`सनातन’च्या संकेतस्थळावर दत्तजयंतीच्या निमित्ताने दत्तगुरूंची आध्यात्मिक माहिती व प्रश्‍नमंजुषा

पनवेल, ११ डिसेंबर (वार्ता.) – शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी दत्तजयंती आहे. या निमित्ताने सनातनचे साधक, वाचक, हितचिंतक व जिज्ञासू यांना दत्तगुरूंविषयी माहिती मिळावी, या हेतूने सनातनच्या संकेतस्थळावर दत्तगुरूंची आध्यात्मिक माहिती http://www.sanatan.org/marathivisheshank/datta या मार्गावर व प्रश्‍नमंजुषा http://www.sanatan.org/marathivisheshank/dattaprashnamanjusha या मार्गावर उपलब्ध करण्यात आली आहे.

संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेल्या माहितीची वैशिष्ट्ये
१. दत्तगुरूंची माहिती वाचतांना `श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकता येईल. त्यामुळे वाचकास नामजपातील सात्त्विकता अनुभवता येऊन `नामजप अधिक योग्य कशा प्रकारे करावा ?’, हेही लक्षात येईल.
२. दत्तगुरूंविषयी माहिती असलेली ध्वनीचित्रफीत पहाता येईल.
३. दत्तगुरूंची माहिती पालकांना स्वत:च्या पाल्यांना सोप्या भाषेत देता यावी, म्हणून `विद्यार्थ्यांसाठी दत्तविषयक प्रवचन’ ठेवण्यात आले आहे.
४. बालवाचकांना दत्तगुरूंविषयी अधिक माहिती व्हावी, या हेतूने दत्तविषयक प्रश्‍नमंजुषा उपलब्ध आहे. ही प्रश्‍नमंजुषा `ऑनलाईन’ असल्याने प्रश्‍न सोडवल्यावर लगेचच आपणास मिळालेले गुण पहाता येतील.
५. संस्थेतर्फे करण्यात आलेल्या दत्तगुरूंच्या संदर्भातील विविध सात्त्विक उत्पादनांची, उदा. नामपट्टी, चित्र, उपासनापद्धती यांविषयी माहिती ध्वनीचित्र तबकडीद्वारे जाणून घेता येईल.
अधिक माहितीसाठी संस्थेच्या dainik@sanatan.org या संकेतस्थळावर संपर्क साधा.

साधकांना सूचना व वाचकांना विनंती
वरील माहितीची `लिंक’ आपण संगणकीय पत्राद्वारे नातेवाईक व मित्रमंडळी यांना पाठवून या धर्मप्रसारात सहभागी व्हावे !