धुळयात मंत्री विजयकुमार गावित व अरुण गुजराथी यांना संतप्‍त हिंदूंनी हाकलून लावले !

धुळे, १० ऑक्टोबर (वार्ता.) – धुळे शहरातील दंगलीच्या पाचव्या दिवशी शहरातील वातावरण निवळल्यासारखे दिसत असले, तरी गावात तणावपूर्ण शांतता आहे. संचारबंदी तीन तासांसाठी शिथिल करण्यात आली होती.

अरिहंत भुवन या हिंदूंनी तात्पुरता आश्रय घेतलेल्या ठिकाणी दंगलग्रस्तांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री. अरूण गुजराथी व नंदुरबारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व आदिवासी विकासमंत्री श्री. विजयकुमार गावीत गेले असता त्यांना अक्षरश: हाकलून देण्यात आले. ते फक्‍त ४ ते ५ मिनिटे त्या ठिकाणी राहू शकले. धुळयात मंत्री
(राज्यकर्त्यांनो, तुमच्या षंढत्वामुळे हिंदूंमध्ये तुमच्याबद्दल निर्माण झालेली ही चीड लक्षात घ्या ! हिंदूंकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रत्येक राजकारण्याला उद्या हिंदूंनी असेच हाकलून लावले, तर कोणाला नवल वाटायला नको ! – संपादक)
दसर्‍याच्या तिसर्‍या दिवशी शहरात मोठी रथयात्रा निघते. दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर या रथयात्रेला परवानगी मिळणार का, इकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

   निगडीत वृत्त : नालायक लोकप्रतिनिधी

Leave a Reply