शारदा पिठाधीश स्वामी अमृतानंद यांना अटक

हिंदूंनो, संत-महंतांची लागोपाठ होणारी अटक पहात बसण्याइतके पौरुषत्वहीन बनू नका !

मालेगाव बाँबस्फोट प्रकरण


संतांना अटक होत असतांना रा. स्व. संघ गप्प का ?

लखनौ, १२ नोव्हेंबर (वृत्तसंस्था) – मालेगावमधील बाँबस्फोटाच्या प्रकरणात जम्मूतील शारदा सर्वज्ञपिठाचे पिठाधीश स्वामी अमृतानंद (पूर्वाश्रमीचे श्री. दयानंद पांडे) यांना आज अटक करण्यात आली.

(अहमदाबादमध्ये अटक करण्यात आलेला दहशतवादी अबु बशीर याला जामा मशिदीचे इमाम बुखारी उघड पाठिंबा देतात व त्याला न सोडल्यास मोठा संहार करणार, असे उघड आव्हान देतात; मात्र त्यांना अटक करण्याची हिंमत काँग्रेस सरकार दाखवत नाही; मात्र हेच सरकार हिंदूंच्या धर्मगुरूंना ठोस पुरावे नसतांना अटक करून मर्दुमकी दाखवते ! हिंदूंनो, काँग्रेस सरकारचा हा हिंदुद्वेष ओळखा व येत्या निवडणुकीत काँग्रेसला त्याची जागा दाखवून द्या ! – संपादक) त्यांना कानपूरमधील काकादेव परिसरातून अटक करण्यात आली. स्वामी अमृतानंद यांचे सनदी लेखापाल श्री. व्ही.के. कपूर व त्यांचे पुत्र श्री. पवन कपूर यांनाही जम्मूमध्ये अटक करण्यात आली आहे. मालेगाव बाँबस्फोटाच्या अंतर्गत स्वामी अमृतानंद यांची खून, कट रचणे व भारतीय स्फोटके कायदा यांअंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. अमरनाथला भूमी हस्तांतरित करावी, यासाठी जम्मूमध्ये आंदोलन छेडण्यात आले होते. त्या आंदोलनामध्ये स्वामी अमृतानंद यांचा हात आहे का, याचाही जम्मू-काश्मीरचे पोलीस तपास करणार आहेत. (जम्मूचे आंदोलन संपून २-३ महिने उलटले. असे असतांना स्वामी अमृतानंद यांची त्याच वेळी चौकशी का केली नाही ? काँग्रेस सरकार मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी हिंदु धर्मगुरूंच्या
मागे पोलिसांचा ससेमिरा लावण्याचा प्रयत्‍न करत आहेत, हे यातून दिसून येते ! – संपादक)

प्रसारमाध्यमांकडून स्वामी अमृतानंद यांचा एकेरी उल्लेख !
स्वामी अमृतानंद यांना अटक झाल्यानंतर झी वृत्तवाहिनीने स्वामी अमृतानंद यांचे पूर्वीचे ध्वनीचित्र मुद्रण दाखवण्यास सुरुवात केली. झी वृत्तवाहिनीसह `आज तक’ या वृत्तवाहिन्या त्यांचा एकेरी उल्लेख करत होत्या. (हिंदुद्वेषापोटी सभ्यतेचे सारे संकेत विसरणारी प्रसारमाध्यमे ! – संपादक)

संतांच्या छळवणुकीच्या विरोधात देशभर आंदोलन करणार ! – विहिंप
नागपूर – साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या विरोधात दशतवाद विरोधी पथकाला अद्याप ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे पथकाने येनकेन प्रकारेन प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्याकडून जबरदस्तीने हवे ते उगळून घेण्यासाठी दशतवाद विरोधी पथक त्यांच्या नाहक वारंवार नार्को चाचण्या करत आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या पोलिसांकडून होणार्‍या छळवणुकीच्या विरोधात विश्‍व हिंदु परिषद देशभर मोर्चा, निदर्शने व धरणे आंदोलन करणार आहे, अशी घोषणा आज विहिंपचे राष्ट्रीय संघटनमंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव यांनी नागपूर येथे केली.
देशातील दहशतवादाला केंद्रशासन जबाबदार आहे. केंद्रशासनच दहशतवादाचे समर्थक आहे. मुसलमान समाज दहशतवादी म्हणून बदनाम आहे. त्यांना वाचवण्यासाठी हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचे सरकारचे हे कारस्थान सुरू आहे, असेही प्रा. आबदेव म्हणाले.

धर्मगुरूंना अटक सोडाच धर्माच्या विरोधात थोडे जरी काही घडले, तरी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर येऊन परिणामकारक कृती करणार्‍या मुसलमान व ख्रिस्तीयांच्याकडून हिंदुत्ववादी संघटना कधी शिकणार ? – संपादक

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

Leave a Reply