दहशतवादविरोधी पथकाकडून बेदम मारहाण व जिवे मारण्याची धमकी

कर्नल पुरोहित यांच्या पत्रातील माहिती

पुणे, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाकडून आपल्याला बेदम मारहाण झाल्याची, तसेच खोटा कबुलीजबाब देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात अटकेत असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आज न्यायालयात त्यांच्या वकिलांमार्फत सादर केलेल्या एका लेखी पत्राद्वारे दिली.

(साध्वी प्रज्ञासिंग व लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे वारंवार मुंबईचे दहशतवादविरोधी पथक त्यांना प्रचंड प्रमाणावर मारहाण करत असल्याच्या व मानसिक त्रास देत असल्याच्या तक्रारी करत आहेत; परंतु केवळ हे दोघेही हिंदु असल्याने त्यांच्या तक्रारींची दखल शासकीय स्तरावर घेण्यात आलेली नाही. हेच जर मुसलमान असते, तर एव्हाना दिल्लीहून त्यांच्या सुटकेचे आदेश आले असते ! हिंदूंनो, येत्या निवडणुकीत अशा हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस सरकारला पराभूत करा व अत्याचारग्रस्त हिंदूंना न्याय मिळवून द्या ! – संपादक) `याच कारणास्तव आपल्याला पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात अधिक सुरक्षित वाटते’, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. हरियाणा पोलीस व केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून जिवे मारण्याच्या मिळालेल्या धमकीचाही पुनरुच्चार त्यांनी पत्रात केला आहे. (हरियाणा पोलीस व केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग हे स्वत:ला सर्वसत्ताधीश समजतात कि काय ? ते काहीही करतील व कुणीही त्यांना काही विचारणार नाही, असे त्यांना वाटते का ? अशा मुजोरांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हिंदुसंघटनाला पर्याय नाही ! – संपादक) बनावट कागदपत्रांच्या आधारे बंदूक मिळवून दिल्याच्या आरोपाच्या प्रकरणी पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात असलेले ले. कर्नल पुरोहित यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. या प्रकरणी सरकारी वकिलांनी ले. कर्नल पुरोहित यांना ७ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. यावर प्रतिवाद करतांना अधिवक्‍ते शिवदे म्हणाले, “मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात अटकेत असलेल्या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली असून २९ नोव्हेंबर रोजी त्यांना `मोक्का’ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तोपर्यंत पोलीस कुठल्या ना कुठल्या कारणास्तव कर्नल पुरोहित यांना पोलीस कोठडीत ठेवण्यासाठी प्रयत्‍नरत आहेत. मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाचा कटू अनुभव लक्षात घेता ले. कर्नल पुरोहित यांना येथेच ३ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी.” आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. अखेर न्यायालयाने सरकारी वकिलांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत ले. कर्नल पुरोहित यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. यानंतर पोलिसांनी ले. कर्नल पुरोहित यांना नाशिक येथील कारागृहात नेले.

पूजासाहित्य, पुस्तके व औषधे जवळ बाळगण्यास न्यायालयाची परवानगी
ले. कर्नल पुरोहित यांनी पूजासाहित्य, पुस्तके व औषधे जवळ बाळगण्याची मागणी आज न्यायालयात वकिलांमार्फत केली. ती न्यायालयाने मान्य केली. ले. कर्नल पुरोहित यांना अस्थमाचा त्रास आहे.

हिंदूंनो, हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी काँग्रेस सरकारने ही कुटील कारस्थाने रचली आहेत, तरीही घाबरू नका ! येत्या निवडणुकीनंतर सर्वच स्तरांवर हिंदुत्ववाद्यांचे सरकार असेल. त्या वेळी अशा अन्याय्य चौकशा बंद होतील !

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

Leave a Reply