धुळे दंगलीचा धावता वेध व बोध !

िंदू महिलांवर नृशंस अत्याचार होत असतांना महाराष्ट्रातील मानवाधिकारवाले मूग गिळून गप्प का ?

५ ऑक्टोबर रोजी धुळे शहरात हिंदु रक्षक समितीने हिंदुस्थानात वाढत चाललेला दहशतवाद, बाँबस्फोट व अतिरेकी कारवाया यांचा धिक्कार करण्यासाठी एका जाहीर सभेचे आयोजन केले होते. या जाहीर सभेची जाहिरात शहरात काही भव्य फलक लावून करण्यात आली होती.

या फलकांवर सरकारचे पितळ उघडे पाडणारी दहशतवादाशी निगडित बोटचेप्या धोरणांच्या विरोधातील घोषवाक्ये होती. या घोषवाक्यांमध्ये कुठेही मुसलमान धर्मावर किंवा समाजावर चिखलफेक करणारे शब्दप्रयोग करण्यात आले नव्हते. तरीसुद्धा साबीर शेख भंगारवाला नामक एक व्यक्‍ती अचानक हजार मुसलमानांना घेऊन आली व या फलकावर दगडफेक करत तो फाडून टाकला. त्या ठिकाणी उपस्थित काही मोजक्या हिंदूंनी प्रतिकार करण्याचा प्रयत्‍न करताच मुसलमान `आम्ही तयारीतच आहोत’, अशा आविर्भावात हिंदूंवर तुटून पडले. पहाता पहाता हे लोण शहरभर पसरले आणि जागोजागी मुसलमानांनी एकत्र येऊन हातात नंग्या तलवारी घेऊन हिंदूंवर व त्यांच्या वस्त्यांवर चवताळून हल्ले करण्यास प्रारंभ केला. नेहमीप्रमाणे हिंदू गाफील व नि:शस्त्र होते. त्यामुळे प्रतिकार झाला नाही आणि मुसलमान वरचढ होत गेले. संध्याकाळपर्यंत मुसलमानांनी हिंदूंच्या विविध वस्त्यांवर हल्ले करत हिंदूंमध्ये व पोलिसांमध्येही दहशत निर्माण केली. पोलिसांनाही पळता भूई थोडी झाली. हे सर्व झाल्यानंतर नेहमीप्रमाणे उशिरा पोलिसांची कुमक शहरात दाखल झाली. तोपर्यंत प्रशासनातर्फे संचारबंदी लागू करण्यात आली. हिंसाचारग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळवले, अशा स्वप्नात प्रशासन शांतपणे झोपले !
त्याच रात्री पुन्हा मुसलमानांनी उचल खात दिवसापेक्षा अधिक तयारीनिशी हिंदूंवर तुटून पडण्याचे धाडस दाखवले. गजानन कॉलनी या हिंदुबहुल शांत भागात संचारबंदी असूनही ५०० हून अधिक मुसलमानांनी बेसावध हिंदूंच्या घरांना अचानक वेढा घातला. घराघरांत घुसून महिला, पुरुष व मुलेबाळे यांना मारहाण करत त्यांना घराबाहेर काढण्यात आले. घरातील साहित्यांची नासधूस करण्यात आली. या नराधमांनी महिलांवर अत्याचार केले आणि घरातील गॅसच्या सिलींडरने घर पेटवून देण्यात आले. अशी ३०० पेक्षा अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यातील २०० कुटुंबांतील रहिवाशांनी अरिहंत भुवनात तात्पुरता आश्रय घेतला. ही कहाणी ऐकून इतरत्रचे हिंदू रात्रभर जागे रहात आपले व आपल्या वस्त्यांचे रक्षण करत राहिले.
सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणार्‍या गृहमंत्र्यांनी पाहुण्यांसारखी शहराला व त्यातही प्रामुख्याने मुसलमान वस्तींना भेट दिली. सरकारीछाप घोषणा केल्या आणि लगेच निघून गेले. त्यांच्या पक्षाचे आमदारही त्यांच्यासोबतच आले आणि त्यांच्यासोबतच गेले व नंतर परत फिरून आलेच नाहीत. गेंड्याची कातडी पांघरलेले करणार तरी काय ? त्या दिवशी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला, तेव्हा हत्यारांनी भरलेली काही वाहने व घरांतही शस्त्रसाठा सापडला. आपल्या बांधवांच्या साहाय्यासाठी मुसलमान पोलिसांनी हातभार लावला. त्यातच सिमीच्या तीन कार्यकर्त्यांना शहरात अटक करण्यात आली. या घटनेमुळे अखेर या दंगलीमागचे डोकेही सिमीचे होते, असे म्हणण्याला वाव आहे. तिसर्‍या दिवशीही संचारबंदीची मुदत वाढवूनही दंगल पूर्णपणे आटोक्यात आली नाही व त्यात ९ जणांची आहुती पडली. ४ हजार ५०० मंडळी निर्वासित झाली. १४ महिलांवर बलात्कार झाले. काही महिलांची, तर वक्षस्थळे कापण्याचा नृशंसपणा या क्रूरकर्म्यांनी दाखवला. ४५ महिला अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांच्या प्रारब्धात काय घडते, याचा वेध आपल्याला घेता येत नाही, अशी आज दु:स्थिती आहे. जे काश्मीरमध्ये १९८९ मध्ये घडले, त्याची पुनरावृत्ती धुळयात आज होत आहे. हिंदू तेव्हाही हरले व आजही हरले आणि मुसलमान व त्यांचे तुष्टीकरण करणारे काँग्रेसी नेहमीप्रमाणे जिंकले ! विजयादशमीच्या वेळी हा पराभव स्वीकारण्याची नामुष्की हिंदूंवर आली, हेच खरे दुर्दैव आहे !
देशाची राजधानी दिल्लीत, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये व महाराष्ट्रातील मालेगावात एकापाठोपाठ झालेले बाँबस्फोट आणि त्यानंतरच्या ठाण्यातील राबोडी परिसरातील व धुळयातील दंगली हा घटनाक्रम काय दर्शवतो ? पुढील काळ हिंदूंसाठी भयावह आहे. सिमीमध्ये असलेल्या व जास्त शिकलेल्या डोक्यांना फक्‍त हिंदूंना संपवण्याच्याच योजना आखण्याचे काम दिले असावे, असे दिसते. दहशतवाद्यांच्या तावडीतून हिंदूंना पोलीस किंवा कोणीही वाचवू शकणार नाही, हे सत्य आता तरी हिंदूंनी लक्षात घ्यावे. हिंदूंनी जातपात, संप्रदाय, संघटना, राजकारण, आरक्षण हे सर्व आपसांतील मतभेद विसरून एकजुटीने कसे राहू, हा एकच विचार करावा. असे झाले तरच आगामी भीषण काळाची नौका पार होईल !

Leave a Reply