इथे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली । अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ।।

हिंदूंनो, तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचे तरुण उच्चशिक्षित जिहादींचे आव्हान स्वीकारा !

ब्रिटिशांना घालवण्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी सशस्त्र लढा दिला. कधी संघटितपणे, तर कधी एकाकी अशी ही झुंज होती. एकाकडून दुसर्‍याने स्फूर्ती घेतली अन् अशी अनेक चैतन्यमय चरित्रे घडलेली या देशाने बघितली. क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन १९०४ मध्ये `अभिनव भारत’ या नावाची सशस्त्र क्रांतीकारकांची गुप्‍त संघटना स्थापन केली. १९५२ मध्ये `अभिनव भारता’चा सांगता समारोह झाला होता; परंतु आता गेल्या १५-२० वर्षांतील घटना बघता `अभिनव भारता’ची या देशाला पुन्हा आवश्यकता आहे, असे काही देशभक्‍त मंडळींना वाटू लागले !

लेखिका : श्रीमती हिमानी सावरकर, राष्ट्रीय अध्यक्षा, अभिनव भारत

देशाचा इतिहास
या देशावर आजवर अनेक परकीय आक्रमणे आली; परंतु येथील पराक्रमी नेत्यांनी आणि देशभक्‍त जनतेने ती परतवून लावली. साडेतीनशे वर्षांपूर्वी येथे ५ पातशाह्या राज्य करत होत्या. स्वराज्य हा शब्द उच्चारायलाही माणसे घाबरत होती, त्या काळात छत्रपती शिवरायांनीच स्वराज्याची शपथ घेतली. ५ पातशाह्या पालथ्या घातल्या आणि स्वराज्य स्थापून दाखवले. सामान्यातल्या सामान्य माणसानेही देशभक्‍तीचा वसा घेतला. म्हणून शिवरायांचे स्वप्न साकार झाले. स्वराज्य संस्थापनेसाठी जे जे करावे लागते ते सर्व यत्‍न महाराजांनी केले.
छत्रपतींच्या स्वराज्याचा विस्तार पुढे पराक्रमी पेशव्यांनी केला. नंतर ब्रिटिशांच्या राजवटीखाली हा देश गुलाम झाला. ब्रिटिशांना घालवण्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी सशस्त्र लढा दिला. कधी संघटितपणे, तर कधी एकाकी अशी ही झुंज होती. एकाकडून दुसर्‍याने स्फूर्ती घेतली अन् अशी अनेक चैतन्यमय चरित्रे घडलेली या देशाने बघितली.
क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन १९०४ मध्ये `अभिनव भारत’ या नावाची सशस्त्र क्रांतीकारकांची गुप्‍त संघटना स्थापन केली. सन १९४७ मध्ये आपला तीन चतुर्थांश देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यवीरांना असे वाटले की, आता `अभिनव भारत’ या संघटनेची आवश्यकता राहिलेली नाही, म्हणून त्यांनी १९५२ मध्ये `अभिनव भारता’चा सांगता समारोह केला.

`अभिनव भारत’ची पुन्हा आवश्यकता
परंतु आता गेल्या १५-२० वर्षांतील घटना बघता `अभिनव भारता’ची या देशाला पुन्हा आवश्यकता आहे, असे काही देशभक्‍त मंडळींना वाटू लागले. आपला देश अखंड व्हावा, आतंकवादाला आळा घालावा, देशोपयोगी समाजोपयोगी कामे करावी, अशी या संघटनेची उद्दिष्टे ठरवली गेली. ही उद्दिष्टे `हिंदु महासभे’शी मिळतीजुळती आहेत.

देशाला दुर्दैवाचा शाप
या देशात ज्या पद्धतीने राष्ट्रीय अस्मिता चिरडली जात आहे, ते बघितले की, कुठल्याही सहृदय माणसाचे मन पेटून उठेल. अंतर्मुख होऊन एकूणच मागील इतिहासावर लक्ष दिले, तर असे जाणवते की, या देशाला दुर्दैवाचा शाप आहे. रामाला वनवास घडतो, कृष्णाचा कारागृहात जन्म होतो, छत्रपती शिवराय पन्नाशीत जातात, तर औरंगजेब दीर्घायुषी ! सर्व पराक्रमी पेशवे अल्पायुषी अन् दुसरे बाजीराव दीर्घायुषी ! इंग्रजांना घालवण्यासाठी जिवाचा आकांत करणार्‍यांवर राजद्रोहाचा आरोप लावला जातो, अन् एकासाठी प्रसंगी दोन-दोन, तीन-तीन जणांना फासावर लटकवले जाते. सावरकरबंधूंना अंदमानचा कारावास, वासुदेवांना एडनचा कारावास, लोकमान्य टिळक अन् सुभाषचंद्रांना मंडालेचा कारावास, तर गांधींना आगाखान पॅलेसमध्ये ठेवतात. क्रांतीकारकांना कदान्न, सक्‍तमजुरी. परिणामी त्यांच्या वजनात घट अथवा काहींचा मृत्यू, तर गांधी, नेहरूंची वजने कारागृहात वाढलेली. त्यांना दूध, झोपायला जाळीदार मच्छरदाणी इत्यादी सुखसुविधा !

मुसलमानांसाठी गांधी-नेहरूंचा उरफाटा न्याय
१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर फाळणी झाली अन् हिंदूंचा आक्रोश झाला. कारण पाकिस्तानातून शव भरूनभरून गाड्या आल्या; मात्र येथील ज्या मुसलमानांना पाकिस्तानात जायचे होते, ते सुखरूप गेले. `मुसलमानांनो, तुम्ही जाऊ नका, ही भूमी तुमची आहे’, असा उरफाटा (अ)न्याय गांधी- नेहरू देत होते. २३ टक्के मुसलमानांना ३० टक्के भूमी मिळालीच; शिवाय येथीलही भूमी त्यांच्या ताब्यात ठेवली. म्हणजे `माझं ते माझं अन् तुझं तेही माझं’ असे झाले. त्या वेळी सरकारचे डोके ठिकाणावर नव्हते. (आताही नाही; कारण सध्याचे पंतप्रधान या देशातील संसाधनाचे पहिले हक्कदार मुसलमान आहेत, असे म्हणतात.)

गांधी हत्येप्रकरणी अनेकांना निष्कारण शिक्षा
या सर्व अन्यायाला जबाबदार असणार्‍या मोहनदास करमचंद गांधी नावाच्या मानवाला देशभक्‍त नथुराम गोडसे यांनी संपवले; पण नथुरामांची देशभक्‍ती लोकांना कळू नये, याची व्यवस्था शासनाने केली. ब्रिटिशांच्या न्यायाप्रमाणे एकासाठी दोन जणांना फाशी अन् तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यात सावरकरांना निष्कारण गोवण्यात आले. वास्तविक सावरकरांना फाशी देण्याचा नेहरूंचा मानस होता; पण तो असफल झाला.
निरपराध हत्या किंवा दहशतवाद केव्हाही वाईटच; पण कोणत्याही कृतीकडे बघतांना त्या कृतींमागील हेतू बघितला पाहिजे.

हिंदूंवरील अन्याय
वर्षांनुवर्षे हिंदूंच्या भावनांची पायमल्ली करायची मुसलमानांचे लांगूलचालन करावयाचे, त्यांना सतत झुकते माप द्यायचे, सोयी-सवलती द्यायच्या. हे कुठवर चालणार ? मग एखाद्या देशभक्‍त समुहाला वाटले की, आम्ही `जशास तसे’ उत्तर देऊ, तर दोष कुणाचा ? अमरसिंहांसारखी माणसे ८० कोटी हिंदूंना २० कोटी मुसलमानांचा धाक दाखवतात, हा दहशतवाद नाही का ? फाशीची शिक्षा होऊनही अफझल गुरू सुखात रहातो, ही दडपशाही नाही का ? अट्टल गुन्हेगार संसदेत बसतात आणि आमच्यावर गुरगुरतात. ही मुजोरी नाही का ? हिंदूंचा आवाज दडपायचा ही दंडेलशाही नाही का ? स्वा. सावरकरांसारख्या देशभक्‍तावर फुटका मणीशंकर चिखलफेक करतो, हाच देशद्रोही मणीशंकर भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनसाठी पैसे गोळा करत होता. तो देशभक्‍ती कशी जाणणार ? मग मणीशंकर संसदेत बसतो अन बुद्धीभ्रष्ट काँग्रेसी सावरकरांचे चित्र संसदेत लावण्यास विरोध करतात.
पण येथे असे बोलायची बंदी आहे. हिंदूंनी तोंड उघडले की, ती सांप्रदायिकता ठरते. उलट मुसलमानांनी धमकावले, तर तो निधर्मीवाद होतो. सततची ही गळचेपी का म्हणून सहन करायची ? सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेले सरकार आता भलत्याच गोष्टींचा बागुलबुवा करून लोकांचे लक्ष विकेंद्रीत करू बघत आहे.
मालेगाव बाँबस्फोटाचा इतका डांगोरा होतो आहे की, जणू काही तेवढा एकच धमाका या देशात घडलेला आहे. हिंदूंची नावे पुढे करून इस्लामी आतंकवादाचे `बॅलन्सिंग’ सुरू आहे. मोठ्या विदेशी शक्‍तींचा यामागे हात आहे. `लेन-देन’चा मामला आहे. राजकीय षडयंत्र आहे.
औरंगजेबापेक्षाही दोन पावले पुढे जाऊन काँग्रेसी सरकारने साधू-संत, साध्वी यांचा छळ मांडला आहे; कारण औरंगजेबाच्या कारकीर्दीत साध्वीला छळल्याचा लिखित उल्लेख नाही.
ही स्थिती बघून उद्वेगाने म्हणावेसे वाटते, `इथे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !’

हिंदु जागरणाला मराठी भाषिकांकडून सुरुवात होत आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे सुरू होत असल्याचे दर्शक असल्याने महाराष्ट्राला `अभिनव भारत’ संघटनेचा अभिमान वाटतो ! – संपादक