काही तरी करून सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती व सनातन प्रभात यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्यकर्ते व पोलीस यांचा सुरू असलेला खटाटोप !
४ जून २००८ रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये काही हिंदूंनी बाँबस्फोट केला. या बाँबस्फोटप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी सनातनच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली. संबंधित आरोपींनी `या कृत्याशी सनातनचा व हिंदु जनजागृती समितीचा संबंध नसून आम्ही हे कृत्य `आम्ही पाचपुते’ या नाटकात केलेल्या हिंदु देवतांच्या विडंबनाच्या विरुद्ध वैयक्तिक रागातून केले आहे’, असे पोलिसांना सांगितले. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती व `सनातन प्रभात’चे संपादक यांनी पोलीस तपासामध्ये पूर्ण सहकार्य केले. असे असले तरीही राज्यकर्ते व धर्मद्रोही यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी कुठूनतरी या संघटनांचा व `सनातन प्रभात’चा बाँबस्फोटाशी संबंध जोडण्यासाठी गेले तब्बल चार महिने त्यांचा पिच्छा पुरवला, तसेच पोलिसांनी त्यांच्या तपासाचे सत्र अद्यापही सुरूच ठेवले आहे.
या प्रकरणी राज्यकर्ते व धर्मद्रोही यांनी घेतलेली भूमिका व पोलिसांनी दहशतवाद्यांची नव्हे, तर राष्ट्र व धर्म कार्य करणार्या सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती व सनातन प्रभात यांची टप्प्याटप्प्याने केलेली चौकशी यांसंदर्भातील महत्त्वाच्या बाबींचा संक्षिप्त आढावा येथे देत आहोत.
संकलक : श्री. मलगोंडा पाटील, रामनाथी आश्रम, गोवा.
हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांची पोलिसांकडून निष्कारण चौकशी
४ जून रोजी बाँबस्फोट झाल्यानंतर लगेचच दहशतवादविरोधी पथकाचा मोर्चा हिंदु जनजागृती समिती या हिंदु धर्मजागृतीचे तेजस्वी कार्य करणार्या संघटनेकडे वळला. या पथकाच्या पोलिसांनी समितीच्या काही पदाधिकार्यांकडे `संशयित आरोपी’ या नजरेतून पाहून अनेकांना रात्री-अपरात्री चौकशीसाठी नेले. विविध पदाधिकार्यांना ताब्यात घेऊन व पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात खेटे घालण्यास लावून त्यांची `आरोपी’ या नात्याने कधी सहजपणे, तर कधी धाकदपटशा दाखवून कसून चौकशी केली. दरम्यान बाँबस्फोटाशी तीळमात्र संबंध नसलेल्या या पदाधिकार्यांना शारीरिक व मानसिक त्रासांना अकारण सामोरे जावे लागले. अखेर बाँबस्फोटासंबंधी त्यांचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे पहाण्याची नजर बदलून त्यांना `निर्दोष’ घोषित केले. त्यानंतरही `समिती या घटनेमध्ये सहभागी असेल’, अशी शंका पोलिसांना असल्यामुळे त्यांनी त्यानंतरही विविध ठिकाणी व विविध पद्धतीने समितीच्या मागे चौकशीचा ससेमिरा चालूच ठेवला.
हिंदूंचा छळ करणार्या पोलिसांबद्दल पुढे हिंदूंना सहानुभूती वाटेल का ?
`पुढे होणार्या दंगलीत दंगेखोर मुसलमान जेव्हा पोलिसांना ठार करत असतील, तेव्हा पोलिसांनी अगोदर केलेल्या अन्यायामुळे हिंदूंना त्यांच्याविषयी सहानुभूती वाटेल का ?
`सनातन प्रभात’चे वाचक व जाहिरातदार आणि सनातन संस्था व समिती यांच्या हितचिंतकांची चौकशी !
बाँबस्फोट करण्यामागे सनातन संस्था व समिती यांचे संघटनात्मक बळ असू शकते, असे गृहीत धरून पोलिसांनी `सनातन प्रभात’चे वाचक व जाहिरातदार आणि सनातन संस्था व समिती यांचे हितचिंतक यांची चौकशी करण्याची शिस्तबद्ध मोहीम उघडली. `सनातन संस्था ही `सनातन प्रभात’च्या माध्यमातून वाचकांना बाँबस्फोटासारखी देशविघातक कृत्ये करण्यास प्रोत्साहित करते व अशा संस्थेचे हितचिंतक आणि संस्थेला साहाय्य करणारे यांचीही त्यानिमित्ताने चौकशी करणे क्रमप्राप्त आहे’, असा पोलिसांनी मोठा गैरसमज करून घेतला व त्यापोटी त्यांनी या सर्वांच्या मागे चौकशीचा रेटा अत्यंत गतीने लावला. मुंबई, ठाणे व रायगड भागात काही वेळा दैनिक `सनातन प्रभात’चे वितरण करणार्या गाडीसोबत जाऊन पोलिसांनी या दैनिकाचे वितरण केली जाणारी स्थळेही पाहून घेतली.या सर्वांची चौकशी काही थेट पोलीस असल्याचे सांगून नव्हे, तर विविध नावे सांगून केली. महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचे सांगून `सर्व्हे करण्यासाठी आम्ही आलो आहोत’, अशी थापही अनेक ठिकाणी मारण्यात आली, तर काही ठिकाणी `अमूक तमूक कंपनीचे लोक आहोत’, असे भासवण्यात आले.
अशा पद्धतीने राष्ट्ररक्षण व धर्मजागृती यांचे उदात्त कार्य करणार्या या संघटना, असे कार्य करण्यास समाजाला उद्युक्त करणारे नियतकालिक आणि विविध माध्यमांतून या कार्यास सहकार्य करणार्या व त्यांचे हित चिंतणार्या व्यक्ती यांना दडपण्याचा हा प्रकार होता.
पोलीस तपासाचा हा अतिरेक पाहून एक वेळ वाटले, `पोलिसांनी असाच तपास गुन्हेगार व दहशतवादी यांच्या संघटनांचा केला असता, तर कदाचित त्या संघटना देशात आजपर्यंत अस्तित्वातच राहिल्या नसत्या आणि देश गुन्हेगार व दहशतवाद मुक्त झाला असता !’
हिंदूंनो, काँग्रेसरूपी कंस नष्ट होण्यासाठी प्रार्थना व प्रयत्न करा !
`मालेगावमधील बाँबस्फोटाबद्दल `हिंदु जनजागृती समिती’वर संशय, म्हणजे औरंगजेबाच्या घोड्यांना पाण्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे संताजी व धनाजी दिसायचे, तशी काँग्रेसच्या पोलिसांची स्थिती झाल्याचे निदर्शक होय. कंसाच्या पापांचा घडा भरल्यानंतर श्रीकृष्णाने त्याचा नाश केला. त्याप्रमाणेच हल्लीची कंसरूपी काँग्रेस समूळ नष्ट होण्यासाठी, अर्थात काँग्रेसचा येत्या निवडणुकीत संपूर्ण पाडाव होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करा व काँग्रेसच्या विरोधात प्रचार करून हिंदुत्ववादी लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी प्रयत्न करा !’
…… आणि धर्मद्रोह्यांची कावऽ कावऽऽ सुरू झाली !
बाँबस्फोटाचे कृत्य केल्याच्या नावाखाली पोलिसांनी १६ जून रोजी काहींना अटक केली. `हे कृत्य करणारे आरोपी सनातन संस्थेचे व हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत. आरोपींनी ते कृत्य वैयक्तिक स्तरावर केले असून त्या कृत्याशी संबंधित संघटनांचा काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे’, असे पोलिसांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर जाहीर केले आणि सनातनच्या विरुद्ध कुरापती काढण्याच्या संधीच्या शोधात असलेल्या धर्मद्रोह्यांना आयती शिकार मिळाली व त्यांची सनातन संस्थेच्या विरोधातील कावऽ कावऽऽ सुरू झाली.
सरकारला सनातनवर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी सरकारदरबारी व दहशतवादविरोधी पथकाकडे त्यांचे घिरट्या घालण्याचे नसते उपद्व्याप सुरू झाले.
धर्मद्रोही व राज्यकर्ते यांनी सनातनवर विविध निराधार आरोप करून सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करणे बाँबस्फोटातील आरोपी हे सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांचे असल्याचे कळताच काही धर्मद्रोही व राज्यकर्ते यांनी `यापूर्वी मालेगाव व जामा मशीद येथे झालेल्या बाँबस्फोटांमागेही समिती व सनातन संस्था यांचाच हात असू शकतो’, असा आरोप केला आणि `त्यादृष्टीने या संघटनांची चौकशी करण्यात यावी’, असा सूर आळवला. त्याचबरोबर `भारतात यापूर्वी झालेल्या सर्व बाँबस्फोटांशी या संघटनांचा काही संबंध आहे का, याचाही तपास करण्यात यावा’, अशी मागणी करून `सनातन संस्था ही दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देते व तसे कार्यकर्ते तयार करते’ वगैरे निराधार आरोपांची तोफही त्यांनी संस्थेवर डागली. पनवेल व ठाणे येथील बाँबस्फोटांमागे केवळ अटक केलेल्यांचा हात नसून सनातनचा हात आहे, असा आरोप करून काहींनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पुढे केली
साधकांनो, `बळीचा बकरा’ बनू नका !
`पू. बंडातात्या कराडकर यांच्या मागे वारकरी असल्यामुळे व आता शिवसेनाही असल्यामुळे काँग्रेस सरकार त्यांच्या विरुद्ध विशेष काही करू शकणार नाही. आपल्यात ते सामर्थ्य नसल्याने सरकार आपल्याला `बळीचा बकरा’ बनवत आहे. आपण सामर्थ्य वाढवले, तर सरकारला आपल्याविरुद्धही विशेष काही करता येणार नाही.’
सनातनला `दहशतवादी संघटना’ समजून पोलीस तपासाची चक्रे आणखी गतीमान होणे
बाँबस्फोट प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर धर्मद्रोही व राज्यकर्ते यांच्याकडून सनातनवर केले जाणारे बिनबुडाचे आरोप आणि राजकीय दबाव यांमुळे `सनातन ही दहशतवादी संघटनाच आहे’, अशा दृष्टीने पोलीस तपास सुरू झाला. `संस्था दहशतवादी तयार करते का’ व `संस्थेमध्ये दहशतवादाची पाळेमुळे कुठपर्यंत आहेत’, याची विविधांगानी चौकशी सुरू झाली. संपूर्ण भारतभर सुरक्षाव्यवस्थेचे तीन-तेरा झालेले असतांना केंद्र व राज्य या स्तरांवरील विविध यंत्रणा आणखी जोमाने सनातनच्या चौकशीच्या कामाला लागल्या.
विविध आश्रमांत जाऊन चौकशी करणे पोलीस खात्यातील विविध विभागांची पथके राज्यातील विविध ठिकाणांबरोबरच प्रामुख्याने देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात तपासाकरिता रात्री-अपरात्री जाऊ लागली. साधकांची चौकशी करणे व त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती प्राप्त करणे आदी करू लागली. दहशतवादविरोधी पथकाकडून अनेकांना चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात बोलावण्याचे आदेश दिले जाऊ लागले. त्या आश्रमात एकाच दिवशी पोलीस खात्याच्या विविध विभागांची पथके येऊन आपआपल्या पद्धतीने चौकशी करत होती.त्याचबरोबर मिरज व रामनाथी, गोवा येथील आश्रमांत जाऊनही काही पोलिसांनी चौकशी केली.
`पोलिसांनो, मुसलमानांच्या दंगलीच्या वेळी अथवा नक्षलवादी व दहशतवादी यांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी राजकीय पक्षांचे नेते नव्हे, तर ईश्वरच तुम्हाला वाचवील, हे लक्षात घ्या व त्यासाठी साधना, म्हणजे दररोज प्रार्थना आणि नामजप करा !’
गृहखात्याच्या आदेशानुसार पोलिसांनी राज्यभरातील साधकांची चौकशी करणे व साधकांची माहिती जमवण्याचा प्रयत्न करणे
महाराष्ट्र राज्यातील गृहखात्याकडून राज्यातील पोलीस ठाण्यांना आदेश जारी झाल्याने जून व जुलै महिन्यात पोलिसांकडून सनातन संस्थेची खालपर्यंत चौकशी सुरू झाली. प्रत्येक ठिकाणच्या साधकांची माहिती जमवण्याचे खटाटोप त्यांनी गतीने सुरू केले. त्याकरिता पोलीस साधकांच्या घरी व ते नोकरी करत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांच्याविषयीची विविध माहिती जमवू लागले. काही स्थानिक साधकांना दूरध्वनी करून सर्व साधकांची यादी व त्यांचे दूरध्वनी क्रमांक देण्यास सांगू लागले. अशाच पद्धतीची चौकशी गोवा राज्यातही काही ठिकाणी करण्यात आली.
(हिंदूंनो, धर्मद्रोही व राष्ट्रद्रोही काँग्रेसचा येत्या निवडणुकीत केंद्र व राज्य स्तरांवर पराभव होईल व हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर येईल. तेव्हा सनातनच्या निरपराध साधकांची चौकशी करणार्या धर्मद्रोही व राष्ट्रद्रोही काँग्रेसची अशीच चौकशी करू ! – संपादक)
`सनातन प्रभात’ नियतकालिकांतील तथाकथित आक्षेपार्ह मजकुरावरून संपादकांची चौकशी
`डॉ. आठवले हे `सनातन प्रभात’ नियतकालिकातून दहशतवादी कृत्ये करण्यास प्रोत्साहित करणारे लिखाण करतात व ते `हिंदु देवतांचे विडंबन करणारी धर्मद्रोही नाटके बंद पाडण्यासाठी दहशतवादी व नक्षलवादी बना !’, असा संदेश देतात’, हा मुद्दा पुढे करून काही नाट्यनिर्माते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अन्य काही धर्मद्रोही यांनी `सनातन प्रभात व डॉ. आठवले यांची चौकशी करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी आणि सनातनवर बंदी घालावी’, अशी मागणी सरकारकडे निवेदनांद्वारे व वृत्तपत्रांच्या माध्यमातून केली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. श्याम मानव वगैरेंनी गेल्या पाच वर्षांत सनातन प्रभात नियतकालिकांत जनप्रबोधनार्थ प्रसिद्ध केलेल्या मजकुरातील काही निवडक (त्यांच्या दृष्टीने प्रक्षोभक) मजकूर काढून तो सरकारदरबारी सादर केला. त्यांच्या मते तो मजकूर दहशतवादी कृत्ये करण्यास प्रोत्साहित करणारा आहे म्हणे !
तसेच `डॉ. आठवले त्यांच्या कार्यकर्त्यांचे ब्रेन वॉश करून त्यांना दहशतवादी कारवाया करण्यास भाग पाडत आहेत, ते मानवी रोबोेंचे कारखानदार आहेत’, असा आरोपही प्रा. मानव यांनी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या सर्व आरोपांची व मागण्यांची तात्काळ दखल घेऊन तपासकामाला सुरुवात केली. त्यानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात पोलीस अधिकार्यांनी `सनातन प्रभात’च्या संपादकांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून सांगितले, “सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराच्या धर्तीवर तुमची व प.पू. डॉ. आठवले यांची चौकशी करायची आहे. त्यासाठी तुम्ही मुंबईला याल कि आम्ही तिकडे येऊ ?” त्यानंतर पोलीस अधिकार्यांनी संपादकांना पनवेल येथे बोलावून त्यांची कित्येक तास चौकशी केली.
सनातन `धर्मक्रांती’च्या शिकवणुकीतून दहशतवादी मानसिकता तयार करत असल्याचा पोलिसांचा गैरसमज होणे दैनिक `सनातन प्रभात’मध्ये `धर्मक्रांती’चा उल्लेख वारंवार केला जातो. `समाजाला धर्माचरणी बनवणे, म्हणजे धर्मक्रांती’, असा खरा अर्थ असणार्या या शब्दाचा अर्थ त्यांनी वेगळाच काढला. त्याबाबत ते अनेक साधकांना `धर्मक्रांती म्हणजे काय ? त्यातून तुम्हाला काय अभिप्रेत आहे ?’, असे विचारू लागले.
पोलिसांनी एका साधकाकडून कोर्या कागदांवर जबरदस्तीने सह्या घेणे
तपास करतांना पोलिसांनी कोर्या कागदांवर एका साधकाच्या सह्या घेतल्या. एक-दोन नाही, तर तब्बल आठ कागदांवर अशा सह्या घेतल्या. पोलिसांनी जबरदस्तीने एखाद्या व्यक्तीची कोर्या कागदावर सही घेणे, हे पोलीस आपली डाळ शिजवण्यासाठी गैरमार्गाचा नियोजनबद्ध अवलंब करत असल्याचे द्योतक आहे. अशा सह्या घेतल्याने पोलिसांना संबंधित व्यक्तीचा मूळ जबाब स्वत:ला हवा तसा फिरवून आपली बाजू बळकट करण्यासाठी उपयोग करता येतो. अशा सह्या घेणार्या, म्हणजे कायद्याचे रक्षकच भक्षक बनलेल्या पोलिसांचा हा गुन्हा नव्हे का ?
कोर्या कागदावर सह्या देणे, म्हणजे स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे आहे, हे साधकांनी पुरते जाणून असावे. अशा पद्धतीने कोणी सह्या देण्यास सांगितल्यास त्यास ठाम नकार द्यावा व असे सांगणार्यांना `तुमच्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार नोंदवू’, असे ठणकावून सांगावे.
सनातन संस्था व समिती यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या शिबिरांची चौकशी करण्यात आली. तसेच गुरुपौर्णिमा महोत्सवांची पोलिसांनी चौकशी केली. (याबाबतची सविस्तर वृत्ते वेळोवेळी प्रसिद्ध केली आहेत.)
सनातन व हिंदु जनजागृती समिती यांसारख्या निरपराध संस्थांची चौकशी करून होणारा कोट्यवधी रुपयांचा चुराडा टाळण्यासाठी साधक-पोलीस हवेत !
`मालेगाव बाँबस्फोटात सनातन व हिंदु जनजागृती समिती यांसारख्या राष्ट्र व धर्म प्रेमी संघटनांची चौकशी करू पहाणारे काँग्रेस सरकार व दहशतवादी पथक आता १.१०.२००८ रोजी आगरतळा (त्रिपुरा) येथे झालेल्या बाँबस्फोटांबद्दलही सनातन व हिंदु जनजागृती समिती यांची चौकशी करील ! पोलिसांचे बळ निरर्थक तपासात फुकट घालवून जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा टाळण्यासाठी साधक-पोलीस हवेत. त्यांना सूक्ष्मातील कळल्याने ते सर्व गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकतील.’
प्रा. श्याम मानव यांनी पोलिसांकडे खोटी कागाळी करणे व पोलिसांनी त्यानुसार सनातनची चौकशी करणे
प्रा. श्याम मानव यांना खूप उशिरा, म्हणजे तब्बल एका वर्षानंतर एका गोष्टीचा साक्षात्कार झाला, तो म्हणजे त्यांच्या मते गेल्या वर्षी पुणे येथील एका कार्यक्रमात त्यांच्यावर जो हल्ला झाला होता, तो म्हणे सनातनच्या लोकांनी केला होता ! त्याबाबत त्यांनी जुलै २००८ मध्ये दहशतवादविरोधी पथकाकडे कागाळी केली. तसेच त्यांनी त्यासंदर्भात सनातनची कसून चौकशी करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाकडे दीर्घकाळ तगादा लावला.पूर्वी या प्रकरणाचा तपास झाला होता व खरे हल्लेखोर कोण, याचा उलगडाही झाला होता आणि त्यात सनातनच्या सहभागाचा मुद्दा कोठेच आला नव्हता. असे असतांनादेखील प्रा. मानव यांच्या मागणीनुसार पोलिसांनी सनातनची त्या दृष्टीनेही काही दिवस चौकशी केली. या विषयाला अनुसरून पोलिसांनी सनातनच्या आश्रमाच्या प्रवक्त्याला विचारले, `मानव यांच्यावर तुम्ही हल्ला केला होता का ? नाहीतर कोणी केला होता ? तुमचा त्याच्यात काय सहभाग होता ?’ वगैरे. त्या वेळीही आमच्या प्रतिनिधीने वस्तूस्थिती कथन केली. या चौकशीमध्ये सनातनचा सहभाग नसल्याचे निष्पन्न झाले. यातून प्रा. मानव यांचा बालहट्ट सिद्ध होतो. लहान मुलांप्रमाणे परत परत तक्रार करून आपले म्हणणे खरे करण्यासाठी केलेला हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न होय. तसेच यांतून त्यांनी स्वत:चा खोटारडेपणा स्वत:च सिद्ध करून दाखविला.
`सनातन संस्था’ व `हिंदु जनजागृती समिती’ या न्यासांची ध्येये व उद्दिष्टे यांच्या प्रती घेऊन चौकशी करणे
सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती या दोन्ही न्यासांची उद्दिष्टे व ध्येयधोरणे यांच्या प्रती पोलिसांनी मागून घेतल्या व यात दहशतवादी कृत्याच्या दृष्टीने काही सापडते का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी केली दोन जणांची `नार्को’ व `ब्रेन मॅपिंग’ चाचणी २७.६.२००८ रोजी पोलिसांच्या वकिलांनी बाँबस्फोटाच्या गुन्ह्याबाबतची पोलीस चौकशी पूर्ण झाल्याचे न्यायाधिशांसमोर सांगितले. त्यानुसार न्यायाधिशांनी आरोपींची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. काही दिवस उलटून गेल्यानंतर पोलिसांनी पुन्हा न्यायालयात जाऊन दोन आरोपींची `नार्को’ व `ब्रेन मॅपिंग’ चाचणी करण्यासाठी परवानगी मिळवली. त्यानुसार त्यांनी दोन जणांची प्रथम `नार्को’ चाचणी केली. त्यातून त्यांना अपेक्षित असे काहीच हाती न लागल्याने त्यांनी आणखी काही दिवसांनंतर त्यांची `ब्रेन मॅपिंग’ चाचणीही करून घेतली.
संस्थेने पोलिसांकडे त्यांना `संशयित आरोपी’ म्हणून हवा असलेल्याला स्वत:हून नेऊन हजर केले. तसेच पोलीस तपासाच्या दृष्टीने हवी असलेली प्रत्येक माहिती खरी व प्रामाणिकपणे पुरवून तपासकामात पूर्णत: सहकार्य केले. तरीही त्यांची संस्थेवरची वक्रदृष्टी कमी झाली नाही. `बाँबस्फोटाच्या गुन्ह्याशी काही तरी करून कुठून तरी सनातनचा संबंध जोडता येईल का’, हे पोलिसांना हवे होते आणि त्यासाठी त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती. यातीलच एक भाग म्हणजे या चाचण्या होत.
`चोराच्या उलट्या बोंबा’ या म्हणीप्रमाणे वागणार्या अंनिसवाल्यांच्या मागणीप्रमाणे सनातनने आतापर्यंत न्यायालयात लावलेल्या दाव्यांची व खटल्यांची पोलिसांनी चौकशी केली. उगाच कोणावरही खटले दाखल करायला संस्थेला वेळ नाही; कारण तिला धर्मप्रसाराचे व्यापक व अफाट कार्य करायचे आहे. सनातनविरुद्ध वक्तव्ये करून बदनामी करत असल्यामुळे केवळ न्याय मिळवण्यासाठी सनातन त्यांच्याविरुद्ध दावा दाखल करते व खटले लावते, दुसर्यांना नाहक त्रास देण्यासाठी नव्हे, हे धर्मद्रोही व संबंधित पोलीस यांनी लक्षात घ्यावे.
पोलीस व धर्मादाय आयुक्त यांच्याकडून संस्था व समिती यांची लेखाविषयक चौकशी
सरकारने पोलीस तपासाबरोबरच संस्थेची लेखाविषयक चौकशीही केली. या चौकशीचा एक भाग म्हणजे, सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती या न्यासांच्या काही वर्षांच्या आर्थिक ताळेबंदाच्या प्रती मागून घेतल्या. त्याचबरोबर सांगली येथे संस्थेच्या न्यासाच्या कागदपत्रांची धर्मादाय आयुक्तांकडून तपासणी करण्यात आली.सनातन संस्थेला विदेशातून निधी येतो का, याची वारंवार चौकशी पोलीस करत होते. पोलिसांनी विविध बँकांमध्ये जाऊन संस्थेच्या बँक खात्यांची माहिती घेतली.
`सनातन प्रभात’च्या संपादकांची अनेक वेळा चौकशी
जून महिन्यामध्ये `सनातन प्रभात’च्या संपादकांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकार्यांनी सनातन संस्थेच्या मुख्यालयात येऊन संपादकांकडून काही माहिती घेतली. त्यानंतर अवघ्या चार दिवसांतच संपादकांना पुन्हा पथकाच्या कार्यालयात चौकशीकरिता पाचारण करून चौकशी करण्यात आली. त्यानंतर मध्यंतरी आणखी काही माहितीही पाठवून देण्यास पोलिसांनी त्यांना सांगितले. ४ ऑक्टोबर रोजी दहशतवादविरोधी अधिकार्यांनी संपादकांना संपर्क करून चौकशीकरिता पुन्हा त्यांच्या कार्यालयात येण्यास सांगितले.
इमाम बुखारी यांच्या विखारी वक्तव्यांची नव्हे, तर सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांच्या जनजागृतीविषयक लिखाणांची गंभीरपणे दखल घेऊन त्यांची चौकशी करणे
इमाम बुखारी यांनी `अहमदाबाद बाँबस्फोट प्रकरणातील सूत्रधार म्हणून पकडलेल्या अबूल बशीर याला न सोडल्यास १९४७ मधील फाळणीच्या वेळेपेक्षाही मोठा उत्पात घडवू’, अशी धमकी दिली. इमाम बुखारी यांचे हे विखारी वक्तव्य नव्हे, तर राष्ट्ररक्षण व धर्मजागृती यांसाठी जनजागृतीच्या उद्देशाने केलेले लिखाण या धर्मद्रोही काँग्रेसला व तिच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या पोलिसांना प्रक्षोभक वाटले. त्यामुळे अखेर पोलिसांची मजल सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉक्टरांच्या चौकशीपर्यंत गेली. ४.९.२००८ रोजी दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकार्याने सनातन संस्थेच्या गोवा येथील मुख्यालयात येऊन प.पू. डॉक्टरांची चौकशी केली. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनीही चौकशीला सामोरे जाऊन पोलिसांना आवश्यक ती माहिती दिली.
पोलीस मुसलमान नेत्यांची किंवा त्यांच्या धर्मगुरूंची अशी चौकशी करतात का ? आणि ते चौकशी करायला गेलेच, तर त्यांना कोणत्या कठोर परिस्थितीचा सामना करावा लागतो, हे ठिकठिकाणी मुसलमान लोकवस्तीत चौकशीला जाणार्या पोलिसांसंदर्भात घडलेल्या प्रसंगांवरून लक्षात येते. त्यामुळे खरोखरच दहशतवाद्यांना अभय देणार्या मुसलमान नेत्यांच्या विखारी फुत्करांकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठीशी घालणे हा राष्ट्र व धर्म द्रोह नव्हे का ?
`सनातन प्रभात’ मुद्रित करणार्या मुद्रणालयांची चौकशी करणे व त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती मिळवणे
दहशतवादविरोधी पथकाने बाँबस्फोटाच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सप्टेंबरमध्ये `सनातन प्रभात’च्या काही नियतकालिकांचे मुद्रण केल्या जाणार्या तुर्भे येथील मुद्रणालयात जाऊन पोलिसांनी `सनातन प्रभात’च्या मुद्रणाविषयी चौकशी केली. त्यानंतर मुद्रणालयाच्या मालकांना दहशतवादविरोधी पथकाच्या कार्यालयात बोलावून चौकशी केली व त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे घेतली.
त्याचबरोबर सांगली व रत्नागिरी येथेही दहशतवादविरोधी पथकाने `सनातन प्रभात’ मुद्रित करणार्या मुद्रणालयांना पत्रे दिली असून सनातन प्रभातच्या मुद्रणाविषयीची काही माहिती मागवली आहे. असेच पत्र कन्नड साप्ताहिक `सनातन प्रभात’ मुद्रित करणार्या कर्नाटकातील मुद्रणालयालादेखील पाठवले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या धर्मजागृती सभांच्या संदर्भातील माहिती मागवणे
राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी झटणार्या हिंदु जनजागृती समितीला पोलिसांच्या चौकशीस सातत्याने सामोरे जावे लागत असून हिंदु जनजागृती समितीतर्फे ऑगस्ट २००७ ते जून २००८ या कालावधीत घेण्यात आलेल्या जाहीर `धर्मजागृती सभां’चीही चौकशी दहशतवादविरोधी पथकाकडून केली.या सभांची तपशीलवार माहिती या पथकाने २४ सप्टेंबर रोजी एका पत्राद्वारे समितीकडे मागितली.
कुठेही बाँबस्फोट झाला, तर त्याचा संबंध संस्था व समिती यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार !
यापुढे कोठेही कोणीही बाँबस्फोट केले, तर त्याचा कोणताच तपास न करता त्या कृत्याचे खापर सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांच्यावर फोडायला काँग्रेस सरकार यत्किंचितही मागे-पुढे बघणार नाही, हे हल्लीच झालेल्या मालेगाव बाँबस्फोटाबाबत संस्था व समिती यांच्यावर संशय घेतल्याच्या मुद्यावरून स्पष्ट झाले आहे. असे करणे म्हणजे अहोरात्र राष्ट्र व धर्म कार्य करणार्या संस्था व संघटना यांना लक्ष्य करून त्यांना संपवण्यासाठी रचलेले काँग्रेसचे कटकारस्थान होय!
खर्या गुन्ह्याच्या दृष्टीने तपास संपला, आता हा केवळ राजकीय तपास !
पोलिसांनी मूळ गुन्ह्याचा तपास करून सप्टेंबरच्या मध्यावधीत आरोपपत्र दाखल केले; परंतु त्यानंतरही संस्था, समिती व सनातन प्रभात यांच्या पोलीस तपासाचे गुर्हाळ सुरूच राहिले. हा प्रकार म्हणजे `गुन्ह्याच्या दृष्टीने असलेला तपास संपल्यानंतर सुरू झालेला हा केवळ राजकीय तपास !’, असे मत राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींसह विविध क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सनातनवर बंदी घालण्यासंदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांची वक्तव्ये म्हणजे निवडणुका डोळयांसमोर ठेवून मुसलमानांना खुश करण्यासाठीचा एक राजकीय डावपेच !
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व केंद्रीय कृषीमंत्री श्री. शरद पवार व महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबत विविध जाहीर कार्यक्रमांत वक्तव्ये करून साधकांना गर्भगळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. `हा प्रकार केवळ येत्या निवडणुका डोळयांसमोर ठेवून मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळवण्याकरता मुसलमानांच्या मागणीप्रमाणे सनातन संस्थेला दडपणे व मुसलमानांना खुश करणे यांसाठीचा एक राजकीय डावपेच आहे’, असेही मत राजकीय क्षेत्रातील अनेकांनी व्यक्त केले आहे.
डोंगर पोखरून उंदीर तरी मिळेल काय ?
पोलिसांनी राज्यकर्ते व धर्मद्रोही यांच्या दबावामुळे संस्था व समिती यांची कितीही खोलात जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना हाती काहीतरी लागेल काय ? कारण `आडात नाही, तर पोहर्यात कुठून येणार ?’ या म्हणीप्रमाणे मुळात निखळ धर्मकार्य करणारी सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यामध्ये दहशतवादी कृत्यांना खतपाणी घालण्यासारखे मुळात काहीच नाही. दोन्ही संघटनांतील तथाकथित दहशतवादाची पाळेमुळे शोधून ती खणण्याच्या इराद्याने केवळ राजकीय दडपणाखाली येऊन या संघटनांचा तपास करणार्या पोलिसांना कित्येक महिने खोदून खोदून, म्हणजे डोंगर पोखरून उंदीर तरी मिळणार काय ?
साधकांनो, धर्म-अधर्म लढ्याची ही तर केवळ सुरुवात असून अजून भयंकर आपत्काल बाकी आहे !
साधकहो, सनातन गेली कित्येक वर्षे सांगत आहे, `२००८ सालापासून आपत्काळ येणार आहे !’ अगदी त्याचीच ही एक छोटीशी चुणुक धर्मविरोधकांच्या भूमिकेमुळे व पोलीस तपासाच्या या सत्रामुळे काही प्रमाणात आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आता व भविष्यातही सनातन संस्थारूपी सावज टप्प्यात येण्याच्या संधीची वाट पहात बसलेले मूठभर सनातनद्वेष्टे सनातनवर या ना त्या कारणाने चिखलफेक करण्याची लबाडी करतील आणि त्याची दखल घेऊन आताप्रमाणेच राज्यकर्ते व प्रशासन कारवाई करण्यासाठी सनातनच्या मागे लागतील; पण काहीही झाले, तरी धर्मासाठी धर्माने वागून धर्मकार्य करणार्या संस्थेचाच (म्हणजे धर्माचाच) विजय निश्चित आहे, ही खूणगाठ मनाशी बांधून ईश्वरावर अतूट श्रद्धा ठेवून येणार्या भयंकर अशा आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवूया व धर्मकार्य जोमाने करूया !
ईश्वरी राज्याच्या स्थापनेची आवश्यकता
`डोंगर पोखरून उंदीरही, म्हणजे सनातन विरुद्ध पुरावे न सापडल्याने पोलीस खोटे पुरावे सादर करतील व त्यांनुसार न्यायालये खोटे निकाल देतील. या सर्व प्रसंगांना तोंड देऊन आपल्याला ईश्वरी राज्याची स्थापना करावयाची आहे. सरकार व पोलीस यांच्या खोटेपणाबद्दल देव जबाबदार व्यक्तींना त्यांच्या पापानुसार पाताळात किंवा नरकात पाठवील !’
आपले मत आम्हाला जरुर कळवा
निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!