हिंदु संत ! ख्रिस्ती संत !!

ख्रिस्ती संतांचा उदोउदो व हिंदु संतांना तुरुंगवास अशी सापत्‍न वागणूक देणारे काँग्रेसचे राज्यकर्ते म्हणे निधर्मी !

 

 

केरळ येथील नन अल्फोन्सा यांना नुकतेच व्हॅटिकन चर्चने मरणानंतर संतपद बहाल केले. `भारतात अल्फोन्सा यांच्याशिवाय आतापर्यंत कोणी संतच झाले नाहीत’, अशा थाटात काँग्रेस सरकारने या घटनेचे स्वागत केले. नेहमीच हिंदु संतांकडे वाकड्या नजरेने पहाणारी प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे यांनीही या घटनेला ठळक प्रसिद्धी दिली.

 

अल्फोन्सा यांना संतपद बहाल करण्यासाठी व्हॅटिकन चर्चने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी काँग्रेस सरकारने केंद्रीय कामगारमंत्री ऑस्कर फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ पाठवले. व्हॅटिकन येथे आयोजित कार्यक्रमाला केरळमधील साम्यवादी सरकारचे सार्वजनिक बांधकाममंत्री मोन्स जोसेफ हे जातीने उपस्थित होते. ख्रिस्तीधर्मानुसार एखाद्या व्यक्‍तीला संतपद बहाल करण्यासाठी मरणानंतर सदर व्यक्‍तीच्या संदर्भात इतरांनी काही चमत्कार अनुभवणे आवश्यक आहे. हे चमत्कार व्हॅटिकन चर्चच्या पोपने मान्य केल्यानंतरच सदर व्यक्‍तीला संतपद बहाल केले जाते. अल्फोन्सा यांच्या `सिमेट्री’समोर एका आजारी मुलाच्या आईने त्याची प्रकृती सुधारण्याबाबत प्रार्थना केली. त्यानंतर तिचा मुलगा बरा झाला. हा चमत्कार पोप यांनी मान्य केल्यानंतर अल्फोन्सा यांना संतपद बहाल करण्याचा निर्णय व्हॅटिकन चर्चने घेतला. तसे पाहिले तर, गोवा राज्यात हजारो हिंदूंवर अत्याचार करणारा झेव्हीयर यालाही व्हॅटिकन चर्चने संतपद बहाल केले होते. त्यामुळे व्हॅटिकन चर्चचे संतपद बहाल करण्याचे निकष काय आहेत, हे चर्चच जाणे. येथे सांगायचा मुद्दा हाच की, भारत ही संतांची भूमी आहे. या पवित्र भूमीवर हजारो संत व ऋषी होऊन गेले व आजही शेकडो संत हयात आहेत. यातील बहुतांश संतांनी चमत्कार दाखवलेले नाहीत. असे असूनही हिंदु धर्माने त्यांचे सामर्थ्य ओळखले व त्यांचा आदर-सत्कार केला. अल्फोन्सा यांना संतपद बहाल करण्याच्या कार्यक्रमातून ख्रिस्तीधर्माचा खुजेपणा व हिंदु धर्माची महानता पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. तसेच काँग्रेस व साम्यवादी यांच्या हिंदुद्वेषाची पुन्हा एकदा प्रचीती आली.

काँग्रेस व साम्यवादी यांच्याकडून ख्रिस्ती संतांना मान-सन्मान व हिंदु संतांचा अपमान !
अल्फोन्सा यांना संतपद जाहीर होताच केंद्रातील काँग्रेस सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक नाणे काढण्याची घोषणा केली. काँग्रेस सरकारच्या राज्यात ख्रिस्तीसंतांना मान-सन्मान मिळतो; मात्र हिंदु संतांचा अपमान करून त्यांना झिडकारले जाते. तुकाराम महाराजांनी जेथे साधना केली, तो भामचंद्र डोंगर विकण्याचा घाट महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने घातला. त्याला विरोध करणार्‍या ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अटक करण्याचे कुकर्म `संतांची भूमी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने केले. ओरिसामध्ये स्वामी लक्ष्मणानंद यांची ख्रिस्तीमाओवाद्यांनी हत्या करून अनेक महिने उलटले; मात्र त्यांच्या मारेकर्‍यांना गजाआड घालण्यासाठी काँग्रेस सरकारने काहीही पावले उचललेली नाहीत. स्वामी लक्ष्मणानंद यांच्या ठिकाणी जर ख्रिस्तीसंत असते, तर काँग्रेस सरकारने आकाश-पाताळ एक करून त्यांच्या मारेकर्‍यांना शोधून त्यांना शासन दिले असते ! काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या संगतीमुळे पूर्णपणे िख्र्तासळलेल्या काँग्रेस सरकारला हिंदु धर्म, देवता व संत यांचे वावडे आहे, हे या सर्व घटनांतून स्पष्ट होते. साम्यवादी हे धर्माला अफूची गोळी समजतात; मात्र साम्यवादी हा मुद्दा केवळ हिंदु धर्मियांसाठीच लागू करतात. साम्यवाद्यांच्या राज्यात हिंदूंच्या संतांवर अनन्वित अत्याचार होत असल्याच्या अनेक घटना आहेत. नुकतेच साम्यवाद्यांच्या बंगालमध्ये स्वामी पुण्यलोकानंद यांच्यावर माकपच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला. त्यांना एका झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. केरळमध्येही साम्यवादी कार्यकर्त्यांनी संतांचे आश्रम तसेच इमारती यांना लक्ष्य केले आहे. हिंदूंच्या संतांबद्दल द्वेषाने पछाडलेल्या साम्यवाद्यांच्या केरळ राज्यात अल्फोन्सा यांना संतपद बहाल केल्याच्या प्रीत्यर्थ अनेक ठिकाणी भव्य मिरवणुकाही काढल्या गेल्या. साम्यवादी व काँग्रेस यांच्या डोळयांत फक्‍त हिंदु धर्मीय खुपतात; मात्र ख्रिस्तीव मुसलमान यांच्याबद्दल त्यांचे प्रेम उतू जाते, हे हिंदूंनी या प्रकरणातून लक्षात घ्यावे.
स्वामी श्रद्धानंद यांची हत्या करणारा अब्दुल रशीद याचा मोहनदास करमचंद गांधींनी रशीदभाई म्हणून सन्मान केला. हिंदूंच्या संतांना अशा प्रकारे अपमानित करण्याची परंपरा गांधींनी काँग्रेसला घालून दिली. तीच परंपरा गांधींचे वंशज आज भारतात चालवत आहेत. हिंदूंनो, अल्फोन्सा प्रकरणातून बोध घेऊन काँग्रेस व साम्यवादी यांचे खरे स्वरूप ओळखून त्यांच्याशी दोन हात करण्यास सिद्ध व्हा !

 

  निगडीत वृत्त : हिंदू धर्माच्या मूळावर उठलेले लोकप्रतिनिधी

Leave a Reply