काँग्रेस सरकारला `सनातन प्रभात’ची भीती का वाटते ?

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत `सनातन प्रभात’वर बंदी घालण्याच्या विषयाची चर्चा होणार असल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. श्री. शरद पवार व श्री. रा.रा. पाटील यांनी `सनातन प्रभात’बद्दल गेले काही दिवस जे वातावरण निर्माण केले आहे, ते पहाता भारताला इंडीयन मुजाहिदीन, हुजी, लष्कर-ए-तोयबा, सिमी यांसारख्या इस्लामी दहशतवादी संघटनांपासून नव्हे, तर राष्ट्र व धर्म यांसाठी कार्य करणार्‍या `सनातन प्रभात’पासून अधिक धोका आहे, असा भास कोणालाही होईल.

एका बाजूला इस्लामी दहशतवाद व नक्षलवाद बोकाळत असतांना आमचे मंत्री-संत्री सनातन प्रभातवर बंदी आणण्याच्या चर्चेत स्वत:चा बहुमोल वेळ वाया घालवणार, याचे आम्हाला वैषम्य वाटते. आम्हाला राहूनराहून एकच प्रश्‍न सारखा भेडसावतो तो हा की, आठ लाख खडे सैन्य असलेल्या काँग्रेस सरकारला जेमतेम १५ हजार (तोही केवळ महाराष्ट्रात) खप असलेल्या `सनातन प्रभात’ची इतकी भीती का वाटावी ?

 

आपल्याला काय वाटते ? आम्हाला प्रतिक्रिये द्वारे अवश्य कळवा

 

धर्माभिमानी हिंदूंना आवाहन : सनातनवरील बंदीच्‍या विरोधात आवाज उठवा!

काँग्रेस सरकार `दैनिक सनातन प्रभात’वर बंदी घालण्यास इतके उतावीळ झाले आहे की, कदाचित हा आमचा शेवटचा संदेश असेल. `दैनिक सनातन प्रभात’चा उद्याचा अंक येईल कि नाही, हे माहीत नाही. सद्यस्थितीत कोणावरही बंदी आणली, तरी ती एका हिंदु संघटनेवर असल्यामुळे त्याचे दु:ख सर्वांनाच असेल; पण त्यातूनही ती बंदी `सनातन प्रभात’वर कोसळली, तर आमचे हजारो हिंदु बांधवांशी होणारे रोजचे संभाषण बंद होईल. `सनातन प्रभात’ने हिंदु बांधवांसाठी केलेल्या कार्यामुळे हजारो हिंदु बांधवांची रोजची व्यष्टीच नव्हे, तर समष्टी साधनेची सुरुवातही `सनातन प्रभात’मधील विचारांनी होते. बंदीनंतर हा विचारांचा ओघ खंडित होईल व हजारो हिंदु बांधवांची स्थिती महापुरात अडकल्याप्रमाणे दिशाहीन होईल. वाचकांनो, आम्ही कधीच अर्थलाभासाठी `दैनिक सनातन प्रभात’चा वापर केला नाही. हिंदूंमध्ये जागृती व्हावी, हिंदु समाज बलसंपन्न व्हावा व ईश्‍वरी राज्याच्या रूपाने लागणारी मधुर फळे हिंदु समाजाला चाखता यावीत, हाच आमचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री : मुख्यमंत्री, मंत्रालय, मुंबई-३२, महाराष्ट्र

दूरध्‍वनी क्रमांक : (022) 2202-5151,5222

chiefminister@maharashtra.gov.in

निषेधाचे पत्र पाठवण्‍यासाठी खालील मार्गिकेवर संपर्क साधा.

http://www.sanatan.org/en/08/index.html

वाचा `सनातन’वर बंदी विशेष 

http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/bandi/

 

2 Responses to “काँग्रेस सरकारला `सनातन प्रभात’ची भीती का वाटते ?”

  1. shashi Pawar Says:

    CONGRESS LA SANATANCHI BHITI VATNAARCH, CONGRESS CHE SHAMBHAR AAPRADH BHARLE AAHET…….JHASHI DHWAPAR YUGAT KANSALA BHAGWAN SHRIKRUSHNACHI SATAT BHITI VATAV HOTI TASHICH CONGRESS LA SANATAN CHI BHITI VATAT AAHE, JHASE KANSA SWAPNAT HI SHRIKRUSHNA DISAT HOTE TASECH CONGRESSCHYA NETA MANDALILA SANATAN DISAT AAHE….
    KANSACHA AANT NIKAT AALA ASTANNA TYACHI HI AAWASTHA HOTI KADACHI TASHICH AAWASTH CONGRESS CHI JHALI AAHE

  2. deepak patil Says:

    please a join me hindu
    desh Bhakat .


Leave a Reply