`प्रहार’च्या प्रकाशनप्रसंगी शरद पवार यांचा पुन्हा थयथयाट !
मुंबई, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – जर एखाद्या ठिकाणी बाँबस्फोट झाला, तर सिमीसारख्या विशिष्ट समाजाच्या संघटनेवर ठपका ठेवला जातो. (पवारसाहेब, ठपका ठेवला जात नाही, तर सिमीचे दहशतवादी त्या बाँबस्फोटात सहभागी झाल्याचे पुरावे पोलिसांना प्राप्त होतात ! – संपादक) दुसरीकडे सनातनसारख्या संघटनाही चुकीचा मार्ग स्वीकारत आहेत. तेव्हा त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असे विद्वेषी वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी आज येथे केले. (राष्ट्र व धर्म यांचे कार्य करणार्या छोट्याशा सनातनची तुलना देशद्रोही बलाढ्य सिमीच्या दहशतवाद्यांशी करणारे सनातनद्वेषाची कावीळ झालेले शरद पवार ! – संपादक) राज्याचे महसूलमंत्री श्री. नारायण राणे यांच्या `प्रहार’ या दैनिकाच्या प्रकाशन सोहळयात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सहकारमंत्री डॉ. पतंगराव कदम हेही उपस्थित होते. “कुठे एखाद्या ठिकाणी बाँबस्फोट होतो, तेव्हा वृत्तपत्रांमध्ये विशिष्ट समाजाच्या नावाने आगपाखड केली जाते; मात्र ठाणे, नवी मुंबई, पनवेल येथील `थिएटर’मध्ये बाँबस्फोट घडवण्यात आला. नांदेडमध्ये बाँब बनवतांना स्फोट झालेला आहे. तेव्हा या स्फोटांमागे ज्या धर्माचे लोक होते, त्यांचा उल्लेख कधीच वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळत नाही. (वर्तमानपत्रांनी दखल घेऊ नये, इतके ते स्फोट किरकोळ होते, याकडे पवारसाहेब सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत ! – संपादक) त्यांच्याबाबत वृत्तपत्रांमध्ये सडेतोड भूमिका मांडण्याची गरज आहे”, असेही श्री. पवार म्हणाले.
दहशतवाद हा केवळ भारतातच नाही, तर जगभरात आहे. (म्हणून तो समर्थनीय आहे का ? शेजारच्याच्या घरात चोरी झाली, तशी माझ्याही घरात झाली, असे एवढ्या शांतपणे कधी कुणी म्हणते का ? – संपादक) पाकिस्तान, इराक, अफगाणिस्तान येथेही नवीन नवीन पद्धतींनी तो वाढत आहे. (पाकिस्तानसारख्या दहशतवादाची बीजे पेरणार्या देशात वेगळे काय घडणार ? – संपादक) भाषा व धर्म या भावनेतून संघर्ष होत असतात; पण त्यांना मर्यादा आहेत; मात्र अशा वेळी सातत्याने एखाद्या विशिष्ट वर्गाला पूर्णपणे दोषी ठरवून त्याच्यावर सतत प्रहार करत राहिलो, तर हा संघर्ष व दंगली वाढतच रहाणार. (पवारसाहेबांचा लाडका मुसलमान वर्ग सतत हिंदूंवर प्रहार करून हिंदूंचा वंशविच्छेद करत आहे. त्याला दोषीही ठरवलेले पवारसाहेबांना आवडत नाही, याला काय म्हणावे ? ही धर्मनिरपेक्षता आहे का ? – संपादक) अफगाणिस्तानातील राजवट संपूर्ण उद्ध्वस्त केली गेले. संपूर्ण देश बेचिराख केला गेला. त्यानंतरही तेथील तरुण पिढी शांततेत राहील, असे म्हणणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहिल्याप्रमाणे आहे. (असे आहे, तर काश्मीरमधील साडेचार लाख हिंदू विस्थापित झाले. तेथे हिंदूंचा वंशविच्छेद झाला. दंगलखोर मुसलमानांमुळे महाराष्ट्रातील हिंदूही आता विस्थापित होत आहेत. गेल्या काही वर्षांत मुसलमान दहशतवाद्यांच्या बाँबस्फोटांनी देश खिळखिळा केला आहे. तरीही येथील हिंदूंची तरुण पिढी शांततेत राहील, असे म्हणणे, हे पवारसाहेबांना कसे वाटते ? – संपादक) भारतात जेव्हा रथयात्रेचे प्रयत्न झाले, बाबरी पाडली, त्यानंतरच दहशतवादी कारवाया, बाँबस्फोट होऊ लागले. (हिंदूंची असंख्य मंदिरे मुसलमानांनी आजपर्यंत जमीनदोस्त केली. काश्मीरमध्ये हे प्रकार आजही सुरू आहेत. त्याबद्दल हिंदूंनी कधी दहशतवादी कारवाया, बाँबस्फोट केले का ? त्यांनी ते केले असते, तर पवारसाहेबांनी त्यांची अशी बाजू घेतली असती का ? – संपादक) त्यापूर्वी बाँबस्फोट झाल्याचे कधीच ऐकीवात आले नव्हते. केवळ या प्रवृत्तींमुळे आजचे दहशतवादाचे स्वरूप पहायला मिळत आहे. (पवारसाहेबांचा इतिहास फारच कच्चा आहे. फाळणीच्या वेळी १० लाख हिंदूंची कत्तल झाली होती. त्या हिंदूंचा काय अपराध होता ? हिंदूंचे शिरकाण करण्याची मुसलमानांची रीत फार जुनी आहे. त्यामुळे मुसलमानांच्या दहशतवादी वृत्तीचे खापर पवारसाहेबांनी हिंदूंवर फोडू नये ! – संपादक) देश उभारायचा असेल, तर देशातील ऐक्य टिकले पाहिजे, असेही श्री. पवार यांनी सांगितले. (देशाची सद्यस्थिती पहाता काही वर्षांतच देशातील ऐक्य टिकवायला हिंदू शिल्लक तरी रहातील का ? – संपादक)


