सनातनसारख्या संस्थेला हिंदु दहशतवादी ठरवणार्‍या `एटीएस्’चा समाचार योग्य वेळी घेऊच ! – शिवसेनाप्रमुख

मुंबई, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदुस्थानात अनेक ठिकाणी आतंकवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. ही शिबिरे उधळावीत व त्यांना छुपा पाठिंबा देणार्‍यांच्याही मुसक्या बांधाव्यात, असे कुणालाही वाटत नाही. चार साधकांनी हिंदूंच्या देवतांच्या विटंबनेबद्दल संतापाच्या भरात एक लहानसे कृत्य केले. त्या बदल्यात सनातनसारख्या संस्थेला हिंदु दहशतवादी ठरवून तिच्या साधकांचा छळ `एटीएस्’वाल्यांनी चालवला आहे. `एटीएस्’वाल्यांचा समाचार आम्ही योग्य वेळी घेऊच. मालेगाव स्फोटाच्या प्रकरणी साध्वी प्रज्ञाच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यालयावर जो हल्ला केला, त्या नामर्दानगीस काय म्हणावे, असा प्रश्‍न शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आज दैनिक `सामना’च्या संपादकीयातून विचारला आहे.

सिमीच्या किती अड्ड्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्ले केले ?
या संपादकीयात शिवसेनाप्रमुख पुढे लिहितात, `स्वत:जवळ गृह खात्याची खुर्ची असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना कसेही वागण्याचा परवाना आमच्या आबांनी दिलेला नसावा. राष्ट्रवादीवाल्यांच्या हल्ल्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळयाची मोडतोड झाली. प्रभू श्रीरामाच्या तसबिरीची विटंबना झाली. (मुसलमानधार्जिण्या दोन्ही काँग्रेसवाल्यांना छत्रपती शिवरायांबद्दल आदर नाही व प्रभू श्रीराम हा तर काँग्रेसवाल्यांच्या लेखी काल्पनिक पात्र आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या दोहोंचा मान राखला जाण्याची शक्यताच नाही. अशांना हिंदूंवर राज्य करण्याचा काय अधिकार ? – संपादक) प्रज्ञा साध्वींचा संबंध कधीकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व संघ परिवार यांच्याशी होता, या चिडीतून म्हणे राष्ट्रवादीवाल्यांनी हा हल्ला केला. दहशतवादाचा निषेध म्हणून हा हल्ला झाला असेल, तर या षंढांना आमचा एकच सवाल आहे तो म्हणजे, हिंदुस्थानात ठिकठिकाणी बाँबस्फोट घडवणार्‍या सिमीच्या किती अड्ड्यांवर तुम्ही हल्ले केलेत हो ?’
दहशतवाद्यांना मदत करणार्‍या वकिलांची कॉलर धरण्याची हिंमत का दाखवली नाही ?
बाँबस्फोटातील खतरनाक आरोपींचे वकीलपत्र घेणारे अँड्. माजीद मेमन हे तर तुमच्याच राष्ट्रवादीचे पदाधिकारी. मग दहशतवाद्यांना मदत करतात म्हणून कुणी त्या वकिलांची कॉलर धरण्याची हिंमत दाखवली नाही; कारण तिकडे त्या दाऊदचा धाक आहे. अफझलची तरफदारी करणार्‍या किती राजकारण्यांच्या घरावर हे दहशतवादविरोधी चाल करून गेले ? तिकडे शेपट्या घालायच्या व हिंदूंच्या बाबतीत मात्र आरोळया ठोकायच्या. नाशकातील नामर्दानगीचा निषेध करावा तेवढा थोडाच. साध्वीला तुरुंगात डांबणारे पोलीस व नाशकातील हल्लेखोर एकाच माळेचे मणी आहेत, असे ताशेरेही श्री. ठाकरे यांनी ओढले.

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!