…………तर श्री. शरद पवारांच्या आधी राज ठाकरे कदाचित पंतप्रधानही होतील.

मराठी माणसाच्या हक्कांच्या मुद्यावर शिवसेनेत फूट पाडायची आणि उत्तरप्रदेशीय लोकांची बाजू घेऊन मते पदरात पाडून घ्यायची, हा काँग्रेसचा डाव राज ठाकरे यांना कळत नसेल, असे नाही. मराठी माणसाच्या हक्काचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवून व्यापक असा हिंदुत्वाचा मुद्दा घेतला पाहिजे. मुंबईतील घुसखोर मुसलमानांना बांगलादेशात पळवून लावायचे, एवढा एकच मुद्दा मनसेने उचलून धरला, तरी त्यांना जगभर प्रसिद्धी मिळेल.

 

राज अटकेचे राजकारण हिंदूंच्या हिताचे नाही !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना मंगळवारी पहाटे
रत्‍नागिरीत अटक केली. हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. `अटक करून दाखवण्याचे आव्हान’ श्री. ठाकरे यांनी सरकारला दिले होते. मुख्यमंत्री देशमुख यांनी ते आव्हान स्वीकारले. `महाराष्ट्र पेटेल’, असे श्री. ठाकरे म्हणाले होते. पहिल्या दिवशी तरी तो पेटला नाही. म्हणून श्री. ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचे महत्त्व किंचितही कमी होत नाही. उलट अनेकांची श्री.ठाकरे यांनी पंचाईत केली आहे. एकंदरीत जे राजकारण चालले ते मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या हिताचे नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

केंद्र शासनाच्या दडपणामुळेच राज ठाकरे यांना अटक
रेल्वे मंडळाच्या वतीने गेल्या रविवारी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्राच्या
अन्य काही भागांत नोकरभरती करण्याच्या दृष्टीने काही परीक्षा घेण्यात आल्या, तशा परीक्षा होणार असल्याच्या जाहिराती बिहारच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या; पण महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या नाहीत, असे मनसेचे म्हणणे आहे. त्यामुळे मराठी मुलांना या परीक्षांना बसता आले नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे चिडून परीक्षाकेंद्रावर हल्ला केला. काही विद्यार्थ्यांना चोप बसला. परीक्षांना बसता आले नाही. साहजिकच रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आगपाखड करून श्री. ठाकरे यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली. लोकसभेत चर्चा झाली. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या अंगात राक्षस संचारला असून दिसेल त्या परप्रांतियाला झोडून काढले जात आहे आणि त्यांना जगणं अशक्य झाले आहे, असे चित्र उभे केले गेले. परिणामी सर्व बाजूंनी दडपण वाढले. ठाकरे यांना अटक करण्यावाचून देशमुखांसमोर दुसरा पर्याय राहिला नाही.
ठाकरे यांचे राजकारण योग्य कि अयोग्य हा मुद्दा नाही. श्री. ठाकरे यांचे आंदोलनाचे विषय बरोबर आहेत. त्यासाठी त्यांनी निवडलेली वेळ योग्य नाही. त्यांच्या राजकारणामुळे हिंदूंमध्ये फूट पडत असून मुख्य शत्रू जो इस्लामी आतंकवाद त्याचे काय करायचे, हा प्रश्‍न तसाच अनिर्णित राहिला आहे.

मराठ्यांवरील अन्यायाची दाद मागणे म्हणजे संकुचितपणा
रेल्वे बोर्ड मराठी माणसावर अन्याय करते, हे उघड आहे. लालूप्रसाद
यादव रेल्वेमंत्री झाल्यापासून बिहारी माणसांची भरती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे, हे खरे आहे; परंतु याविरुद्ध महाराष्ट्रात निवडून गेलेल्या खासदारांना आवाज उठवता आला असता. मुख्यमंत्र्यांना नियोजन मंडळाकडे दाद मागता आली असती; परंतु मराठी माणसावरील अन्यायाची दाद मागणे म्हणजे संकुचितपणा आहे, असे खासदारांना वाटते. म्हणून बेळगावात कर्नाटक सरकारकडून गेली ५० वर्षे मराठी माणसावर सतत अन्याय होत आहे. त्याविरूद्ध मराठी खासदारांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी कधी आवाज उठवल्याचे ऐकलेले नाही. म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोनचार बिहारींना चोप दिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटते. आपली पहिली मागणी श्री. ठाकरे यांना धडा शिकवा, अशी असते. मराठी माणसावरील अन्याय दूर झाला पाहिजे, असा मराठी माणसांचा सामूहिक आवाज उठत नाही.

प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांना खलनायकाच्या रूपात उभे केले दुकानाच्या पाट्या मराठीत पाहिजेत, हा विषय वास्तविक महापालिकेच्या कार्यवाहीचा आहे. तसे नियम आहेत. निर्बंध आहेत. महापालिकेने आग्रह धरला नाही म्हणून मनसेला आग्रह धरावा लागला; परंतु मराठीत पाटी लिहायला सांगणे म्हणजे धर्मांतर करायला सांगण्याइतके गंभीर आहे, असा अर्थ प्रसारमाध्यमांनी लावला, आणि कारण नसतांना खलनायकाच्या रूपात राज ठाकरे यांना उभे केले गेले.

मराठी माणसाच्या एकजुटीवर वैचारिक गोंधळाचा परिणाम
श्री. ठाकरे अशा मुद्यांवर आंदोलन उभे करतात, तेव्हा सर्वसामान्य मराठी
माणसाला ते मुद्दे पटलेले असतात आणि या मुद्यांना पाठिंबा द्यावा, असेच त्याला वाटत असते; परंतु त्याची निष्ठा यापूर्वी त्याने शिवसेनेला वाहिलेली असल्याने शिवसेनेला अव्हेरून तो स्वतंत्र भूमिका घेत नाही. काही वेळा शिवसैनिकांचे मन राज ठाकरे यांच्याबरोबर तर शरीर श्री. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असते. त्यामुळे त्यांची मनोवृत्ती द्विधा होते. तेवढ्या प्रमाणात मराठी माणसाच्या एकजुटीवर या वैचारिक गोंधळाचा परिणाम होतो. श्री. राज ठाकरे आंदोलनासाठी जे मुद्दे घेतात, ते मुळचे आमचे मुद्दे आहेत, असे म्हणून शिवसेनेचे नेते राजच्या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्‍न करतात; परंतु अशी हवा काढता येत नाही. कारण मुद्दे कोणाची खाजगी `प्रॉपर्टी’ नसते. उद्या समान नागरी संहितेचा मुद्दा काही कारणाने काँग्रेसने मांडायचा ठरवल्यास तर तो आमचा मुद्दा आहे. तुम्ही मांडू शकत नाही, असे भाजप काँग्रेसला म्हणू शकत नाही. उलट आपला मुद्दा काँग्रेसने घेतला, हा भाजपने आपला विजय मानला पाहिजे. काँग्रेस तसे करत असते. उदा. सावरकरांचा अखंड हिंदुस्थानचा मुद्दा इतका उचलून धरला की, १९४६ च्या सार्वजनिक निवडणुकीत काँग्रेसने अखंड हिंदुस्थानला पाठिंबा देऊन त्या मुद्यावर निवडणुका लढवण्याचे ठरवले. काँग्रेसने अखंड हिंदुस्थानच्या मुद्यावर लढायचे ठरवले म्हणून लोकांना इतका आनंद झाला की, त्यांनी काँग्रेसला बहुमताने निवडून दिले. सत्तेवर येताच वर्षाच्या आत काँग्रेसने फाळणीला पाठिंबा दिला आहे आणि लोकांना फसवले. तशी फसवणूक राजने करू नये, असे वाटत असेल, तर शिवसेनेने सावध रहावे; पण आमचे मुद्दे उचलू नका, असे म्हणू नये.

उत्तरप्रदेशीय लोकांची मते पदरात पाडणे, हा काँग्रेसचा डाव
शिवसेना ही शक्‍ती आहे. या शक्‍तीचा आधार घेऊन भाजप महाराष्ट्रात
सत्ता संपादन करू शकतो. काँग्रेसच्या विशेषत: शरद पवारांचा राग भाजपवर आहे. भाजपला उखडून टाकण्यासाठी ते शिवसेनेला दुर्बळ करणार आहेत. शिवसेनेला दुबळी करण्यासाठी ते राज ठाकरे यांचा वापर करणार आहेत. मराठी माणसाच्या हक्कांच्या मुद्यावर शिवसेनेत फूट पाडायची आणि आपण उत्तरप्रदेशीय लोकांची बाजू घेऊन मते पदरात पाडून घ्यायची, हा काँग्रेसचा डाव आहे. तो राज ठाकरे यांना कळत नसेल असे नाही. पण संघटना चलवण्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता आहे आणि तेवढा पैसा त्यांना केवळ शरद पवार देऊ शकतात, अशी त्यांची समजूत आहे.

राज ठाकरे यांनी देशहितासाठी मराठी मुद्दे तात्पुरते बाजूला ठेवून बांगलादेशी मुसलमानांचा प्रश्‍न प्रथम हाती घ्यावा

यावर उपाय म्हणजे मराठी माणसाच्या हक्काचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवला पाहिजे. व्यापक असा हिंदुत्वाचा मुद्दा घेतला पाहीजे. मुंबईत घुसलेले बांगलादेशी मुसलमान यांना बांगलादेशात पळवून लावायचे एवढा एकच मुद्दा मनसेने उचलून धरला, तरी त्यांना जगभर प्रसिद्धी मिळेल, लोक या आंदोलनाला वाटेल तेवढा पैसा उपलब्ध करून देतील आणि मराठी माणसात फूट पडणार नाही. राष्ट्रीय कर्तव्यकर्म केल्याचे पुण्य श्री. ठाकरे यांना मिळेल. दुकानच्या पाट्या मराठीत लिहिण्यापेक्षा दोनचार नोकर्‍या पदरात पाडून घेण्यापेक्षा बांगलादेशी मुसलमानांना मुंबईबाहेर बांगलादेशात हाकलून देण्याचा मुद्दा सर्वांना पटणारा आहे. मुंबईचे गुजराती, दाक्षिणात्य, उत्तरप्रदेशी इत्यादी सगळयांना या मुद्याला पाठिंबा द्यावाच लागेल. जे पाठिंबा देणार नाहीत ते उघड्यावर पडतील. उदा. समाजवादी पक्षाचे अमरसिंग बांगलादेशी मुसलमानांविरूद्ध बोलणार नाहीत. त्या वेळी जया बच्चन, शबाना आझमी, तिस्ता सेटलवाड आणि महेश भट काय करतील, ते पहाणे मनोरंजक ठरेल.
म्हणून श्री. राज ठाकरे यांनी देशहितासाठी मराठी माणसाचे मुद्दे तात्पुरते बाजूला ठेवून बांगलादेशी मुसलमानांचा प्रश्‍न प्रथम हाती घ्यावा. त्यानंतर आपोआप इस्लामी आतंकवादाच्या विरुद्ध लढण्यासाठी तरुण त्यांच्या भोवती गोळा होतील. त्यात ते यशस्वी झाले, तर श्री. शरद पवारांच्या आधी ते कदाचित पंतप्रधानही होतील.

 

  निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

चिक्कमगळूरच्या दत्तपिठात पूजा सुरू

हिंदूंच्या दीर्घ आंदोलनाला यश !

हिंदूंनो, धर्मरक्षणाच्या आंदोलनात मिळालेल्या या यशाबद्दल ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्‍त करा !
चिक्कमगळूर (कर्नाटक) – आश्‍विन पौर्णिमा, शके १९३० म्हणजे १४ ऑक्टोबर २००८ या दिवशी जिल्ह्यात असलेल्या चंद्रद्रोण पर्वतावरील दत्तपिठात हिंदूंना पूजा करायला कर्नाटक सरकाराने परवानगी दिली. या वेळी एक हजार दत्तभक्‍त एकत्र आले व त्यांनी दत्तपिठात वैदिक पद्धतीनुसार पूजा केली. या पूजेच्या वेळी प.पू. सद्‌गुरु स्वामी आत्मानंद सरस्वती महाराज (श्री समर्थ श्रीधर आश्रम, बेंगळुरू), श्रीमहंत श्रीजमुनापुरीजी महाराज (काशी) व विजापूरच्या आंदोल मठाचे पूज्य श्री सिद्धलिंगस्वामी यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या ५० कार्यकर्त्यांचा सहभाग होता. हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद प्रभु व त्यांच्या धर्मपत्‍नी सौ. प्रतिमा प्रभु यांनी पूजा केली. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते मे २००७ पासून दर पौर्णिमेला दत्तपिठात पूजा करायचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करत होते. त्याप्रमाणे १४.२.२००८ रोजी उच्च न्यायालयाने दत्तपिठात पूजा करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार समितीने दर पौर्णिमेच्या दिवशी सातत्याने १५ वेळा पूजा करण्याचा प्रयत्‍न केला. `श्री गुरुदत्तपीठ संवर्धन समिती’ने १९७८ पासून कायद्याला अनुसरून आखलेल्या मोहिमेला अखेर यश मिळाले आहे.

 

  निगडीत वृत्त : हिंदु जनजागृती समिती

रंधा (जिल्हा जळगाव) येथे एका रात्रीत देवीच्या मूर्तीची तोडफोड करून तेथे दर्गा उभारला !

दिवाळीच्या शुभदिनी हिंदूंसाठी काळी बातमी !

रंधा (जिल्हा जळगाव), २५ ऑक्टोबर – रंधा (तालुका रावेर) येथील आदिवासींच्या देवतेची मूर्ती तोडून मुसलमानांनी रातोरात दर्गा उभारल्याची घटना नुकतीच घडली.

(महमद गझनीने जशी हिंदूंची देवळे नष्ट करण्याचा सपाटा लावला होता, तशीच स्थिती आता येत असल्याची ही घटना द्योतक आहे ! तेव्हा दिवस नव्हे, तर रात्रही वैर्‍याची आहे, हे हिंदूंनी लक्षात ठेवावे व जागरूक रहावे ! – संपादक) या प्रकरणी सरपंचासह आठ व्यक्‍तींना अटक करण्यात आली. तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रंधा गावात बंजारी समाजाचे `दुर्गा नाईक’ हे देवीचे देऊळ आहे. सततच्या दुष्काळामुळे गावकरी हे गाव सोडून गेले; पण दरवर्षी दसरा व दिवाळीच्या वेळी या देवीच्या उत्सवासाठी बंजारा एकत्र येतात. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी येथील हुसेन तडवी, गुलजार तडवी, नजीर तडवी, यांच्यासह २० ते २५ व्यक्‍तींनी या देवीच्या मूर्तीची तोडफोड करून ती फेकून दिली व त्या ठिकाणी असलेले भगवे झेंडेही काढून फेकले. (हिंदूंच्या प्रत्येक सणाच्या वेळी दंगे करून त्यांना भीतीच्या वातावरणात ठेवणे, हाच एककलमी कार्यक्रम मुसलमान राबवत आहेत ! – संपादक) लगोलग त्या ठिकाणी पीरबाबाचा दर्गा तयार करण्यात आला व त्यावर हिरवी चादर चढवण्यात आली. या घटनेचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आणि आठ व्यक्‍तींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मुसलमानी अंमल व आताची स्थिती

 

 

  निगडीत वृत्त : हिंदूंनो आता तरी या धर्मांध मुसलमानांचा बंदोबस्त करा

… तर काँग्रेसवाल्यांनो, आम्ही आमच्या अटकेची वाट पहात आहोत !

सनातनवर बंदी आलीच तर हिंदूंमध्ये वैचारिक क्रांतीचा उन्माद निर्माण होईल !

महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारला सनातनच्या साधकांचे अनावृत्त पत्र

प्रती,
काँग्रेस सरकार,
महाराष्ट्र.

मागील महिन्यापासून आपण सनातनवर बंदी आणण्याचा अटोकाट प्रयत्‍न करत आहात. त्यामुळे कदाचित आपण नंतर आम्हा साधकांना आपल्या अंधार्‍या कोठडीची हवा (तेथे असते का, हा प्रश्‍नच !) खायला लावाल; पण काँग्रेसवाल्यांनो, त्यामुळे `सनातन प्रभात’ने सांगितल्याप्रमाणे तुमची शंभर पापे भरणार आहेत, त्यामुळे तुमचा नायनाट होऊन पुढील कित्येक पिढ्या वाचणार आहेत, सध्याचे तुमचे हे तथाकथित निधर्मी राज्य जाऊन धर्माधिष्ठित राज्याची स्थापना करण्यासाठी ईश्‍वर अवतार घेणार आहे, तर आम्ही आमच्या अटकेची वाट पहात आहोत.

आमचा आदर्श आहे, महर्षी दधिचींचा, वीर सावरकर व भगतसिंग यांचा… !
काँग्रेसवाल्यांनो, आमच्यापुढे आदर्श आहे, महर्षी दधिचींचा ! दधिचींनी असुरांचा नाश करण्यासाठी इंद्राला शस्त्राची आवश्यकता असतांना स्वत: देहत्याग करून आपली हाडे वज्र तयार करण्यासाठी उपलब्ध करून दिली होती. आमच्यापुढे आदर्श आहे, वीर सावरकर व भगतसिंग यांचा ! त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, या हिंदुस्थानात स्वराज्याची स्थापना करण्यासाठी स्वत:च्या प्राणांची बाजी लावली. आमच्यापुढे आदर्श आहे, आमच्या सद्‌गुरूंचा ! ज्यांनी साधकांना होणारे अनिष्ट शक्‍तींचे त्रास स्वत:च्या अंगावर झेलले व साधकांचे रक्षण केले.

काँग्रेसवाल्यांनो, आमची तयारी आधीच झाली आहे !
आपण म्हणाल, `बोलणे सोपे असते. एकदा पोलीस कोठडीची हवा खाल्ल्यावर कळेल.’ काँग्रेसवाल्यांनो, कारावासात तुमचे पोलीस साधकांना फोडून काढतील. त्यामुळे आमचे हाडन्हाड दुखेल; प्रसंगी आमच्या अंगातून रक्‍तही पडेल. कारागृहातील जेवणात किडे, अळया आदींचा कचरा असेल. त्यामुळे साधकांना `जेऊ नये’, असे वाटेल. कारागृहातील शौचालये बांधल्यापासून कोणीही स्वच्छ न केल्याने तुंबलेली असतील व त्यांची दुर्गंधी कारागृहात पसरलेली असेल. त्यामुळे साधकांना किळस येऊन रात्रंदिवस झोप लागणार नाही; परंतु काँग्रेसवाल्यांनो, हे त्रास आम्ही साधक कितीतरी वर्षांपासून अनुभवत आहोत. अनिष्ट शक्‍तींच्या तीव्र त्रासांमुळे साधकांना हाडे दुखणे, घरात रक्‍ताचे डाग पडून विविध प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास होणे, सुग्रास जेवण समोर असूनही ते `जेवू नये’, असे वाटणे, अगदी चांगली स्वच्छता असतांनाही दुर्गंध येणे, कित्येक रात्री झोप न लागणे, प्राणशक्‍ती कमी होणे, साधक बेशुद्ध होणे असे कितीतरी प्रकारचे गंभीर त्रास आम्हा साधकांना यापूर्वीच झाले आहेत. या सर्व त्रासांतही आमच्या सद्‌गुरूंनी आम्हाला आनंदात ठेवले. इतक्या गंभीर त्रासांची अगदी थोडीच झळ साधकांना भोगायला सांगून बहुतांश स्वत: झेलली. एकीकडे दुर्गंध येत असतांनाच ईश्‍वरी तत्त्वामुळे साधकांना तेथे सुगंधही अनुभवता आला. काँग्रेसवाल्यांनो, हाच भाग तुमच्या कारागृहातही होईल. `आमचा ईश्‍वर साधकांची काळजी घेईलच घेईल’, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे `आमची तयारी आधीच झाली आहे’, असे समजा !

आम्ही तेथेही साधनाच, म्हणजे धर्मप्रसारच करू !
राहिला प्रश्‍न साधकांच्या साधनेचा. काँग्रेसवाल्यांनो, तुम्हाला देवाधर्माचे करणारे लोक आवडत नसल्याने कदाचित तुमच्या पोलीस अधिकार्‍यांनी तुम्हाला सांगितले नसेल; पण तुमच्या एक-दोन कारागृहात आमचे सत्संगही चालायचे हो ! पोलिसांसाठी वेगळे व कैद्यांसाठी वेगळे असे सत्संगही आम्ही साधकांनी घेतले. त्यामुळे बराच लाभ झाल्याची प्रतिक्रियाही त्या वेळी पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्‍त केली होती. काँग्रेसवाल्यांनो, तुमच्या तथाकथित निधर्मीवादामुळे तुम्ही हिंदु पोलिसांना कायमच पाण्यात पहाता. त्यामुळे पोलिसांवर कायमच ताण असतो. सत्ता तुमच्या हातात असल्याने ते काही करू शकत नाहीत. तुमच्या हिटलरशाहीमुळे जे निराश होतात, ते आत्महत्या करतात; पण जे देवावर श्रद्धा ठेवणारे असतात, ते सनातनसारख्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली साधना करून मनाची स्थिरता टिकवून ठेवतात. काँग्रेसवाल्यांनो, असेच सत्संग आम्ही कारागृहातही घेऊ. त्यामुळे तुम्हाला `पोलिसांवरील ताण कमी करण्याचे’ कधीही न जमलेले कामही होईल. एकप्रकारे तुम्हाला मदतच होईल ना ! काँग्रेसवाल्यांनो, वीर सावरकरांनी हिंदु कैद्यांचे कारागृहात होणारे धर्मांतर रोखले होते. आम्ही कैद्यांना धर्मशिक्षण देऊन तेथे त्यांच्यात खरे हिंदुत्व, म्हणजेच साधकत्व निर्माण करण्याचा प्रयत्‍न करू, म्हणजे तुमच्या कारागृहातही साधनाच करू.

`केला पोत जरी बळेची खाले, ज्वाळा तरी ती वरती उफाळे’ या उक्‍तीप्रमाणे `सनातनवरील बंदी’ हीच वैचारिक क्रांतीची ठिणगी ठरेल !
काँग्रेसवाल्यांनो, भगतसिंगादी क्रांतीवीरांच्या अटकेनंतर क्रांतीची ज्वाला आणखी धगधगली. त्यातून होरपळल्याने गोर्‍या इंग्रजांना देश सोडून पळावे लागले, तसे काँग्रेसवाल्यांनो, सनातनच्या साधकांना अटक झाल्यानंतर हिंदूंमध्ये निश्चितच वैचारिक क्रांती करण्याचा उन्माद निर्माण होईल. त्यामुळे येत्या निवडणुकीत काळया इंग्रजांना, म्हणजेच तुम्हाला सत्ता सोडावी लागेल, हे सत्य जाणा !

काँग्रेसवाल्यांनो, साधकांच्या संघटित त्यागातून ईश्‍वरी राज्य निश्चितच येईल !
त्रेतायुगात राम वनवासाला निघाला असतांना त्याने राक्षसांनी खाल्लेल्या लाखो ऋषीमुनींच्या हाडांचे डोंगर पाहिले. त्यानंतर त्याने राक्षसांना नायनाट करून रामराज्य स्थापले. द्वापारयुगात श्रीकृष्णाने कंस, चाणूर, शिशुपाल, कौरव आदी असुरांच्या अपराधांचा घडा भरल्यानंतर महाभारत घडवले व धर्मराज्याची स्थापना केली. तसे काँग्रेसवाल्यांनो, कलीयुगात साधकांच्या संघटित त्यागातून ईश्‍वरी राज्य येईल, हे सुनिश्चित आहे. जितक्या लवकर तुम्ही आमच्यावर बंदी आणाल, तितक्या लवकर तुमची पापे भरतील व ईश्‍वर अवतार घेईल. आम्ही ईश्‍वरी अवताराचीच वाट पहात आहोत.

आम्ही प्रार्थना करतो विश्‍वमांगल्याची !
काँग्रेसवाल्यांनो, आम्ही साधक आहोत. आम्हाला तुमचे राज्य नको. आमचे ध्येय ईश्‍वरप्राप्‍ती आहे. आम्हाला ईश्‍वरी राज्य हवे आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासारखा खलनायकी विचार करू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही नेहमी संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांप्रमाणे विश्‍वमांगल्याची प्रार्थना करतो,
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।।
भुता परस्परे जडो । मैत्र्य जिवांचे ।।
दुरितांचे तिमीर जावो । विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ।।
जो जे वांछील, तो ते लाहो । प्राणीजात ।।

- सनातनचे हजारो साधक

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!