भारतातील दहशतवाद निपटण्यासाठी आता प्रजेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील असलेले इस्रायली राज्यकर्ते भारताने आयात करावेत !
मुंबई, ५ डिसेंबर (वृत्तसंस्था) – शहरावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४ इस्रायली नागरिक ठार झाले. त्यामुळे इस्रायल सरकार संतप्त झाले आहे. याचा बदला घेण्यासाठी इस्रायल सरकार पाकिस्तानवर हवाईहल्ले करण्याच्या विचारात आहे.
(इस्रायलच्या चार नागरिकांना दहशतवाद्यांनी ठार मारल्यावर इस्रायल त्याचा सूड उगवण्यासाठी पाकिस्तानवर चढाई करण्यासाठी कंबर कसतो. या उलट पाकपुरस्कृत दहशतवाद्यांकडून भारतावर वारंवार हल्ले होत असतांना काँग्रेस सरकार पाकिस्तानच्या विरोधात काहीही करत नाही ! भारतातील दहशतवाद निपटण्यासाठी आता प्रजेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील असलेले इस्रायली राज्यकर्ते भारताने आयात करावेत ! – संपादक) हे हल्ले करण्यासाठी भारताने इस्रायलच्या लढाऊ विमानांना इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी इस्रायल सरकारने काँग्रेस सरकारकडे केली आहे. इस्रायलला ही परवानगी दिल्यास जगात इस्रायलचे शत्रू असलेली राष्ट्रे भारताचीही शत्रू बनतील, या भीतीमुळे काँग्रेस सरकार इस्रायलची ही परवानगी फेटाळणार, असे वृत्त आहे.


