म्हणे उत्सवांवर ५० टक्के रक्कम खर्च होणे अयोग्य !
मुंबई, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासातर्फे एकूण उत्पन्नाच्या ५० टक्के रक्कम विविध उत्सवांवर व प्रशासकीय बाबींवर खर्च होत असते. हे अयोग्य असून या न्यासाचा जास्तीतजास्त पैसा हा गरिबांना अर्थसाहाय्य देण्यासाठी खर्च करण्यात यावा.
(गरिबांचा उद्धार करण्यासाठी हिंदू कररूपाने घाम गाळून पैसा भरत आहेतच. आणखी हिंदूंच्या मंदिरांचा पैसा सरकारला कशाला हवा ? मंत्री, प्रशासन आदी सर्व सरकारी घटक भ्रष्टाचार करून जनतेचा पैसा खात असल्याने गरिबांचा उद्धार थांबला आहे. त्यामुळे आता सरकारला पैसा हवा असेल, तर त्याने मंदिराबाहेर करवंटी घेऊन स्वत:च्या एका प्रतिनिधीला बसवावे; पण हिंदूंच्या मंदिरांच्या पैशाकडे वाकड्या डोळयाने पाहू नये. मंदिरांचा पैसा हा धर्मकार्यासाठीच खर्च व्हायला हवा ! – संपादक) मंदिरात होणार्या उत्सवांवर अनाठाई खर्च करण्यात येऊ नये, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांनी संबंधितांना सूचना केली. (हिंदूंना जगणे अवघड करून ठेवलेल्या दोन्ही काँग्रेसच्या राज्यात मंदिरांतील उत्सवांमुळे व थोडीफार साधना केल्यामुळे हिंदूंच्या मनाला उभारी येत आहे. त्या उत्सवांवरील खर्चही कमी करण्याची सूचना करणार्या मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे भत्ते, त्यांचे परदेश दौरे यांचा खर्च कमी करण्यासाठी काय केले ? – संपादक) श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जगताप यांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्तांच्या एका शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व चर्चा केली. श्री सिद्धीविनायक मंदिराचे वार्षिक उत्पन्न ३१ कोटी रुपये असून दरदिवशी वैद्यकीय खर्चास अर्थसाहाय्य मिळावे, म्हणून ४० अर्ज दाखल होत असतात. सध्या गरजू रुग्णांना प्रत्येकी २५ हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम वाढवण्यात यावी, अशी मागणी या वेळी न्यासातर्फे करण्यात आली. अनेक संस्थांचे बांधकाम न्यासातर्फे मदत न मिळाल्याने अपुर्या अवस्थेत असल्याची बाबही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात आली, तसेच या मंदिराच्या शेजारी असलेल्या जाखादेवी दवाखान्यास मंदिराची जास्तीची जमीन देण्याबाबत मागणी होत आहे; परंतु यासाठी जुन्या प्रस्तावात बदल करावयाचा असेल, तर पुन्हा मुंबई महापालिकेकडे नव्याने प्रस्ताव सादर होणे आवश्यक असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्री. किशोर गजभिये यांनी स्पष्ट केले. (वरील सर्व कामे ही सरकारने जनतेसाठी करायची आहेत. ती करण्याची जबाबदारी हिंदूंच्या देवस्थानाने का घ्यावी ? देवस्थान हे धार्मिक कृती करण्यासाठी आहे. कुठे देवस्थानांना भरघोस देणग्या देणारे पूर्वीचे हिंदु राजे, तर कुठे देवस्थानाची संपत्ती ओरबाडणारे आजचे काँग्रेसवाले ! – संपादक)
निगडीत वृत्त : याबाबत बलाढ्य हिंदुत्त्ववादी संघटना काय करणार आहेत?


