सरकारवर दबाव आणण्यासाठी मुसलमान नगरसेवकांना राजीनामे देण्यास भाग पाडणार्या मुसलमानांकडून हिंदू कधी शिकणार ?
धुळे येथील दंगलीचे प्रकरण
संभाजीनगर, १३ ऑक्टोबर – धुळे येथे नुकत्याच झालेल्या दंगलीनंतर मुसलमान समाजाकडून येणार्या दबावामुळे येथील ४ नगरसेवकांनी आज राजीनामे दिले. राजीनामा दिलेल्या नगरसेवकांत १ अपक्ष, तर ३ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश आहे.
सदर नगरसेवकांनी राजीनामे देण्यापूर्वी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. मनमोहनसिंह ओबेराय यांच्यासोबत बैठकही झाली. त्यानंतरही नगरसेवक आपल्या मतावर ठाम राहिल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे दंगलीत हिंदु व मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करणार्या कारवाया केल्याच्या प्रकरणीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या या तीन नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात आले, असेही वृत्त असल्याने नागरिकांत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे यास्मीन शेख, जावेद कुरेशी व मुजीब अलमशहा, तर अपक्ष नगरसेवक निसारशहा यांनी आज महापालिका आयुक्तांकडे आपले राजीनामे सादर केले. (हिंदूंनो, मुसलमान लोकप्रतिनिधींना आपल्या तालावर नाचवणार्या संघटित मुसलमानांपासून बोध घ्या ! आपण संघटित नसल्याने जन्महिंदू लोकप्रतिनिधी आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या. – संपादक)
|