हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी धर्मांध मुसलमान दंगली घडवून हिंदु धर्मावर आघात करण्याचे दुष्कृत्य वर्षानुवर्षे करत आहेत. यंदा ऐन नवरात्रीत ठाण्यातील राबोडी परिसरात व धुळे शहरात धर्मांध मुसलमानांनी दंगली घडवल्या. गत वर्षीही नवरात्रीत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात देवीच्या मिरवणुकीवर हल्ला करून धर्मांधांनी दंगल घडवली होती. या घटनेला आता एक वर्ष उलटले, तरी त्या घटनेतून हिंदू शिकले नाही. त्यातून शिकून हिंदु समाजाने सुधारण्याचा प्रयत्न केला असता, तर कदाचित तशाच प्रकारच्या व आता दैनंदिन घडू लागलेल्या घटनांची पुनरावृत्ती टळू शकली असती आणि ठाणे व धुळे येथील दंगलींमध्ये हिंदूंची ससेहोलपट झाली नसती ! मुसलमानी आक्रमणांचा प्रतिकार ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत धुळे येथे झालेल्या दंगलीचा धावता घटनाक्रम येथे देत आहोत. निद्रिस्त हिंदूंनी त्यातून शिकावे, हाच यामागील एकमेव उद्देश.
रविवार ५ ऑक्टोबर (आश्विन शुद्ध षष्ठी)
* हिंदु रक्षक समितीच्या दहशतवादाच्या विरोधातील जाहीर सभेच्या जाहिरात फलकांवर साबीर शेख भंगारवाला याच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने जमलेल्या धर्मांध मुसलमानांची दगडफेक व त्यानंतर `अल्ला हो अकबर’च्या घोषणा
* मुसलमानांनी नवरात्रीचे फलकही फाडले.
* ३ जण ठार (पैकी १ हिंदु, दोघे कोण, ते कळले नाही.)
* जखमींच्या संख्येचा प्रत्यक्षदर्शी हिंदुत्ववाद्यांनी सांगितलेला आकडा १ हजार २००, शासकीय आकडा – ९७ जखमी, ७ गंभीर जखमी
* दंगलीमुळे दहशतवादाच्या विरोधातील सभा रद्द करण्याचा निर्णय
* अँसिडचे फुगे, स्पिरीटच्या बाटल्या, गॅस सिलेंडर, रॉकेल, दगड व विटा यांच्या साहाय्याने मुसलमानांचा हिंदूंवर हल्ला
* मुसलमानांचा तीन मंदिरांवर हल्ला
* हिंदूंकडून मशिदींची तोडफोड
* अनेक वाहने पेटवली
* धर्मांधांकडून दुकानांमध्ये लुटालूट
* हिंदु, वाहने व पोलीस यांवर मुसलमानांकडून तुफान दगडफेक
* मुसलमानांकडून काही ठिकाणी गलोलने दगडफेक (त्यांच्याजवळ धार असलेले दगड तयार होते व मारतांना ते दगड फिरवून मारत होते, त्यामुळे दगड लागणारा हमखास जखमीच होत होता.)
* पाचकंदिल भागात दंगल भडकली
* अतिरिक्त जिल्हाधिकारी एम्.वाय. पाटील दंगलीत जखमी
* पोलीसबळाचा अत्यंत अभाव आणि पोलिसांची कुमक शेजारील शहरांतून व राज्यांतून मागवली, शीघ्र कृती दल, राखीव पोलीस दल, राज्य राखीव दल मागवले
* परिथिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर
* हिंदूंनी पोलिसांना सांगितले, “बंदुकीचा वापर करा, नाहीतर आम्हाला द्या.’ त्यावर पोलिसांनी सांगितले, “आम्हाला तसे आदेश नाहीत.”
* धुळयात संचारबंदी लागू
* सिमीच्या युसुफचा कट असल्याचा मुंबई पोलिसांचा कयास
सोमवार ६ ऑक्टोबर (आश्विन शुद्ध सप्तमी)
* सलग दुसर्या दिवशीही मुसलमानांचे हिंदूंवर हल्ले सुरूच
* पोलिसांचे नियोजन व नियंत्रण पूर्णत: कोलमडले, त्यामुळे परि*थिती पोलिसांच्या हाताबाहेर
* दंगलीचे लोण नागाव, वणी, अंबोली अशा शेजारील छोट्या छोट्या गावांत पसरले
* मालेगावहून धर्मांध मुसलमानांना बोलावून घेण्यात आले. त्यामुळे स्थानिक मुस्लिमांचा जोर वाढला आणि मोगलाईचा थरारच धुळयातील हिंदूंनी अनुभवला.
* मुसलमानांनी ठिकठिकाणी अँसिडचे बाँब फेकले
* नंग्या तलवारी, गावठी कट्टे नाचवत अनेक हिंदूंची घरे लुटली आणि अत्यंत आक्रमक व निर्घृणपणे हिंदूंच्या वस्त्यांवर हल्ले. रात्रीच हल्ले सुरू केले
* अँसिड बॉँब, गॅस सिलेंडर, टोकदार दगड यांनी भरलेला ट्रॅक्टरच मुसलमानांच्या मदतीसाठी शहरातून फिरवण्यात येत होता.
* मुसलमानांनी घरांत घुसून हिंदु स्त्रिया व मुली यांची छेड काढली आणि त्यांना बेदम मारहाणही केली, पुरुषांनाही मारहाण केली.
* अनेकांनी आपल्या बायकामुलांना घेऊन पळ काढला व कसाबसा जीव वाचवला.
* गजानननगर वस्तीतील २०० हिंदूंनी बायकामुलांसह नेसत्या वस्रानिशी पलायन करून अरिहंत मंगल कार्यालयात आश्रय घेतला
* धर्मांध मुसलमान घरातून हिंदूंना जबरदस्तीने खेचून काढत होते. जे घरातून बाहेर निघू शकले नाहीत, ते बचावले. पाच-सहा तास हिंदूंनी स्वत:ला घरात कोंडून घेतले
* हिंदूंच्या घरांवर हल्ले करून अन्नधान्य गटारात फेकले आणि अन्नात माती मिसळली
* हजारो हिंदूंच्या घरात पाणी पिण्यासाठी फुटके मडकेही शिल्लक ठेवले नाही, मुसलमानांनी त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली.
हिंदु वस्त्या भयाने गोठून गेल्या.
* आग्रा रोड, पाच कंदील, ऐंशी फुटी रस्ता, देवपूर रोड, मनोहर चित्रपटगृह चौक, जी.टी. बापू चौक, तिरंगा चौक यांसह माधवपुरा या सर्वच भागांत धर्मांध मुसलमानांनी तुफान दगडफेक केल्याने वस्त्यांमध्ये दगडांचा प्रचंड खच पडला.
* शहरातील अंबिकानगर भागात मुसलमानांचे हिंदूंच्या घरांवर हल्ले
* शिवाजीनगर झोपडपट्टीवर मुसलमानांनी हल्ला चढवला.
* संतोषीनगर वस्तीत हिंदूंनी भीतीने घरात दडून बसून दारे लावून घेतली.
* गजानननगर भागातील हिंदूंच्या घरांवर लोटगाडीमध्ये दगड भरून मुसलमानांचा हल्ला, कॉलनी उद्ध्वस्त
* अंडाकृती बगीचा या भागावर मुसलमानांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु हिंदूंचा संघटितपणा व पोलिसांची वेळेवर मिळालेली मदत यांमुळे येथील हिंदू बचावले
* धारधार नंग्या तलावरी घेऊन मुसलमानांचा हिंदु वस्तीवर हल्ला, हिंदूंना दिसताचक्षणी मारण्याचे मुसलमानानांचे कृत्य
* मुसलमानांनी `काफीर हिंदु जलादो, अल्ला हो अकबर’ अशा घोषणा देत हल्ले केले.
* `भडक चाळ’ या चाळीतील घरांना मुसलमानांनी आगी लावल्या.
* `पिंजारी चाळ’ या मुसलमानबहुल चाळीतील काही घरांना हिंदूंनी आगी लावल्या.
* फटाक्यांच्या कारखान्याला धर्मांधांनी आग लावली.
* मुसलमानांनी ५० घरांत घुसून गॅसच्या सिलेंडरचे स्फोट केले व घरांना आगी लावल्या.
* अनेक ठिकाणी हिंदूंना घरातून फरफटत बाहेर काढले व दुचाकी घरात नेऊन स्फोट घडवून आणले.
* मुसलमानांनी घरात घुसून शीतकपाट, दूरध्वनी संच, धुलाई यंत्र अशा महागाच्या संसारोपयोगी वस्तूंचा अगदी चक्काचूर केला.
* मित्रत्वाचे संबंध असणार्या हिंदूंचाही मुसलमानांकडून विश्वासघात
* वाकडीभोर भागातील दर्गा हिंदूंनी पाडला व त्या ठिकाणी रातोरात शिवमंदिर उभारले.
* ५० घरांतील दंगलग्रस्तांसाठी प्रशासनाने १० ते १२ पोळया पाठवल्या.
* अनेक वस्त्यांत हिंदू रात्रभर जागे होते व जीव मुठीत धरून बसले होते.
* गजानननगर येथे पोलिसांची मदत पाच तास तब्बल उशिराने पोहोचली
* अनेकांनी पोलिसांना “या दंगेखोरांपासून आम्हाला वाचवा”, अशी विनंती केली; मात्र पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही, अशी तक्रार दंगलग्र*त हिंदूंनी केली.
* संचारबंदी असल्याने हिंदूंना बाहेरून मदत नाही.
मंगळवार, ७ ऑक्टोबर (आश्विन शुद्ध अष्टमी)
* ४८ तासांनंतरही शहर शांत झाले नाही, हिंदु दहशतीखालीच होते.
* मुसलमानांनी एका हिंदूला जिवंत जाळले. त्यामुळे वातावरण तापले.
* गजानननगर वसाहतीतील तीन तरुणी व एक महिला यांच्यावर धर्मांध मुसलमानांनी सामूहिक बलात्कार केला.
* तिसर्या दिवशी हिंदू रस्त्यावर उतरल्याने दोन्ही गट समोरासमोर येत होते. तेव्हा पोलिसांनी `शूट अँट साईट’चे आदेश दिले; दोन दिवस मुसलमान हिंदूंवर हल्ले करत असतांना षंढ पोलिसांनी त्यांची शस्त्रे मान्य केली होती व त्यांना `शस्त्र चालवण्याचे आदेश नाहीत’, असे बेजबाबदारपणे सांगत होते.
* गवळीवाडा परिसरात मशिदीवर चढून मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक केली. तेव्हा पोलिसांनी हवेत गोळीबार करून मुसलमानांना खाली उतरवले.
* साक्री भागात पोलिसांनी हवेत गोळीबार केला.
* मालेगाव मार्गावर हत्यारांनी भरलेली इंडिका गाडी जप्त
* साखळी मार्गावर तलवारींनी भरलेला ट्रक पकडला.
* शस्त्रसाठा घेऊन जाणारा मुसलमान हवालदार व त्याचे वाहन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
* एम्आयडीसीतील एका रबर फॅक्टरीला जमावाने आग लावली, सात ट्रक पेटवून दिले.
* धर्मांधांनी वाहनांना आगी लावून पळ काढला.
* साक्रीतील हॉटेल अप्सरा, कुरेशी चिकन शॉप यांना आगी लागल्या.
* साक्री मार्गावरील `आशियाना’ बंगल्यातून सिमीच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. याच घरातून अँसिड बाँब व पेट्रोल बाँब जप्त करण्यात आले.
* आर्थिक नुकसानीची तपासणी प्रशासनाकडून सुरू
* नेर गावात मुसलमानांची केवळ ११ घरे असतांना केवळ त्यांच्या संरक्षणासाठी संचारबंदी लागू
* एवढी मोठी दंगल सुरू होऊनही स्थानिक काँग्रेसचे आमदार श्री. राजवर्धन कदमबांडे व नेते श्री. रोहिदास पाटील यांनी दंगलग्रस्त भागाला भेट दिली नाही.
* शांतीनगर भागात हिंदूंनी सामूहिक आरती सुरू केली.
* दंगल सुरू असतांनाही मुसलमानांचे पाच वेळा नमाज पठण सुरू होते.
* मुसलमान पुरुष आणि स्त्रिया मिळून हिंदूंच्या घरांवर हल्ले करत होते. पुरुष प्रथम दगडाने घरावर हल्ला करत व नंतर महिला घरात घुसून सामानाची लूट करायच्या व गॅस सिलेंडर पेटवून द्यायच्या. त्यामुळे पूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होते.
* दोन दिवस होरपळलेल्या हिंदूंनी अखेर तिसर्या दिवशी सडेतोड प्रत्युत्तर दिले. `हर हर महादेव’च्या गर्जनेत मोहल्ल्यात मुसलमानांना पळता भुई थोडी केली. संचारबंदी धुडकावून मिल परिसर, मोहन थिएटर विभाग, जुने धुळे, एकवीरा मंदिर परिसर आणि ठिकठिकाणच्या कॉलनींतून हिंदू मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले.
* दोन गटांत धुमश्चक्री झाली.
* नेर, सिंदखेडा, नंदुरबार येथे प्रचंड तणाव
* बळींची संख्या सातवर पोहोचली, जखमींची संख्याही वाढली.
* हिंदू रस्त्यावर उतरल्याने बहुसंख्य मुसलमान त्यांच्या नातेवाइकांकडे पळाले.
* हिंदूंनी दंगेखोरांची वाहने पेटवली.
* हिंदू आक्रमक झाल्याने अनेक ठिकाणी दंगेखोर बाहेर पडलेच नाहीत.
* गजानननगर भागात शिवसेना नेते श्री. दिवाकर रावते व इतर शिवसेना नेते यांनी भेट दिली. निर्वासित हिंदूंना धीर देऊन विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले.
* गजानन कॉॅलनी व अलंकार सोसायटी या भागात शुकशुकाट होता.
* लळिंग येथे बंदोबस्तावर असलेल्या रामचंद्र चौधरी या पोलिसाला धर्मांधांनी बेदम मारहाण केली. त्यांची मोटरसायकल जाळली. इतकेच नव्हे, तर मारत मारत त्याला लळिंग गावातून बाहेर हाकलले.
* चाळीसगाव रोडवरील रुग्णालयात दंगलीतील जखमींची संख्या वाढल्याने तेथील औषधांचा साठा संपला.
* विस्थापित झालेल्या हिंदूंसाठी शेजारील गावातील हिंदूंनी जेवणाखाणाची व मुलांसाठी दूधपाण्याची सोय केली.
बुधवार, ८ ऑक्टोबर (आश्विन शुद्ध नवमी)
* राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री. राजवर्धन कदमबांडे अत्याचारग्रस्त हिंदूंना भेटायला गेले, तेव्हा संतप्त हिंदूंनी त्यांना अक्षरश: हाकलून लावले.
* महादेवपुरात हल्ला करण्यासाठी आलेल्या मुसलमानांना हिंदूंनी पळवून लावले.
* मुसलमानांनी हिंदूंच्या लहान मुलांना जबरदस्तीने गोमांस खायला घातले.
* घर लुटण्यासाठी आलेल्या मुसलमान महिला शिव्याही देत होत्या.
* नागरिकांची महत्त्वाची कागदपत्रे घरे जळाल्यामुळे जळून गेली.
* हिंदु घरातील पुरुष बाहेर गेल्यावर घरातील महिलांवर मुसलमान चाल करून आले, तेव्हा त्या गच्चीत लपून बसल्या. मुसलमान त्यांच्यावर पेट्रोल बाँब फेकत होते. पाच तासांनंतर जीव मुठीत धरून त्या खाली आल्या, असे श्री. यशवंत बोरसे यांनी सांगितले.
* श्री. विमल चौधरी व त्यांचे कुटुंबीय यांना सुरा दाखवून घराबाहेर काढले व कापण्याच्या तयारीत असतांनाच काही हिंदू तेथे धावून आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
* गजानननगरमधील अरिहंत भुवन येथे आश्रयाला आलेल्या २०० हिंदूंनी दयनीय स्थिती असूनही शासनाची मदत नाकारली.
* संचारबंदी कायम स् ग्रामीण भागात दंगलीची धग कायम
* मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख व जखमींना ५० हजार रुपये देण्याचे शासनाचे आश्वासन
* दंगलखोरांवर कारवाई देण्याचे आदेश देण्यात आले.
* मुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी पहाणी केली.
* दसर्याच्या आदल्या दिवशी हिंदूंच्या घरांत अस्वस्थता
* साडेपाच हजार निर्वासितांना विविध ठिकाणी आसरा
* दूध, भाज्या, औषधे, पाणी या जीवनावश्यक वस्तू व गॅस सिलेंडर यांचा मोठा तुटवडा
* विस्थापितांना शासनाकडून जेवण


