पत्रकार परिषदेत दैनिक `लोकसत्ता’चे पत्रकार श्री. बंधुराज लोणे यांनी विचारलेल्या प्रश्नांची श्री. वर्तक यांनी दिलेली उत्तरे
श्री. बंधुराज लोणे : तुम्ही प्रसिद्ध केलेल्या बंदीच्या अंकात पत्रकाराच्या जातीचा उल्लेख करण्याची आवश्यकता काय होती ?
श्री. वर्तक : हो. आम्ही तसा उल्लेख केला
आहे. मुळात जातीचा उल्लेख करण्यामागे काही विशेष हेतू असण्याचे कारण नाही; मात्र काही ठिकाणी हेतूपुरस्सर सनातनच्या संबंधात बातम्या प्रसारित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
श्री. लोणे : परंतु श्री. रा.रा. पाटील यांनी मुलाखतीमध्ये तसे वक्तव्य केले आहे. पत्रकाराने तसे लिहिले आहे, असेही नाही.
श्री. वर्तक : तुम्ही नंतर वैयक्तिक भेटल्यास मी तुम्हाला याबाबत सविस्तर सांगू शकीन.
(याबाबतची सनातनची भूमिका)
पत्रकारांना केवळ पत्रकारिता हा एकच धर्म असतो. त्यांना विशिष्ट धर्माशी काही देणेघेणे नसते. असे असतांना सनातनच्या विरोधातील सर्व बातम्या मुसलमान पत्रकारांनी त्यांच्या वर्तमानपत्रांत छापून आणण्यासाठी पुढाकार घेतला, ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. आम्ही वर्तमानपत्रांतून तसे छापणे गैर असले, तरी विशिष्ट धर्मीय पत्रकार त्यांच्या धर्माशी बांधीलकी ठेवून सनातनविरोधी भूमिका मांडत आहेत, ही बाजू मांडली जाणे गरजेचे होते. हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष्य करण्यासाठी मुसलमान पत्रकार स्वत:ची लेखणी झिजवतात; पण हिंदुत्ववाद्यांवर होणारा अन्याय मांडण्यासाठी हजारो हिंदु पत्रकारांपैकी एकही स्वत:ची लेखणी उचलत नाही. त्यासाठी वृत्तामध्ये `मुसलमान’ हा उल्लेख करण्यात आला होता; तथापी कोणाच्याही भावना दुखावणे किंवा पत्रकारांना जातीवरून लक्ष्य करणे, हा त्यातील हेतू नव्हता. – संपादक
मुंबई, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या बाँबस्फोटाचे निमित्त करून `सनातन’वर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार व महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी केली आहे. निवडणुका जवळ आल्याने राजकीय सोय पाहून मतांच्या राजकारणासाठी `सनातन’सारख्या हिंदूंच्या आध्यात्मिक व राष्ट्रप्रेमी संघटनेचा राजकीय बळी देण्याचे हे षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी आज प्रेस क्लब येथील पत्रकार परिषदेत केले.
ते पुढे म्हणाले, “अहमदाबाद येथील बाँबस्फोटांचा मुख्य सूत्रधार अबू बशर याला अटक केल्यानंतर काँग्रेसचे रामनरेश यादव, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, अकबर अहमद व जामा मशिदीचे इमाम बुखारी आदींची रांग बशर याच्या घरी लागली. येथे २ हजार लोकांचा मोर्चा काढून प्रक्षोभक भाषणे करण्यात आली. त्या वेळी सरकारने त्यांच्या विरोधात काही कारवाई केली नाही. दुसरीकडे बाँबस्फोटात सनातनचे लोक पकडल्यानंतर काही तासांतच आम्ही त्याचा निषेध केला. मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेऊन स्फोटाच्या कृत्याचा निषेध केला. पोलिसांनाही चौकशीत सर्वतोपरी सहकार्य केले. या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींनी सदर कृत्याशी सनातन संस्थेचा काहीएक संबंध नसल्याचे सांगितल्याचे पोलिसांनीच पत्रकार परिषदेत म्हटले. तरीही बाँबस्फोट करणार्या बशरसारख्यांच्या पाठीशी रहाणार्यांना मोकळीक व त्याचा निषेध करणार्या सनातनसारख्यांवर बंदीची तलवार, अशी अन्याय्य भूमिका सरकारकडून हिंदूंच्या संघटनांबाबत घेतली जात आहे. देशभरात ठिकठिकाणी झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी आपल्या राज्याचे गौरवशाली पोलीसदल राष्ट्रघातकी मुसलमान दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणात पकडत आहे; मात्र यामुळे मुसलमान समाजात वाढत असलेली नाराजी लक्षात घेऊन ती दूर करण्यासाठी `आम्ही हिंदूंच्या सनातन संस्थेवरही बंदी घालत आहोत’, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सनातन संस्था ही धर्मप्रसाराचे कार्य करणारी संस्था आहे. तिच्यावर बंदी म्हणजे धर्मप्रसारावर बंदी हे लक्षात घेतले पाहिजे.” सनातनच्या कार्याविषयी श्री. वर्तक यांनी सांगितले, “सनातन संस्था गेली १८ वर्षे समाज, राष्ट्र व धर्म यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. सनातनने धर्मरक्षणासाठी कायमच सनदशीर मार्गाने आंदोलने केली आहेत. तसेच बालसंस्कारवर्ग, प्रथमोपचार, अमली पदार्थविरोधी मोहीम, आदिवासींना कपडे वाटप, मोफत नेत्रचिकित्सा व चष्मेवाटप शिबिरे, रक्तदान शिबिरे, पोलीस व सैन्यातील जवान यांच्यासाठी ताणतणाव नियंत्रण वर्ग, जत्रा सुनियोजन मोहीम, राष्ट्रध्वजाचा सन्मान मोहीम, धार्मिक उत्सवांतील गैरप्रकारांच्या विरोधातील मोहीम, वृक्षारोपण आदी अनेक समाजोपयोगी उपक्रम संस्था विनामूल्य राबवत आहे. याउपरही संस्थेला एका भलत्याच कृत्यासाठी जबाबदार ठरवून तिच्यावर बंदी घालण्याची मागणी करतांना या गेल्या १८ वर्षांच्या प्रदीर्घ काळातील समाजसेवेकडे कानाडोळा का केला जात आहे ? इतकेच नव्हे, तर जबाबदार पदांवर असणारी आमची नेतेमंडळी सनातन संस्थेसारख्या राष्ट्रभक्त व राष्ट्रप्रेमी संघटनेची सिमीसारख्या राष्ट्रद्रोही व दहशतवादी संघटनेबरोबर तुलना करून आपण मतांसाठी कुठल्या थराला जाऊ शकतो, हे सिद्ध करत आहेत.” ईश्वरी पाठबळ, संतांचे आशीर्वाद व हिंदूंचे प्रेम यांच्या आधारे कार्य करणार्या सनातनवर बंदी घालण्याच्या राजकीय षड्यंत्राला आम्ही भीत नाही. जर येनकेन प्रकारेण बंदी आणण्याचा प्रयत्न झालाच, तर त्याला सर्व हिंदूंकडून कडाडून विरोध होईल व येत्या निवडणुकीत त्याचा मोठा राजकीय
परिणाम झाल्याशिवाय रहाणार नाही, असेही श्री. वर्तक यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “काँग्रेसचे नेते महंमद सुरती यांना १९९३ च्या बाँबस्फोट प्रकरणात २० वर्षांची कैद झाली आहे. पिंपरी यथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांच्यावर १७ गुन्हे आहेत. त्यांत ३ खुनाचे व काही महिलांवर अत्याचार केल्याचे आहेत. त्यांची दिल्ली बाँबस्फोटांतील आरोपींना मदत केल्याच्या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाकडून चौकशी करण्यात आली. यावरून या पक्षांवरही कारवाई व्हावी, असे आम्ही म्हणावे का ? आज संसदेत १०० हून अधिक खासदारांवर गुन्हेगारीचे आरोप आहेत. ही संसदेची कुचेष्टाच आहे.” `सनातन प्रभात’विषयी ते म्हणाले, “संस्थेच्या मुखपत्रावरही आक्षेप घेण्यात येत आहे. आमचे मुखपत्र सत्यच छापते. सत्य हे बोचरे असते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची भाषा केली जात आहे.”
हिंदुस्थानात हिंदूंना नष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न ! – सौ. वर्षा ठकार
बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असल्याची माहिती `लज्जा’ या कादंबरीच्या माध्यमातून जगासमोर उघडकीस आणणार्या बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांना भारतातूनही हद्दपार करण्यात आले. जगात मुसलमानांची ५२ राष्ट्रे आहेत. उर्वरित सर्वांत जास्त देश ख्रिस्त्यांचे आहेत. हिंदुराष्ट्र असणारे एकमेव नेपाळ आता धर्मनिरपेक्ष झाले आहे. जगात केवळ हिंदुस्थान हिंदुबहुल असतांना येथेही राज्यकर्ते त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानमध्ये मुशर्रफच्या विरोधात जनता एकत्र झाली, तसे भारतात झाले पाहिजे, असे सनातन संस्थेच्या महिला समन्वयक सौ. वर्षा ठकार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
क्षणचित्र
एका पत्रकाराने श्री. अभय वर्तक यांच्या पत्रकार परिषदेत विषय मांडण्यावरून मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांपेक्षा श्री. वर्तक यांनी परिणामकारक व उत्कृष्टपणे मुद्दे मांडले. भविष्यात ते या संघटनांच्या नेत्यांच्या पुढे जातील व सरकारला पुरून उरतील. त्यांच्या शब्दांमध्ये धार आहे.”
पत्रकार परिषदेस पुढील वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्या यांचे प्रतिनिधी उपस्थित होते -
इंग्रजी दैनिक `हिंदुस्थान टाइम्स’, `इंडीयन एक्स्प्रेस, `पीटीआय’, `सकाळ टाइम्स’, दैनिक `एशीयन एज’, मराठी दैनिक `लोकसत्ता’, दैनिक `गावकरी’, दैनिक `प्रहार’, दैनिक `तेजस्वी महाराष्ट्र’, दैनिक `निर्भीड लेख’, दैनिक `वृत्त’, दैनिक `व्हीजन मुंबई’, दैनिक `दहिसर सत्ता टाइम्स’, हिंदी दैनिक `खबरे आजतक’, दैनिक `पहला समाचार’, दैनिक `उर्दू टाइम्स’, वृत्तवाहिनी `सह्याद्री’, `व्हाईस ऑफ इंडिया न्यूज’, `इंडिया न्यूज’, `एन्डीटीव्ही’, `सीएन्एन्-आयबीएन्’, `न्यूज २४’, `झी २४ तास’, `ई-टीव्ही’, `सन नेटवर्क’ व `एन्एम्टीव्ही’
धर्माभिमानी हिंदूंना आवाहन : सनातनवरील बंदीच्या विरोधात आवाज उठवा!
काँग्रेस सरकार `दैनिक सनातन प्रभात’वर बंदी घालण्यास इतके उतावीळ झाले आहे की, कदाचित हा आमचा शेवटचा संदेश असेल. `दैनिक सनातन प्रभात’चा उद्याचा अंक येईल कि नाही, हे माहीत नाही. सद्यस्थितीत कोणावरही बंदी आणली, तरी ती एका हिंदु संघटनेवर असल्यामुळे त्याचे दु:ख सर्वांनाच असेल; पण त्यातूनही ती बंदी `सनातन प्रभात’वर कोसळली, तर आमचे हजारो हिंदु बांधवांशी होणारे रोजचे संभाषण बंद होईल. `सनातन प्रभात’ने हिंदु बांधवांसाठी केलेल्या कार्यामुळे हजारो हिंदु बांधवांची रोजची व्यष्टीच नव्हे, तर समष्टी साधनेची सुरुवातही `सनातन प्रभात’मधील विचारांनी होते. बंदीनंतर हा विचारांचा ओघ खंडित होईल व हजारो हिंदु बांधवांची स्थिती महापुरात अडकल्याप्रमाणे दिशाहीन होईल. वाचकांनो, आम्ही कधीच अर्थलाभासाठी `दैनिक सनातन प्रभात’चा वापर केला नाही. हिंदूंमध्ये जागृती व्हावी, हिंदु समाज बलसंपन्न व्हावा व ईश्वरी राज्याच्या रूपाने लागणारी मधुर फळे हिंदु समाजाला चाखता यावीत, हाच आमचा उद्देश आहे.
खाली दिलेल्या संगणकीय पत्त्यावर तुम्ही निषेधाचे पत्र पाठवू शकता.
मुख्यमंत्री :
मुख्यमंत्री,
मंत्रालय, मुंबई-३२, महाराष्ट्र
दूरध्वनी क्रमांक : (022) 2202-5151,5222
chiefminister@maharashtra.gov.in
निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!




October 14, 2008 at 8:56 am
sanatan sanstha dharma va rashtra sathi talmaline karya karnari ekmev sanstha aahe…. majhi sarvanna vinanti aahe ki tyani
सनातनवरील बंदीच्या विरोधात आवाज उठवा!
va
Mukhyamantri sahebanna nishedhache patra pathvave….
Vareel link var click karoon patra pathvave……
Hindutva sathi , Hindu Rashtra sathi Sarvanni milun prayatna karuya
October 14, 2008 at 9:32 pm
Shivsena should locate perfect hindu kattarvaadi many many people and tell them to be converted into Muslim & Christian. Then they should spread the knowledge of Hinduism which will be very strong. He should always speak and preach about VEDAS but his name should be Mohmmad Aasif. Like wise from Christians religion, they should speak about VEDAS but his name should be Thomas. This way they will be able to spread Vedic knowledge in a easy way.