म्हणे मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात नागपूरमध्येही सनातनवर नजर !

सनातनविषयी अपप्रचार करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान करणार्‍या दैनिक सकाळचा निषेध !

दैनिक `सकाळ’च्या संकेतस्थळावर सनातनविषयी अपप्रचार !

नागपूर, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – मालेगावमधील बाँबस्फोटामागे सनातनच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूरमध्ये पोलिसांनी या संदर्भात चौकशी सुरू केली आहे. दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असलेल्या नागपुरात संघाचे मुख्यालय आहे. येथे बहुतांश हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकार्‍यांची निवासस्थाने आणि कार्यालये आहेत. त्यांत सनातनचाही समावेश आहे, असे आधारहीन व धादांत खोटे वृत्त दैनिक `सकाळ’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

(हाती कोणताही पुरावा नसतांना सनातनवर असा अश्लाघ्य आरोप करणार्‍या दैनिक `सकाळ’चा निषेध ! सनातनचे पदाधिकारी वगैरे कुणीही नाहीत. सनातनमध्ये वैयक्‍तिक आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी साधक येतात. सनातनमध्ये पदाधिकारीच नाहीत, तर अशी काही निवासस्थाने वा कार्यालये नागपूरमध्ये असण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही ! सनातनची बदनामी करणार्‍या दैनिक `सकाळ’वर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने सनातन वकिलांचा सल्ला घेत आहे. मालेगाव बाँबस्फोटात सनातन अथवा हिंदु जनजागृती समिती यांचा कोणताही संबंध नाही, असा निर्वाळा खुद्द दहशतवादविरोधी पथकाने दिला आहे. – संपादक) या वृत्तात पुढे म्हटले आहे, `सनातनशी संबंधित कार्यकर्त्यांना मालेगाव बाँबस्फोटाच्या अनुषंगाने अटक केल्याचे वृत्त मिळाल्यामुळे नागपूरमध्येही खळबळ उडाली. (निखालस खोटे वृत्त प्रसिद्ध करणारे दैनिक `सकाळ’चे संकेतस्थळ ! – संपादक)पोलिसांनी तातडीने सनातनच्या प्रतापनगरातील, तसेच अन्य ठिकाणच्या कार्यालयांकडे नजर वळवली आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांनी अधिक माहिती देण्याचे मात्र टाळले.’

सनातनचा तपास नाही ! – नागपूर पोलीस आयुक्‍त
मालेगाव येथील बाँबस्फोटाच्या संदर्भात सनातनची चौकशी सुरू असल्याच्या वृत्ताबाबत आज सनातनच्या नागपूर येथील साधकांनी पोलीस आयुक्‍तांची भेट घेतली असता “कोणत्याही बाँबस्फोटाच्या प्रकरणात सनातनचा तपास आमच्याकडे सुरू नाही”, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी साधकांकडून सनातनच्या कार्यालयांची माहिती घेतली व इतरही काही बाबींची चौकशी केली.

खानदेशमधील काही जिल्ह्यांत सनातनची चौकशी !
खानदेशमधील काही जिल्ह्यांत सनातनची चौकशी करण्याचा आदेश उच्चस्तरावरून प्राप्‍त झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. अकोल्यात सनातनच्या एका साधकाच्या भावाला सनातनचा साधक समजून पोलीस चौकशीसाठी त्याच्याकडे गेले; परंतु तो सनातनशी संबंधित नसल्याचे कळल्यावर ते परतले.

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

One Response to “म्हणे मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात नागपूरमध्येही सनातनवर नजर !”

  1. shashi Pawar Says:

    DAINIK SAAKAL CHA NISHED, DAINIK SAKAAL KON CHALAVTE HE SARV JAG JANTE, JE SWATAH MUSALMAN VA ATANKAWADI YANNA HINDU VIRODHI PROTSAHAN DETAT TECH SANATAN SARKHYA HINDUTVAVADI DAINIK VAR AASE AAROP KARTAT


Leave a Reply