… तर काँग्रेसवाल्यांनो, आम्ही आमच्या अटकेची वाट पहात आहोत !

सनातनवर बंदी आलीच तर हिंदूंमध्ये वैचारिक क्रांतीचा उन्माद निर्माण होईल !

महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारला सनातनच्या साधकांचे अनावृत्त पत्र

प्रती,
काँग्रेस सरकार,
महाराष्ट्र.

मागील महिन्यापासून आपण सनातनवर बंदी आणण्याचा अटोकाट प्रयत्‍न करत आहात. त्यामुळे कदाचित आपण नंतर आम्हा साधकांना आपल्या अंधार्‍या कोठडीची हवा (तेथे असते का, हा प्रश्‍नच !) खायला लावाल; पण काँग्रेसवाल्यांनो, त्यामुळे `सनातन प्रभात’ने सांगितल्याप्रमाणे तुमची शंभर पापे भरणार आहेत, त्यामुळे तुमचा नायनाट होऊन पुढील कित्येक पिढ्या वाचणार आहेत, सध्याचे तुमचे हे तथाकथित निधर्मी राज्य जाऊन धर्माधिष्ठित राज्याची स्थापना करण्यासाठी ईश्‍वर अवतार घेणार आहे, तर आम्ही आमच्या अटकेची वाट पहात आहोत.

आमचा आदर्श आहे, महर्षी दधिचींचा, वीर सावरकर व भगतसिंग यांचा… !
काँग्रेसवाल्यांनो, आमच्यापुढे आदर्श आहे, महर्षी दधिचींचा ! दधिचींनी असुरांचा नाश करण्यासाठी इंद्राला शस्त्राची आवश्यकता असतांना स्वत: देहत्याग करून आपली हाडे वज्र तयार करण्यासाठी उपलब्ध करून दिली होती. आमच्यापुढे आदर्श आहे, वीर सावरकर व भगतसिंग यांचा ! त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, या हिंदुस्थानात स्वराज्याची स्थापना करण्यासाठी स्वत:च्या प्राणांची बाजी लावली. आमच्यापुढे आदर्श आहे, आमच्या सद्‌गुरूंचा ! ज्यांनी साधकांना होणारे अनिष्ट शक्‍तींचे त्रास स्वत:च्या अंगावर झेलले व साधकांचे रक्षण केले.

काँग्रेसवाल्यांनो, आमची तयारी आधीच झाली आहे !
आपण म्हणाल, `बोलणे सोपे असते. एकदा पोलीस कोठडीची हवा खाल्ल्यावर कळेल.’ काँग्रेसवाल्यांनो, कारावासात तुमचे पोलीस साधकांना फोडून काढतील. त्यामुळे आमचे हाडन्हाड दुखेल; प्रसंगी आमच्या अंगातून रक्‍तही पडेल. कारागृहातील जेवणात किडे, अळया आदींचा कचरा असेल. त्यामुळे साधकांना `जेऊ नये’, असे वाटेल. कारागृहातील शौचालये बांधल्यापासून कोणीही स्वच्छ न केल्याने तुंबलेली असतील व त्यांची दुर्गंधी कारागृहात पसरलेली असेल. त्यामुळे साधकांना किळस येऊन रात्रंदिवस झोप लागणार नाही; परंतु काँग्रेसवाल्यांनो, हे त्रास आम्ही साधक कितीतरी वर्षांपासून अनुभवत आहोत. अनिष्ट शक्‍तींच्या तीव्र त्रासांमुळे साधकांना हाडे दुखणे, घरात रक्‍ताचे डाग पडून विविध प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास होणे, सुग्रास जेवण समोर असूनही ते `जेवू नये’, असे वाटणे, अगदी चांगली स्वच्छता असतांनाही दुर्गंध येणे, कित्येक रात्री झोप न लागणे, प्राणशक्‍ती कमी होणे, साधक बेशुद्ध होणे असे कितीतरी प्रकारचे गंभीर त्रास आम्हा साधकांना यापूर्वीच झाले आहेत. या सर्व त्रासांतही आमच्या सद्‌गुरूंनी आम्हाला आनंदात ठेवले. इतक्या गंभीर त्रासांची अगदी थोडीच झळ साधकांना भोगायला सांगून बहुतांश स्वत: झेलली. एकीकडे दुर्गंध येत असतांनाच ईश्‍वरी तत्त्वामुळे साधकांना तेथे सुगंधही अनुभवता आला. काँग्रेसवाल्यांनो, हाच भाग तुमच्या कारागृहातही होईल. `आमचा ईश्‍वर साधकांची काळजी घेईलच घेईल’, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे `आमची तयारी आधीच झाली आहे’, असे समजा !

आम्ही तेथेही साधनाच, म्हणजे धर्मप्रसारच करू !
राहिला प्रश्‍न साधकांच्या साधनेचा. काँग्रेसवाल्यांनो, तुम्हाला देवाधर्माचे करणारे लोक आवडत नसल्याने कदाचित तुमच्या पोलीस अधिकार्‍यांनी तुम्हाला सांगितले नसेल; पण तुमच्या एक-दोन कारागृहात आमचे सत्संगही चालायचे हो ! पोलिसांसाठी वेगळे व कैद्यांसाठी वेगळे असे सत्संगही आम्ही साधकांनी घेतले. त्यामुळे बराच लाभ झाल्याची प्रतिक्रियाही त्या वेळी पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्‍त केली होती. काँग्रेसवाल्यांनो, तुमच्या तथाकथित निधर्मीवादामुळे तुम्ही हिंदु पोलिसांना कायमच पाण्यात पहाता. त्यामुळे पोलिसांवर कायमच ताण असतो. सत्ता तुमच्या हातात असल्याने ते काही करू शकत नाहीत. तुमच्या हिटलरशाहीमुळे जे निराश होतात, ते आत्महत्या करतात; पण जे देवावर श्रद्धा ठेवणारे असतात, ते सनातनसारख्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली साधना करून मनाची स्थिरता टिकवून ठेवतात. काँग्रेसवाल्यांनो, असेच सत्संग आम्ही कारागृहातही घेऊ. त्यामुळे तुम्हाला `पोलिसांवरील ताण कमी करण्याचे’ कधीही न जमलेले कामही होईल. एकप्रकारे तुम्हाला मदतच होईल ना ! काँग्रेसवाल्यांनो, वीर सावरकरांनी हिंदु कैद्यांचे कारागृहात होणारे धर्मांतर रोखले होते. आम्ही कैद्यांना धर्मशिक्षण देऊन तेथे त्यांच्यात खरे हिंदुत्व, म्हणजेच साधकत्व निर्माण करण्याचा प्रयत्‍न करू, म्हणजे तुमच्या कारागृहातही साधनाच करू.

`केला पोत जरी बळेची खाले, ज्वाळा तरी ती वरती उफाळे’ या उक्‍तीप्रमाणे `सनातनवरील बंदी’ हीच वैचारिक क्रांतीची ठिणगी ठरेल !
काँग्रेसवाल्यांनो, भगतसिंगादी क्रांतीवीरांच्या अटकेनंतर क्रांतीची ज्वाला आणखी धगधगली. त्यातून होरपळल्याने गोर्‍या इंग्रजांना देश सोडून पळावे लागले, तसे काँग्रेसवाल्यांनो, सनातनच्या साधकांना अटक झाल्यानंतर हिंदूंमध्ये निश्चितच वैचारिक क्रांती करण्याचा उन्माद निर्माण होईल. त्यामुळे येत्या निवडणुकीत काळया इंग्रजांना, म्हणजेच तुम्हाला सत्ता सोडावी लागेल, हे सत्य जाणा !

काँग्रेसवाल्यांनो, साधकांच्या संघटित त्यागातून ईश्‍वरी राज्य निश्चितच येईल !
त्रेतायुगात राम वनवासाला निघाला असतांना त्याने राक्षसांनी खाल्लेल्या लाखो ऋषीमुनींच्या हाडांचे डोंगर पाहिले. त्यानंतर त्याने राक्षसांना नायनाट करून रामराज्य स्थापले. द्वापारयुगात श्रीकृष्णाने कंस, चाणूर, शिशुपाल, कौरव आदी असुरांच्या अपराधांचा घडा भरल्यानंतर महाभारत घडवले व धर्मराज्याची स्थापना केली. तसे काँग्रेसवाल्यांनो, कलीयुगात साधकांच्या संघटित त्यागातून ईश्‍वरी राज्य येईल, हे सुनिश्चित आहे. जितक्या लवकर तुम्ही आमच्यावर बंदी आणाल, तितक्या लवकर तुमची पापे भरतील व ईश्‍वर अवतार घेईल. आम्ही ईश्‍वरी अवताराचीच वाट पहात आहोत.

आम्ही प्रार्थना करतो विश्‍वमांगल्याची !
काँग्रेसवाल्यांनो, आम्ही साधक आहोत. आम्हाला तुमचे राज्य नको. आमचे ध्येय ईश्‍वरप्राप्‍ती आहे. आम्हाला ईश्‍वरी राज्य हवे आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासारखा खलनायकी विचार करू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही नेहमी संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांप्रमाणे विश्‍वमांगल्याची प्रार्थना करतो,
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।।
भुता परस्परे जडो । मैत्र्य जिवांचे ।।
दुरितांचे तिमीर जावो । विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ।।
जो जे वांछील, तो ते लाहो । प्राणीजात ।।

- सनातनचे हजारो साधक

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

Leave a Reply