयत्‍न करणे आवश्यक आहे.

स्वत:वरील अन्यायाला स्वत:च वाचा फोडा ! – विनय पानवळकर, धर्मशक्‍तीसेना
मुंबईवरील हल्ल्यात, धुळे येथील दंगलीत सर्वसामान्यांनाच आपले प्राण गमवावे लागले. अत्यंत असुरक्षित अशा परिस्थितीत हिंदूंनी स्वत:वरील अन्यायाला स्वत:च वाचा फोडली पाहिजे. त्यासाठी स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यामुळे हिंदूमध्ये प्रतिकारक्षम मन तयार होऊन त्यांचे आत्मबळ वाढण्यास मदत होईल. यासाठीच धर्मशक्‍तीसेनेची स्थापना करण्यात आली आहे. आजवर आपण धर्मासाठी मरणार्‍यांचा इतिहास शिकला; परंतु इथून पुढे धर्मासाठी जगणार्‍यांचा इतिहास शिकवता आला पाहिजे. मुसलमानांनी सांगितले की, पुढील १२ वर्षांत भारतात सर्वांची सुंता आम्ही करू. आज आपण सर्वजण निश्चय करू की, पुढील १२ वर्षांत आपण भारतात मुस्लिम दहशतवाद नष्ट करू.

हिंदूंनी क्रांतीच्या मशाली हातात घ्याव्यात – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती
ज्या धर्माने `वसुधैव कुटुंबकम्’ची शिकवण दिली आहे, तो धर्म दहशतवादी कसा असू शकेल ? २६ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांसाठी मिणमिणत्या मेणबत्त्यांनी शांतता मोर्चे काढण्याऐवजी हिंदूंनी क्रांतीच्या मशाली हाती घेणे आता आवश्यक आहे. सर्वत्रच्या हिंदूंनी आंदोलन यशस्वी कसे करावे, यासाठी अमरनाथ येथील हिंदूंचा आदर्श ठेवावा. एन्सीआर्टीच्या सातवीच्या पुस्तकात ६० पाने मुगलांच्या इतिहासावर खर्ची घातली असून शिवाजी महाराजांची माहिती केवळ सहा ओळीत दिली आहे, तर महाराणा प्रताप यांचा उल्लेखही नाही. यावर सरकारने कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल.

शिवाजी महाराजांच्या नुसत्या घोषणा नकोत, तर त्यांच्यासारखे आचरण करा ! – भारताचार्य सु.ग. शेवडे
जवळ असलेल्यांना आपल्याला ओळखता येत नाही; म्हणूनच राजकारण्यांना हिंदु धर्म ओळखता येत नाही. खरे तर मुसलमान हे अल्पसंख्यांक नाहीत. दहा टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे अल्पसंख्यांक अशी युनोची व्याख्या आहे. या देशात सगळाच उलटा न्याय आहे. आपण तेलगीला सोडतो आणि सन्मानीय व्यक्‍तींच्या नार्को चाचण्या घेतो. कसाबच्या करणीतून नेमके कोण दहशतवादी आहेत, हे स्पष्ट झाले आहे. मनुस्मृतीत म्हटले आहे, जे आपल्यावर मार करतात त्यांना दिसताक्षणीच ठार केले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या नावाने नुसत्या घोषणा नकोत, तर त्यांच्यासारखे आचरण करा.

समितीतर्फे शाहीर योगेश यांचा `जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान !

या वेळी हिंदु जनजागृती समितीतर्फे महाराष्ट्र शाहीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शाहीर योगेश यांना त्यांच्या हिंदुत्वाच्या अतुलनीय कार्याबद्दल `जीवन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी त्यांच्या धर्मपत्‍नी सौ. उषा दिवाकर विष्णुरकर याही उपस्थित होत्या. भारताचार्य श्री. सु.ग. शेवडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पहार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

या वेळी प्रखर हिंदुत्ववादी `दैनिक सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांचा भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सन्माननीय उपस्थिती
महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. रांजणे महाराज; राष्ट्रीय कीर्तनकार श्री. रामकृष्ण कानडे; श्री संप्रदायाचे जिल्हा सेवाध्यक्ष श्री. विश्‍वास समगीर; आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. अभय माटे; भारत जागृती मंचचे श्री. हेमंत पारसनीस; योग वेदांत समितीचे श्री. विजय दीक्षित; शिवसेनेचे कसबा शाखाप्रमुख श्री. सचिन चिंचवडे व माजी शहाराध्यक्ष श्री. रामभाऊ पारीख; भाजपचे नगरसेवक श्री. अनिल शिरोळे व श्री. दिगंबर डवरी; ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे; अखंड नवहिंदुस्थान मंचचे श्री. विद्याधर नारगोळकर; जय मल्हार प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद खंडागळे; हिंदु महासभेचे
श्री. विलास दीक्षित; प्रतापगड उत्सव समितीचे श्री. राज यादव; श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. संजय जठर; लाल महाल उत्सव समितीचे श्री. चंद्रशेखर शिंदे; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्‍ते श्री. नवनाथ बांदल व पुणे शहर सरचिटणीस श्री. नितीन ढमाले

पुणे शहरात धर्मजागृतीसाठी हिंदु जनजागृती समितीचे व्यापक नियोजन !
हिंदु जनजागृती समितीने ९ जून २००७ रोजी पुणे शहरात घेतलेल्या सभेनंतर आज समितीची ही ७ वी सभा पार पडली. यापूर्वी पुणे शहर, चिंचवड, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता व जेजुरी या ठिकाणी समितीने सभा घेऊन धर्मजागृती केली. यापुढेही ५ फेब्रुवारीपर्यंत श्रीक्षेत्र जेजुरी, पुणे शहर, जुन्नर, शिरवळ, राजगुरूनगर, वडगाव, काशिंबेग (घोडेगाव), तळेगाव, नगर, सांगवी व भोर या १० ठिकाणी सभा घेण्याचे समितीचे नियोजन आहे.

क्षणचित्रे
* हिंदु धर्माभिमानी घोषणा देत असतांना मान्यवर वक्‍ते भारताचार्य श्री. सु.ग. शेवडे यांनीही उत्स्फूर्तपणे हात उंचावून घोषणा दिल्या. * प्रारंभी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वहाण्यात आली. * सनातन-निर्मित `सात्त्विक रांगोळया’ या नूतन ग्रंथाचे प्रकाशन श्रीमती हिमानीताई सावरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. * धर्मद्रोही काँग्रेस शासन सनातन संस्थेवर आणू पहात असलेल्या बंदीला विरोध करणार्‍या निषेधपत्रावर उपस्थित हिंदु धर्माभिमान्यांनी मोठ्या संख्येने स्वाक्षर्‍या केल्या.

* हिंदु जनजागृती समितीतर्फे हिंदु धर्मजागृती सभेत राष्ट्र व धर्म विषयक ठराव मांडण्यात येतात. या सभेत नेहमीच्या ठरावांमध्ये पुढील दोन नवीन ठराव मांडण्यात आले. – १. या वर्षीपासून ३१ डिसेंबर साजरा करणार नाही. २. यापुढे माझे मत फक्‍त हिंदुत्वासाठी असेल.

धर्मजागृती सभेला सहकार्य करून अनेकांनी बजावले धर्मकर्तव्य !
* हॉटेल मयुरचे श्री. अमित चोरडीया, हॉटेल स्वादचे श्री. संजय पाटील, हॉटेल रणजीतचे श्री. पाटणकर, अतिथी भोजनालयाचे श्री. दिलीप पळशीकर, अन्नपुर्णा केटरर्सचे श्री. प्रभाकर काजरेकर, श्रीपाद इडली सेंटरचे श्री. नगरकर, राजेश्‍वरी स्नॅक्सचे श्री. लक्ष्मण दवे, भाजपचे श्री. धीरज घाटे, श्री. व सौ. सौंदणकर, श्रीमती सावंत व सौ. प्रतिभा गाडगीळ या सर्वांनी सभेच्या प्रसारासाठी एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांसाठी भोजन, न्याहारी व चहा यांची सोय विनामूल्य उपलब्ध करून दिली.
* प्रतिभा ऑफसेट यांनी सभेसाठी अल्पदरात हस्तपत्रके व भीत्तीपत्रके छापून दिली.
* श्री क्रिएशनचे श्री. रवी वाली यांनी सभेसाठी `फ्लेक्स’, तर श्री. नितीन मोटे यांनी कापडी फलक अल्पदरात छापून दिले.
* अँरीस्टो टेलर्स यांनी सभेच्या प्रसिद्धीसाठी ३ होर्डिंग प्रायोजित केले.

सभा सुरू असतांना तीन वेळा वीज गेली. त्या कालावधीत हिंदु धर्माभिनान्यांनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या. या वेळी धर्माभिमान्यांनी प्रार्थना केल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला. श्री. सु.ग. शेवडे त्यांच्या भाषणात शेवटी म्हणाले, “आपण दैनिक सनातन प्रभातमध्ये वाईट शक्‍तींविषयी वाचतो. आता गेलेली वीज हा त्याचाच भाग होता.”

हिंदु धर्मजागृती सभेचे वैशिष्ट्य
`समाज, संघटना व साधक यांना अध्यात्म आणि धर्म या विषयी जागृत करणारी, हिंदु संघटनेत एकजूट निर्माण करणारी आणि साधकांमध्ये उत्साह निर्माण करणारी अशी ही धर्मसभा आहे. – ईश्‍वर (कु. क्षिप्रा वेद , वाराणसी यांच्या माध्यमातून)

१. `आम्ही हे करू, हे देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवणार्‍या राजकीय पक्षांच्या सभांना पैसे देऊन व ट्रकने आणलेल्या १ लाख लोकांपेक्षा `राष्ट्र व धर्म यांसाठी त्याग करा’, हे ऐकायला हिंदु जनजागृती समितीच्या सभेला १ हजार लोक आले, तरी ते जास्त महत्त्वाचे !’
२. `कुठे निवडणुका आल्यावरच निवडून येण्यासाठी सभा घेणारे सर्व राजकीय पक्ष, तर कुठे केवळ राष्ट्र व धर्म यांच्या संदर्भात जागृती होण्यासाठी सभा घेणार्‍या हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था !’
३. `कुठे जनतेला विविध प्रलोभने दाखवून स्वार्थी बनवणारे व नंतर काही न देणारे राजकीय पक्ष, तर कुठे राष्ट्र व धर्म यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला शिकवणार्‍या व ईश्‍वरप्राप्‍तीचा मार्ग दाखवणार्‍या हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था !’
- डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था यांच्या संयुक्‍त विद्यमाने ठिकठिकाणी धर्मजागृती सभा होत आहेत. या सभांच्या वेळी वाईट शक्‍तींचा त्रास होतो, हा प्रत्येक वेळचा अनुभव आहे. तो त्रास दूर होण्यासाठी व धर्मजागृती सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सनातनचे संत पू. निकमतात्या नामजप करत आहेत. – डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था