हिंदूंकडून बाँबस्फोट होत असतील, तर ती इस्लामी दहशतवादाच्या विरोधातील प्रतिक्रिया ! – हिमानी सावरकर

पुणे, २९ ऑक्टोबर – देशात हिंदूंकडून बाँबस्फोट होत असतील, तर ते हिंदूंच्या इस्लामी दहशतवादाच्या विरोधातील प्रतिक्रियाच होत. हिंदूंना तुम्ही दहशतवादी म्हणणार असाल, तर स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीकारकांनाही तुम्हाला दहशतवादी म्हणावे लागेल. यापुढे हिंदू शिवाजी महाराज व क्रांतिकारक यांच्या इतिहासातून धडे घेऊन कार्य करतील, असे परखड मत `अभिनव भारत’ संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती हिमानी सावरकर यांनी आज येथे व्यक्‍त केले.

`अभिनव भारत’ संघटनेचे मध्यप्रदेशातील कार्य पहाणार्‍या श्री. समीर कुलकर्णी या तरुण कार्यकर्त्याला आज दहशतवादविरोधी पथकाने मालेगाव येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक केली. त्याबाबत `स्टार माझा’ या मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देतांना श्रीमती सावरकर बोलत होत्या. श्रीमती सावरकर पुढे म्हणाल्या, “हिंदूंच्या बाबत सर्वत्र घोर अन्याय सुरू आहे. हिंदूंनी काही चांगले काम केले की, त्याला चिरडून टाकण्यात येत आहे. काँग्रेसचे सरकार धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना चिरडून टाकत असतांना मुसलमान व ख्रिस्तीयांच्यावर कृपा करत आहे.” बाँबस्फोटांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, “बाँबस्फोटांचे समर्थन आम्ही करणार नाही. हिंदूंनी बाँबस्फोट केले असतील, तर ते अद्याप सिद्ध व्हायचे आहेत. आता त्यांना तुम्ही अतिरेकी म्हणू शकत नाही. समजा हिंदूंनी बाँबस्फोट केलेच असतील, तर ती एक प्रतिक्रिया आहे. इतकी वर्षे देशात बाँबस्फोट होत आहेत, त्याबद्दल आतापर्यंत त्याचा कोणीही `इस्लामी दहशतवाद’ असा उल्लेख करत नव्हते. आता हिंदूंना बाँबस्फोटांत अटक करण्यात आल्यावर मात्र लगेच सर्व जण `हिंदु दहशतवादी’ असा उल्लेख करू लागले आहेत.” “जागोजागी बाँबस्फोटात हिंदु मारले जात असतांना कोणाला काहीच वाटत नव्हते. अमरसिंग यांच्यासारखे नेते २० कोटी मुसलमान ८० कोटी हिंदूंना भारी पडतील”, असे सांगतात. हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे. दहशतवादी अफझल याला फाशी दिली जात नाही. त्यामुळे हिंदु आता हा अन्याय सहन करणार नाहीत”, असा गर्भित इशारा त्यांनी या वेळी दिला.


गोळीचे उत्तर गोळीने, तर बाँबस्फोटांचे उत्तर बाँबस्फोटाने, असे का म्हणू नये ?
मुंबईत बसमध्ये राहुल राज याला चकमकीत ठार केल्यावर गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी `गोळीचे उत्तर गोळीनेच दिले जाईल’, असे सांगितले होते. तर बाँबस्फोटांचे उत्तर बाँबस्फोटांनीच देण्यात येत आहे, असे म्हटले तर ?, असा मार्मिक प्रश्‍न श्रीमती सावरकर यांनी विचारला.

श्री. समीर कुलकर्णी हा देशाची सेवा करणारा सरळ मार्गी व स्पष्टवक्‍ता तरुण आहे. कोणावर अन्याय करू नये व अन्याय सहनही करू नये, अशा विचारांचा तो मुलगा आहे. जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे भाषण करून अथवा लिखाण करून तो त्यावर कृती करतो, अशी माहिती श्रीमती सावरकर यांनी अटक करण्यात आलेल्या श्री. कुलकर्णी याच्याबद्दल दिली.


मालेगाव बाँबस्फोटाप्रकरणी माजी लष्करी अधिकार्‍यासह दोघांना पोलीस कोठडी
नाशिक – मालेगाव येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी काल दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेले निवृत्त लष्करी अधिकारी श्री. रमेश उपाध्याय व `अभिनव भारत’ संघटनेचा
कार्यकर्ता श्री. समीर कुलकर्णी यांना आज नाशिक न्यायालयाने १० नोव्हेंबरपर्यंत
पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!