काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी पद, पक्ष व संप्रदाय विसरून संघटित झालेल्या हिंदूंचे अभिनंदन !
धर्मद्रोही काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंचा संघटित अविष्कार !
| पनवेल, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरात हिंदुत्ववादी संघटनांवर निधर्मी काँग्रेस सरकार लादू पहात असलेल्या संभाव्य बंदीचा तीव्र निषेध आज नामदिंडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षासहित हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय व पक्ष यांनी संघटितपणे नोंदवला. हिंदुत्ववादी पक्ष व संघटना यांच्या प्रमुख नेत्यांनी येत्या निवडणुकीत निधर्मी काँग्रेसला पायउतार करण्याचा निश्चय करून हिंदुत्वाची ज्योत प्रज्वलीत करण्याचे आव्हान या वेळी तीन हजार हिंदूंना केले !
हिंदूंवर अनन्वित अत्याचार होऊ देणार्या व हिंदुत्वाच्या मुळावर उठलेल्या अन्याय्य काँग्रेस सरकारच्या विरोधात धर्माभिमान्यांनी दिलेल्या घोषणांमुळे मोठी जनजागृती होऊन पनवेलमधील हजारो हिंदूंच्या मनामध्ये काँग्रेस सरकारचा निषेध ठामपणे नोंदवला गेला. आज त्रिपुरीपौर्णिमेच्या मुहूर्तावर त्रिपुरासूररूपी देशद्रोही काँग्रेसला हिंदु संघटनाच्या रूपाने जबरदस्त इशारा देणारी आजची सकाळ पनवेलमधील कट्टर हिंदुत्ववाद्यांसाठी संस्मरणीय करेल, यात शंकाच नाही ! या नामदिंडीच्या प्रारंभी प.पू. पांडे महाराज यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. ह.भ.प. गणेश महाराज पाटील यांनी धर्मध्वजाला हार अर्पण केला. तर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार श्री. विवेकानंद पाटील यांनी श्रीफळ वाढवल्यावर नामदिंडीला प्रारंभ झाला. पनवेल बसस्थानकापासून सुरू झालेली नामदिंडी टपालनाक्यामार्गे पनवेल शहरातून शिवाजी चौकात आल्यावर निषेधसभेत रूपांतरीत झाली आणि हिंदुत्ववादी पक्ष, संघटना व संप्रदाय यांच्या प्रमुख नेत्यांनी हिंदु जनसमुदायाला संबोधित केले. तहसीलदारांना काँग्रेस सरकारच्या निषेधाचे निवेदन दिल्यानंतर संपूर्ण `वन्देमातरम्’ने नामदिंडीची सांगता झाली. …. असे जागवले मान्यवरांनी हिंदूंमध्ये हिंदुत्व राज्यकर्त्यांना जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागतील ! – ह.भ.प. सुभाष महाराज घाडगे, इंचगिरी संप्रदाय सनातन सूर्याला हात घालाल, तर जळून जाल ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती काँग्रेसला गाडायची शपथ घ्या ! – भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब पाटील हिंदूंनो, देवतांच्या हातातही शस्त्रे असतात, हे विसरू नका – शिवसेनेचे आमदार श्री. देवेंद्र साटम वारकरी संप्रदायाचे रायगड जिल्हाध्यक्ष ह.भ.प. धनाजी महाराज पाटील या वेळी म्हणाले, “या देशावर सध्या तृतीयपंथीयांचे राज्य आहे. ते राज्य घालवण्यासाठी आपल्याला हिंदुसंघटनाचे असेच कार्य पुढेही करावे लागणार आहे.” प.पू. आसाराम बापू संप्रदायाचे श्री. प्रकाश माणिक म्हणाले, “हिंदूंवर घाला घालण्याचे काम अनेक वर्षे चालू आहे. जेव्हा धर्मावर संकट येते, तेव्हा भगवंत अवतार घेतो. त्याप्रमाणे आज तुमच्या-आमच्या माध्यमातून धर्मासाठी श्रीकृष्णाने अवतार घेतला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा हिंदु धर्मावर आघात होतील, तेव्हा तेव्हा सर्वांनी हिंदु म्हणून असेच एकत्रित व्हावे.” श्री संप्रदायाचे श्री. विलास पांगम म्हणाले, “हिंदु धर्म धोक्यात असल्याने नरेंद्र महाराज नेहमीच हिंदूंना एकत्रित येण्याचे आवाहन करतात. हिंदूंच्या रक्षणासाठी आता संप्रदाय, संघटना, पक्ष बाजूला ठेवून एकत्रित या व हिंदूंची मतपेटी तयार करा”, असे आवाहन केले. भाजपचे नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष श्री. भगवान ढाकणे म्हणाले, “या निधर्मी सरकारने सनातनच्या ठाण्यातील फेरीला परवानगी दिली नाही, हे लक्षात घ्या.” शिवसेनेचे श्री. माधव भिडे म्हणाले, “हिंदु जागृत नव्हे, तर प्रज्वलित झाला पाहिजे. हिंदु संघटनांना बाँब एवढा भयानक आहे की, त्यासाठी हिंदूंना बाँबस्फोट करण्याची आवश्यकता नाही. पण तो हिंदु आज घराबाहेर पडला पाहिजे. आज जमेलेले पत्रकार `पनवेलमध्ये हिंदु पिसाळलेत’, असे सरकारपर्यंत पोहोचवतील.” भाजपचे तालुका अध्यक्ष श्री. महेंद्र घरत म्हणाले, “काँग्रेसने महागाई व भ्रष्टाचार वाढवला. काँग्रेसचे ९९ अपराध भरले आहेत. शंभरावा अपराध ते हिंदुत्वावर आघात करून करत आहेत.”…ही ठरली पनवेल येथील नामदिंडीची ठळक वैशिष्ट्ये * केवळ हिंदुत्ववादीच नव्हे, तर पनवेलमधील शेकापसहित धर्माभिमानी हिंदूंचा फेरीत सहभाग * प.पू. पांडे महाराजांची संपूर्ण नामदिंडीतील वंदनीय उपस्थिती * रणरणत्या उन्हातही सनातनचे बालसाधक व हजारो हिंदु स्त्री-पुरुषांचा ओसांडलेला सळसळता उत्साह * निषेध सभेतील मान्यवरांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी धर्माभिमान्यांमध्ये जागवलेले हिंदुसंघटनाचे बळ पनवेलचे तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी स्वत: नामदिंडीनंतरच्या निषेधसभेत आले ! रायगड जिल्हा शिवसेनेच्या पटलावर गावोगावी हिंदूंच्या दिंड्या काढण्याचा उपक्रम ! नामदिंडीला उपस्थित मान्यवर श्री. काशीनाथ पाटील, सभापती, शेकाप श्री. नंदा ओझे,जिल्हा संघचालक, रा.स्व.संघ श्री. शरद ओगले, तालुका कार्यवाह, रा.स्व.संघ श्री. तुषार जाधव, तालुका युवा अध्यक्ष, भाजप श्री. महेंद्र पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष, भाजप सौ. ऊषाजी शर्मा, गायत्री परिवार श्री. भगवान बडगुजर, ज्येष्ठ कार्यकर्ते, शेकाप श्री. विलास पांगम, पनवेल तालुका अध्यक्ष, श्री संप्रदाय श्री. बाबा गरुड, श्री संप्रदाय श्री. सुनीत ठक्कर, शिवसेना शहरप्रमुख ह.भ.प. धाऊशेठ पाटील श्री. संजयगुरुजी, भाजप श्री. प्रदीप जाधव, नगरसेवक, भाजप श्री. मनोरे, नगरसेवक, भाजप श्री. वेणुगोपाल, श्री अय्यपा सेवा समिती श्री. सुभाष कडव, तालुका संयोजक, बजरंग दल श्री. मंगल पाटील, जिल्हा संयोजक, बजरंग दल श्री. संतोष डांगरे, प्रखंडमंत्री, विश्व हिंदु परिषद श्री. दीपक बांदेकर, ओंकार भक्ती प्रसारक समिती सौ. सीमा मानकामे, उपजिल्हा प्रमुख, महिला आघाडी, शिवसेना श्री. शिरीष बुटाला, माजी जिल्हाप्रमुख शिवसेनामान्यवरांच्या प्रतिक्रिया श्री. नंदा ओझे, जिल्हा संघटक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : काँग्रेस सरकार हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. त्याचा हिंदु समाजावर परिणाम होत आहे. हिंदु समाज जागृत व्हावा व त्याच्या विरोधात होत असलेल्या षडयंत्रास तोंड देण्यास सज्ज व्हावे. ह.भ.प. गणेश महाराज : हिंदूंना संघटित करण्याचे कार्य करणार्यांवर काँग्रेस सरकार बंदी घालू पहात आहे. हे हिंदु राष्ट्र आहे. त्यामुळे अशा सरकारला विरोध करण्यासाठी नामस्मरणाची साथ हवी. अशा प्रकारे नामदिंड्या सर्वत्र झाल्यास सरकारला जाग येईल. श्री. सुमीत ठक्कर, शहरप्रमुख, शिवसेना : काँग्रेस शासन हिंदु संघटनांवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे. अशा शासनाचा मी निषेध करतो. श्री. तुषार जाधव, तालुकाध्यक्ष, युवा मोर्चा, भाजप : आज काँग्रेस हिंदूंवर अन्याय करत आहे. जे कार्य करायचे ते एक वर्षात करून घ्यावे. काँग्रेसने लक्षात घ्यावे की, येत्या निवडणुकीत हिंदूच मतांद्वारे काँग्रेसजनांना नष्ट करतील. श्री. शिरीष बुटाला, माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना : काँग्रेसरूपी त्रिपुरारी राक्षस गाडण्यासाठी ही दिंडी काढण्यात आली. ही नामदिंडी हिंदूंना प्रेरणा देणारी ठरेल. श्री. श्रीनंद पटवर्धन, नगरसेवक, भाजप : मुंबई येथे रेल्वेमध्ये झालेल्या बाँबस्फोटात सापडलेल्या दहशतवाद्यांच्या चाचण्या घेतल्या नाहीत. निवडणुका जवळ आल्याने मालेगाव स्फोटप्रकरणी हिंदुत्ववाद्यांना अटक करण्यात येत आहे, हे काँग्रेस सरकारच्या अंगाशी येणार आहे. श्री. रमेश गुडेकर, नगरसेवक व माजी शहरप्रमुख, शिवसेना : या फेरीचे अतिशय सुंदर आयोजन झाले आहे. सर्व संस्था, संघटना व पक्ष एकत्र आले, हे हिंदू व देश यादृष्टीने महत्त्वाचे आहे. देशात नको ते लोक वाढत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस शासन कठोर भूमिका घेत नाही. श्री. विनोद साबळे, जिल्हाध्यक्ष, मराठा आरक्षण समिती : काँग्रेस हिंदु संघटनांवर अन्याय करत आहे. याच्या विरोधात समाज पेटून उठला नाही, तर आपण अल्पसंख्यांक होऊ. श्री. काशीनाथ पाटील, पंचायत समितीचे सभापती व शेतकरी कामगार पक्षाचे नेते : `डाऊ’ला प्रोत्साहन देऊन काँग्रेस सरकारने ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अटक केली. अशा प्रकारे अन्याय होणार्यांच्या मागे शेतकरी कामगार पक्ष उभा आहे. श्री. काका सादरानी, समाजसेवक व शेकापचे स्वीकृत नगरसेवक : जनजागृतीचे हे कार्य उत्तम आहे. हे असेच आपल्याला पुढे टिकवायला हवे. श्री. नितीन पाटील, शहराध्यक्ष, शेकाप : काँग्रेस इंग्रजांच्या पद्धतीने राज्य करत आहे. त्यामुळे हिंदूंनी असेच एकत्र राहिले पाहिजे. क्षणचित्रे |
निगडीत वृत्त : असे धर्माभिमानी हिंदू सर्वत्र हवे






