मुंबई, ९ डिसेंबर (वार्ता.) – भारताने पाकव्याप्त काश्मीरची मागणी करावी. वेळ पडल्यास युद्ध करावे आणि अखंड काश्मीर आपल्याकडे ठेवून दहशतीने उरलेला काश्मीर बळकावण्याची पाकिस्तानातील जिहादी प्रवृत्तीच्या लोकांची आशा मुळातून उपटून नष्ट करावी, अशी मागणी हिंदु मानवाधिकार मंचच्या नियामक मंडळाने सोमवारी रात्री विलेपार्ले येथे झालेल्या बैठकीत केली. पाकिस्तानी आणि इस्लामी दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबरला मुंबईवर अचानक हल्ला करून मुंबईचे सार्वजनिक जीवन ६० तास वेठीस धरले होते. आता या हल्ल्याची चिकित्सा करतांना त्यात धार्मिक आणि पक्षीय दृष्टीकोन न आणता केवळ राष्ट्रीय दृष्टीकोनातून चर्चा व्हावी, अशी मागणी विचारवंत करीत आहेत. या मागणीचा आदर करीत दहशतवादाचा प्रश्न मुळातून मिटविण्यासाठी राष्ट्रीय दृष्टीकोनातून विचार करायचा असेल, तर पाकव्याप्त काश्मीर जिंकणे आणि अखंड काश्मीर दहा वर्षांपर्यंत सेनादलाच्या संपूर्णपणे स्वाधीन करून तेथील फुटीरवादी प्रवृत्तींना भारतनिष्ठ बनवणे यांसारखा सोपा, व्यवहार्य आणि राष्ट्रीय पर्याय दुसरा नाही, असे हिंदु मानवाधिकारचे मत आहे. भारतातील मुसलमानांची मने मुल्लामौलवींनी चुकीच्या पद्धतीने उपदेशिलेल्या कुराणामुळे प्रदूषित झाली असून मुळात कुराण शांततावादाचा आणि सहिष्णुतेचा पुरस्कार करीत आहे, असे मत मुसलमान समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती प्रदर्शित करीत आहेत. हिंदु मानवाधिकार मंच या मताचा आदर करून पुढील दोन मागण्या करीत आहे. भारतहितविरोधी प्रचार केल्याच्या आरोपांवरून काही मौलवींविरुद्ध विविध न्यायालयांनी अटक वॉरंट काढले असूनही मुसलमान समाजाच्या दबावमुळे त्या त्या राज्य सरकारांना या मौलवींना अटक करण्याचे धाडस होत नाही. तरी त्यांना अटक व्हावी म्हणून मुसलमान समाजाने स्थानिक पोलीस यंत्रणेला साह्य करावे, असे आवाहन या प्रतिष्ठीत व्यक्तींनी करावे. दुसरी मागणी अशी की, नव्या परिस्थितीत भारतात सध्या अनुसरल्या जात असलेल्या सर्वच धर्मग्रंथांची अधिकारी व्यक्तींकडून कठोर जिकित्सा व्हावी आणि भारतातील विभिन्न धर्मियांचे सहजीवन आणि जागतिक शांतता यांना संकटात टाकू शकतील, अशा आदेशांचा आणि सूचनांचा समावेश धर्मग्रंथात असेल, तर त्यांचे पालन करण्यास दंडनीय प्रतिबंध भारतीय संसदेने करावा. मुसलमानांनी स्वत:ला अल्पसंख्याक न समजता भारतीय म्हणवावे, असे मत २६ नोव्हेंबरनंतर मुसलमानांमधील प्रतिष्ठित व्यक्ती व्यक्त करू लागल्या आहेत. भारतीय एकात्मतेच्या दृष्टीने आणि मुसलमानांमधील द्विराष्ट्रवाद नाहीसा होण्याच्या दृष्टीने ही अंधुकशी सुरुवात आहे. हिंदु मानवाधिकार मंच या परिवर्तनाचे स्वागत करीत आहे. भारतात मुसलमान केवळ धार्मिक अल्पसंख्यांक असून राष्ट्रीय आणि भाषिक अल्पसंख्यांक नाहीत ही भूमिका विद्वज्जनांनी मान्य करावी, तसेच भारतीय संसदेला मान्य करता येणार नाही आणि भारतीय भावविश्वाला बाधा पोचवील, अशी राजकीय महत्त्वाकांक्षा मुसलमान बाळगणार नाहीत, याची सर्व भारतियांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मंच करीत आहे. सर्वश्री अरविंद विठ्ठल कुलकर्णी, धमेंद्र मुदलियार, रवी नाथानी, सत्यप्रकाश मिश्र, मकरंद महाडिक आणि शरद मिस्त्री या बैठकीस उपस्थित होते.


