केंद्रीय कृषीमंत्री श्री. शरद पवार म्हणाले, `मी बरेच संत वाङ्मय वाचले आहे; पण एखाद्या संताने `बाँब तयार करा आणि निरपराध लोकांना मारा’, असे म्हटल्याचे मी वाचलेले नाही.’ खरे आहे. हिंदू संतांनी तसे म्हटलेले नाही; पण संत सांगतात, तसेच सगळे वागतात, असे दिसत नाही. संसदेवर खासदारांची सामूहिक हत्या करण्याच्या उद्देशाने सशस्त्र आक्रमण करणार्या महंमद अफझल याला सर्वोच्च न्यायालयाने फाशी दिली, तरी `सरकारने ती देऊ नये’, असे कोणत्याही संताने म्हटलेले नाही. तरीसुद्धा महंमद अफझल याला फाशी देण्याविषयी पवार तोंडातून एकही शब्द बाहेर पडू देत नाहीत !
काँग्रेस नेत्यांच्या लबाड्या बहुजन समाजाच्या लक्षात येण्याचा काळ केंद्रीय कृषीमंत्री श्री. शरद पवार यांच्या विषयी नवी माहिती बाहेर येत आहे. ही माहिती ते स्वत:च पुरवत आहेत. सुखद आणि दु:खद धक्का देणारी अशी ही माहिती आहे. मुंबईतून ही माहिती पवार महोदयांनी जगापुढे सादर केली आहे. `इंडियन नॅशनल काँग्रेस’ आणि राष्ट्रवादी काँग्रेस’ अशा दोन पक्षांच्या वतीने संयुक्त सभा काही दिवसांपूर्वी झाली. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा जणू नारळ या सभेत फोडण्यात आला, असे वृत्तपत्रांतून सांगण्यात आले आहे. साहजिकच आहे की, या आणि अशा सभांतून जी भाषणे होणार ती राजकीयच असणार. आपल्या पक्षाव्यतिरिक्त इतर सर्व पक्ष राज्य करायला कसे अयोग्य आहेत, हे अशा सभांतून शिरा ताणून सांगितले जाते. जनतेची विशेषत: तळागाळातील माणसांची काळजी केवळ आपल्यालाच कशी आहे, हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा खटाटोप केला जातो. पवारजी शिरा ताणत नाहीत; परंतु अतिशय चतुराईने सामान्य माणसाचा बुद्धीभ्रम करणारी भाषणे करण्यात ते पटाईत आहेत. निवडणुकीच्या काळात त्यांचे एकमेव उद्दिष्ट भाजप-शिवसेना युतीचे बारा वाजवणे, हे असते. त्यासाठी भलेबुरे सर्व मार्ग ते अवलंबतात, हिंदुत्वाचे राजकारण हे देशाला सर्व दृष्टीने किती घातक आहे, हे सांगण्यावर त्यांचा भर असतो. कठीण गोष्ट सोपी करून सांगावी, तसे पवारसाहेब अशा वेळी सांगतात. `हिंदुत्वाचे राजकारण म्हणजे ब्राह्मणांचे राजकारण’, अशी सोपी सरळ सुलभ व्याख्या पवार महाशय करतात. जर हिंदुत्ववादी सत्तेवर आले, तर अस्पृश्यांना पुन्हा गळयांत मडकी बांधावी लागतील, अशी भीती बहुजन समाजाला वाटावी, अशी त्यांची भाषणे असतात. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ते जाणीवपूर्वक `श्रीमंत’ असा करतात; परंतु फार मोठे धाडस करून असे म्हणता येईल की, शरदराव पवारांचा महाराष्ट्रातील जनतेशी पूर्वीसारखा जो थोडाफार सुसंवाद राहिला होता, तो तेवढा राहिलेला दिसत नाही.
हिंदुत्वाविषयी वस्तूस्थिती अशी आहे की, पवारसाहेब, ते आता ब्राह्मणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. ते तळागाळात जाऊन स्थिरावते आहे. ज्याला आपण `ओबीसी’ म्हणतो, तो समाज आज हिंदुत्वाच्या अग्रस्थानी आहे. मुसलमानांचे फाजील लाड करतांना काँग्रेस शासनाने हिंदुत्वाची जी विटंबना केली, त्यामुळे सगळयांत अधिक संताप या तथाकथित मागास समाजाला आला आहे. मुसलमानांचे लाड केल्याने काँग्रेस पक्षाचे भले होत असेल; पण भारताची चारही दिशांनी वाट लागत आहे, असे गण्यागणप्यालासुद्धा वाटू लागले आहे. देशाच्या स्वाभिमान रक्षणासाठी हा साधासरळ मनाचा समाज लढाऊ पवित्र्यात उभा ठाकला आहे. हे राजकारणातील सुप्त प्रवाह आहेत. ते सगळे अजून पृष्ठभागावर वहात आलेले नाहीत; परंतु त्याचा कानोसा गृह मंत्रालयाला लागला पाहिजे. तसा तो आबा पाटलांना लागला असणार. त्यांनी पवारसाहेबांच्या कानांवर खरीखुरी माहिती घातलीच असणार. जेम्स लेन प्रकरणात भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराच्या वास्तूवर हल्ला करून मोडतोड झाली. पुरंदरे आणि बेडेकर या इतिहासाच्या भाष्यकरांना विटंबित आणि विद्रूप करण्याच्या सुपार्या देऊन झाल्या. दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरु नव्हेत; म्हणून त्यांच्या नावे पुरस्कार देण्याची आवश्यकता नाही, असे आरडाओरडून आंदोलन करून झाले; पण बहुजन समाजावर त्यांचा म्हणावा तसा प्रभाव पडला नाही. ब्रिटीश राज्यकर्ते, सेंट झेव्हिअर्ससारखे धर्मगुरु आणि काँग्रेस संस्कृतीत मुरलेले पवारांसारखे महाराष्ट्राचे नेतृत्व यांच्या विचारांत एक साम्य आढळते आणि ते म्हणजे हे की, बहुजन समाजावर आपल्याला राज्य करायचे असेल, तर त्यांना ब्राह्मणांपासून दूर ठेवले पाहिजे; कारण ब्राह्मण सत्य सांगतात आणि त्यांचा शत्रूमित्रविवेक सदैव जागा असतो. ते समाजाला लाचार होऊ देत नाहीत. बहुजन समाजाच्या लक्षात काँग्रेस नेत्यांच्या लबाड्या येऊ लागल्या आहेत.
हिंदुत्वावर तुटून पडण्याची काँग्रेस नेत्यांची सवय
हिंदुत्व म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मण्य म्हणजे शोषण, असा जो विषारी प्रचार काँग्रेसी नेत्यांनी महाराष्ट्रात केला, तो बिनबुडाचा आहे, हे बहुजन समाजाच्या लक्षात आले आहे. आपल्या ज्ञातीच्या, समाजाच्या एवढेच नव्हे, तर एकंदर देशाच्या स्थैर्याला आणि सुरक्षित भवितव्याला खरा धोका इस्लामी आतंकवादाचा आणि त्याला सांभाळून घेणार्या काँग्रेस संस्कृतीचा असून हिंदुत्वाचा मनोभावे स्वीकार केल्याने ही धरून अन्य संकटेही नाहीशी होण्याची निश्चिती आहे, असे आता तळागाळातील माणसांना वाटू लागले आहे. हिंदुत्वामुळे समाजाची पक्की एकजूट होईल. क्षुद्र स्वार्थ गळून, देशासाठी प्रामाणिकपणे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि त्यामुळे भ्रष्टाचाराला खूपच आळा बसेल, असे सामान्य माणसाला वाटू लागले आहे; परंतु लोकांनी जर हिंदुत्व अंत:करणात प्रतिष्ठित केले, तर आपले काय होईल, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटू लागली आहे; कारण मुल्लामौलवींकडून आणि मिशनर्यांकडून सुपारी घेतल्यासारखी हिंदुत्वावर तुटून पडण्याची काँग्रेस नेत्यांना सवय झाली आहे; परंतु तरुणांना, महिलांना हिंदुत्वाची ओढ लागत आहे आणि आपल्या द्वेषपूर्ण प्रचाराचा परिणाम होत नाही, हे लक्षात आल्यामुळे लोकांना बनवण्याच्या पद्धतीत बदल करण्याचे काँग्रेस नेत्यांनी ठरवले आहे, असे दिसते.
संतवाङ्मयाचे वाचन करतो, असे सांगण्यामागे पवार यांचा उद्देश
निदान पवारांनी वेगळया पद्धतीने लोकांना संबोधित करायचे ठरवले आहे, असे दिसते. आपण बरेच संत वाङ्मय वाचले आहे, असे ते लोकांना सांगू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या संयुक्त सभेत भाषण करतांना ते म्हणाले, `मी बरेच संत वाङ्मय वाचले आहे,’ मला स्वत:ला हे वाचून आनंद झाला. वाचनाचा वेगळा संस्कार असतो, तो सगळयांवर होतो, असे नाही; पण तो दोष ग्रंथाचा नसतो. तुम्ही खिडकी उघडलीत, तर प्रकाश आत येण्यास उत्सूक असतो. पवारसाहेब वाचनवेडे नाहीत. त्यांच्या भाषणात ग्रंथवाचनाचे उल्लेख फार नसतात; परंतु आता ते आपण बरेच संत वाङ्मय वाचल्याचे म्हणत असतील, तर त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. अर्थात संत वाङ्मयाचे परिशीलन केल्याने होणारे संस्कार गडद असतात. तुमच्या दैनंदिन सहज बोलण्यातूनही तुम्ही संत वाङ्मय वाचले असल्याचे लक्षात येते; मात्र पवारजींचे प्रकरण फार वेगळे आहे. संत वाङ्मय वाचूनही एकाही संतांची रचना आपल्या मुखावाटे बाहेर पडू द्यायची नाही, असे एकदा त्यांनी ठरवले, तर कोणीही त्यांना तोंड उघडायला बाध्य करू शकणार नाही. ज्ञानेश्वर आणि रामदास सोडा; पण तुकारामाचा तरी एखादा मार्मिक अभंग पवारांनी उद्धृत करायला आडकाठी असू नये; पण तुकारामाचे तेवढे भाग्य दिसत नाही. मग आपण संत वाङ्मय वाचत असल्याचा उल्लेख इतक्या वर्षांत बहुधा प्रथमच पवारांनी का केला ?
पवार म्हणाले, `मी बरेच संत वाङ्मय वाचले आहे; पण एखाद्या संतांनी `बाँब तयार करा आणि निरपराध लोकांना मारा’, असे म्हटल्याचे मी वाचलेले नाही.’ खरे आहे. हिंदू संतांनी तसे म्हटलेले नाही; पण संत सांगतात तसेच सगळे वागतात असे दिसत नाही. संसदेवर खासदारांवर सामूहिक हत्या करण्याच्या उद्देशाने सशस्त्र आक्रमण करणार्या महंमद अफझल याला सर्वोच्च न्यायालयाने फाशी दिली, तरी सरकारने ती देऊ नये, असे कोणत्याही संताने म्हटलेले नाही. तरीसुद्धा महंमद अफझल याला फाशी देण्याविषयी पवार तोंडातून एकही शब्द बाहेर पडू देत नाहीत.
माझे पवारांएवढे वाचन नाही; पण तुकारामबुवांचे अभंग माझ्या डोळयांसमोर कधीतरी उभे रहातात. पंढरीच्या पांडुरंगाचे वर्णन करतांना ते म्हणतात, `महाकाळ हे कापती दैत्य ज्यासी । पाहा सावळे रूप हे पापनाशी’. त्याच अभंगात तुकाराम महाराजांनी `जया चिंतिता अग्नि हा शांति निवे’, असे म्हटले आहे. विठ्ठल साजरागोजिरा दिसत असला तरी प्रत्यक्षात तो महाकाळ आहे. असा धाक शत्रूच्या मनात शिवराज पाटील किंवा शरद पवार यांच्याविषयी आहे काय ?
श्री शिवाजी महाराजांना उपदेश करतांना तुकारामबुवांनी म्हटले आहे, `आता एक योग साधावा हा नीट । भल्याच्या तो वीट मानू नये । जेणे योगे तुम्हा घडो पाहे दोष । ऐसा हा सायास करू नये । निंदक दुर्जन संग्रही असती । त्यांची युक्ती चित्ती आणू नका । परीक्षावे कोण राज्याचे रक्षक । विवेकाविवेक पाहोनिया । सांगणे न लगे सर्वज्ञ तूं राजा । अनाथांच्या काजा साह्य व्हावे ।
राजा हाच प्रजेचा कळीकाळ असतो !
ज्यांनी फाळणी केली, तेच राज्याचे रक्षक आहेत, असे मानून चाल, असे तुकारामाने म्हटलेले नाही. मग तुकारामाने काय म्हटले आहे ? महाराष्ट्र शासनाने १९५० मध्ये श्री तुकारामबुवांच्या अभंगाची गाथा प्रसिद्ध केली. त्यातील ३०३५ वा अभंग पुढीलप्रमाणे आहे.
पाहा हो कलिचे महिमान
पाहा हो कलिचे महिमान
असत्यासि रिझले जन
पापा देती अनुमोदन
करिती हेळण संतांचे ।।
ऐसे अधर्माचे बळ
लोक झकविले सकळ
केले धर्माचे निर्मूळ
प्रलयकाळ आरंभला ।।
थोर या युगाचे आश्चर्य
ब्रह्मकर्म उत्तम सार
सांडूनिया द्विजवर
दावलपीर स्मरताती ।।
नमस्कारावया हरिदासा
लाजती धरती काही गर्वसा
पोटासाठी खौसा
वंदिती मलिंछाच्या ।।
मुख्य सर्वोत्तम साधने
ती उच्छेदूनि केली दीने
कुडी कापटये महा मोहने
मिरविताती दुर्जन ।।
कैसे विनाशकाळाचे कौतुक
राजे झाले प्रजांचे अंतक
पिते पुत्र सहोदर
एकाएक शत्रुघाते वर्तती ।।
राजा प्रजेचा कळीकाळ कसा होतो, याचे वर्णन तुकाराम महाराजांनी सविस्तर केले आहे. मोगलाची अत्याचारपूर्व राजवट समोर ठेवून त्यांनी लिहिली आहे. त्यावर शिवाजी महाराजांनी मात कशी केली, ते सांगितले आहे. आज तुकारामबुवा असते, तर आतंकवादाच्या संदर्भात ते पवारांना उद्देशून काय म्हणाले असते, हा चिंतनाचा विषय आहे. बाँबस्फोट करा, असे संत सांगत नाहीत; पण अन्याय सहन करा, असेही
कोणी संत सांगत नाहीत; परंतु `बाँबस्फोट करा, शत्रूचे हालहाल करा, सामूहिक संहार करा’, असे कुराण सांगते.
त्याविषयीची माहिती पुढच्या अंकात पवारांसाठी उपलब्ध करू.
निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार