दहशतवाद्यांचा समर्थक असलेल्या समाजवादी पक्षावर बंदी घालण्याची मागणी करणार्या शिवसेनाप्रमुखांचे अभिनंदन !
मुंबई, २० ऑक्टोबर (वार्ता.) – दिल्लीतील बाँबस्फोटांमधील आरोपी जामियानगरच्या बाटला हाऊसमध्ये लपले होते. पोलिसांनी जिवावर उदार होऊन कारवाई केली. जे आरोपी तिकडे पकडले गेले, त्यांतील काहीजण समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते निघाले. खरेतर या एकाच कारणाबद्दल समाजवादी पक्षावर कडक कारवाई करून, त्यांच्या कार्याची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत.
बजरंग दल व सनातन यांसारख्या संस्थांवर बंदी, वगैरे घालण्याची भाषा अधूनमधून काँग्रेससह ही सर्व भंपक मंडळी करत असतात ना मग त्याच कारणासाठी त्या `सप’वर कारवाई का करत नाही ? `सप’वर नुसती कारवाई नको, तर अशा धर्मांध पक्षावर बंदीच घालायला हवी, असे सडेतोड विचार शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक `सामना’मधील संपादकीय लेखातून शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी मांडले आहेत. त्यांनी पुढे म्हटले आहे, “सप’वर बंदी घातली, तरच हा देश सुखी होईल. हिंदु संघटनांना एक न्याय व धर्मांध मुसलमानांची थुंकी झेलणार्या `सप’सारख्या पक्षांना दुसरा न्याय ! हा काय मामला आहे ? राष्ट्रद्रोही महंमद अफझलची वकिली करण्यातही हे `सप’वाले जास्त आघाडीवर आहेत. महंमद अफझलला `दया’ किंवा `मानवता’ दाखवणे, हाच जर या मंडळींचा राष्ट्रधर्म असेल, तर मग हिंदुस्थानच्या शालेय पुस्तकांत इतिहासाचे धडे बदलावे लागतील व शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, कान्हेरे, पिंगळे, अश्फाकउल्ला खां व मौलाना आझाद यांना `लुटारू’ ठरवून महंमद अफझललाच इतिहासाच्या पानावर `योद्धा’ व `क्रांतीकारक’ म्हणून स्थान द्यावे लागेल. मुसलमानांच्या खुषमस्करीसाठी आता हे एवढेच करणे उरले आहे व उद्या `सप’सारखा `जीनावादी’ पक्ष अशा प्रकारची मागणी करायलाही कमी करणार नाही.”
|
October 21, 2008 at 2:46 pm
shivsena pramukh aahet mahnun aaj maharashtra madhye hindutva tikun aahe, Nahi tar Abu Azmi sarkhe gazni che vansahjanni ya rajyat sarvannachi sunnat keli asti. Khare tar Bajrang dal va sanatan hindutva tikave ya sathi prayatna karat aahet, pan samajvadi paksha aapli vote bank vachavnya sathi musalmanna na tyanchya rashtradrohi karvayanmadhye madat karat aahe va protsahan hi karat aahe. Sarkar la thodi jari aakal asel tar samajvadi pakshavar bandi ghalavi.