मुजोर पाक दाऊदच्या बदल्यात शिवसेनाप्रमुखांची मागणी करणार !
प्रखर हिंदुत्ववादी नेत्याची तुलना कुख्यात गुंड व दहशतवादी असलेल्या मुसलमानाशी करणारा पाकिस्तान ! अशा धर्मांध शत्रूराष्ट्रावर हल्ला करणे, हाच त्याचे तोंड कायमचे बंद करण्याचा एकमेव मार्ग आहे ! हिंदूंनो, काँग्रेस हे करणार नाही; म्हणून येत्या निवडणुकीत काँग्रेसला हाकलून लावून कृतीशील हिंदुत्ववाद्यांनाच सत्ता बहाल करा !
इस्लामाबाद, ४ डिसेंबर – भारत सरकारने भारताला हव्या असलेल्या २० दहशतवाद्यांची यादी पाकिस्तान सरकारला पाठवली आहे. तीत कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचेही नाव आहे; मात्र पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी ही मागणी धुडकावून लावली आहे. (एवढासा पाकिस्तान भारताबाबत अक्षम्य गुन्हे करून वर मुजोर वक्तव्ये करतो, तो केवळ नपुंसक काँग्रेसी राज्यकर्त्यांमुळेच ! संपूर्ण राष्ट्राचे मानसिक खच्चीकरण करणार्या काँग्रेसी राज्यकर्त्यांना केवळ निवडणुकीत पराभूत करून भागणार नाही, तर त्यांच्यावर अभियोग चालवून त्यांना कठोर शासन करायला हवे ! – संपादक) एवढेच नव्हे, तर `तुम्हाला दाऊद हवा असेल, तर त्याबदल्यात आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे द्या’, अशी मागणी ते भारत सरकारकडे करणार आहेत. पाकिस्तानला हव्या असलेल्या ३५ जणांच्या नावांची यादी पाकिस्तानने तयार केली आहे. या यादीत शिवसेनाप्रमुख हे चौथ्या स्थानावर आहेत. (हे वाचून ज्यांचे रक्त सळसळत नाही, ते हिंदूच नाहीत ! – संपादक) ही यादी पाकिस्तानमधील `डेलीमेल टुडे’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे `श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून पाकिस्तानात झालेल्या जनसंहारात ३३ जणांना त्यांचे प्राण गमावावे लागले आणि जातीय हिंसाही झाली’, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. (हिंदू असे दहशतवादी प्रवृत्तीचे असते, तर आज जगाच्या पाठीवर `पाकिस्तान’ हे राष्ट्र शिल्लक राहिले नसते ! – संपादक) श्री. ठाकरे यांच्या व्यतिरिक्त कुख्यात गुंड छोटा राजन याचाही या यादीत समावेश आहे.


