हिंदुत्ववादी संघटनांवरील संभाव्य बंदीच्या निषेधार्थ ३ हजार हिंदूंनी दिलेल्या घोषणांनी पनवेल दुमदुमले !

काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी पद, पक्ष व संप्रदाय विसरून संघटित झालेल्या हिंदूंचे अभिनंदन !

धर्मद्रोही काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंचा संघटित अविष्कार !

पनवेल, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरात हिंदुत्ववादी संघटनांवर निधर्मी काँग्रेस सरकार लादू पहात असलेल्या संभाव्य बंदीचा तीव्र निषेध आज नामदिंडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षासहित हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय व पक्ष यांनी संघटितपणे नोंदवला. हिंदुत्ववादी पक्ष व संघटना यांच्या प्रमुख नेत्यांनी येत्या निवडणुकीत निधर्मी काँग्रेसला पायउतार करण्याचा निश्चय करून हिंदुत्वाची ज्योत प्रज्वलीत करण्याचे आव्हान या वेळी तीन हजार हिंदूंना केले !

हिंदूंवर अनन्वित अत्याचार होऊ देणार्‍या व हिंदुत्वाच्या मुळावर उठलेल्या अन्याय्य काँग्रेस सरकारच्या विरोधात धर्माभिमान्यांनी दिलेल्या घोषणांमुळे मोठी जनजागृती होऊन पनवेलमधील हजारो हिंदूंच्या मनामध्ये काँग्रेस सरकारचा निषेध ठामपणे नोंदवला गेला. आज त्रिपुरीपौर्णिमेच्या मुहूर्तावर त्रिपुरासूररूपी देशद्रोही काँग्रेसला हिंदु संघटनाच्या रूपाने जबरदस्त इशारा देणारी आजची सकाळ पनवेलमधील कट्टर हिंदुत्ववाद्यांसाठी संस्मरणीय करेल, यात शंकाच नाही ! या नामदिंडीच्या प्रारंभी प.पू. पांडे महाराज यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. ह.भ.प. गणेश महाराज पाटील यांनी धर्मध्वजाला हार अर्पण केला. तर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार श्री. विवेकानंद पाटील यांनी श्रीफळ वाढवल्यावर नामदिंडीला प्रारंभ झाला. पनवेल बसस्थानकापासून सुरू झालेली नामदिंडी टपालनाक्यामार्गे पनवेल शहरातून शिवाजी चौकात आल्यावर निषेधसभेत रूपांतरीत झाली आणि हिंदुत्ववादी पक्ष, संघटना व संप्रदाय यांच्या प्रमुख नेत्यांनी हिंदु जनसमुदायाला संबोधित केले. तहसीलदारांना काँग्रेस सरकारच्या निषेधाचे निवेदन दिल्यानंतर संपूर्ण `वन्देमातरम्’ने नामदिंडीची सांगता झाली.

…. असे जागवले मान्यवरांनी हिंदूंमध्ये हिंदुत्व
संतांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणार्‍या काँग्रेसला त्यांचा शाप लागेल ! – अभय वर्तक, सनातन संस्था
सनातन संस्था ही आध्यात्मिक आहे. संस्था बालसंस्कारवर्ग, अध्यात्मप्रसार, तसेच सामाजिक कार्य करते. तसेच बजरंग दलही गोमातेचे रक्षण करण्याचे कार्य करते. असे असतांनाही सरकार सनातन संस्था, बजरंग दल यांच्यावर बंदी आणू पहात आहे. सनातन संस्था दहशतवादी, बजरंग दल दहशतवादी, रा.स्व. संघ दहशतवादी, शिवसेना दहशतवादी, भाजप दहशतवादी आणि आबा एकटे `राष्ट्रवादी’ काय ? या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात पोलीस व लष्कर यांमधील प्रामाणिक लोकांमध्ये असंतोष आहे. काँग्रेसच्या या भ्रष्टाचारी सरकारचा धोंडा आपल्या डोक्यावर आहे, त्यावर काँग्रेस व ख्रिस्तीयांचे धोंडे आहेत. त्याखाली हिंदु दबून जात आहेत. `अग्रत: चतुरोवेद:…’ हे परशुरामांचे वचन आठवा. आज संतांना व आमच्या मायभगिनींना उन्हातान्हातून रस्त्यावर उतरायला लावणार्‍या काँग्रेस सरकारला त्यांचा शाप लागल्याशिवाय रहाणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

राज्यकर्त्यांना जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागतील ! – ह.भ.प. सुभाष महाराज घाडगे, इंचगिरी संप्रदाय
काँग्रेस सरकारने हिंदूंची चेष्टा चालवली आहे. अशा राज्यकर्त्यांना जिवंतपणीच मरणयातना भोगाव्या लागतील. हे सरकार `डाऊ’ कंपनी देशात आणत आहे. या कंपनीचे विषारी पाणी नदीत गेल्यामुळे इंद्रायणी नदी नष्ट होणार आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात आपल्याला यापुढे अशा प्रकारची आंदोलने खूप मोठ्या प्रमाणात करावी लागतील. हे सरकार जी उद्दिष्टे ठेवून आमच्या संतांना अटक करत आहे, ती त्यांची उद्दिष्टे यशस्वी होणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

सनातन सूर्याला हात घालाल, तर जळून जाल ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती
या भर उन्हात एकाच उद्देशाने हिंदुत्वाचा जयघोष करण्यासाठी आपण सारे जमलो आहोत. हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी येण्याच्या केवळ घोषणेनंतर हिंदु एकत्र आले तर काय होऊ शकते, हा संदेश सरकारला गेला आहे; प्रत्यक्षात बंदी आणून दाखवा व मग हिंदूंची काय ताकद आहे ती बघा. जे `वंदेमातरम्’ म्हणतात, ते दहशतवादी, जे भारतमातेचा जयघोष करतात, ते दहशतवादी मग जे `वंदेमातरम्’ म्हणण्याचे नाकारतात, ते कोण ? आज तंबाखू चोळणारे मंत्री उद्या हिंदूंवर अन्याय करतील, तर खरोखरच ते हात चोळत बसतील. हिंदूंवर अन्याय होतो, तेव्हा मानवधिकारवाले, टिस्टा सेटलवाड आणि महेश भट कोठे जातात ? आज देशाची सेवा करणार्‍या लष्करी अधिकार्‍यांवर आरोप होतात. साहेबराव पाटलांसारख्या पोलीस अधिकार्‍यांची बदली केली जाते. कर्नल श्रीकांत पुरोहितांना दहशतवादी ठरवले जाते. या सर्व घटनांमुळे हिंदूंमध्ये असंतोष पसरल्याशिवाय रहाणार नाही; परंतु काँग्रेसवाल्यांनो, हे लक्षात ठेवा सनातन धर्म हा सूर्याप्रमाणे आहे. त्याला हात घालायला जाल, तर संपून जाल.

काँग्रेसला गाडायची शपथ घ्या ! – भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब पाटील
उद्या स्वातंत्र्यसैनिकांनाही दहशतवादी ठरवण्यास हे सरकार कमी करणार नाही. हिंदूंनी त्यांच्यावर अन्याय होत असतांना त्यांच्या हक्कासाठी भांडायच नाही का ? मग ८५ कोटी हिंदू काय कामाचे ? या सरकारने मंदिरांचे सरकारीकरण केले, ते अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणू पहात आहे. रामसेतू, राम अस्तित्वात नाही म्हणातात, मग काँग्रेसच्या गांधीनी सांगितलेले रामराज्य कोणाचे होते ? बंडा तात्यांच्या तुळशीच्या माळेला यांनी हात घातला. साध्वींच्या यांनी तीन वेळा चाचण्या केल्या. हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी आणून हे जनतेची दिशाभूल करत आहेत. काँग्रेसला गाडायची आज शपथ घ्या.

हिंदूंनो, देवतांच्या हातातही शस्त्रे असतात, हे विसरू नका – शिवसेनेचे आमदार श्री. देवेंद्र साटम
काँग्रेस सरकारला गाडण्यासाठी हिंदूंची वज्रमूठ निर्माण करा. हिंदूंच्या अस्मितेला हे सराकर वारंवार हात घालत आहे, त्याला गाडले पाहिजे. या देशात दहशतवादी व गुन्हेगार हे मुसलमान आहेत. साध्वींना समस्त हिंदूंकडून पाठिंबा मिळेल, हे लक्षात ठेवा. हे सरकार सच्चर आयोग आणून मुसलमानांचे तुष्टीकरण करत आहे. अफझलला सोडून समस्त जनमानसात संस्कार निर्माण करण्यासाठी झटणार्‍या सनातनवर बंदी आणत आहे. रामदेव बाबांच्या औषधात भेसळ आहे म्हणते, आसारामबापूंच्या आश्रमांवर हल्ला करते, धर्मगुरूंना अटक करण्यास कमी करत नाही. हिंदु देवतांच्या हातात शस्त्र आहेत, हे लक्षात घ्या. झोपी गेलेल्या हिंदूंनी आता ही शस्त्रे घेऊन जागृत होण्याची वेळ
आली आहे.


वारकरी संप्रदायाचे रायगड जिल्हाध्यक्ष ह.भ.प. धनाजी महाराज पाटील या वेळी म्हणाले, “या देशावर सध्या तृतीयपंथीयांचे राज्य आहे. ते राज्य घालवण्यासाठी आपल्याला हिंदुसंघटनाचे असेच कार्य पुढेही करावे लागणार आहे.”
प.पू. आसाराम बापू संप्रदायाचे श्री. प्रकाश माणिक म्हणाले, “हिंदूंवर घाला घालण्याचे काम अनेक वर्षे चालू आहे. जेव्हा धर्मावर संकट येते, तेव्हा भगवंत अवतार घेतो. त्याप्रमाणे आज तुमच्या-आमच्या माध्यमातून धर्मासाठी श्रीकृष्णाने अवतार घेतला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा हिंदु धर्मावर आघात होतील, तेव्हा तेव्हा सर्वांनी हिंदु म्हणून असेच एकत्रित व्हावे.”
श्री संप्रदायाचे श्री. विलास पांगम म्हणाले, “हिंदु धर्म धोक्यात असल्याने नरेंद्र महाराज नेहमीच हिंदूंना एकत्रित येण्याचे आवाहन करतात. हिंदूंच्या रक्षणासाठी आता संप्रदाय, संघटना, पक्ष बाजूला ठेवून एकत्रित या व हिंदूंची मतपेटी तयार करा”, असे आवाहन केले.
भाजपचे नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष श्री. भगवान ढाकणे म्हणाले, “या निधर्मी सरकारने सनातनच्या ठाण्यातील फेरीला परवानगी दिली नाही, हे लक्षात घ्या.”
शिवसेनेचे श्री. माधव भिडे म्हणाले, “हिंदु जागृत नव्हे, तर प्रज्वलित झाला पाहिजे. हिंदु संघटनांना बाँब एवढा भयानक आहे की, त्यासाठी हिंदूंना बाँबस्फोट करण्याची आवश्यकता नाही. पण तो हिंदु आज घराबाहेर पडला पाहिजे. आज जमेलेले पत्रकार `पनवेलमध्ये हिंदु पिसाळलेत’, असे सरकारपर्यंत पोहोचवतील.”
भाजपचे तालुका अध्यक्ष श्री. महेंद्र घरत म्हणाले, “काँग्रेसने महागाई व भ्रष्टाचार वाढवला. काँग्रेसचे ९९ अपराध भरले आहेत. शंभरावा अपराध ते हिंदुत्वावर आघात करून करत आहेत.”…ही ठरली पनवेल येथील नामदिंडीची ठळक वैशिष्ट्ये
* केवळ हिंदुत्ववादीच नव्हे, तर पनवेलमधील शेकापसहित धर्माभिमानी हिंदूंचा फेरीत सहभाग
* प.पू. पांडे महाराजांची संपूर्ण नामदिंडीतील वंदनीय उपस्थिती
* रणरणत्या उन्हातही सनातनचे बालसाधक व हजारो हिंदु स्त्री-पुरुषांचा
ओसांडलेला सळसळता उत्साह
* निषेध सभेतील मान्यवरांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी धर्माभिमान्यांमध्ये जागवलेले हिंदुसंघटनाचे बळ

पनवेलचे तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी स्वत: नामदिंडीनंतरच्या निषेधसभेत आले !
हिंदुत्ववादी संघटनांवर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ नामदिंडीत सहभागी हिंदुत्ववादी संघटनांकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन स्वीकारण्यासाठी पनवेलचे तहसीलदार श्री. दत्तात्रेय केदारी स्वत: जातीने निषेधसभेच्या स्थळी येथील शिवाजी चौकात आले व समस्त धर्माभिमानी हिंदूंच्या साक्षीने हिंदुत्ववादी पक्ष, संघटना व संप्रदाय यांच्या प्रमुखांनी हे निवेदन त्यांना दिले.

रायगड जिल्हा शिवसेनेच्या पटलावर गावोगावी हिंदूंच्या दिंड्या काढण्याचा उपक्रम !
रायगड जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. बबनराव पाटील यांनी या वेळी जाहीर केले की, रायगड जिल्ह्याच्या शिवसेनेच्या उपक्रमाच्या पटलावर आजपासून िजिल्ह्यातील गावागावांत अशा प्रकारे हिंदूंचे संघटन करून दिंड्या काढणे हा उपक्रम तिसर्‍या क्रमांवर घेत आहोत.


नामदिंडीला उपस्थित मान्यवर
श्री. काशीनाथ पाटील, सभापती, शेकाप
श्री. नंदा ओझे,जिल्हा संघचालक, रा.स्व.संघ
श्री. शरद ओगले, तालुका कार्यवाह, रा.स्व.संघ
श्री. तुषार जाधव, तालुका युवा अध्यक्ष, भाजप
श्री. महेंद्र पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष, भाजप
सौ. ऊषाजी शर्मा, गायत्री परिवार
श्री. भगवान बडगुजर, ज्येष्ठ कार्यकर्ते, शेकाप
श्री. विलास पांगम, पनवेल तालुका अध्यक्ष, श्री संप्रदाय
श्री. बाबा गरुड, श्री संप्रदाय
श्री. सुनीत ठक्कर, शिवसेना शहरप्रमुख
ह.भ.प. धाऊशेठ पाटील
श्री. संजयगुरुजी, भाजप
श्री. प्रदीप जाधव, नगरसेवक, भाजप
श्री. मनोरे, नगरसेवक, भाजप
श्री. वेणुगोपाल, श्री अय्यपा सेवा समिती
श्री. सुभाष कडव, तालुका संयोजक, बजरंग दल
श्री. मंगल पाटील, जिल्हा संयोजक, बजरंग दल
श्री. संतोष डांगरे, प्रखंडमंत्री, विश्‍व हिंदु परिषद
श्री. दीपक बांदेकर, ओंकार भक्‍ती प्रसारक समिती
सौ. सीमा मानकामे, उपजिल्हा प्रमुख, महिला आघाडी, शिवसेना
श्री. शिरीष बुटाला, माजी जिल्हाप्रमुख शिवसेनामान्यवरांच्या प्रतिक्रिया
श्री. नंदा ओझे, जिल्हा संघटक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : काँग्रेस सरकार हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्‍न करत आहे. त्याचा हिंदु समाजावर परिणाम होत आहे. हिंदु समाज जागृत व्हावा व त्याच्या विरोधात होत असलेल्या षडयंत्रास तोंड देण्यास सज्ज व्हावे.
ह.भ.प. गणेश महाराज : हिंदूंना संघटित करण्याचे कार्य करणार्‍यांवर काँग्रेस सरकार बंदी घालू पहात आहे. हे हिंदु राष्ट्र आहे. त्यामुळे अशा सरकारला विरोध करण्यासाठी नामस्मरणाची साथ हवी. अशा प्रकारे नामदिंड्या सर्वत्र झाल्यास सरकारला जाग येईल.
श्री. सुमीत ठक्कर, शहरप्रमुख, शिवसेना : काँग्रेस शासन हिंदु संघटनांवर बंदी घालण्याचा प्रयत्‍न करत आहे. अशा शासनाचा मी निषेध करतो.
श्री. तुषार जाधव, तालुकाध्यक्ष, युवा मोर्चा, भाजप : आज काँग्रेस हिंदूंवर अन्याय करत आहे. जे कार्य करायचे ते एक वर्षात करून घ्यावे. काँग्रेसने लक्षात घ्यावे की, येत्या निवडणुकीत हिंदूच मतांद्वारे काँग्रेसजनांना नष्ट करतील.
श्री. शिरीष बुटाला, माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना : काँग्रेसरूपी त्रिपुरारी राक्षस गाडण्यासाठी ही दिंडी काढण्यात आली. ही नामदिंडी हिंदूंना प्रेरणा देणारी ठरेल.
श्री. श्रीनंद पटवर्धन, नगरसेवक, भाजप : मुंबई येथे रेल्वेमध्ये झालेल्या बाँबस्फोटात सापडलेल्या दहशतवाद्यांच्या चाचण्या घेतल्या नाहीत. निवडणुका जवळ आल्याने मालेगाव स्फोटप्रकरणी हिंदुत्ववाद्यांना अटक करण्यात येत आहे, हे काँग्रेस सरकारच्या अंगाशी येणार आहे.
श्री. रमेश गुडेकर, नगरसेवक व माजी शहरप्रमुख, शिवसेना : या फेरीचे अतिशय सुंदर आयोजन झाले आहे. सर्व संस्था, संघटना व पक्ष एकत्र आले, हे हिंदू व देश यादृष्टीने महत्त्वाचे आहे. देशात नको ते लोक वाढत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस शासन कठोर भूमिका घेत नाही.
श्री. विनोद साबळे, जिल्हाध्यक्ष, मराठा आरक्षण समिती : काँग्रेस हिंदु संघटनांवर अन्याय करत आहे. याच्या विरोधात समाज पेटून उठला नाही, तर आपण अल्पसंख्यांक होऊ.
श्री. काशीनाथ पाटील, पंचायत समितीचे सभापती व शेतकरी कामगार पक्षाचे नेते : `डाऊ’ला प्रोत्साहन देऊन काँग्रेस सरकारने ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अटक केली. अशा प्रकारे अन्याय होणार्‍यांच्या मागे शेतकरी कामगार पक्ष उभा आहे.
श्री. काका सादरानी, समाजसेवक व शेकापचे स्वीकृत नगरसेवक : जनजागृतीचे हे कार्य उत्तम आहे. हे असेच आपल्याला पुढे टिकवायला हवे.
श्री. नितीन पाटील, शहराध्यक्ष, शेकाप : काँग्रेस इंग्रजांच्या पद्धतीने राज्य करत आहे. त्यामुळे हिंदूंनी असेच एकत्र राहिले पाहिजे.

क्षणचित्रे
* धर्मध्वजाच्या पूजनापूर्वी गुरुजींनी संस्कृतमधील `ध्वजसंकल्प’ वाचून दाखवला.
* ध्वजपूजनानंतर सर्व पक्ष व संप्रदाय यांच्या मान्यवरांनी धर्मध्वजाला पुष्प अर्पण केली. * दिंडीच्या मार्गावरील बाजारपेठ, दुकाने, इमारती व रस्ते येथील सर्वच हिंदू उत्सुकतेने नामदिंडीतील काँग्रेसचा निषेध करणारे फलक वाचत होते व घोषणांना उत्स्फूर्त प्रतिसादही देत होते. * घरातून नामदिंडी पहाणार्‍या एका पाच वर्षांच्या मुलाने त्याच्या आजीजवळ दिंडीत सहभागी होण्यासाठी हट्ट धरला. त्यामुळे शेवटी त्याच्यासह त्याची आजी या दिंडीत सहभागी झाली. * सात महिन्याच्या बाळाला घेऊन डोंबिवली येथून आलेली एक धर्माभिमानी हिंदु माता या नामदिंडीत सहभागी झाली होती. विशेष म्हणजे खूप ऊन असूनही तीन तासात तिचे बाळ एकदाही रडले नाही. * वरळी येथून आलेल्या ८५ वर्षांच्या आजींनी `गाडीत बसणार नाही’, असे निर्धाराने सांगितले व संपूर्ण नामदिंडी त्या चालत होत्या. * बाजारपेठेतून दिंडी जात असतांना आपल्या आईबरोबर जाणार्‍या एका लहान मुलीला नामदिंडीविषयी एवढी उत्सुकता निर्माण झाली की तिने शेवटी एका पोलिसालाच “हे काय आहे ?” असे विचारले. * नामदिंडी ज्या मार्गावरून जात होती, त्या मार्गाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात येत होते. * नामदिंडी मार्गस्थ होत असतांना मध्ये मध्ये शंखध्वनी करण्यात येत होता. * अनेक ठिकाणी नामदिंडीच्या स्वागताचे फलक लावले होते. * नामदिंडीतील हिंदूंनी हातात भगवे झेंडे धरल्याने संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते. * मान्यवरांची भाषणे सुरू असतांना समुदायातून उत्स्फूर्तपणे काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.* नामदिंडीत वाटण्यात येणारी पत्रके रस्त्यावरील काही जिज्ञासू आवर्जून मागून घेऊन वाचत होते. * नामदिंडीत राबवण्यात आलेल्या सरकारच्या निषेधातील स्वाक्षरी मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला. * ८ वृत्तवाहिन्या व विविध वृत्तपत्रे यांचे प्रतिनिधी नामदिंडीचे वृत्त संकलित करण्याकरता आले होते. * फेरीसाठी शेतकरी कामगार पक्षाची रग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. * या नामदिंडीला पोलिसांचे उत्तम सहकार्य मिळाले. * या वेळी पोलिसांनी सनातन आहे, तेथे शांततेनेचे कार्यक्रम होणार, अशी प्रतिक्रिया व्यक्‍त केली.

निगडीत वृत्त : असे धर्माभिमानी हिंदू सर्वत्र हव

Leave a Reply