वमन नको, नमन करा !

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी या बाँबस्फोटात आपला सहभाग असल्याचे मान्य करावे, म्हणून मुंबईत पोलिसांनी त्यांना भयंकर मारहाण केल्याचे निवेदन त्यांनी नाशिकच्या न्यायालयात सादर केले. पोलिसांना पुरावे मिळत नसल्याने आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दुष्कीर्त करण्याचे कारस्थान सफल होत नसल्याने वैफल्यातून हा छळ होत आहे, हे उघड आहे.

त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नसल्याने आणि वैयक्‍तिक स्वार्थाला गाडून भव्यतर धार्मिक आणि राष्ट्रीय उत्थानासाठी त्यांनी तरुणपणात संन्यस्त जीवन स्वेच्छेने स्वीकारले असल्याने, जर त्यांनी बाँबस्फोटात हातभार लावला असता, तर अभिमानाने त्यांनी ते मान्य केले असते. त्या साध्वी असल्याने त्यांच्यासारख्या व्यक्‍तींशी वागण्याचे शिष्टसंमत संकेत ठरलेले आहेत. त्यांचा भंग पोलिसांनी का केला, हे गृहमंत्र्यांना आज ना उद्या समाजाला विश्‍वासात घेऊन सांगावे लागेल. प्रसंगी मन मोठे करून जनतेची माफी मागावी लागेल. साध्वी प्रज्ञासिंगजी यांना त्यांच्या शिष्याकरवी मारहाण करण्यात आली, त्यांच्या गुरूंविषयी अपशब्द वापरण्यात आले आणि साध्वीच्या विमल चारित्र्याविषयी संशय व्यक्‍त करणारे अभद्र शब्द वारंवार उच्चारण्यात आले. हा उद्धटपणा सहनशक्‍तीच्या पलीकडचा आहे. ज्याचे शील विकाऊ आहे, अशा व्यक्‍तीला वेश्येच्याही चारित्र्याविषयी बोलण्याचा हक्क नसतो. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या, दाऊद इब्राहिमची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानणार्‍या आणि बांगलादेशी घुसखोरांसमोर पायघड्या अंथरणार्‍या महाराष्ट्राच्या काँग्रेस सरकारने साध्वीच्या चारित्र्याविषयी पोलिसांना अर्वाच्च बरळण्यास चिथावणी द्यावी, हा नुसता उद्धटपणा नाही, तर हे महापाप आहे. आणि या पापाला प्रायश्चित्त या सरकारच्या हातून सत्ता काढून घेणे, हेच आहे. दलालीवर सरकार चालवणार्‍या या नेत्यांना शुद्ध चारित्र्याची महती काय कळणार ? आपल्या पितरांना नरकात ढकलणारे हे गर्हणीय कृत्य या फाळणीबहाद्दर विश्‍वासघातक्यांनी केले; कारण त्यांना `पॅरिटी’ साधायची आहे. बाँबस्फोट झाले की नेहमीच मुसलमानांना पकडले जाते. त्यामुळे मुसलमानांना किती राग आला असेल या कल्पनेने काँग्रेस नेत्यांची झोप उडाली आहे. तेव्हा आम्ही पक्षपाती नाही, हे दाखवण्यासाठी साध्वीचा छळ निर्लज्जपणे केला जात आहे. अत्यंत अभिनव पद्धतीने हिंदूंनी निषेध करून काँग्रेस संस्कृतीच्या मुखंदांना धडा शिकविला पाहिजे. सुरुवातीला महिलांचे मोर्चे शांत, गंभीरतेने प्रत्येक पोलीस ठाण्यावर गेले पाहिजेत आणि साध्वीला नमन करण्याऐवजी वमन का करता, असा प्रश्‍न विचारला गेला पाहिजे.
- सुघोष