सनातनविषयी अपप्रचार करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान करणार्या दैनिक सकाळचा निषेध !दैनिक `सकाळ’च्या संकेतस्थळावर सनातनविषयी अपप्रचार !नागपूर, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – मालेगावमधील बाँबस्फोटामागे सनातनच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूरमध्ये पोलिसांनी या संदर्भात चौकशी सुरू केली आहे. दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असलेल्या नागपुरात संघाचे मुख्यालय आहे. येथे बहुतांश हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकार्यांची निवासस्थाने आणि कार्यालये आहेत. त्यांत सनातनचाही समावेश आहे, असे आधारहीन व धादांत खोटे वृत्त दैनिक `सकाळ’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. (हाती कोणताही पुरावा नसतांना सनातनवर असा अश्लाघ्य आरोप करणार्या दैनिक `सकाळ’चा निषेध ! सनातनचे पदाधिकारी वगैरे कुणीही नाहीत. सनातनमध्ये वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी साधक येतात. सनातनमध्ये पदाधिकारीच नाहीत, तर अशी काही निवासस्थाने वा कार्यालये नागपूरमध्ये असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! सनातनची बदनामी करणार्या दैनिक `सकाळ’वर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने सनातन वकिलांचा सल्ला घेत आहे. मालेगाव बाँबस्फोटात सनातन अथवा हिंदु जनजागृती समिती यांचा कोणताही संबंध नाही, असा निर्वाळा खुद्द दहशतवादविरोधी पथकाने दिला आहे. – संपादक) या वृत्तात पुढे म्हटले आहे, `सनातनशी संबंधित कार्यकर्त्यांना मालेगाव बाँबस्फोटाच्या अनुषंगाने अटक केल्याचे वृत्त मिळाल्यामुळे नागपूरमध्येही खळबळ उडाली. (निखालस खोटे वृत्त प्रसिद्ध करणारे दैनिक `सकाळ’चे संकेतस्थळ ! – संपादक)पोलिसांनी तातडीने सनातनच्या प्रतापनगरातील, तसेच अन्य ठिकाणच्या कार्यालयांकडे नजर वळवली आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकार्यांनी अधिक माहिती देण्याचे मात्र टाळले.’ सनातनचा तपास नाही ! – नागपूर पोलीस आयुक्त खानदेशमधील काही जिल्ह्यांत सनातनची चौकशी ! |
निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!


