भारतातील राजकारणी व शासनातील कर्मचारी भ्रष्ट झाले आहेत, हे माहीत होते; पण देशाच्या रक्षणासाठी स्वत:हून भरती होणारे, देशासाठी प्राणपणाने लढण्याची जिद्द व मनाची तयारी असणारे, म्हणजे अशी उच्च ध्येये असणारे सेनेतील लोकही भ्रष्टाचारासारख्या नीच कर्माला कवटाळतील, याबद्दल विश्वासच बसत नाही. देशासाठी सर्वकाही त्यजायला तत्पर असणारे भ्रष्टाचार करून देशालाच लुबाडायला कसे तयार होतात ?
स्वत:ची उच्च ध्येये ते मातीमोल कशी करू शकतात ? त्यांच्या भ्रष्टाचाराची पुढील उदाहरणे वाचली, तर वरील प्रश्नांनी आपण अचंबित होऊ; पण म्हटलेच आहे, `जसा राजा, तशी प्रजा !’ राजा हाच काळाला कारण आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल, तर प्रथम भ्रष्ट राजकारण्यांना दूर केले पाहिजे, तरच सर्वदूरची ही कीड नष्ट होईल, अन्यथा भारत देश रसातळाला जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे जागृत व धर्माभिमानी लोकांनी भ्रष्ट फांद्या तोडण्यात वेळ न घालवता सरळ भ्रष्ट राजकारणीरूपी मुळावरच प्रथम घाव घालायला हवा.
४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
खोटे बिल बनवून पैसे कमवणे
`एकदा वैज्ञानिकांचा परिसंवाद (सेमिनार) आयोजित केला होता. त्यासाठी एका छापखान्यात एक माहितीपत्रक छापण्यासाठी दिले होते. एकाची किंमत १२५ रुपये होती. अधिकार्याला याबद्दल सांगितल्यावर तो ओरडून म्हणाला, “त्यांनी प्रत्येकी ९०० रुपये याप्रमाणे कोटेशन दिले आहे.” एकंदरीत १२५ रुपयांचे माहितीपत्रक ९०० रुपयाला विकून त्यातून पैसे मिळवणे, असा अधिकार्यांचा उद्देश होता.
`नेविमेला’ कार्यक्रमासाठी आम्हा सहाजणांकडे जबाबदारी दिली होती. तिथे जेवणासाठी आम्हाला स्वत:चे पैसे वापरून जेवायला लागले. प्रत्यक्षात `जेवणासाठी पैसे देतो’, असे सांगूनदेखील अधिकार्यांनी दिले नाहीत.
उत्सवासाठी जमवलेल्या वर्गणीतून अधिकार्यांनी दारू पिणे
नवरात्री उत्सवासाठी सगळयांकडून वर्गणी घेतली. नवरात्रीत पूजा झाल्यावर आयोजक दारू पिऊन पूजास्थळाकडे जात होते. नवरात्री उत्सवातील शिल्लक राहिलेले ७ हजार रुपये आयोजकांनी दारू पिऊन उडवले, असे ऐकण्यात आहे. यात नौदल अधिकार्याचाही (कमांडिंग ऑफिसरचा) हात आहे, असे ऐकण्यास आले.
दुरुस्तीच्या ठेक्यामध्ये होणारा भ्रष्टाचार
मिसाईल घेऊन जाणार्या गाड्यांची दुरुस्ती करण्याकरता खाजगी कंपन्यांना संविदा दिल्या जातात. ते व्यवस्थित दुरुस्ती करत नसल्याने या गाड्या मिसाईल घेऊन विशाखापट्टणला जातांना वाटेत बंद पडतात. हे जे.के. मिसाईलच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूपच घातक आहे.
सरकारी वस्तूंचा वैयक्तिक कारणासाठी उपयोग
कार्यालयात लावायची वातानुकुलित यंत्रे काही अधिकारी त्यांच्या घरी लावतात.
नेवीबॉल, हॅशरन यांसाख्या मोठमोठ्या पाटर््यांमध्ये अधिकारी लाखो रुपयांची उधळपट्टी करतात. यासाठी लागणारे काही पैसे नौसैनिकांच्या निधीतून दिले जाते. – नौदलातील एक अधिकारी
(क्रमश:)



