श्री सिद्धेश्‍वराच्या आशीर्वादाने हिंदुद्रोह्यांना चीतपट करण्यास ५ हजार सोलापूरवासीय सिद्ध !

साधूसंतांना सजा, अफझलची मजा ।
सुरक्षायंत्रणांचा बोर्‍या, दहशत माजवी पाकचा पोर्‍या ।
नेभळट राजकारणी, पाकशी करतात इमानी ।
धर्मजागृतीची वेळ आली । अरे पुन्हा धर्मतेजाच्या पेटवा मशाली ।।

सोलापूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – जिहादी दहशतवाद, हिंदु संघटनांवर बंदी घालण्याचा काँग्रेस सरकारचा डाव, हिंदुद्रोही चित्रकार म.फि. हुसेन यांचे उदात्तीकरण, रामसेतू जमीनदोस्त करण्याचा कुटील डाव, `डाऊ’च्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांची तपोभूमी उद्ध्वस्त करण्याचा डाव, संतांना अवमानास्पद वागणूक व हिंदूंचे धर्मांतर यांसारख्या अनेक आघातांमुळे हिंदु धर्म संकटात सापडला आहे.

हे थांबवण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे व हिंदुसंघटन करणे, ही काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन येथील नार्थकोट मैदानावर आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत संत आणि हिंदु धर्माभिमानी यांनी केले. आज सायंकाळी झालेल्या जिल्ह्यातील सहाव्या हिंदु धर्मजागृती सभेत श्री सिद्धेश्‍वराच्या आशीर्वादाने हिंदुद्रोह्यांना चीतपट करण्यासाठी ५ हजार सोलापूरकर सिद्ध झाले. पू. भरतबुबा रामदासी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन डॉ. श्रीपाद पेटकर व सौ. सुनीता दीक्षित यांनी केले. हिंदु जनजागृती समितीची ओळख डॉ. अविनाश काशिद यांनी करून दिली. धर्मजागृती सभेची सांगता `वन्दे मातरम्’ म्हणून झाली. या वेळी सनातनचे संत पू. सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सभेस उपस्थित राहिलेल्या समस्त हिंदु धर्माभिमान्यांची बैठक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मार्कंडेय मंदिराच्या पहिल्या मजल्यावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला हिंदु धर्माभिमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

धर्मकार्य करणार्‍या हिंदूंच्या हेतूबाबत पोलिसांची आपापसांत पैज !
समितीचे कार्यकर्ते प्रसार करतांना पाहून एक पोलीस त्याच्या सहकार्‍याला म्हणाला, “हे लोक पैसे मिळतात म्हणून एवढे चिकाटीने काम करतांना दिसतात.” त्या वेळी दुसरा पोलीस म्हणाला, “अरे नाही. हे सर्व ते सेवा म्हणून करतात.” (ज्या पोलिसांचा समितीचे उपक्रम अथवा कार्यकर्ते यांच्याशी केव्हा ना केव्हा संपर्क आलेला आहे, त्यांचा कार्यकर्त्यांवर असा विश्‍वास आहे ! – संपादक) या चर्चेनंतर दोघांत १०० रुपयांची पैज लागली. दुपारी त्या पोलिसाने समितीच्या एका कार्यकर्तीला त्याबाबत विचारले. ती म्हणाली, “दादा, सध्या इतकी धर्महानी होत आहे. त्यामुळे धर्मरक्षणासाठी आम्ही हे सर्व सेवा म्हणून करतो. हे कार्य करण्यासाठी देवच आम्हाला शक्‍ती देतो.” त्या वेळी दुसर्‍या पोलिसाने पहिल्या पोलिसाकडून पैजेचे १०० रुपये घेऊन अर्पण केले.

इतर पोलीस यातून बोध घेतील का ?
समितीच्या कार्यकर्त्या सभेची भित्तीपत्रके वाहनांवर लावत असतांना एका पोलिसाने अभिनव प्रकारे सेवेची संधी साधली. त्याने प्रत्येक रिक्शावाल्याला थांबवून रिक्शावर धर्मसभेच्या प्रसिद्धीचे रंगीत भित्तीपत्रक लावण्यास सांगितले. हा पोलीस महिला कार्यकर्त्यांना म्हणाला, “तुम्ही भीतीपत्रके लावत बसू नका. खरेतर ही कामे आम्ही पुरुषांनी करायला हवीत; पण पुरुष करत नसल्याने तुम्हाला करावी लागत आहेत.” त्या पोलिसाने पुढील चौकात असलेल्या त्याच्या मित्राला भ्रमणध्वनी करून प्रत्येक रिक्शावर भित्तीपत्रक लावण्याविषयी सांगितले. (हिंदूंनो, खर्‍या अर्थाने हिंदु असलेल्या पोलिसाचे अभिनंदन ! – संपादक)

हिंदु धर्मजागृती सभेचे वैशिष्ट्य
`समाज, संघटना व साधक यांना अध्यात्म आणि धर्म या विषयी जागृत करणारी,
हिंदु संघटनेत एकजूट निर्माण करणारी आणि साधकांमध्ये उत्साह निर्माण करणारी
अशी ही धर्मसभा आहे. – ईश्‍वर (कु. क्षिप्रा वेद यांच्या माध्यमातून)

सोलापूर शहराची लोकसंख्या १२ लाखहून अधिक आहे. तसेच तेथे अहिंदूंची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात असूनही येथील सभेला ५ हजारहून अधिक उपस्थिती असणे, हे हिंदु जनजागृती समितीबद्दल हिंदूंच्या मनात विश्‍वास व आशा निर्माण होत असल्याचे द्योतक आहे.’ – डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था यांच्या संयुक्‍त विद्यमाने ठिकठिकाणी धर्मजागृती सभा होत आहेत. या सभांच्या वेळी वाईट शक्‍तींचा त्रास होतो, हा प्रत्येक वेळचा अनुभव आहे. तो त्रास दूर होण्यासाठी व धर्मजागृती सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सनातनचे संत पू. निकमतात्या नामजप करत आहेत. – डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था

Leave a Reply