धुळे येथे मुसलमानांचे हिंदूंवर हल्ले सुरूच; पोलीस हतबल

पोलीस दोन दिवस दंगल नियंत्रित करू न शकणे, हे काँग्रेसच्या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे !

नि:शस्त्र जनतेला लढण्यास सांगणारे पोलीस !

 

 

दोन दिवस दंगलग्रस्त स्थितीवर नियंत्रण न मिळवता आलेले पोलीस सकाळी हिंदुबहुल वस्तीत फिरून सांगत होते की, घरात बसा, तर दुपारी येऊन सांगत होते की, चौकाचौकात थांबा. मुसलमान हल्ला करू शकतात. तो परतवून लावा. (आपली जबाबदारी झटकणारे व हिंदूंना मृत्यूच्या खाईत लोटणारे पोलीस ! – संपादक)

धुळे, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – धुळे शहरात ५ ऑक्टोबर रोजी मुसलमानांनी हिंदु रक्षक समितीच्या फलकावर दगडफेक करण्याचे निमित्त करून पूर्वनियोजन करून सुरू केलेली दंगल आज दुसर्‍या दिवशी सायंकाळपर्यंत सुरू होती. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे व पोलिसांची अतिरिक्‍त कुमक मागवण्यात आली आहे; परंतु नियोजन व व्यवस्थापन यांच्या तीव्र अभावामुळे संचारबंदी लागू करूनही दंगलग्रस्त परिस्थितीवर पोलिसांना नियंत्रण मिळवता आलेले नाही. (मुसलमान दंगलखोर पोलिसांना आवरत नाहीत, याचा अर्थ काय समजायचा ? – संपादक) रात्रभर परिस्थिती ठीक होती. आज या दंगलीचे लोण शेजारील नागाव, वणी, अंबोली अशा छोट्या गावांत पसरले. आज सकाळी पुन्हा मात्र शहरातील अंबिकानगर भागातील हिंदूंच्या घरांवर नजीकच्या मुसलमानांनी हल्ले केले. (संचारबंदीलाही न जुमानणारे मुसलमान ! – संपादक) संचारबंदी असूनही `भडक चाळ’ या हिंदूंच्या चाळीतील घरांना मुसलमानांनी आगी लावल्याचे व `पिंजारी चाळ’ या मुसलमानबहुल चाळीतील काही घरांना हिंदूंनी आग लावल्याचे वृत्त आहे.
“दंगल करणार्‍या मुसलमानांची मानसिकता अतिरेक्यांसारखी होती. मदरशांमध्ये जसे कपडे घालतात, तसे कपडे त्यांनी घातलेले होते. पोलिसांची मदत तब्बल पाच तासांनंतर पोहोचली. गजानन नगर भागातील हिंदूंच्या वस्तीवर लोटगाडीमध्ये दगड भरून मुसलमानांनी हल्ला केला. अंदाजे ५० घरांत घुसून गॅसच्या सिलेंडरचे स्फोट केले व घरांना आगी लावल्या”, असे नवनाथ नगर येथील श्री. कैलास मिस्त्री यांनी सांगितले.

संतोषीमाता कॉलनी या हिंदुबहुल वस्तीतील हिंदूंना दंगलीची माहिती कळताच सर्व हिंदू घरात जाऊन त्यांनी दारे लावून घेतली. (हिंदूंवर ही वेळ येते, याचा अर्थ त्यांना सुरक्षित वाटत नाही. सरकारने हिंदूंना वार्‍यावर सोडले आहे का ? – संपादक) दंगलीच्या काळात वाडीभोकर भागातील एक दर्गा संतापलेल्या हिंदूंनी पाडून टाकला व त्या ठिकाणी रातोरात शिवमंदिर उभारण्यात आले. शहरातील दंगलीचे भीषण स्वरूप पाहून हिंदु रक्षक समितीतर्फे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजित केलेली सभा रद्द करण्यात आली होती.

प्रतिक्रिया :
श्री. सुनील महाले, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस : आतापर्यंत मुसलमानांनी कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हल्ला केला नाही. हा हल्ला पूर्वनियोजित व द्वेषभावनेनेच केला होता.

मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन
धुळे दंगलीच्या प्रकरणी `हिंदु जनजागृती समिती’ आणि `श्रद्धावर्धन व धर्मरक्षा समिती’ यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना धुळे येथे दंगलीस कारणीभूत धर्मांध मुसलमानांवर कारवाई करण्याबाबत निवेदन पाठवले आहे. या निवेदनात म्हटले आहे, `धुळे येथे हिंदु रक्षक समिती यांनी लोकशाही मार्गाने सभा घेण्याचे आयोजन केले होते; पण मुस्लिमांनी सभेचा प्रसार करणारा बॅनर फाडून इस्लामच्या घोषणा देऊन दंगल सुरू केली. या सर्व घटनांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. त्यांना सर्वांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी. तसेच या दंगलीला कारणीभूत असलेल्या साबीर शेख भंगारवाला व इतर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. अचलपूर, चोपडा, रावेर या ठिकाणच्या दंगलीत दरवेळी मुस्लिम तयारीने हल्ला करतात व हिंदूंची हानी होते. ही बाब सरकार शांततेने का पहाते ? मुस्लिम दंगलीची तयारी करत असतांना पोलीस व प्रशासन काय करते ? त्यांनी मुस्लिमांच्या पूर्वतयारीवरच नियंत्रण व निर्बंध घालावेत. त्यासाठी शासनाने वेगळी यंत्रणा निर्माण करावी. हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाने चोखपणे पार पाडावी. हिंदुत्ववादी संघटनांना शासनाने स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण द्यावे व दंगलीच्या काळात दंगल नियंत्रित करण्यासाठी प्रशिक्षण देऊन तरुणांना मदत द्यावी, ही नम्र विनंती.’


श्री. सुनील मिस्त्री, गजानन नगर : आमची कॉलनी मुसलमानांनी उद्ध्वस्त केली. पोलिसांची कुमक सायंकाळी ६ वाजता आली. स्वत: पोलीस अधीक्षकही आमच्या भागात येण्यास मागे-पुढे पहात होते. आमच्या वस्तीतील संतोष घिरडकर ही एक व्यक्‍ती त्याच्या घरात अडकली होती. तिने दार लावले होते. मुसलमान तिच्या घरी आले व दार उघडायचा प्रयत्‍न केला; पण न उघडल्यामुळे पुढे गेले. तेव्हा ते `हिंदूंना दिसताक्षणीच मारायच्या’ गोष्टी करत होते. त्यांच्या हातात धारदार तलवारी होत्या. देवाची कृपा म्हणून मी जिवंत राहिलो, असे संतोष म्हणाला. पहाटेपर्यंत आम्हाला कोणाकडूनही मदत मिळाली नाही. आम्हीच सर्वांनी खिचडी केली व खाल्ली. पहाटे ५० घरातील दंगलग्रस्तांसाठी १०-१५ पोळया प्रशासनातर्फे पाठवण्यात आल्या.

श्री. प्रकाश पाटील, एक दंगलग्रस्त नागरिक : माझ्या मामाच्या घरात मुसलमानांनी मामांची दोन दुचाकी वाहने ठेवली व त्यांना आग लावून दिली. त्यामुळे स्फोटाने सर्व घर पेटले. ज्या मुसलमानांसोबत आमचे मित्रत्वाचे संबंध आहेत,
आमच्या सणावारांना त्यांना सहभागी करून घ्यायचो, त्यांनीच आमचा घात केला.

कु. वैशाली शेगावकर, एक दंगलग्रस्त नागरिक : आमच्या घरात घुसून मुसलमानांनी दूरदर्शन संच फोडला व आम्हाला बळजबरीने घराबाहेर ओढत होते. आम्ही कसेतरी घरात स्वत:ला कोंडून ठेवले व पाच तास जीव मुठीत घेऊन बसलो होतो.

श्री. विशाल कांजरेकर, अंडाकृती बगीचा, देवपूर : मुसलमानांची मानसिकता राक्षसी व अत्यंत क्रूरपणाची होती. हिंदूंवर आक्रस्ताळपणाने तुटून पडत होते. आमच्या वस्तीतील हिंदू रात्रभर जागे होतो. आमच्या वस्तीवर हल्ल्याचा प्रयत्‍न केला; पण आम्ही संघटित होतो व पोलिसांची मदत वेळेत मिळाली म्हणून मुसलमानांच्या तावडीतून वाचलो.


 

गृहमंत्र्यांच्या भेटीचा सोपस्कार : हिंदूंच्या जखमांवर मीठ
दंगलग्रस्त धुळे शहराला गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी आज अत्यंत धावती भेट दिली; मात्र यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी त्यांच्या जखमांवर मीठ चोळल्यासारखे झाले आहे. त्यांनी शहरात पत्रकार परिषदही घेतली. नागरिक ज्या स्थितीतून जात आहेत, त्या स्थितीविषयी गृहमंत्र्यांना काहीच देणे-घेणे नसून त्यांनी केवळ एक शासकीय सोपस्कार पार पाडला, अशीच प्रतिक्रिया स्थानिकांच्या मनात आहे. श्री. पाटील ५० ते ६० गतीच्या वेगात असणार्‍या गाडीतून शहरात फिरले. ते कोठेही खाली उतरले नाहीत. एका हिंदुबहूल वस्तीमध्ये श्री. पाटील अगदी थोडा वेळ थांबले व हिंदूंची अत्यंत जुजबी चौकशी केली. त्यानंतर लगेच आपल्या वाहनातून ते मुसलमान वस्तीकडे रवाना झाले. (दंगल मुसलमानांनी सुरू केली. नुकसान हिंदूंचे झाले; अशा स्थितीतही मुसलमानांच्या तुष्टीकरणाची एकही संधी न सोडणारे गृहमंत्री हिंदूंचे हित जपतील, अशी आशाच नको ! – संपादक)
दंगल सुरू असतांना काँग्रेसचे श्री. रोहिदास पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे
श्री. राजवर्धन कदमबांडे अशा दोन्ही आमदारांनी दंगलग्रस्त भागाला भेट दिली नाही.

 |  मित्रांना पाठवा |

 

  निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!