काँग्रेसवाल्यांनो, ज्या कारणामुळे देशाची वाताहात होत आहे, त्याविषयी तुमच्या श्रद्धास्थानाचे विचार पहा आणि सद्सद्विवेकबुद्धीने पाऊल टाका !
मोहनदास करमचंद गांधी म्हणतात, “जर माझ्यापाशी सत्ता असती आणि मी कायदा बनवू शकलो असतो, तर सर्व प्रकारच्या धर्मातरांवर मी निश्चितच बंदी घातली असती. खरंतर टाळण्याजोगे अनेक संघर्ष धर्मांतरामुळे उद्भवतात. हिंदु घरातील मिशनर्यांचा प्रवेश म्हणजे वेशभूषा, प्रथा, भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी यात परिवर्तन आणि त्यानंतर कुटुंबाचा विनाश !”(`हरीजन’- ११ मे १९३५)
ओरिसा व कर्नाटक या राज्यांतील ख्रिस्त्यांवरील हल्ल्यांच्या मागे धर्मांतर हे कारण आहे. कायद्याचे उल्लंघन करणार्या कोणत्याही कृतीचा निषेध झालाच पाहिजे; मात्र कोणतीही समस्या मुळासकट दूर करण्यासाठी महात्मा गांधी यांचा सल्ला अवलंबला पाहिजे. महात्मा गांधी यांचा धर्मांतराला तीव्र विरोध होता. धर्मांतरासाठी देशात येणारा निधी थांबवला पाहिजे.
- गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी (८ ऑक्टोबर २००८)


