दहशतवादविरोधी पथकाकडून तपासकामात पक्षपातीपणा ! – विहिंप

मालेगाव बाँबस्फोट प्रकरण

पुणे, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – दहशतवादविरोधी पथकाकडून मालेगाव बाँबस्फोटाच्या तपासकामात पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोप विश्‍व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशमंत्री श्री. बाबूजी नाटेकर यांनी आज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

(हिंदुत्ववादी संघटनांनो, पत्रकार परिषदा घेण्याबरोबरच सरकारला दखल घ्यावी लागेल, अशी कृती करा ! – संपादक) या वेळी विहिंपचे प्रांत संघटनमंत्री श्री. भार्गव सरपोतदार व श्री. हेमंत धर्मावत उपस्थित होते. मालेगाव बाँबस्फोटाच्या तपासकामाची दिशा ही आगामी निवडणुका डोळयांसमोर ठेवून तयार केली गेली आहे. त्याद्वारे मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदू व हिंदुत्ववादी संघटना यांना बदनाम करण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे, असा आरोप श्री. नाटेकर यांनी या वेळी केला. सरकारच्या या षड्यंत्राच्या विरोधात विश्‍व हिंदु परिषदेने देशव्यापी आंदोलन पुकारले असून जनतेने आता स्वत:चे रक्षण स्वत:च करावे, असे आवाहन त्याद्वारे केले जाणार असल्याचे श्री. नाटेकर यांनी सांगितले. (हिंदूंनी स्वत:चे रक्षण स्वत:च करण्याचा प्रयत्‍न केला की, त्यांना पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागते, असा आतापर्यंतच्या दंगलींमध्ये सापडलेल्या हिंदूंचा अनुभव आहे. मुसलमान सशस्त्र असतात व ते नि:शस्त्र हिंदूंवर हल्ले करतात. त्यामुळे हिंदू हतबल होतात, असेही अनुभवास आले आहे. अशा परिस्थितीत अडकलेल्या हिंदूंनी स्वत:चे रक्षण स्वत:च कसे करावे, याचे मार्गदर्शनही विहिंप हिंदूंना करणार का ? – संपादक)

आश्रमाची झडती घेणार्‍या सरकारने कधी मदरशांची झडती घेतली आहे का ? श्री. नाटेकर पुढे म्हणाले, “एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा देऊनही सरकार अफझलला केवळ मुस्लिमांच्या मतांसाठी फाशी देत नाही; मात्र दुसरीकडे निर्दोष साध्वी, हिंदू व सेनाधिकारी यांना नाहक बदनाम करते. देशात आजपर्यंत झालेल्या बाँबस्फोटांपैकी एकाही बाँबस्फोटाची मालेगाव बॉबस्फोटाएवढी सखोल चौकशी झाली नाही, तसेच आरोपींना कडक शासनही झाले नाही. तपासकामाच्या नावाखाली हिंदूंच्या आश्रमांची झडती घेणार्‍या सरकारने कधी मदरशांमध्ये जाऊन चौकशी केली आहे का ? साध्वी प्रज्ञासिंग यांना अटक करणारे सरकार प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल असंख्य `अटक वॉरंट’ जारी झालेल्या इमाम बुखारी यांना अटक करते का ?” कुठल्याही प्रकरणाचा संबंध कुणाशीही लावून काँग्रेस सरकार विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल व सनातन संस्था यांच्यासारख्या राष्ट्रभक्‍त संघटनांना नाहक बदनाम करत आहे, असे विहिंपचे श्री. भार्गव सरपोतदार यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

…तर तेलगीची नार्को चाचणी का दडपली ?
नार्को चाचणीबाबत बोलतांना ते म्हणाले, “नार्को चाचणीतून सत्य बाहेर येते, असे सरकारला वाटते. त्यामुळेच साध्वी प्रज्ञासिंग यांची नार्को चाचणी करण्यात आली. नार्को चाचणीतून जर सत्य बाहेर येत असेल, तर तेलगीने ज्या नार्को चाचणीत शरद पवार व छगन भुजबळ यांची नावे घेतली, ती नार्को चाचणी सरकारने का दडपली ?”

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!